।।अशीही एक दिवाळी।।

मायमराठी's picture
मायमराठी in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

।।अशीही एक दिवाळी।।

तशी रात्रीपासूनच तमाला लोटून काढत कोपऱ्यातून चांदण्यांची रांगोळीची तयारी सुरू होते. पहाटेला आभाळ भरून टाकलेल्या ठिपक्यांवर प्रकाशयोजना मिचकावायला लागते. एकीकडे दवभरल्या देहांनी निथळताना झाडं सोवळ्या हातांनी सडा घालू लागतात. आळोखेपिळोखे देत वारा, नाजूक तनूच्या फुलांना अलगद उठवत मदत करू लागतो. अद्याप झोपेत असलेली ती आसक्ततेची रंगीबेरंगी लेणी आईच्या मांडीवर उगीच इकडून तिकडे लोळत असतात. विरक्त देठाचा प्राजक्त जणू स्नानसंध्येच्या तयारीत असतो. मधूनच वाऱ्याच्या उबदार फुंकरीने सुखाने जड झालेला कोण्या निनावी फुलांचा बिछाना एखाद्या लाटेसारखा पसरत असतो. घाणेरीची फुलं आता चांगली जागी होऊन हातात गुच्छ घेऊन कोणाच्यातरी स्वागताला तयार राहू लागतात. एव्हाना बकुळीची सुवासिक रांगोळी नि:शब्दपणे आसमंताला कवेत घेत राहते. एव्हाना कुठे जंगलात पहाटेचे राग आळवत मोगरा पशुपक्ष्यांना जाग आणत असतो. तेव्हाच कुठलीतरी शूर रानफुलं कुठेही ओबडधोबड दगडांच्या चिरांमधून डोकी उचलत सरळ आभाळात नजर लावत ध्यानाच्या तयारीत असतात. बेलाग कड्यांच्या कपारीतून न जाणे कोणती जंगली फुलं मावळ्यांसारखी खाली तळातील रहाळात, दऱ्यांमध्ये लक्ष ठेवता पलीकडच्या सहकाऱ्याला हाकारेकुकारे देत राहतात.

दूरवर डोंगरांतून कंदिलाची तयारी झालेली असते. क्षितिजाला जरतारी किनार लावून झालेली असते. कंदील पूर्ण उगवेपर्यंत, तिची किनार झळाळत राहते. त्याच कंदिलाच्या प्रकाशात न्हायला नद्यांचं, तलावांचं पाणी चमचम करत आतुर असतं. समुद्र कधीचाच उठून बसलेला, लाटा घेऊन वाळूत शिंपल्यांच्या पणत्या रोवून आलेला असतो. थोड्या वेळातच सगळ्या तुकड्यातुकड्याने चमकत किनाऱ्याचा देह उजळवून टाकणार असतात. लाटांची स्वरचित स्वरांची पहाटेची मैफील त्याच सुवर्णदेहाला बेधुंद करत राहते. कानांत जीव ओतून किनाऱ्यावरील सर्व सृष्टी डोलत डोलत दाद देताना मानेला सैल झटके देताना पाहून पक्षीही क्षणभर उडणं विसरून थबकत थबकत सभागृहात प्रवेश करतात. प्रत्येक लाट साथसंगत सवे घेऊन वाहता वाहताच नवीन राग रचत राहतात. दिवाळी पहाट ऐकत चारदोन छोटेमोठे रसिक मासे पाण्यातून बाहेर येत येत दाद देऊन जातात.

मातीचं तयार उटणं थोडं प्रकाशात, थोडं दवांत, थोडं पुष्परसांत भिजून तयार असतम. न जाणो कोणी कधी लावून घ्यायला येईल. फराळाकरता विविध फळं आल्यागेल्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असतात. ती कळून यावीत म्हणून झाडं चवऱ्याही ढालायला तयार असतात. कोणा वृक्षाखाली स्वयंभू उमटून आलेल्या कोण्या एका दगडावर जंगली फुलांचा फळांचा अभिषेक होतो.

आरतीची वाट न बघता पक्षी व खारी आपापला वाटा घेण्यात मग्न असतात. तो दगडही देव असल्याचा आव आणून त्यांच्याकडे पाहत मंद स्मित करतो. दोनचार मैना नृत्याविष्कार सादर करण्याच्या तयारीत असतात. लांबून रात्रभर दिवाळीच्या तयारीत जागरणाचे लाल डोळे घेऊन भारद्वाज हलकेच ठेका धरतो. चिमण्या अंगणात पट आखून उड्या मारत छप्पापाणी खेळण्याच्या मस्तीत कायम सुट्टी असल्याचा आनंद घेत राहतात.

images-6

ही दिवाळी संपतच नाही. साजरी होतंच राहते दिवसभर, संधिप्रकाशात व रात्रीतही, निरपेक्षपणे. आपल्याआपल्यातंच जीव रमवत ही सगळी मंडळी एकमेकांवर घनघोर अवलंबून असतानाच स्वैरपणे आयुष्य उपभोगत असतात. त्यांचं एकमेकांवर प्रेम, त्यांच्या मोकळ्याढाकळ्या जीवनशैलीतंच दडलेलं असतं. हे निखळ अस्तित्वच 'भेट' असते. इतरांकरता जी कधीच दिली-घेतली जात नाही. फक्त अनुभवली जाते.

निसर्ग सदैव आनंदाच्या सहजावस्थेतच असतो. त्याकरता काही वेगळं घडण्याची सक्ती नाही. निसर्ग नेहमीच दिवाळीमय असतो. ती यावी लागत नाही, ती असतेच त्याच्याच आश्रयाला. तो सर्वांगाने नटलेला असतो प्रत्येक क्षणाला, वस्त्र नवीन नसतात. वस्त्र त्याला सामावून नवीन होतात. त्याच्या अणूरेणूंत मांडलेलं तेज तेवत राहतं, सगळ्या ऐश्वर्य लक्षणांसह. शून्यातून उलगडणाऱ्या या दिवाळीत पूर्णत्व एकवटलेले असूनही ते एकाच वेळी शून्यात स्थिर असते.

अदृश्यातून दृश्याचा रस्ता 'उर्ध्वमूलमध:शाखम्...' असतो हे खरंच. पण तो शुद्ध स्पंदनांनी भारलेला असतो. पूर्णत्व अपूर्णत्वांत बीज बनून राहतं, त्रिगुणांमधून डोकावू लागतं. मायेशी रत होत होत वेगवेगळ्या आकारांत साकारू लागतं. तरीही नित्य '...पूर्णमेवावशिष्यते।' हीच ती मूळ ऊर्जा चराचरांतून द्वैतात साजरी होत राहते. तीच आपल्या देहांत चैतन्याच्या रूपाने चिन्मयज्योतीच्या तेजात उजळत असते. त्या प्रकाशाला ओहोटी नाही. नवद्वाराच्या देहात तेवणारी ही ज्योत आकळून घेणं म्हणजेच दिवाळी नव्हे का?

अशी एखादी दिवाळी मनात रेखाटली गेली, तर आपली खैर नाही गड्या हो!! आपल्याला सामावून, संपवून टाकून उरवून ठेवील... स्वत:च दिवे होऊन जाऊ, व आतल्या आत त्यांची आवली मांडून, उजळत राहू कायमचेच आणि अंधार प्रकाशात व प्रकाश अंधारात मिसळला जाईल, कधीही वेगळा न होण्याकरता.

श्रेयनिर्देश: प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 4:52 pm | यशोधरा

शब्दश्रीमंत लेख. सुरेख.

मायमराठी's picture

30 Oct 2019 - 9:56 pm | मायमराठी

भाषेची दिवाळी साजरी करायचा छोटासा प्रयत्न _/\_

पद्मावति's picture

30 Oct 2019 - 11:23 pm | पद्मावति

आहा..काय सुरेख लिहिलंय. प्रसन्न वाटले वाचुन.

सुधीर कांदळकर's picture

1 Nov 2019 - 6:08 am | सुधीर कांदळकर


दिवाळी पहाट ऐकत चारदोन छोटेमोठे रसिक मासे पाण्यातून बाहेर येत येत दात देऊन जातात.

हे कळले नाही. रत्नजडित भाषा आवडली. पण शेवटून दुसरा परिच्छेद या काव्यमय भाषेचा सूर बिघडवणारा वाटला. तरी लेख सुंदरच. धन्यवाद.

राहून गेलेला टंकनदोष सुधारला आहे. क्षमस्व आणि धन्यवाद.

मायमराठी's picture

1 Nov 2019 - 11:15 am | मायमराठी

खरं तर मीच तो सुधारून द्यायला हवा होता; नजरेतून सुटला. शार्क वगैरे मासे एकदम रसिकबिसिक होऊन दात द्यायला आले तर दिवाळी झालीच म्हणायची.

जुइ's picture

1 Nov 2019 - 11:12 pm | जुइ

सुरेख लिहिले आहे!

अलंकारिक भाषा, काव्यात्मक लेखन वाचण्यापेक्षा सहज सोप्या भाषेतील गद्य लेखन वाचण्याकडे माझा नैसर्गिक कल असल्याने असेल कदाचित, फारसा अर्थबोध न झाल्याने हा लेख डोक्यावरून गेला असला तरी तुमचे इतर लेखन वाचायला नेहमीच आवडते, लिहिते रहा...

श्वेता२४'s picture

6 Nov 2019 - 11:45 am | श्वेता२४

तुमचे प्रत्येक वाक्य निसर्गाचं रुपडं माझ्याडोळासमोर उभा करत होतं. प्रत्येक वाक्य न वाक्य म्हणजे रत्न आहे रत्न. मायमराठीने निश्चितच तुमच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आहे. प्रत्येक वाक्याला मन दाद देत होतं क्या बात.... क्या बात...... कसं सुचलं असं तुम्हाला. खुप संदर लेख आहे हा. वाचनखूण साठवली आहे.

अभिदेश's picture

8 Nov 2019 - 4:18 pm | अभिदेश

पण खुप जास्त अलन्कारित भाषा वापरलिये त्यामुळे हा लेख दवणिय झाला आहे.

मायमराठी's picture

8 Nov 2019 - 8:33 pm | मायमराठी

नुसताच दवणिय नाही दयनीय पण झाला . हा हा हा. असो परत असे प्रयत्न इथे होणार नाहीत. निश्चिन्त व्हा.