बेंगलोर ट्रिप मधे काय का पहावे ??

अर्पित's picture
अर्पित in भटकंती
18 Oct 2019 - 3:59 pm

मी सहकुटंब 21 डिसेंबर ते 30 डिसेंबर रोजी बंगलोर जायची योजना केली आहे.

बेंगळुरू मधे मित्रचया घरि रहनार आहे पन काही दिवस जवळपास भटकंती करायचा मानस आहे।

दिमातीला मित्रचि गाडी आसेलच.

मित्र सोबत नसताना सुधा आसपस कुठे फिरता येईल त्यासाथी मार्गदर्शन करावे.

अंतरजलावर पहिल्यनादा मराठी लिहितोय त्यामुले शुद्धलेखनासाथी माफी असावी

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2019 - 4:43 pm | चौथा कोनाडा

अर्पित, हार्दिक स्वागत आहे मिपावर !
तुमच्या मित्राच्या गाडीच्या ड्रायव्हरला देखिल ही स्थले माहित असतात.

ही फारच टिपकल लोकप्रिय सहल आहे.

इतर वेळी तिथल्याच टुरिस्ट एजन्सी कडून बुक केली तर वेळेच्या दृष्टिने आणि खर्चाच्या हिशेबाने परवडते.
भरपुर ट्रॅव्हल एजन्सिज आहेत. आंजावर याबद्दल ढिगाने माहिती आहे.

http://www.traveltoolset.com/article/view/22/32/karnatak
https://travelblog.expedia.co.in/activities/tourist-places-bangalore/

या वानगी दाखल लिन्क दिल्यात.

कंजूस's picture

18 Oct 2019 - 4:58 pm | कंजूस

सोपी युक्ती म्हणजे -
टुअर एजंट्स असतात त्यांच्याकडे जाऊन हाफ डे/ फुल डे साइट सीइंग पत्रके तीन चार जणांकडून घेणे. त्यामध्ये प्लान दिलेला असतो. कधी निघणार सकाळी काय केव्हा बघणार, दुपारी आणि संध्याकाळी काय दाखवणार वगैरे. सर्वांचे टायमिंग सेम असते. ते लक्षात ठेवून त्या वेळेस त्या ठिकाणी न जाणे.

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2019 - 5:07 pm | चौथा कोनाडा

कंजूसजी +१

यांच्या कडे तर कार आणि चालक असणार आहे. त्याला ठिकाणे माहित असणार आहेत. फक्त वेळेचे नियोजन नीट केले तर बरेच काही पाहून होइल.

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2019 - 8:12 pm | टवाळ कार्टा

नंदी हिल्स अगदी सक्काळी सक्काळी

त्यानुसार थोडंफार नक्की सुचवेन

चौकटराजा's picture

19 Oct 2019 - 1:04 pm | चौकटराजा

बन्ग्लुरू हे शहर पूर्वी फार मोकळे होते .आता विकासामुळेच ते बकाल बनत चालले आहे ! इथे काय काय पहाण्यासारखे आहे ते आता सर्व शहरात थोड्याफार फरकाने पहायला मिळते. तरीही लालबाग, कबन पार्क , सायन्स म्हुसियम सोडू नका ! गरूडा मॉल सारखे आता आपल्याला आपल्याकडेही पहायला मिळतात !

कानडाऊ योगेशु's picture

19 Oct 2019 - 9:23 pm | कानडाऊ योगेशु

बनेरघट्टा नॅशन्ल पार्क बघण्यासारखे आहे. विशेषतः लायन सफारी.पण आजकाल बेंगलोरमध्ये सगळीकडे अगदी तुडुंब गर्दी असते. दीडएक तास तर रांगेमध्येच लागेल.
विश्वेश्वरय्या म्युजियम व नेहरु तारांगण न चुकविण्यासारख्या जागा आहेत.
कब्बन पार्क ,लाल बाग मोठ्या बागा आहेत. पण शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने ट्राफिकचा त्रास होऊ शकतो.
कब्बन पार्क मध्ये एक छोटे मत्स्यालय ही आहे व टॉय ट्रेन ही आहे.
बाकी नऊ दिवसांची ट्रीप दिसते आहे. ह्यात मैसुर उटी ही पाहुन येऊ शकता.

चौकस२१२'s picture

21 Oct 2019 - 8:54 am | चौकस२१२

एखादा दिवस गाडी नसेल किंवा चालवयचा त्रास नको असेल तर कर्नाटक सरकार च्या दिवसाच्या सहली चांगल्या आहेत ( होत्या) श्रीरंगपट्टणम आणि बहुतेक त्याच सहलीत महैसुर चा राजवाडा हे जर होत असेल तर ते करण्यासारखे आहे .. राजवाडा खरा तर जरा निवांत पणे बघण्यासारखा आहे

मित्रहो's picture

21 Oct 2019 - 12:28 pm | मित्रहो

जे आहे ते सर्वत्र आहे. तरी वर इतरांनी सुचवलेली स्थळे योग्य आहेत. कबन पार्क, म्युझियम, नेहरु तारांगण सारे जवळजवळ आहे पण शहराच्या मध्यभागी आहेत. नंदी हिल्य ठिकठाक आहे.

थोडे दूर जायचे असल्यास म्हैसूर आणि आसपासचा परिसर आहे. म्हैसूरला जाताना कामत मधे नाष्टा करायला विसरु नका. थोड पुढे गेले तर मदूर या गावी मदूर वडा मस्त असतो. मदूर वरुन डावीकडे वळलात तर शिवसमुद्रम हा धबधबा आहे. नुकताच पावसाळा झाल्याने धबधबा बघण्सारखा असेल. प्रथमच बंगलोरला जात असाल तर बंगलोर, मैसूर आणि आसपासचा परिसर बघावा. कूर्ग, उटीपर्यंत जाता येते. बंगलोरच्या आसपास सुंदर जागांची कमी नाही.

हे सारे बघितले असले तर दुसऱा रस्ता धरा चित्रदुर्ग किल्ला, टुमकूर करा. ज्यांना किल्ल्यात रस आहे त्यांना हे आवडू शकते. रस्त्यात टूमकूर मधे एक मठ आहे नाव आठवत नाही.

हसनच्या दिशेने गेलात तर पुढे श्रवणबेळगोळला, बेलूर ला जा. दक्षिणेला धर्मपुरी आहे. हैद्राबाद रोडला पण बरीच स्थळे आहेत.

थोडक्यात काय बंगलोर शहराच्या आसपास बरच काही आहे. तिरुपती सुद्धा पाच तासाच्या अंतरावर आहे.

अर्पित's picture

22 Oct 2019 - 11:01 am | अर्पित

सर्व प्रतिसादकांचें आभार

मुक्त विहारि's picture

22 Oct 2019 - 12:09 pm | मुक्त विहारि

M.T.R. जेवायचे ठिकाण.

असे आमच्या सौ.चे मत आहे...

सुरज भोसले's picture

22 Oct 2019 - 1:14 pm | सुरज भोसले

या दिवाळीत आम्ही बंगलोर ला जाणार आहोत, २७ तारखेला बंगलोर मधली खाण्यासाठीची ठिकाणे व खरेदी व बेंगलोर मधली बघण्यासाठी ची ठिकाणे कृपया सुचवाल का? २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर (सकाळी ६ पर्यंत) पर्यंत KSTDC ची बंगलोर, म्हैसूर, उटी, कनूर, कोडाईकनाल अशी ट्रिप आहे, त्याचे आम्ही बुकिंग केले आहे. १ नोव्हेंबर व २ नोव्हेंबर अशी दोन दिवसाची आजून काही ट्रिप असल्यास कृपया सांगा
बंगलोर दर्शन साठी कार बुक करावी किंवा बस ने फिरावे. बंगलोर दर्शन साठी कार ट्रॅव्हलर असल्यास कृपया सांगा

चौथा कोनाडा's picture

25 Oct 2019 - 3:37 pm | चौथा कोनाडा

अर्पितजी, खरे हुश्श्यार !
अमुक ठिकाणी जायचंय, अमुक दिनांकांना जायचंय म्हणुन धागा काढून गेले,
ना आपले तपशिल सांगितले , ना आपले प्लान,
"सर्व प्रतिसादकांचें आभार" असं मोघम लिहून गुल्लाड झाले.
अर्पितजी, खरे हुश्श्यार !

कंजूस's picture

25 Oct 2019 - 9:24 pm | कंजूस

बंगळुरुतले ( बंगलोर) लोक दिवाळीत कुठे जातात?

स्थानिकच बाकी सगळ्याच बाबतीत अगदी सण साजरे करण्यासाठीही अनुत्साहीच वाटले म्हणूनच तरुण मुंबई पुणेकर तिथे फार काळ रमत नाहीत.