काहूर

चॅट्सवूड's picture
चॅट्सवूड in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

काहूर

जयेश...
सॉरी..
प्लीज मला माफ कर.

तुला सगळं सांगायचं होतं, पण कधी जमलं नाही. बऱ्याच गोष्टी मनात साचल्यात, गढूळ झाल्या आहेत आणि त्याचा निचराही होत नाहीये. पण आता असं तुझ्यासमोर बोलता येणार नाही. मी माझ्या परीने इथे सगळं इथे लिहून काढते. तू शांतपणे वाच. हे सगळं वाचल्यावर, तुला काय वाटेल ते मला माहीत नाही, पण प्लीज मला माफ कर.

मी आता सगळं, सविस्तर, खरं सांगते.
जयेश, तुला आठवतं, त्या दिवशी मी ऑफिसमधून घरी आले होते, दारातच मला चक्कर आली होती. "कोणीतरी..." मी घरात येत म्हणाले, "पाठलाग करतयं"

तेवढं ऐकून तू तडक जिने उतरून खाली गेलास. तुला थांबवता आलं नाही, कारण मी दमले होते. पायात गोळे आले होते, उजवा गुडघा ठणकत होता. खांद्यावरची पर्स बाजूला फेकत, भिंतीचा आधार घेत, डोळे मिटून मी कण्हत दाराजवळ कशीतरी विसावले.

तू थोड्या वेळाने परत घरी आलास.

"श्रेया.." तू मला हलकेच म्हणालास. मी डोळे उघडले. तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी काळजी तरळत होती. तेव्हाच तुला सगळं सांगून टाकायला हवं होतं, पण जमलं नाही. तू दोन्ही हातांनी मला अलगद उचललंस, बेडरूममध्ये घेऊन आलास. माझ्यासाठी पाणी आणलं होतंस. जवळ बसून राहिलास. अलगद जवळ घेतलंस, थोपटलंस, शांत केलंस. डोळ्यानेच 'काय झालं?' विचारलंस.
"कोणीतरी पाठलाग करत आहे." मी म्हणाले.
"कधीपासून?"
"तीन-चार दिवस झाले" मी खोटं बोलले. तीन-चार नाही, पण बरेच दिवस झाले होते.
"पण कोण?" तू विचारलंस.
आजही याचं उत्तर माझ्याकडे नाही. माझा कोण का पाठलाग करेल? काय मिळणार? कदाचित माझ्या गावाकडचं कोणीतरी? मी अशी बिनालग्नाची कोणा बरोबर राहते, हे बघायचं असेल. माझ्या घरी जाऊन चुगल्या करायच्या असतील. हे करून लोकांना काय सुख मिळतं? देव जाणे.
"कोण असू शकतं?" मी स्वतःलाच विचारलं.
"तुझा कोणी एक्स बॉयफ्रेंड?" तू माझ्या प्रश्नाला प्रश्न केलास.
"ह्या.. तुझीच कोणीतरी एक्स गर्लफ्रेंड असेल" मी तेव्हा म्हणाले होते. पण नाही, असा पाठलाग करणारी व्यक्ती अनोळखी होती. ओळखीचं कोणी असतं तर चटकन लक्षात आलं असतं.

तेव्हा विचार करून दमले होते. तुझ्या खांद्यावर मान टाकली, तुझा तो आफ्टरशेव्ह!! बदल ना रे. तुला किती छान सुगंधी आफ्टरशेव्ह दिले आहेत, ते वापर ना.. प्लीज. ऐकतच नाही. पण तेव्हा तुला असं काही म्हणाले नाही. तुला माहितेय, तू मला असं कुरवाळून, गोंजारून घ्यायचास हे मला आवडायचं. खूप जास्त आवडायचं. तेव्हा मला फक्त तेच हवं होतं.

तेव्हा तुझ्या कुशीत कधी झोपले कळलंच नाही.

.

अचानक मी धावत होते, अंधारात, वेगात, अनवाणी. आजूबाजूला बरीच उंच झाडं होती, अंधाराला गडद करत होती. नुकताच पाऊस पडून गेला असावा. पायाखाली चिखल होता. मी कशीही, दिसेल तसं, दिसेल तिथून वेडीवाकडी धावत होते. थांबताही येत नव्हतं. पण मी का पळतेय? एवढ्या रात्री? कुठे? कशाला? म्हणून धावताना मी मागे वळून बघितलं अन मला जाग आली... मी कुशी बदलून तुझ्याकडे बघितलं, तेव्हा तू घोरत होतास. अ‍ॅज युज्युअल!! हे नेहमीचं स्वप्न. पण या स्वप्नाचा अर्थ काय होता? माझा कोण पाठलाग करत होतं?

दुसऱ्या दिवशी तू मला ऑफिसला सोडायला, मग ऑफिस सुटल्यावर घ्यायला आलास, मस्त वाटलं. त्यानंतर आपण मॉलमध्ये गेलो होतो ना, तेव्हासुद्धा आपल्या दोघांना कोणीतरी बघत आहे, लांबून, हळूच, नकळत, असं वाटायचं. मी घाबरले होते. प्रत्येकाकडे संशयाने बघत होते. जो कोणी असेल त्याने समोर यावं, जे पाहिजे ते करावं, बोलून मोकळं व्हावं, पण असा पाठलाग करू नये. अनामिक भीती वाटत राहते. आपण पिक्चर बघत होतो, तेव्हा त्या रिकाम्या थेटरमध्ये त्या अंधाराचं वजन माझ्यावर येत होतं. पोटातली भीती छातीत शिरू पाहत होती. जयेश.. तुला न सांगता ही ते कळलं. तू जसा माझ्या हातात हात गुंफलास, तशी ती भीती उसवली, अन विरून गेली.

घरीच राहावं, तुझ्याजवळ, टीव्ही बघावा, काहीतरी छान ऑर्डर करून खावं, बस्स! एवढंच पाहिजे होतं. बाकी काही नाही. तशी इच्छा होती, अपेक्षा नाही. पण मग तेव्हा मला स्वार्थी वाटायचं. तुला आठवतं ना, एकदा रात्री माझ्यासाठी शिरा केला होतास. कमी गोड होता, पण तुला शिरा जमतो, करत जा. मला तेव्हा कुठे घराबाहेर जावसं वाटायचं नाही. मग तू माझ्यासाठी घरी बसून राहायचास, तेव्हा गिल्टी वाटायचं. पण खरं रे, बाहेर नकोसं वाटायचं. तुला माझी काळजी वाटत होती, म्हणून तू काउन्सेलरकडे जाऊ या असं म्हणालास. एकदम काउन्सेलिंग? मला भीती वाटली. मी पटकन नाही म्हणाले. पण मग दुसरा मार्ग नव्हता. ही भीती मनातून कशी जाणार? काहीतरी करायला हवं होतं, म्हणून आपण काउन्सेलरकडे गेलो.

खरं सांगू का? ती काउन्सेलर मंद वाटली. ती चेहऱ्यावर काही दाखवायची नाही, एकदम मख्ख. माझं बोलणं तिला कळत होतं की नाही? देव जाणे. त्या काउन्सेलरने खूप प्रश्न विचारले, खूप खोदून विचारलं. तुला माहितेय मी इन्ट्रोव्हर्ट, मग हिला काय सांगू? मला जमत नव्हतं. काउन्सेलरला तुझ्याबद्दल सांगितलं, घरच्यांना बद्दल बोलले अन मग साहजिकच सुधाचा विषय निघाला. खरं तर मला सुधाबद्दल काही सांगायचं नव्हतं. कशाला ना उगीच? ती काउन्सेलर काहीतरी अर्थ लावत बसणार. सुधाबद्दल बोलताना तिच्यासमोर रडायचं नव्हतं. हो यार.. मी रडले तिच्यासमोर. असं काही भोकाड पसरलं नाही, पण हो.. तिने टिशू पेपर दिले होते. आपल्या मनातलं दुसऱ्याच्या तोंडून ऐकलं ना, की बरोबर वाटतं.

.

तुला सुधाबद्दल कितपत माहीत आहे? आपण कधी याबद्दल जास्त बोललो नाही. मला हा सब्जेक्ट आपल्या मध्ये नको होता. याबद्दल तुला सांगायच नेहमी टाळलं. कारण लाज वाटायची. तुला काय वाटेल? तुला कीव वाटली तर? तुझं सगळं मला हवं होतं, फक्त कीव सोडून.

मला वाटतं, एखाद्याची कीव करताना आपुलकी असावी, पण आपुलकी करताना त्यात कीव नसावी.

त्या काउन्सेलरने सुधाबद्दल सगळं विचारलं. तुझ्याआधी तिला कसं सांगणार? मला जमत नव्हतं, पण कसंतरी सगळं सांगून टाकलं. आत्ता तुला सगळं सांगते. तुला माहितेय, सुधा माझी मोठी बहीण होती. पण ती माझ्याशी भांडायची, केस ओढायची, मारायची, खूप त्रास द्यायची. बहिणींची भांडणं म्हणून बाकीचे दुर्लक्ष करायचे. मी लहान होते, त्यामुळे जास्त काही करता यायचं नाही, पण आई माझी बाजू घ्यायची. सुधावर ओरडायची, म्हणून मग सुधा आईशी भांडायची, तेव्हा मग मला सुधाचा राग यायचा.

त्या दिवशी आई बाबा घरी नव्हते, घरात फक्त मी आणि सुधाच होतो. सुधा आमच्या झोपायच्या खोलीत बसली होती. मला त्या खोलीतून अभ्यासाची पुस्तकं घ्यायची होती. मी कितीतरी वेळ त्या खोलीचं दार वाजवलं, हाका मारल्या, ओरडले, रडले, तरी सुधाने दार उघडलं नाही. मग मी चिडले, त्या खोलीच्या दाराला बाहेरून कडी लावली. घराबाहेर येऊन रडत बसले. असा किती वेळ गेला आता आठवत नाही. नंतर आई घरी आली. आईला झालेला प्रकार सांगितला, तेव्हा आईने सुधाच्या नावाने हाका मारत त्या खोलीची कडी काढली, दार उघडलं. आम्ही समोर बघितलं...

..पण त्या खोलीत कोणीच नव्हतं.

खोलीची खिडकी उघडी होती. सुधा त्या खिडकीतून बाहेर पडून, निघून गेली होती. त्या दिवसानंतर सुधा कधी दिसलीच नाही. ती घरी परत आलीच नाही. ती निघून गेली होती, कायमची. न सांगता, न विचारता अन न कळवता. तिला आमचा निरोपसुद्धा घ्यावासा वाटला नाही? का? तिला आमचा तिटकारा आला असावा. त्या दिवशी कळतंच नव्हतं, आता त्रास द्यायला कोणी नाही म्हणू हसू? का सख्खी बहीण निघून गेली म्हणून रडू? मी शांत बसून राहिले. आम्ही पण तिचा शोध घेतला, बाबांनी पोलिसात तक्रार केली, पण ती कधी सापडली नाही. एवढ्या वर्षांत सुधाने कधी ना पत्रं पाठवलं, ना फोन केला, ना परत आली.

मी कधी आईबाबांना सांगितलं नाही, पण तुला सांगते - सुधा गेल्यानंतर मला ना एक स्वप्नं पडायचं. मी सुधाच्या खोलीचं दार उघडते. पुढे अंधार असतो, पुसट दिसतं असतं, खूप थंड वाटतं, माझे हात गारठतात, पण मी हळूच तशीच पुढे सरकते. समोर बघते, अन बघतच बसते..

.

राखाडी रंगाचा पंखा, त्यावर पिवळ्या रंगाची ओढणी बांधलेली असते. त्या ओढणीचा गळ्याला फास लावून सुधा पंख्याला लटकत आहे, शांतपणे. पिंजारलेले केस, डोळे खोबणीतून बाहेर आले असतात, तिची मान एका बाजूला कलंडली असते, पाय हवेत तरंगत असतात. मी एकटक तिच्याकडे बघत राहते. मला काय होतं, काय माहीत? पण मी हळूच तिच्या जवळ जाते, तिचे दोन्ही पाय पकडते, तिला खाली ओढायचा प्रयत्न करते, पण.. जमतं नाही. मग मी सुधाकडे बघते, तिला "खाली ये" असं म्हणते, तशी ती पंख्याला लटकलेली सुधा, डोळे उघडते, मान सरळ करते, माझ्याकडे बघते आणि खुद्कन हसते...

...तेवढ्यात, स्वप्न फुटतं अन मला जाग येते.

आई कधी विषय काढत नाही, पण तिला सुधाची आठवण आली की एकटीच कोपऱ्यात बसून रडत बसते. मला सारखं वाटायचं, मी सुधाला खूप त्रास दिला म्हणून ती निघून गेली. बाबा या सगळ्याचा मला दोष देतात असंही वाटतं. हे बाबांच्या नजरेतून पोहोचतं. जे नजरेतून पोहोचतं, ते सांगण्याची गरज पडत नाही.

तुला माहितेय, तेव्हा सुधालासुद्धा वाटायचं की, तिचा कोणतरी पाठलाग करत आहे. तिने आईला हे सांगितलं होतं, पण आईने जास्त लक्ष दिलं नाही.

माझा भुताखेतांवर नाही, पण निगेटिव्ह एनर्जीवर विश्वास आहे. याबद्दल मी त्या काउन्सेलरलासुद्धा विचारलं होतं. ती चक्रावलीच. सुधाचा जे काही किंवा कोणी पाठलाग करतं होतं, तेच माझा पाठलाग करतं होतं का? अशी काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर? पण एवढ्या वर्षानंतर मला का त्रास देते? आणि आत्ताच का? कशामुळे?

ती काउन्सेलर म्हणाली की, माझा असं कोणी पाठलाग करतच नाहीये. ही माझी मानसिक भीती आहे. गिल्टमधून येणारी भीती. गिल्ट म्हणजे अपराधीपणाची भावना. ही भावना सतत आपल्याला टोचत असते. आपण काही चुकीचं केलं आहे, मग आपल्याला शिक्षा मिळावी असं वाटतं राहतं. थोडक्यात, त्या काउन्सेलरला म्हणायचं होतं की हा पाठलाग होणं म्हणजे माझ्या गिल्टचं एक स्वरूप आहे.

त्या काउन्सेलरला माझ्या गिल्टची जाणीव झाली होती. "सुधाबद्दल गिल्टी वाटून घेऊन नकोस, ही गिल्ट तुला आतून पोखरत आहे" असं ती म्हणाली.
पण जयेश.. हे सगळं खरं होतं. मला खूप जास्त अपराधी वाटतं होतं. पण सुधामुळे नसावं, माझ्या गिल्टचं कारण वेगळं होतं.

मला हेच तुला सांगायचं आहे, पण... सांगता येत नाहीये, पण तुला हे माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे, मी सांगते.

तो माझे छान फोटो काढायचा.

आम्ही आधी थोडंच बोलायचो. मग जनरल भेटू लागलो, थोडा वेळ. तो माझे फोटो काढायचा, तेव्हाच मला गिल्टी वाटायचं. त्याचं नाव सांगता येणार नाही, पण त्याचा विषय दोन-तीनदा आपल्या घरात झाला होता. आधी आम्ही टाइमपास फ्रेंड्स होतो, बाकी काही नाही. चॅटिंग करायचो, जनरला भेटायचो, थोडा वेळ, कधी क्लोज आलो नाही. जयेश, प्लीज तू चिडू नकोस. पण त्या दिवशी, किवरी पॉइंटवर गेलो होतो. हो तोच तो लव्हर्स पॉइंट. मी ऑफिसला दांडी मारली होती. तो माझे फोटो काढत होता, जे मी लगेच डिलीट केले. पण मग तेव्हा आम्ही.... मला कळत नाहीये कसं लिहू.... तिथे आम्ही एकटेच होतो. वीक डे होता. त्या पॉइंटवर कोणीच नव्हतं. तेव्हा कोणीतरी आम्हाला झाडीतून, चोरून बघतंय असं वाटलं. मी लगेच मागे वळून बघितलं, पण ती व्यक्ती पळून गेली. तेव्हा मी घाबरले, कोण असेल काय माहीत? ऑफिसमधलं कोणी? ओळखीचं? ती व्यक्ती हे सर्व तुला सांगेन, मग तू हर्ट होशील. असं काही झालं तर? नको. मी स्वतःला माफ करू शकणार नाही. आपल्यात जे होतं, ते असं धुळीस मिळवायचं नव्हतं. जयेश, मी मूर्ख होते.

त्या दिवशी लगेच त्याच्याबरोबरचं नातं तोडलं. त्याला सगळीकडे ब्लॉक केलं. तरी मला गिल्टी वाटतं होतं. मी त्या अपराधी भावनेपासून दूर पळू लागले. पण त्याला माझी सवय झाली होती, म्हणून तो दुसऱ्या नंबर वरून कॉल करायचा. मी त्याला यूज केलं, गरजेपुरतं त्याच्याशी बोलले, गरज संपल्यावर ब्लॉक केलं, खेळणं म्हणून वागवलं. तेव्हा मला खूप वाईट वाटलं, स्वतःचा तिटकारा वाटला. त्याने हे सगळं बोलून दाखवलं. मलाच मी नकोशी झाले.. तेव्हापासूनचं मला कोणीतरी चोरून बघतंय, माझा पाठलाग करतंय हे सगळं सुरू झालं.

मी खूप विचार केला की, माझा पाठलाग कोण करत असेल?
ऑफिसमधलं कोणीतरी?
का गावाकडचं कोणीतरी?
का हा फोटोग्राफर मित्र, जो दुखावला गेला होता?
का मग सुधा?
हो, मला वाटायचं सुधाचं माझा पाठलाग करत असेल. एवढ्या वर्षांनंतर तिला माझ्याशी बोलायचं असेल.
का कोणी रँडम व्यक्ती? ज्याला माझ्याबद्दल आकर्षण वाटत असेल म्हणून पाठलाग करत असेल.
का मग एखादी निगेटिव्ह एनर्जी? जिने सुधाचासुद्धा असाच पाठलाग केला होता? पण मग या निगेटिव्ह एनर्जीला सुधाकडून किंवा माझ्याकडून काय हवं होतं?
माझा पाठलाग करून काय मिळणार होतं? हाच प्रश्न सारखा मनात घोंघावत होता.
याचं कधी उत्तर मिळालं नाही.

20191018-144336
कदाचित त्या काउन्सेलरचं बरोबर होतं. ही गिल्ट माझा पाठलाग करत होती. या गिल्टला मी चेहरा द्यायचा प्रयत्न करत होते, पण जी गोष्ट कधी बघितली नाही, ती कळणार कशी? तिला ओळखणार कसं? काही चुकलं ना की गिल्टी वाटतंच आणि मग या गिल्टला चुकवता येत नाही.

माझ्यामुळे सुधाने आईबाबांशी संबंध तोडले, मी तुला चीट केलं, हर्ट केलं. परत, सतत, अखंडपणे ही गिल्ट माझा पाठलाग करत राहणार, हे आता सहन होतं नाही.

जयेश, यू आर माय फर्स्ट अँड लास्ट लव्ह.
जयेश, प्लीज तू माझ्या फोटोग्राफर मित्राचा शोध घेऊ नकोस. आधीच त्याला मी खूप दुखावलं आहे, यात त्याची काही चूक नाहीये. मीच चुकले होते. या सगळ्याची शिक्षा मला मिळायला हवी. मी जरा क्रॅक आहे, तशीच राहीन. पण आता माझा त्रास कोणाला होणार नाही.

बाबा, त्या दिवशी मी सुधाशी भांडायला नको होतं. आय अ‍ॅम सॉरी, प्लीज मला माफ करा. आई, तू खंबीर राहा, बाबांची काळजी घे. पुढचा जन्म असेल तर मी तुमच्याच घरी जन्म घेईन. माझ्या लॅपटॉपचा पासवर्ड 'जयेशलव्हयू' असा आहे. डेस्कटॉपवरच्या एका फाइलमध्ये मी माझे सगळे पासवर्ड नमूद करून ठेवले आहेत. जयेश.. माझ्या बँक अकाउंटमधले सगळे पैसे आईबाबांना दे..
हीच माझी शेवटची इच्छा आहे.

तुमची चुकलेली,
श्रेया मनीष शाहजकर

images-15

मी आजूबाजूला बघितलं, मागे वळून बघितलं. कोणीच नव्हतं. वर आकाशात चंद्राकडे बघितलं. आज पौर्णिमा होती, पण तरीही इथे खाली अंधार गडद होता. शांतात भयाण होती. मधूनच काजवे चमकत होते. या उंच ठिकाणी हवा विरळ होती, पण गार वाटतं होतं. मी हळूहळू चालत पुढे जाऊ लागले. समोर खोल दरी होती. मी दरीच्या टोकापाशी जाऊन थांबले. खाली बघितलं तसा छातीतला ठोका चुकला. आपसूकच माझ्या दोन्ही हाताच्या मुठी वळल्या. मी डोळे गच्च मिटून घेतले. मी तशीच तोल संभाळून उभी राहिले. तीनचार सेकंदांनंतर मी हळूच डोळे उघडले. दरीत काळाकुट्ट अंधार स्थिरावला होता. दरीचा तळ दिसत नव्हता. तळाशी काय असेल? मी डोळे ताणून खाली बघितलं, तसं माझं डोकं गरगरलं.. मी पटकन मागे सरकले.

मी दीर्घ श्वास घेऊन स्वतःला सावरलं. मागे सरकले. थंडी वाढत होती, म्हणून दोन्ही तळहात एकमेकांशी घासले, मग आपसूकच माझा हात माझ्या जीन्सच्या खिशात गेला. मी खिशातून दुसरी सुसाइड नोट काढली आणि परत एकदा वाचू लागले.

जयेश जयदीप प्रभाकरन
आय हेट यू.
तुझ्यासारखा फालतू माणूस कधी बघितला नाही.
माझे पाय पकडून तू मला सॉरी म्हणायला हवंस.
तुझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहून मी चूक केली. आधी बरा वागत होतास, पण त्यानंतर तुझे खरे रंग दाखवलेस. माझ्या घरी मी कधी चहासुद्धा केला नव्हता, पण तुझं प्रत्येक काम केलं. कारण माझं प्रेम होतं. तू माझ्यासाठी काय केलंस? काहीच नाही. शून्य. तुझ्याबरोबर राहायचं म्हणून मी चांगले जॉब्स सोडले. माझं सगळं करियर तुझ्यामुळे बर्बाद झालं. तुझ्यामुळे माझ्या आईवडिलांपासून, नातेवाइकांपासून दुरावले गेले.

तू मला फसवलंस. माझ्या पैशांवर जगत राहिलास..फुकट्या, तुझी लायकीतरी होती का माझ्याबरोबर राहायची? पण तुझं हे सगळं माफ करत बसले. कधीतरी नीट बोलशील, सुधारशील, लग्नासाठी विचारशील, असं मला वाटतं होतं. पण मी मूर्ख होते. तुझे सगळे पैसे तू तुझ्या त्या नव्या गर्लफ्रेंडवर उडवलेस. मला सगळं माहितेय. मला तिचं नाव, गाव काही माहीत नव्हतं. मी तुझ्या त्या नवीन गर्लफ्रेंडचासुद्धा पाठलाग केला होता, तिला जाब विचारण्यासाठी. तिला चांगला धडा शिकवायचा होता..

त्या दिवशी मी तुम्हा दोघांना किवरी पॉइंटवर बघितलं, तेव्हाच तुम्हा दोघांना गोळ्या मारून ठार करायला हवं होतं. माझी तू कधी किंमत केली नाहीस, पण आता करशील. तुझ्याबरोबर राहण्यापेक्षा मी नरकात राहीन.

आई, बाबा....
बाबा, आय अ‍ॅम सॉरी, प्लीज मला माफ करा. आई, तू खंबीर राहा, बाबांची काळजी घे. पुढचा जन्म असेल तर मी तुमच्याच घरी जन्म घेईन.

माझ्या अकाउंटमधले आणि जयेश जयदीप प्रभाकरन याच्या अकाउंटमधले सगळे पैसे, माझ्या आई बाबांना द्यावेत, कारण हे सगळे पैसे माझेच आहेत. जयेश जयदीप प्रभाकरन या फालतू माणसामुळे मला जगणं नकोसं झालं आहे. या माणसामुळे मी जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूला जयेश जयदीप प्रभाकरन आणि त्याची ती गर्लफ्रेंड हेच दोघे जबाबदार आहेत. या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, हीच माझी शेवटची इच्छा आहे.

येते...

आई, बाबा, तुमचीच,
श्रेया मनीष शाहजकर

मी खिशातून लायटर काढते, या सुसाइड नोटला आग लावते. एका क्षणात हे कागद पेट घेतात. माझी बोटं भाजतात, पण तरीही मी कागद तसाच पकडून ठेवते. कागद पूर्ण जळू लागतो. त्या जळणाऱ्या कागदांकडे बघत असताना मला मागच्या काही महिन्यांतील घटना डोळ्यासमोर एकत्र येतात.

श्रेया आणि जयेश लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते, पण त्यांचं कधी पटलं नाही. हे दोघे सारखे भांडायचे, म्हणून जयेश श्रेयाला सोडून देणार होता. श्रेयाला याचा अंदाज आला होता, तशी श्रेया बिथरली. वेडयासारखी वागू लागली. जयेशबद्दल खूप जास्त पझेसिव्ह झाली, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करू लागली, तेव्हा जयेश श्रेयापासून, घरापासून दूर राहू लागला. पण श्रेयाला हे मान्य नव्हतं. ती जयेशचा पाठलाग करू लागली. तो कुठे जातो? कोणाला भेटतो? हे चोरून बघू लागली. तेव्हाच श्रेयाला माझ्याबद्दल कळलं. तेव्हा मी आणि जयेश खूप जवळ आलो होतो, वी लव्ह ईच अदर. पण श्रेयाला माझं नाव, गाव माहीत नव्हतं, म्हणून ती माझा पाठलाग करू लागली.

श्रेयाचा कोणी पाठलाग करत नव्हतं, तर ती माझा पाठलाग करत होती.

मग त्या दिवशी श्रेयाने आमचा पाठलाग केला. किवरी पॉइंटवर जयेश आणि मला एकत्र बघितलं. तिला संताप आला. तिने तिथे तमाशा केला, माझ्या मुस्काटीत मारलं. तेव्हा मी चिडले नव्हते, तर मला श्रेयाची भीती वाटू लागली. तिला जर संधी मिळाली असती, तर तिने माझा जीव घेतला असता.

श्रेयाने जयेश सोडून जाऊन नये म्हणून बरेच प्रयत्न केले. जयेशला घाबरवण्यासाठी श्रेयाने एक सुसाइड नोट लिहिली. या सुसाइड नोटमध्ये सारा दोष तिने जयेशला दिला होता. जेव्हा जयेशने ही सुसाइड नोट मला दाखवली, तेव्हाच जाणवलं की श्रेयाचं हस्ताक्षर फार काही चांगलं नाही.

तुमचं हस्ताक्षर वाईट असेल, तर किती ही प्रयत्न केला तरी तुम्हाला चांगलं हस्ताक्षर काढता येतं नाही.
पण..
तुमचं हस्ताक्षर चांगलं असेल तर तुम्हाला वाईट हस्ताक्षर काढता येतं.

श्रेया वेडसर होती. तिने कधीही जीव दिला असता, नाहीतर आमचा जीव घेतला असता. किवरी पॉइंटवर तिचं रुद्र स्वरूप बघून मला हे जाणवलं होतं. श्रेयाची खरी सुसाइड नोट आज ना उद्या पोलिसांना मिळाली असती, मग जयेश अडकला असता, मग कदाचित मीसुद्धा अडकले असते.

हे सगळं आठवल्यावर अंग भीतीने शहारलं. थंडीसुद्धा वाढत होती, एक विचित्र वास आजूबाजूला पसरला होता, म्हणून माझं डोकं ठणकू लागलं. तहान लागली होती, पण आता पाणी नव्हतं. मला परत दरीत खाली बघायचं नव्हतं, नाहीतर मी परत घाबरले असते. मी डोळे मिटूनच माझ्या दोन्ही कानातले काढून जीन्सच्या खिशात ठेवले. बोटातली रिंगसुद्धा काढून खिशात ठेवली. माझे केस मोकळे सोडले, परत एकदा नीट एकत्र करून बांधले. माझी सँडल पायातून काढून हातात घेतली.

मग मी मागे वळून बघितलं. मागे जयेश उभा होता. मी अनवाणी पायाने जयेशजवळ चालत गेले. माझ्या हातातल्या सँडल खाली जमिनीवर ठेवल्या. जयेश मी लिहिलेली श्रेयाची नवीन सुसाइड नोट वाचत होता. माझ्याकडे न बघत जयेशने विचारलं, "डोन्ट यू लाइक माय आफ्टरशेव्ह?"
"नो, आय हेट इट" मी उत्तर दिलं.
"हा फोटोग्राफर मित्र कोण होता?" जयेशने विचारलं.
"ते सगळं काल्पनिक आहे.." मी म्हणाले, यावर जयेशने मान डोलावली. एखादी व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा त्याच्या मागे स्ट्रॉन्ग कारण असायला हवं. त्यामुळेच श्रेयाने जयेशला चीट केलं, तिला गिल्टी वाटू लागलं हे सर्व लिहावं लागलं.

"हा सुधाचा भाग..." जयेश सुसाइड नोटच्या कागदांकडे बघत म्हणाला.
"तिच्या आईबाबांनासुद्धा हे सगळं खरं वाटलं पाहिजे" मी म्हणाले.
श्रेयाच्या आयुष्यात हे सगळं घडलं होतं. सुधा तिची मोठी बहीण, श्रेयाच्या लहानपणीच घर सोडून गेली होती.

"येस्स.." जयेश पटकन म्हणून गेला. त्या सुसाइड नोटमध्ये जयेशची इमेज एकदम 'गुड बॉय'सारखी होती. त्यामुळे त्याच्यावर कोणी संशय घेणार नव्हतं.

या नवीन सुसाइड नोटमध्ये कुठेही माझं नाव किंवा माझ्या नावाचा उल्लेख येणार नाही, याची मी काळजी घेतली होती.

एखादी व्यक्ती तुम्हाला इजा करणार आहे, हे कळल्यावर तुम्ही काय करणार? पळून जाणार? किंवा त्याला अडवणार? पण मग कसं? ती व्यक्ती तुम्हाला इजा केल्याशिवाय माघार घेणार नाही.. मग काय करणार?
सतत मरणाच्या भीतीखाली जगायचं? का त्यासाठी काही करायचं?
माझं चुकतं होतं? का नाही? माहीत नाही. पण मी या सगळ्यातून स्वतःला वाचवत होते..फक्त सर्व्हायव्हल. स्वतःच्या सर्व्हायव्हलसाठी असं वागणं चुकीचं असू शकेल? हा सूड नव्हता, अट्टाहास होता, जिवंत राहण्याचा.

images-2

हा सगळा विचार करत असताना मी खाली बघितलं. आमच्या दोघांच्या मध्ये खाली जमिनीवर श्रेया पडली होती. ती शांत झोपली होती असंच वाटतं होतं. पण श्रेया दारूच्या नशेत होती. श्रेया रोज अशी खूप दारू प्यायची. तिला जगायचं नव्हतंच, बाकीच्यांना शांतपणे जगू द्यायचं नव्हतं. म्हणून जयेशने आज तिला विरोध केला नाही. तिची शुद्ध हरपल्यावर कारमधून इथे या निर्जन स्थळी तिला आणलं.

श्रेयाने घातलेला टॉप मळला होता, मधून थोडा फाटलाही होता. ती मधूनच काही तरी बरळत होती, पण आम्हाला नीटसं कळत नव्हतं, म्हणून मी खाली बसले, तिच्याकडे बघत नीट ऐकू लागले..

"स्स्स... रर.. मा..हहह.." असं काही परत परत बरळत होती.
मला काहीच कळत नव्हतं. मी जयेशकडे बघितलं, त्याने खांदे उडवले.
कदाचित श्रेयाला "सॉरी माफ करा" असं काहीस म्हणायचं असेल? तिला तिची चूक उमगली असेल का? का मी माझ्या मनाची समजूत घालून घेत आहे?

का आता तिला काही स्वप्न पडतं असेल?
नवीन सुसाइड नोटमधली श्रेयाची स्वप्नं. ती स्वप्नं तिची नव्हती, माझी स्वतःची होती.
श्रेयाबरोबर असं करताना मला स्वतःला फार गिल्टी वाटतं होतं, ही गिल्ट स्वप्नातून माझ्यात शिरू पाहत होती.

आमच्याकडे वेळ कमी होती. मी लिहिलेली श्रेयाची नवीन सुसाइड नोट श्रेयाच्या जीन्सच्या खिशात ठेवली. मग परत एकदा श्रेयाच्या जीन्सचे खिसे तपासले. एका खिशात तिचा सेलफोन, तर दुसऱ्या खिशात सुसाइड नोट होती. मी जयेशला इशारा करत श्रेयाचे पाय पकडले अन जयेशने काखेतून श्रेयाला पकडलं. आम्ही चालत श्रेयाला घेऊन दरीच्या टोकाशी आलो.

मी जयेशकडे बघितलं. तो माझ्याकडे बघत पुटपुटला, "एक.. दोन.."
पुढच्याच क्षणी..
आम्ही श्रेयाला दरीत फेकलं...

श्रेयनिर्देश: चित्रे आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

26 Oct 2019 - 11:38 am | तुषार काळभोर

आवडली

पद्मावति's picture

26 Oct 2019 - 1:13 pm | पद्मावति

थरारक. मस्तंच.

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 2:14 pm | यशोधरा

आवडली कथा.

विनिता००२'s picture

29 Oct 2019 - 4:50 pm | विनिता००२

मस्त :)

मराठी कथालेखक's picture

30 Oct 2019 - 2:58 pm | मराठी कथालेखक

मस्तच... ही "मी" म्हणजे सुधा का ? नाहीतर दुसर्‍या कुणाला हे कसं माहित असणार जे की जयेशला पण माहित नाही.

श्वेता२४'s picture

5 Nov 2019 - 3:15 pm | श्वेता२४

कथा खूपच छान आहे. आवडली

एमी's picture

6 Nov 2019 - 7:23 am | एमी

नाही सुधा नाहीय ती.
> "हा सुधाचा भाग..." जयेश सुसाइड नोटच्या कागदांकडे बघत म्हणाला. > म्हणजे जयेशलापण माहीत नाही असे नसून, 'तो भाग लिहायची गरज होती का' असे तो विचारतोय.

> या नवीन सुसाइड नोटमध्ये कुठेही माझं नाव किंवा माझ्या नावाचा उल्लेख येणार नाही, याची मी काळजी घेतली होती. > ही वेगळीच कोणीतरी मुलगी आहे.

टर्मीनेटर's picture

4 Nov 2019 - 6:04 pm | टर्मीनेटर

कथा आवडली...

एमी's picture

5 Nov 2019 - 1:57 pm | एमी

बाब्बो :-O मस्त जमलीय!

अजून लिहा

मुक्त विहारि's picture

22 Nov 2019 - 7:18 am | मुक्त विहारि

मस्त कथा आहे.