लेपाक्षी --हम्पी व परत भाग पहिला

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
27 Mar 2020 - 1:01 pm

सुमारे १५ वर्षापूर्वी हम्पी येथे सहकुटुम्ब गेलो होतो. आता २०१९ मधे ज्यावेळी जावे असे ठरले त्यावेळी अगदी हेतू पूर्वक एकट्याने प्रवास करायचे असे मनाने घेतले. त्यातून मतभेद,सहल सदस्यांचे पुढे मागे चालणे टाळता येऊन पुरते निर्णय स्वातंत्र्य मिळते असा अनेकांचा अनुभव आपण ही घेऊन पहावा असे वाटले.
हम्पीला जायचे तर सीझन टाळून पण अगदी पावसाळा व अगदी उन्हाळा असे ही न करता. मग २२ ते २३ सप्टेंबर हा मुहूर्त निघाला. साधारण पणे ५ सप्टेम्बर ला राजस्थान मधून पावसाळा परत फिरतो हे गृहित धरता कर्नाटकातील हम्पी ची सुटका पावसाळा २३ सप्टेम्बरला करील असा आडाखा मी बांधला होता. पण हिटलरची रशियावरची स्वारी काय व माझी विजयनगर वरील स्वारी काय ,निसर्गाने अकाली ठरवली. जुलै मधेच रेल्वे आरक्षण व हॉटेल बुकिंग केले होते. पण २१ सप्टेम्बर झाला तरी मान्सून काही आवरते घेण्याचे लक्षण प .भारतात दिसत नव्ह्ते. आता काय होईल ते जाईल अस विचार करून सहल काही केल्या रद्द करायची नाही असे ठरविले.

हम्पीला पुण्याहून दोन मार्गाने जाता येते. एक सोलापूर गुंटकल असा मार्ग तर दुसरा , मिरज हुब्ळी गदग असा मार्ग. एकच दगडात अनेक पक्षी अशी माझी प्रवास आखणी असते. नैनीताल ( काठगोदाम ) सह चन्दीगढ , माउन्ट अबू सह , जेसल्मेर ,जोधपूर, तसेच जयपूर ग्वालियर सह ओर्छा ही त्यातील काही उदाहरणे.गेल्या वेळी हम्पीला जाताना हैद्राबाद रामोजी फिल्म सिटी असा बेत पार पाडला होता. यावेळी जोडून लेपाक्षी व बेळ्ळारी घ्यावे असा बेत पक्का केला.

पुण्या हून सोलापूर मार्गे हिन्दुपूर असे तिकिट काढले. हिंदूपूर गुन्टकल मार्गे होस्पेटे असे तिकिट काढले व होस्पेटे मिरज मार्गे पुणे असे तिकिट काढले, मेक माय ट्रीप तर्फे गोपी गेस्ट हाउस हम्पी येथे दोन दिवसाचे निवासाचे बुकिंग केले. व दि २३ /९/२०१९ ला उद्यान एक्स्प्रेस ने पुण्याहून प्रस्थान केले.


.

.

.
अलिकडे रेल्वे स्टेशन मधे मोठमोठी पेन्टिन्ग काढली जात आहेत , ही हिन्दुपूर स्टेशन मधील आहेत.
२४ सप्टेंबर ला भल्या सकाळी हिंदूपूरला उतरलो. क्लोकरूमची सोय नसतानाही " मी माझ्या जोखमीवर बॅकपॅक ठेवतो ! " असे म्हटल्यावर मला एक १५ रू चे क्लोकरूम तिकीट रेलवे कडून मिळाले. मला हायसे वाटले. कारण आता मी हलका झालो होतो. स्टेशनच्या बाहेर आलो . लेपाक्षीला जाण्यासाठी ३ किमी वर बस स्टॅण्ड आहे हे ठाऊक होते. उन्हे पडली होती तरी रात्री जोरदार पाऊस झाला होता त्याची चिन्हे रस्ता दाखवीत होता. रिक्षा करून दहा मिनिटात बस स्थानक गाठले . स्थानक कसले एक अडडा . रंगीबेरंगी बसेस उभ्या .चौकशी करता लेपाक्षीची बस १० मिनिटात येईल असे कळले. हिंदुपूरातील स्थानिक बाया नोकरीवर जाण्यासाठी जमल्या होत्या . बस आल्यावर हिंदी येणाऱ्या एका महिलेला विचारून खात्री करून बस मध्ये बसलो . आरामशीर सीट्स . बाहेर हिरवागार नजारा. रस्ता रुंदीची कामे जोशात . एका माणसाला लेपाक्षी आले की सांगा असे खुणावून तिकीट घेतले. १३ किमी साठी फक्त १० रू . महाराष्ट्र किती महागडे राज्य आहे याचा प्रत्यय घडोघडी येण्याची सुरुवात झाली होती.

वीसेक मिनिटात १३ किमी चे रम्य अन्तर पार झाल्यावर लेपाक्षी गावातील शाळा काही सरकारी कार्यालये असे काही दिसू लागल्यावर मी धोपटी उचलली व योग्य जागी उतरलो . गावात फारशी खाण्याची काही सोय नाही हे अगोदर माहीत होते. हिंदुपूरला ही कोणत्या ही प्रकारचा नाश्ता मिळण्याचे काही जमले नव्ह्ते. येथील प्रसिद्ध असे एकच ठिकाण ते म्हण्जे गावातील वीरभद्राचे प्रचण्ड मन्दीर. ते मात्र अगदी जगप्रसिद्ध आहे. येथील एक खांब म्हणे तरंगता आहे .त्याखालून टॉवेलच्या आकाराचे पूर्ण वस्त्र इकडून तिकडे जाते .


.

वर्षानुवर्षे हा" चमत्कार" मानणार्‍याचे डोळे खाडकन उघडले जेंव्हा एका ब्रिटीशाने सत्य शोधण्याचा ध्यास घेतला . हा खाम्ब तरंगता नाहीच. एका जागी जमीनीला टेकलेला आहे पण आड्वे पडूनही ती जागा डोळ्यांना दिसत नाही. मी ही हा खांब पाहिल्यावर माझी पनामा कॅप त्याखालून घालून फिरवून बाहेर आणून पाहिली.

.

.

.

.

.

१०

.

११

.

१२

.

१३

.

१४

.

१५

.
वीरभद्र मंदिराकडे जाताना एक दिलासा देणारी पाटी दिसली . सदर पाटी आंध्र प्रदेश टूरिझम तर्फे राहण्याची , जेवण्याची नाष्ट्याची सोय आहे असे सांगत होती. मंदिराच्या वीसेक पायऱ्या चढून गेलो .एकदा वाटले मंदिर प्रथम पाहून घ्यावे पण पोट काही वेगळेच संकेत देत होते. मग देवळाच्या बाजूने चालत जात टूरिझम च्या उपहार गृहाची चौकशी करीत निघालो .

१६

.

१७

.

१८

.

१९

.

२०

.

२१

.

२२

.

२३

.

२४

.

२५
.

२६

.

२७

.
समोर एका प्रचंड धोंड्यावर विराजमान झालेला पण उडण्याच्या तयारीत आहे अशी पोझ असलेला वीसेक फूट उंचीचा " जटायू " सकाळाच्या सोनेरी उन्हात न्हाऊन निघत असलेला दिसला. एका टेकाडावर दोन तीन साधारणा तीस फूट व्यासाचे फिकट तपकिरी रंगाचे धोंडे अगदी रचल्यासारखे आहेत. त्याकडे प्रथम दगडी व नंतर लोखंडी जिन्याने जायची व्यवस्था आहे.

मसाला डोसा व वर मस्त घट्ट कॉफी गट्ट करून बाहेर येताना निवासाची चौकशी केली .येथे ९९९ रूपयात डबल बेड वातानुकुलित रूम्स पर्यटन विभागाने उपलब्ध करून दिल्या आहेत. शेजारीच एक लहानशी पण सुरेख बाग आहे.
२८

.

२९
.

३०

.

३१

.

३२

.


बागेत एका धोंड्यातून जागेवरच १५ फूट उंचीचा नन्दी कोरला आहे. दक्षीणेतील इतर नंदीप्रमाणे हा काळ्या रंगाचा नाही , चांगला मस्त बदामी रंगात आहे. बागेत बारीकसे तळे आहे त्यात अत्यंत देखणी अशी कमळे फुललेली दिसली त्यांचे प्रतिबिंबासकटचे फोटो काढून झाले. दूरवर नंदीमागे एका धोंड्यानी बनलेल्या टेकाडावर जटायू चा पुतळा उडण्याचा बेतात अशी पोझमध्ये विराजमान झाला आहे.
सकाळचे ९ वाजता जटायू कडे जाण्याचा दरवाजा उघडतो असे चौकशी करता समजले. मग त्या परिसरात प्रवेश करून १० रु चे तिकीट काढले व तेवढ्यात तीन माणसे समोरून येताना दिसली. मी कोण कुठचा वगॆरे चौकशी करून झाल्यावरती " कर्नाटक " हे माझे पर्यटनाच्या बाबतीत सर्वात लाडके राज्य आहे असे मी त्यांना सांगितल्यावर त्यातील एकाने माझे हस्तान्दोलन केले व आपली ओळख करून दिली " डेप्यु , डायरेक्टर आन्धर टूरिझम ! " अर्थात आन्धर देखील फार सुरेख राज्य आहे असे मी लगेचच म्हटल्याने त्याला काहीसे बरे वाटले असावे. तो काही इंस्पेक्शन साठी आला होता. या धोंडाटेकडी ची बाग ही सुंदर केली आहे . गरुडा पर्यंत जाण्यासाठी प्रथम फरसबंदी व नंतर लोखंडी जिना केला आहे . जटायू असलेल्या धोंड्यावर जाणारा जिना सर्वासाठी खुला नाही . मी लोखंडी जिन्याची दुसरी तिसरी फ्लाईट चढून नजीकच्या धोंड्यावर गेलो . इथे कोणताही अपघात होऊन प्रवासी क्षतिग्रस्त होऊन नये म्हणून लोखंडाचे मजबूत रेलिंग केले आहे. वरून दूरवर र पहाता धोंड्या धोंड्यानी विभूषित टेकड्या दिसत होत्या . खाली पहाता लेपाक्षी गावाचा मर्यादित असा पसारा व समोर वीरभद्र देवालयाची पूर्वेकडची बाजू.
३३

.
लेपाक्षी हे एक लहानसे गाव आहे त्यात वीरभद्र हेच एकमेवा देवालय लोकांनी मुद्दाम येऊन पाहावे असे आहे . म्हणून अधेकाधिक टूरिस्ट येण्यासाठी देवालयाजवळच हे जटायू स्मारक एक आकर्षण या स्वरूपात पर्यटन विभागाने उभे केले आहे .

क्रमशः -- पुढील भागात धोंडा टेकडी

प्रतिक्रिया

सुरुवात झकास आणि एकटेच फिरणार म्हणजे सर्व दाखवणार हे नक्की.
(फोटो उमटले नाहीत.)

वर्णन डिट्टेलवार पण फोटू एकही दिसत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2020 - 2:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:(

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

27 Mar 2020 - 2:42 pm | प्रचेतस

गूगल फोटोज मध्ये शेयरिंग मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. धागा संपादित करून पहिल्या फोटोची युआरएल परत टाकून पहा बरं तो फोटो दिसतोय का ते.

चौकटराजा's picture

27 Mar 2020 - 2:49 pm | चौकटराजा

मला सगळे दिसताहेत , ब्राउजर क्रोम वापरला आहे त्यामुळे शेअरिग ला काही गडबड ?

तुमचं लॉगिन असल्याने तुम्हाला दिसतातच.

कंजूस's picture

27 Mar 2020 - 3:18 pm | कंजूस

अल्बमपुढे 'shared' दिसले पाहिजे.

तुमचे फोटो तुम्हाला दिसणारच हो.
१) गूगल फोटोज मधले पहिले एक दोन सिलेक्ट करा>>add to album>> album title>>create>>options >>share>>ok>>sharing link created.
२) Go back to albums >> आता त्यामध्ये हा अल्बम दिसेल आणि पुढे "shared" दिसले पाहिजे. तो उघडा आणि +वर क्लिक करून आताचे सर्व add kara.
३) Go back to albums >>> हा पुन्हा उघडा आणि त्यात हे सर्व फोटो दिसले पाहिजेत. >>मग एकेक फोटो वेगळा उघडून 'copy image location'. करून ती नवी लिंक इथे प्रत्येकाची बदलावी लागेल. [ khup google user content वाली]

लेपाक्षीचं दर्शन लवकर करवा. आज तीज आहे.

फोट दिसत असले तर सान्गा म्हण्जे पुढचे टाकतो .

चौकस२१२'s picture

27 Mar 2020 - 4:28 pm | चौकस२१२

२ दिसत आहेत

vishalk's picture

27 Mar 2020 - 4:30 pm | vishalk

2 फोटो दिसत आहेत

कंजूस's picture

27 Mar 2020 - 5:36 pm | कंजूस

आले २२

प्रचेतस's picture

27 Mar 2020 - 6:26 pm | प्रचेतस

पहिला भाग सुरेख झालाय. लेपाक्षी मंदिर व परिसर आवडला. हंपीसारखेच थोर प्रस्तरखंड दिसताहेत. पुढचा भाग लवकर येऊ द्यात.

फुलांचे आणि कावळ्यांचे कमी केले तरी चालतील. - (२५ ते ३१)
आजून बरेच गायब आहेत.
क्र चार टोपी खांबाखाली हा पुढच्या भागासाठी असावा.

चौकटराजा's picture

28 Mar 2020 - 8:45 am | चौकटराजा

फायफॉक्स वापरला तर सर्व फोटो दिसतात पण क्र्रोम वापरला तर २२ च !

सहमत मंदिरांचे / निसर्ग वैगरे बघायला जास्त आवडेल

कंजूस's picture

28 Mar 2020 - 9:03 am | कंजूस

तसं नाही. क्र ११ ची लिंक कोणत्याही ब्राउजरात उमटत नाही. ती लिंक शेअर्ड अल्बम उघडून त्यात फोटो दिसल्यावर फोटोवर क्लिक करून नवीन घ्या.
क्र १० - झाडांचा रस्ता - सर्वठिकाणी दिसतो.

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2020 - 1:34 pm | चौथा कोनाडा

सुंदर भटकंती वृत्तांत ! मजा आली !
मला ३३ पैकी २२ फोटो दिसले, १२ फोटो दिसले नाहीत. (क्रोम मध्येपण) सगळेच फोटो भारी आहेत.
"तरंगता खांब" जमिनीला टेकलेला आहे हे प्रथमच कळले.
खडकांचे, कमळाचे, नंदी आणि जटायू स्मारक यांचे फोटो खूप आवडले.

चौरा साहेब, पुढचा भाग टाका लवकर !

कंजूस's picture

28 Mar 2020 - 7:19 pm | कंजूस

Album photos
A 1)

A 2
अल्बममधून फोटो येत आहेत.

किल्लेदार's picture

21 Apr 2020 - 5:31 pm | किल्लेदार

हा धागा बघायचा राहून गेला.. (आणि हे ठिकाण पण). आरामात वाचतो