एका शंभर टक्के तोतया पुस्तकाची छोटीशी गोष्ट

रामदास's picture
रामदास in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

एका शंभर टक्के तोतया पुस्तकाची छोटीशी गोष्ट


फार पूर्वी लोक हार्ड बाउंड पुस्तके वाचायचे. आता हार्ड बाउंड पुस्तक म्हणजे काय, तर हार्ड बाउंड पुस्तक म्हणजे पुठ्ठयाचे जाडजूड दणदणीत कव्हर असलेली पुस्तके. यांच्या बाइंडिंगची पद्धत वेगळी आणि महागडी होती. त्यामुळे पुस्तकांच्या किमती वाढायच्या आणि पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. पण विसाव्या शतकामध्ये एक वेगळाच प्रकार आला, तो म्हणजे पॉकेट बुक आणि पेपरबॅक!

आता पॉकेटबुक म्हणजे काय, तर सहज कोटाच्या खिशात मावेल एवढेच पुस्तक छापायचे, प्रचंड मोठे ग्रंथ छापायचे नाहीत. तसेच पेपरबॅक म्हणजे जाड पुठ्ठयाच्या कव्हरऐवजी साध्या कागदांची कव्हर वापरायची आणि पुस्तकांची शिवणही वेगळ्या प्रकारची असायची. कव्हरचा कागदही अर्थात हलका असायचा, त्यामुळे स्वस्त आणि खिशात मावेल असे पुस्तक म्हणजे पेपरबॅक आणि पॉकेट साइझ अशी ही क्रांती झाली. या क्रांतीमधले पहिले पुस्तक जेम्स हिल्टनचे 'लॉस्ट होराइझन' हे समजले जाते. पण पर्ल बक या लेखिकेचे 'गुड अर्थ' हे पुस्तक पहिले पेपरबॅक आणि पॉकेट साइझ बुक होते अशी मान्यता आहे. पण आपण या वादात पडणार नाही की पाहिले पुस्तक कोणाचे होते. पुढे काय झाले हे आपण बघू या.

जशी पेपरबॅक पुस्तके आली, तशी पुस्तकांची संख्या वाढली, वाचकांची संख्या वाढली आणि नवनवीन प्रयोग करण्याची इच्छादेखील वाढीस लागली. एकोणीसशे पासष्ट-सत्तरनंतर नवीन कादंबऱ्या लिहिणाऱ्यांची फौजच निर्माण झाली. याच सुमारास अमेरिकेत हेरॉल्ड रॉबिन्स नावाचा लेखक उदयाला आला. हेरॉल्ड रॉबिन्स आणि इतर लेखकांमध्ये फरक असा होता की हेरॉल्ड फारसा गंभीर प्रकारचे लेखन करत नसे पण वाचकांना आवडेल असे लेखन करत असे. त्याचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य हे होते की त्याच्या सगळ्या कादंबर्‍यांमध्ये भडक लैंगिक किंवा कामुक वर्णने असायची. त्या काळच्या पिढीला ही त्याची शैली इतकी आवडली की त्याच्या 'कार्पेटबॅगर्स' या पुस्तकाने तर विक्रीचे सारे उच्चांक मोडले. त्यानंतर त्यांची अनेक पुस्तके आली. हेरॉल्ड रॉबिन्सचे पुस्तक म्हणजे त्यात शृंगारिक वर्णनांचे दोन-चार तरी परिच्छेद असतीलच, हे गृहीतक मनात ठेवूनच ते पुस्तक विकत घेतले जाई.

हेरॉल्ड रॉबिन्सच्या लोकप्रियतेनंतर अशा लेखांची जणू लाटच आली, ज्यांच्या कादंबऱ्यांमधे कथा अशी फारशी विशेष नसायची आणि कथेपेक्षा अधूनमधून भडक वर्णनाची पखरणच अधिक असायची. अनेक लेखकांची अनेक पुस्तके या लाटेत आर्थिक नफा कमवून गेली. परंतु जे अभिजात लेखन करणारे उत्तम लेखक होते, त्यांना अशा लिखाणाचा अतिशय राग होता.

MCREADY-obit-super-Jumbo

त्या काळी माईक मकग्रेडी नावाचे गृहस्थ लाँग आयलंडच्या न्यूज डे वर्तमानपत्राच्या न्यूज डेस्कचे ब्युरो चीफ होते, त्यांना या सगळ्या प्रकाराची किळस आली. या भडक लेखनामुळे लेखनाचा दर्जा खालावत चाललाय याची त्यांना काळजी लागली आणि म्हणून त्यांनी यावर एक उपाय करायचे ठरवले. त्यांनी 'नेकेड केम द स्ट्रेंजर' या नावाची कादंबरी लिहिली. ही कादंबरी खऱ्या अर्थाने डुप्लिकेट होती. आता डुप्लिकेट म्हणजे अशी की ही कादंबरी खरे म्हणजे त्यांनी लिहिलीच नव्हती. कादंबरीतली चोवीस प्रकरणे त्यांनी त्यांच्या चोवीस वार्ताहरांकडून वेगवेगळी लिहून घेतली. लिहिणार्‍या वार्ताहरांना त्यांनी सक्त ताकीद दिली की त्यांच्या लिखाणात कमीतकमी दोन पाने तरी कामुक किंवा लैंगिक वर्णन हवेच. असे हे चोवीस, पंचवीस लोकांनी पुस्तक पूर्ण झाले. लेखक म्हणून त्या पुस्तकावर माईक मकग्रेडीचे नाव छापले आणि हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झाले. अनेक महिने न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर्सच्या यादीत हे पुस्तक पहिल्या पाच नंबरात होते. अनेक महिन्यांच्या यशस्वी खपानंतर मकग्रेडीने ही बाब उघड केली की हे पुस्तक त्याने स्वतः लिहिलेले नाहीये, तर त्याच्या अनेक वार्ताहरांनी मिळून हे पुस्तक लिहिले आहे. हेरॉल्ड रॉबिन्ससारख्या त्या काळच्या अनेक लेखकांच्या लेखनाची थट्टा करावी अशा उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती केली गेली आहे. थोडक्यात 'स्पूफ' असा हा प्रकार होता.

पुस्तकामागचा उद्देश आणि जन्मकथा पुढे आणली, तर पुस्तकाचा खप घटेल असे प्रकाशकांना वाटले होते, पण झाले नेमके उलटे. मकग्रेडीच्या स्पूफनंतर या पुस्तकाची विक्री जवळपास पाच पटींनी वाढली. आपण डुप्लिकेट पुस्तकांविषयी ऐकतो, फूटपाथवर परवानगी न घेता छापलेली अनेक पुस्तके विक्रीस ठेवलेली असतात, पण खऱ्या अर्थाने डुप्लिकेट म्हणावे असे पुस्तक 'नेकेड केम द स्ट्रेंजर' हे होते.

श्रेयनिर्देश : प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

भारीये ! नवीनच माहिती मिळाली. धन्यवाद!

राघव
--
आपणां सर्वांस दीपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा!

जालिम लोशन's picture

25 Oct 2019 - 4:26 pm | जालिम लोशन

दिवाळीच्या शुभेच्छ्या.

छान लेख, सोबत ऑडिओ दिलाय, हे बेस्ट.
गोष्ट ऐकत, ऐकत वाचली.

वा रामदास काका ! ध्वनिमुद्रण तुमच्या ऑफिसमधेच केलंय का? तुमच्या मित्राकडे? :) छान झालंय

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 2:20 am | मीअपर्णा

खूप छान लेख. असं काही पुस्तक आहे हे माहितच नव्हतं.
ध्वनिमुद्रणही खूप छान झालंय.

ध्वनीमुद्रण आणि लेख अशी दुहेरी मेजवानी मिळाली.
@रामदास -
तुमचे खास 'रामदासी' लेखन अजून वाचायची इच्छा आहे, लिहा हो.

सुधीर कांदळकर's picture

30 Oct 2019 - 6:33 pm | सुधीर कांदळकर

पुस्तकाची मस्त मनोरंजक कथा आवडली. धन्यवाद.

हॅरॉल्ड रॉबिन्समुळे अनेक आठवणी जाग्या झाल्या. माझ्या एका मित्राने हे साताठशे पानांचे पुस्तक अशाच मजकुरासाठी विकत घेतले होते. मी काही पाने वाचून नंतर सोडून दिली. त्याची द पायरेट्स होती तुलनेने लहान पण तश्शीच.

सोत्रि's picture

31 Oct 2019 - 9:37 am | सोत्रि

रन्जक लेख आणि अनोखी माहिती!

- (ओरिजिनल) सोकाजी

सुनील's picture

31 Oct 2019 - 2:58 pm | सुनील

रोचक कथा.

घोस्ट लेखनाची सुरुवात इथूनच झाली काय?

पद्मावति's picture

31 Oct 2019 - 3:06 pm | पद्मावति

रोचक माहीती.

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 1:06 am | गुल्लू दादा

छान वाटलं ऐकत वाचताना ..धन्यवाद

मित्रहो's picture

2 Nov 2019 - 8:18 am | मित्रहो

छान रोचक माहिती

तुषार काळभोर's picture

2 Nov 2019 - 1:13 pm | तुषार काळभोर

तुमच्या आवाजात ऐकयला मजा आली.

श्वेता२४'s picture

2 Nov 2019 - 4:38 pm | श्वेता२४

आवडला लेख

ही छोटीशी गोष्ट आणि तिचे ऑडीओ स्वरूपातील अभिवाचन दोन्ही आवडले!
धन्यवाद.