उभे गाढव मुकाबला

Primary tabs

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in जनातलं, मनातलं
7 Jan 2020 - 6:00 pm

शीर्षक वाचून आपणास हा लेख जलिकट्टी व तत्सम चुरसदार खेळाची माहितीपट आहे अशी अपेक्षा असेल तर आपला अपेक्षाभंग होऊ शकतो. सहसा अशी वाक्ये तळटीप म्हणून वापरतात परंतु लेखाच्या सुरवातीलाच असे वाक्य टाकण्याचे 1च कारण !वाचकसंख्या वाढवण्यासाठी थोडा "धुरळा " उडवायचा होता.

धुरळा हा समीर विद्वंस दिग्दर्शित चित्रपट ३ जानेवारीला प्रदर्शित झाला .२०-२०च्या जमान्यात नव-वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटाने झाली. चित्रपट पाहिला नि आवडला सुद्धा. धुरळा चित्रपटाची स्टारकास्ट तगडी आहे. चित्रपटाची कथा थोडक्यात अशी,सरपंच निवृत्ती उभे हे अनेक वर्षे बिनविरोध निवडून येत आहेत आणि आता शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेचा वारस कोण यावर हि चित्रकथा रंगवली आहे. निवृत्ती यांचे सख्ख्ये नि सावत्र मिळून ३ वारस. तिघांच्या तीन तरहा ! संयत, भडक नि कुटील राजकरण यात रंगवून दाखवण्यात आले आहे. आधी सांगितल्याप्रमाणेच चित्रपटात अनेक सितारे आहेत पण चित्रपटात एकही तारखेच्या व तारकाच्या तेजाने दुसरा झाकोळून जाणार नाही याची दिग्दर्शकाने काळजी घेतली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेला आवश्यक तितके महत्त्व देण्यात आले आहे.
सइ ताम्हणकर नि सोनाली कुलकर्णी असल्यामुळे वेगळ्या आयटम गर्ल ची गरज नाही असे वाटू शकते. पण राजकारणावर आधारित ग्रामीण बाजाचा चित्रपट असूनही एकही लावणी वा द्वयर्थी गाणे दिग्दर्शकाने “कथेची आवश्यकता “ म्हणून घुसडले नाही. चित्रपटात केवळ २च गाणी आहेत व ती कथेला पूरक आहेत. सई ताम्हणकर नि सोनाली कुलकर्णी चित्रपटात आहेत पण ९९.९९ % साडीत वावरलया आहेत. सईचा संयत नि सोनालीचा आवश्यक तितका भडक अभिनय लक्ष्यात ठेवण्याजोगा आहे. चित्रपटाचे नेपथ्य नि संपादन उत्तम आहे. उदय सबनीस नि उमेश कामात हे पाहुण्या भूमिकेत असले तरी छाप पडून जातात. प्राजक्ता हनमघर ला तसा विशेष वाव नाही. सामना रंगतो खरा तो म्हणजे अंकुश नि प्रसाद मध्ये पण अनिकेत नि सिद्धार्थ त्याला आपल्या परीने फोडणी देतात. सुलेखा तळवलकर नि अलका कुबल यांनी आपल्या भूमिका उत्कृष्ठ रित्या वठविल्या आहेत. चित्रपटातील अनेक प्रसंग लक्ष्यात ठेवण्यासारखे आहेत . “उमेश नि अंकुश मधले चित्रपटाच्या सुरुवातीस रंगलेला संवाद असो ” व दीर नि वहिनीतील चहा पितांनाच संवाद असो “ वा “ किंगकाँग नि माकडाचा संवाद असो असे अनेक प्रसंग उत्तमरीत्या रंगवण्यात आले आहेत. सुनील तावडेंचा सुद्धा एक सुंदर cameo आहे. निवडूणीकीतील धुमाकूळ, गावातील धर्मसत्ता नि राजसत्ता यांचा शीत संघर्ष नि त्याला असलेली घरभेदींची साथ उत्तमरीत्या दाखवली आहे.
नववर्षाचा धुराळा बसण्यागोदरच हा धुराळा स्व-नयनांनी विशाल पडद्यावर पाहावा.

नोंद - उभे नि गाढवे अशी गावातील दोन सत्ताकेंद्रे आहेत

मांडणीकलाप्रकटनविचारसमीक्षालेख

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

7 Jan 2020 - 7:53 pm | Nitin Palkar

चित्रपट पहावासा वाटायला लावणारे समीक्षण.

कुमार१'s picture

7 Jan 2020 - 7:56 pm | कुमार१

आवडले !

मुक्त विहारि's picture

8 Jan 2020 - 6:57 am | मुक्त विहारि

पण परिक्षण आवडले.

विअर्ड विक्स's picture

8 Jan 2020 - 2:47 pm | विअर्ड विक्स

Thanks for encouraging