वडिलांची सेवानिवृत्ती | मदत / मार्गदर्शन

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in काथ्याकूट
15 Nov 2019 - 9:55 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरांनो,

माझे वडील ऑक्टोबर महिन्यात सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेत. त्या संदर्भात मला काही प्रश्न आहेत. आशा करतो की मिपाकरांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.
आत्ता तरी त्यांना कुठलाच मोठा आजार नाहीए, वयोमानाप्रमाणे होणारे छोटे मोठे आजार झालेले आहेत. काही कारणामुळे ते गाडी चालू शकत नाहीत. तरी पार्श्वभूमी लक्षात घेऊन मदत व्हावी.

१) गुंतवणूक :

जी काही रक्कम आली असेल त्याची विभागणी कशी करावी? आणि कशा प्रकारे गुंतवणूक करावी? उदाहरणासाठी म्हणून मी एक लाख रुपये मिळाले असं गृहीत धरतो. मला असं वाटतंय की त्यापैकी 70000 हे पोस्ट वा बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवावेत. 20000 हे मध्यम धोका असलेल्या गुंतवणूक पर्यायात गुंतवावेत. व 10000 जास्त धोका असलेल्या पण जास्त रिटर्न्स मिळू शकत असलेल्या गुंतवणूक पर्यायात गुंतवावेत. हा 70 20 10 फॉर्मुला तुम्हाला योग्य वाटतो का ? 20% मध्ये नेमके कोणते पर्याय येतील ? 10% नेमकी कुठे गुंतवावेत. त्यांना दरमहा जवळपास तीस हजार रुपये पेन्शनच्या रूपात मिळतील त्यामुळे दैनंदिन खर्च चालवण्यासाठी गुंतवणूक नाही केली तरी चालेल. पुण्यात नसलं तरी परभणी हिंगोली सारख्या छोट्या गावात घर आहेत. त्यामुळे रहाण्याचा खर्च नाही. त्यांची राहणी पण अतिशय साधी आहे. म्हणजे तो पण खर्च खुप कमी आहे.

२) वेळेचा सदुपयोग :

यानंतरचा मोठा प्रश्न येतो तो म्हणजे वेळेचा उपयोग कसा करावा ?
पुण्यामध्ये अशा काही संस्था आहेत का, जिथे स्वयंप्रेरणेने काही काम करता येईल ? त्यापासून उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा नाही.पण कामाचा ताण नसेल असा काही पर्याय सुचतो का ? मला एक पर्याय असा पण सुचतो की घराच्या जवळपास एक छोटसं दुकान टाकून द्यावे. खूप जास्त अर्थार्जन व्हावं असं नाही पण वेळ आनंदात जावा. खूप जास्त मेहनत नसलेले अजून काही पर्याय सुचतात का?

३) आरोग्य विमा :

आरोग्य विमा बाबत काय विचार करावा आत्ता आई-वडिलांचा मिळून फक्त दोन लाखाचा आरोग्य विमा आहे ज्याचे पैसे माझ्या पगारातून जातात. यावर वार्षीक जास्तित जास्त किती खर्च करावा ?

याशिवाय अजुन काही गोष्टींचे स्वागतच आहे.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

16 Nov 2019 - 5:00 am | कंजूस

चांगला धागा आहे.
१) पेन्शन असल्यामुळे अधिक रिटनवाली गुंतवणूक टाळावी हे माझे मत. सध्या दहा/अकरा टक्केवालीसुद्धा भरोसेलायक वाटत नाही.
२)दोन तीन ठिकाणी काम सुरू करून अनुभवावरून तिकडे जाणे उत्तम.
३) आरोग्य विमा - यावर मी एक धागा काढला होता त्यात बऱ्याच जणांनी विचार व्यक्त केलेत. साठ +, पासष्ट + नंतर हप्ते फारच वाढवतात.
४)गावाकडच्या घराकडे जाऊनयेऊन राहाणे हा एक विरंगुळा होईल.
त्यांचे सेवानिवृत्त आयुष्य मजेत जावो.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Nov 2019 - 10:49 am | प्रकाश घाटपांडे

क्रमांक २ साठी त्यांचा पिंड काय आहे हे महत्वाचे आहे. त्यानुसारच ठरवता येईल.

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2019 - 2:54 pm | चौथा कोनाडा

कंजूस यांचा आरोग्य विमा धागा खाली दिलाय, माहितीपुर्ण आणि महत्वपुर्ण आहे, सर्वांनाच उपयोगी पडेल !

मेडिकल हेल्थ इन्शुअरन्स २०१८_१९
https://www.misalpav.com/node/43127

थॅन्क्स कंजूससाहेब !

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2019 - 3:15 pm | चौथा कोनाडा

२) वेळेचा सदुपयोग :

दुकानाची आयडिया बरी आहे, पण जास्त धावपळ, ताणतणाव नसावेत.
आमच्या परिसरात एका मनपामधील निवृत्त आजींनी गोळया बिस्किट असलं साधी टपरी टाकलीय. सकाळ संध्याकाळ उघडते. काय टेन्शन नाही,
किंवा एखादा बिनकटकटीचा पार्टटाईम जॉब देखिल बरा पडेल.

कंजूस's picture

16 Nov 2019 - 5:50 pm | कंजूस

दुकानाची कमाई -

दिवसाला हजार रु गल्ला जमला तर शंभर रु ढोबळ आवक. त्यातून वीज, तूटफुट वजा करा. फक्त शेवा.

लेखाच्या मुद्दा क्रमांक ३ च्या अनुषंगाने

मी कंजूस साहेबांचे "मेडिकल हेल्थ इन्शुअरन्स २०१८_१९" हा धागा वाचला. माझा स्वतःचा star चा आरोग्यविमा आहे जर या कंपनीच्या क्लेम पॉलिसिवर कोणी प्रकाश टाकत असेल तर मला मदत होईल. डॉक्टर खरे यांचे मत वाचायलाही आवडेल

कंजूस's picture

20 Nov 2019 - 6:01 am | कंजूस

माझा स्वतःचा star चा आरोग्यविमा आहे जर या कंपनीच्या क्लेम पॉलिसिवर कोणी प्रकाश टाकत असेल

- आकाश कंदील.

तरुण वर्गासाठी विमा हवाच. त्याचे हप्ते कमी असतात आणि गरजही आहे. Star कंपनीबद्दल ( किंवा इतर आरोग्य विमा देणारी) माहीत नाही. जेव्हा कुणी भरपाई मागतात तेव्हाच कळणार आहे किती टक्के देतात, टाळाटाळ करतात का वगैरे.

Religere. नावाची एक कंपनी सध्या चर्चेत आहे कारण काही अफरातफर ( ४-५ हजार कोटी) झाल्याने एकाला अटक झाली आहे. म्हणजे असं की यांचे हप्ते कमी असले तरी कंपनीचं सांगता येत नाही. तसं आपलं नुकसान त्या वर्षाचा विमा क्लेम डुबणे एवढेच मर्यादित राहणार. दुसरा विमा काढावा लागणार.

माझ्या लेखातला मुद्दा हा साठ/पास/+ वयाच्या लोकांसाठीचा होता. हप्ते मोठे आणि भरपाईला क्यापिंगचा जामर असतो. मग तसा काहीच उपयोग नसतोच. शिवाय फक्त हॉस्पिटलमध्ये राहावे लागल्यास भरपाई. ज्ये नागरिक इतरही बरीच औषधे घेत असतात (हजार दीडहजाराचीही) तो खर्च वेगळा.

सुबोध खरे's picture

20 Nov 2019 - 9:36 am | सुबोध खरे

साठ/पास/+ वयाच्या लोकांसाठीचा

गाडी जुनी झाली कि त्याच्या देखभालीचा खर्च वाढतच जातो म्हणून आपण गाडीचा विमा उतरवणे बंद करतो का?

आकस्मिक होणाऱ्या मोठ्या खर्चामुळे आपले अंदाजपत्रक साफ कोलमडू नये म्हणून विमा असतो.

( गाडी जुनी झाली तर तिच्या जागी नवी घेता येते परंतु शरीर जून तरी पूर्ण बदलता येत नाही)

दर महिना होणारा खर्च हा विम्यातून निघेल अशी अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे मग तो गाडीचा विमा असो किंवा आरोग्य विमा

विम्यातून कोणी जर "फायदा काय" असा विचार करत असेल तर ते मुळातच चूक आहे.

गाडीचा जसा विमा असतो परंतु त्याचा वापर करायला लागू नये अशीच सर्वांची इच्छा असते तसेच आरोग्य विम्याचे आहे.

आरोग्यविमा आपल्याला वापरायला लागू नये परंतु तो वापरायची वेळ आली तर आपले आर्थिक नियोजन साफ कोलमडू नये या साठी आरोग्यविमा आहे.

सुबोध खरे's picture

20 Nov 2019 - 9:29 am | सुबोध खरे

https://www.insurancedekho.com/health-insurance/articles/best-health-ins...

येथे आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे आकडे पाहू शकता.

सिरुसेरि's picture

20 Nov 2019 - 7:55 pm | सिरुसेरि

70 20 10 फॉर्मुला -- एक विचार असा --

70% - FD , 20% - Debt based MF , 10% - हाताशी ( म्हणजे सहजपणे emergency ला उपलब्ध होतील ) असे ठेवावे .

बापू मामा's picture

20 Jan 2020 - 12:57 pm | बापू मामा

नमस्कार, मलाही मार्गदर्शन हवे आहे. वय ५७, सुतगिरण्यात कामास होतो. ५४ व्या वर्षी जीवघेणा अपघात ग्रस्त. नौकरी गेली. नवीन मिळणे नाही. पत्नी गृहिणी, मुलगा व मुलगी विवाहित होऊन चिंचवड ग्रामी. स्वतःचे वर्धा येथे स्वकष्टार्जीत घर अंदाजे ३० लाखचे. इ.पी.एफ ओ ची पेन्शन दरमहा १२३४/-, एल.आय.सी.त सर्व गुंतवणूक. भरायला पैसे नाहीत.सरेंडर केल्यास दहा लाख मिळतील.
हे दहा लाख कुठे गुंतवावे जेणे करून सध्याच्या महागाईत दरमहा दहा हजार व भविष्यात किमान २५ वर्षे जगल्यास दरमहा २० हजार मिळतील?
रिवर्स मॉरगेज मध्ये घर(३० लाखाचे)गहाण ठेवल्यास किती मिळतील? दोघांच्या मृत्यूपर्यंत राहता येईल ना? त्याचे बाजार भावाच्या कितीपर्यंत मिळतील? व रिवर्स मॉरगेज साठी वय काय लागते? कोणती बॅंक हे देते?

चौथा कोनाडा's picture

31 Jan 2020 - 5:43 pm | चौथा कोनाडा

हे दहा लाख कुठे गुंतवावे जेणे करून सध्याच्या महागाईत दरमहा दहा हजार व भविष्यात किमान २५ वर्षे जगल्यास दरमहा २० हजार मिळतील?

हे पैसे जास्त व्याजासाठी इतरत्र गुंतवणे अतिशय धोक्याचे ठरू शकते. जास्त व्याजामागे जाऊन मुद्दलही बुडाल्याच्या अनेक घटना पाहण्यात आहेत (उदा: लॉयड फायनान्स, डीएसके, पॅनकार्ड क्लब इ) मला वाटते एल.आय.सी.तच हे पैसे सुरक्षित आहेत.

रिवर्स मॉरगेज मध्ये घर(३० लाखाचे)गहाण ठेवल्यास किती मिळतील?

जवळच्या स्टेट बॅन्केत घराचही कागदपत्रे घेऊन तपशिल घ्या, आणी निर्णय घ्या.
खालील लिंकवर प्राथमिक माहिती आहे.
https://homeloans.sbi/products/view/reverse-mortgage-loan

काही वर्षांनी इतर देशाप्रमाणे तुमचे पैसे बँकेत ठेवायला फी (उलट व्याज/नेगटिव इंटरेस्ट )देण्याची टूम भारतात येऊ शकते. ) सध्याचे सात - आठ टक्के हे देणेसुद्धा सरकारला जड जात आहे.
बँका उद्योगधंद्यांवळ चालतात तेच डुबत आहेत. चीनच्या ड्र्यागनचा विळखा जबरदस्त आहे.

चौकटराजा's picture

1 Feb 2020 - 8:20 pm | चौकटराजा

जसजसा विकास होतो म्हणजेच जीडीपी वाढत जातो तितक्या प्रमाणात लोकांकडून उधळपट्टी वाढत नाही , विकास होताना अनेक नवी तंत्रे लोकांचा रोजगार बुडवीत जातात . वी आर एस चे कारण हेच आहे. दुसरे असे की कंपन्यांना स्पर्थात्मक जगात जगावे लागते .त्यात काटकसरीचा सर्वात सुलभ उपाय म्हणजे नोकर कमी करणे .आता तर सरकारने आय पी ओ काढून एल आय सी तून देखील अंग काढून घेण्याचे ठरविलेले आहे. उद्याच्या रोजगाराची शाश्वती असणे हो मानवी कुशलतेवर जेवढे अवलंबून आहे तेवढेच ते मानसिकतेवर ही अवलंबून आहे .जेट एअरवेज , व्हिडीओकाँन ,सहारा डी, एस के , किंगफिशर हे गाळात गेलेले असताना देखील माझी छोटी आय टी कम्पनी मात्र आणखी शंभर वर्षे जगणार आहे अशा खोट्या आशेवर लोक जगात आहेत .२० २० वर्षांची कर्जे डोक्यावर आहेत .याउलट काही लोकांना या येऊ घातलेल्या भयानक संकटाची चाहूल लागली आहे . अशा अर्थाने मानसिकता ही महत्वाची आहे ! उधळे व आशावादी लोक उधळपट्टी करतात त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते .काटकसरी व भित्रे लोक पैसे साचवून ठेवतात. गरजावर नियंत्रण ठेवतात . असे पैसे बाजारात आले की, पैसा ही देखील कमोडिटी आहे .सप्लाय जास्त किंमत कमी . व्याज ही पैशाची किंमत असते . ते अशा अतिरिक्त पैशामुळे खाली खाली जाते . ज्याची लोकसंख्या जास्त आहे त्यात काळाच्या गरजेमुळे नवीन कुशलता काही लोक आत्मसात करतीलाही पाटणा ज्यात काही कुशलताच नाही अशी बी कॉम वाली मंडळी जबर मारा खाणार आहे. आता बँकेमध्ये माझा फार्मसीचा पदवीधर असलेला मित्र ऑफिसर आहे ! आता बोला ! बी ई झालेला इंजिनीअर बँकेत व्यवस्थापक झाला तर आस्चर्य वाटायला नको !