लवकर शहाणे व्हा!

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
26 Jan 2020 - 11:16 am

लवकर शहाणे व्हा!
============

निर्भयाच्या बलात्का-यांना फाशी लवकरच होईल, पण बलात्कार थांबणार नाहीत. ते चालूच राहतील. जोपर्यंत "किडक्या प्रजे"ची निर्मिती थांबत नाही, तोपर्यंत बलात्कार चालूच राहणार...

माणसाचा विवेक जगण्याच्या ताणातून संपतो, शरीराला (पर्यायाने मेंदूला) सडवणा-या पर्यावरणातून तो संपवला जातो. धान्याला किड लागली की धान्य निवडून किड संपत नाही. धान्याला उन दाखवावे लागते, धान्य साठवायची (पर्यावरण) जागा बदलावी लागतो. दोन-चार बलात्का-यांना फाशी हे फक्त डब्यातून बाहेर येणारे पोरकिडे चिरडून टाकण्यासारखे आहे कारण बाकी डबा किड्यांसकट सडक्या धान्याने भरलेला तसाच राहतो.

Whistle-blower ची कुचेष्टा करणारा समाज हा सहसा चुकीच्या गृहितकांना कुरवाळत राहतो. मूळ प्रश्न नाकारत राहतो किंवा सिक्रेट ग्रुपमधून कुचेष्टा करत राहतो. फार काही मिळवले जात नाही. चुकीची गृहितके केळ्याच्या साली सारखी असतात. कधी आपटवतील सांगता येत नाही.

दीर्घायुष्याची रहस्ये शोधताना शरीरांतर्गत (जनुकीय देणगी) आणि बाह्य घटकांचा (आहार जीवनशैली, सामाजिक घटक) अभ्यास केला जातो. तसा बलात्कार कमी असलेल्या प्रदेशांचा अभ्यास केला जातो का?

लवकर शहाणे व्हा!

https://medicalxpress.com/news/2020-01-high-air-pollution-exposure-one-y...

संदर्भ : https://www.misalpav.com/node/42260

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

28 Jan 2020 - 8:59 am | युयुत्सु

धन्यवाद! पेपर वाचला. माझ्या मूळ मुद्द्याला (ताणाचा आणि पर्यावरणाचा मेंदूच्या रचनेवर होणारा परिणाम) त्यामुळे धक्का बसला आहे असे वाटत नाही. "Abnormal white matter integrity" ची कारणे पण कदाचित ताण आणि पर्यावरणात सापडतील.