ती लेस्बिअन आहे?

राजे १०७'s picture
राजे १०७ in जनातलं, मनातलं
22 Sep 2019 - 2:41 pm

मी शिक्षण घेतलेल्या कोर्सची मुलं नव्वद पंचाण्णव टक्के सरकारी नोकरीत जात असत. माझंही शिक्षण पूर्ण झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळाली. माझे क्लासमेट उच्च पदांवर वेगवेगळ्या खात्यात क्लास थ्री पासून ते सुपर क्लास वन अधिकारी बनले होते.
मी एका तालुक्याच्या ठिकाणी नोकरी करत होतो. सोबतच शेजारच्या गावचा माझा बॅचमेट व जवळचा मित्र नोकरी करत होता.
अगोदर वेगळ्या जिल्ह्यात नोकऱ्या करून एकाच तालुक्यात बदलून आलो होतो. मित्र जिल्ह्याच्या ठिकाणी रहात होता व मी माझ्या हेड क्वार्टर ला रहात होतो. एकमेकांच्या घरी जाणे येणे होत होते. आमचं मुळ गाव दूसऱ्या जिल्ह्यात होते व नोकरी दुसऱ्या जिल्ह्यात करत होतो. मी मित्राच्या लग्नाला गेलो नव्हतो. पण आता वहीनींशी ओळख झाली आणि वहिनी बोलघेवड्या, अतिथ्यशिल स्वभावाच्या होत्या. एके दिवशी वहिनींनी त्यांच्या बहिणीला स्थळ बघा असं सांगितलं. ती आमच्याच डिपार्टमेंटमध्ये दुसऱ्या तालुक्यात काम करत होती. तिचं नाव विजया. विजयाचा घटस्फोट झाला होता. तिचा नवरा डॉक्टर होता पण पटत नव्हतं म्हणून त्यानं तिला सोडून दिले होते.
मी एक-दोन स्थळं सुचवली पण वहिनी आणि विजया यांना आवडली नाही. विजया व तिची एक मैत्रीण महाश्वेता नावाची, जिला सर्व श्वेता म्हणत यांची घट्ट मैत्री होती. श्वेता मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील मुलगी होती व ती पण विजयाच्या ऑफिसमध्ये सरकारी नोकरी करत होती. या दोघी आमच्याच कॉलेज मध्ये पाच-सहा वर्षांनंतर शिकलेल्या होत्या व नोकरीतही ज्युनिअर होत्या. विजया मुळे श्वेताची ओळख झाली. तिची हकीकत म्हणजे ती लग्नच करायचं नाही या मताची होती. तिचे आई-वडील,भाऊ तिच्या विनंत्या करून थकले होते पण ती लग्न करायचं नाही यावर ठाम होती. जर माझं बळजबरीने लग्न लावलं तर मी दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या घरातून कायमची निघून येईन असं ती आई-वडिलांना सांगत असे. श्वेताचं वय तीस होऊन गेले होते व तिच्या घरच्यांनी लग्नाचा विचार मागे टाकला होता. विजया आणि श्वेता प्रत्येक वेळी बरोबरच असत. दोघींना एकमेकींशिवाय अजिबात गमत नसे. श्वेता तिच्या कार्यालयातील बिनलग्नाच्या मुलींना सुध्दा लग्न करु नका. नवऱ्याची कायमची गुलामी करत रहावे लागते असं ब्रेनवॉशिंग करते हे कानावर पडले होते.
एक दिवस मी जिल्ह्याच्या ठिकाणी कामासाठी गेलो होतो. खूप उशीर होणार होता. म्हणून मित्राला फोन करून विचारले की मुक्कामाला येत आहे. तो आनंदाने या असं म्हणाला. मी काम संपवून त्याच्या घरी गेलो तर तिथे विजया आणि श्वेता दोघीही मुक्कामी आलेल्या होत्या. जेवण झाल्यानंतर मी एका खोलीत झोपायला गेलो. मित्र व वहिनी दुसऱ्या खोलीत, तर विजया आणि श्वेता हॉलमध्ये झोपणार होत्या.
दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून मी पाच साडेपाच वाजता निघालो तर हॉलमध्ये विचित्र गोष्ट पाहिली श्वेता आणि विजया एकमेकींच्या मिठीत पायावर पाय टाकून झोपलेल्या होत्या. अंगावर पांघरून नाही आणि अशा अवस्थेत गाढ झोपेत होत्या. मी मित्राला आवाज देऊन उठवलं व बाहेर पडून मोटारसायकल चालवत माझ्या घरी आलो.
नंतर महेश हा ज्युनिअर सहकारी आमच्या कडे बदलून आला. तो खूप जॉली आणि हरहुन्नरी गडी होता. त्याच्या बरोबर ट्रेकिंग ला जाणं, दारु पिणं, निरनिराळ्या ठिकाणी खादाडी करणं खूप आनंददायी होतं. लहान असला तरी वाचन दांडगे होते आणि शेरोशायरी सारखे छंद त्याला होते. त्याच्या झायलो गाडीतून सुटीच्या दिवशी लांब लांब फिरायला जात असू. असंच एकदा महेश आणि मी दोघंच फिरायला गेलो होतो. बोलता बोलता मित्राच्या मेव्हणीचा विजयाचा विषय निघाला. तर महेश म्हणाला ती आणि मी बॅचमेट आहोत. तिच्या लग्नाची गोष्ट काढताच तो म्हणाला कॉलेजमध्ये ती कोणत्याही मुलाशी बोलली नाही की प्रेम, मित्र काही नाही. ती आणि तिची मैत्रिण दोघींना सगळी मुलं लेस्बियन म्हणायचे.
आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे विजया आणि श्वेता लेस्बिअन आहेत तर..

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

22 Sep 2019 - 3:45 pm | आनन्दा

जिभेला काही हाड?

चौथा कोनाडा's picture

25 Sep 2019 - 11:16 am | चौथा कोनाडा

आनन्दासाहेब, तुम्हाला एवढं काय खटकलं कि एकदम "जिभेला हाड?" वैगरे आठवलं ?

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2019 - 6:05 pm | चौथा कोनाडा

चांगली रोचक कथा आहे, आता पर्यंत असले काही पाहिले / ऐकले नाही, वाचताना थोडा धक्का बसला.
सध्या एलजीबीटी चळवळी सुरू आहेत, काहीजण मन मोकळे करत आहेत. भारतीय समाजातील त्यांचा वावर हा मोठा औत्सुक्याचा हा विषय आहे !

आपले आणखी अनुभव वाचायला आवडतील !

सोन्या बागलाणकर's picture

23 Sep 2019 - 3:50 am | सोन्या बागलाणकर

बरं मग...असू दे की... तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी लेस्बियन असावं की स्ट्रेट...तुम्हाला कशाला खुपतंय?

आनन्दा's picture

23 Sep 2019 - 10:07 am | आनन्दा

काका लैंगिक कल नव्हे, तर त्याबद्दलचा अंदाज. तो देखील कोणत्याही ठोस माहितीशिवाय..
जाऊद्या. काय बोलणार आपण?

परिंदा's picture

23 Sep 2019 - 7:11 am | परिंदा

काहीही लिहिलेय!

विजयाचा घटस्फोट झाला होता. तिचा नवरा डॉक्टर होता पण पटत नव्हतं म्हणून त्यानं तिला सोडून दिले होते.
????

राजे १०७'s picture

25 Sep 2019 - 12:06 pm | राजे १०७

सोडून दिले मग घटस्फोट झाला संमतीने यवढं समजायला मेंदू कार्यक्षम असावा लागतो. तं म्हणता तपेलं वळकता आलं पाहिजे.

जॉनविक्क's picture

23 Sep 2019 - 9:14 am | जॉनविक्क

आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे विजया आणि श्वेता लेस्बिअन आहेत तर..

यु आर एन अबसोलुट इंडिजिनस एंटरटेनर.

माहितगार's picture

23 Sep 2019 - 10:11 am | माहितगार

यु आर एन अबसोलुट इंडिजिनस एंटरटेनर.

संस्कृतात समलिंगी नात्यांना नामाभिधान होते का माहित नाही. एका महाकाव्यात स्त्रीसमलैंगिकता समकक्ष असेल असे वर्णन येउन जाते - नामाभिधान नसल्याने दावा करणे मात्र अवघड ठरते शिवाय अनुवादक टाळतात किंवा अनुवादात गोची करतात.

समाजातिल उघड चर्चा सहसा टाळली जाणे आणि स्विकार्यतेचा प्रदीर्घकाळ अभाव राहीला आहे . समाज चर्चा करत असेल आणि लैंगिक जिवनातील वैविध्य (अव्यापारीय, गुन्हेगारीविरहीत, परस्पर अनुमती आधारीत आणि आरोग्यकारकपणे) स्विकारत असेल तर ठिक आहे.

अर्थात अशा चर्चांच्या भरात निष्कर्ष घाई होणार नाहीत हे ही पहाण्याकडे लक्ष वेधणे हा माझ्या प्रतिसादाचा उद्देश्य आहे. माझ्या परिचयतील एका भारतात वापस आलेल्या एन आर आय स्त्रीचा समज दोन मित्रांनी किंवा मैत्रिणींनी एकमेकांना केलेला प्रत्येक स्पर्ष समलैंगिक उद्देश्याचा किंवा त्यास कारणीभूत असतो असा होता त्या मुळे दोन मित्रांनी किंवा मैत्रिणींनि हातात हात घेतले तरी त्या लगेच त्यांना हटकत . प्रत्येक हातात हात घेणे प्रत्येक गळा भेट किंवा वरील वर्णना प्रमाणे झोपेत एकमेकांवर हात पाय टाकणे म्हणजे समलैंगिकच असे अर्थ काढण्याचे निष्कर्षघाईचे अतीरेकही करु नयेत हे महत्वाचे असावे असे वाटते.

जॉनविक्क's picture

23 Sep 2019 - 1:22 pm | जॉनविक्क

वरील वर्णना प्रमाणे झोपेत एकमेकांवर हात पाय टाकणे म्हणजे समलैंगिकच असे अर्थ काढण्याचे निष्कर्षघाईचे अतीरेकही करु नयेत हे महत्वाचे असावे असे वाटते.

नक्किच काढलेला नाही. कोणत्याही मुलाशी बोलली नाही की प्रेम, मित्र काही नाही. ती आणि तिची मैत्रिण दोघींना सगळी मुलं लेस्बियन म्हणायचे. या नंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला तो पर्यंत अंधारातच चाचपडत होते

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Sep 2019 - 1:53 pm | अनिरुद्ध.वैद्य

>>

पण प्रचंड सजेस्टीव्ह लिहिलेलं आहे!

एकदम बरोबर जवान दादा. धन्यवाद.

मारवा's picture

25 Sep 2019 - 10:49 am | मारवा
चौथा कोनाडा's picture

9 Oct 2019 - 10:18 am | चौथा कोनाडा

मारवा साहेब, सुरेख लेख आहे हा.
माहितीपूर्ण अन महत्वाचा लेख !
इथं दुवाच दिल्याबद्दल धन्यवाद !

तुमीच एकदा या लेखाचा अनुवाद करून फोटो सह इथं पोस्टवा !

सुबोध खरे's picture

23 Sep 2019 - 11:32 am | सुबोध खरे

आपण अर्धवट माहितीवर फार पटकन निवाडा देऊन मोकळे होतो.

मुळात समजा त्या समलैंगिक असतील तर कुणाला काय त्रास आहे त्यांचा?

त्यांना असे श्रेणीबद्ध(CATEGORISE) करण्याची आवश्यकता नाही.

जॉनविक्क's picture

23 Sep 2019 - 1:19 pm | जॉनविक्क

असे कॅटेगोराईज करायची आवश्यक्ताच नाही, हा जास्त संतुलित दृष्टीकोण आहे.

मी शिक्षण घेतलेल्या कोर्सची मुलं नव्वद पंचाण्णव टक्के सरकारी नोकरीत जात असत.

कोन्त अस कोर्स ?

राजे १०७'s picture

23 Sep 2019 - 3:53 pm | राजे १०७

सांगायचे असते तर लेखात सांगितले असते.

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2019 - 1:31 pm | चौथा कोनाडा

हस्तरजी, एमपीएस्सी असनार तो कोर्स !
(आमचा आपला एक ठोकताळा)

धर्मराजमुटके's picture

24 Sep 2019 - 2:25 pm | धर्मराजमुटके

एमपीएस्सी नाय ओ ! टायपिंग आणि शॉर्टहँड असनार बगा !

राजे १०७'s picture

24 Sep 2019 - 4:08 pm | राजे १०७

करेक्ट वळकलं. हे कोर्स करून सुपर क्लास वन अधिकारी बन्ता यतंय.

आदिजोशी's picture

24 Sep 2019 - 2:17 pm | आदिजोशी

आधीच मुलांची लग्न जमेनाशी झालीत. त्यात बायकाच बायकांशी लग्न करायला लागल्या तर होतकरू तरुणांनी जावं कुठे? त्यांनाही गे बनण्याशिवाय पर्याय राहणार नाही. समाजाच्या ह्या अधोगतीला फॅशिस्ट लेस्बियन फेमिनिस्टा जबाबदार आहेत.

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2019 - 2:43 pm | चौथा कोनाडा

हा .... हा ..... हा .....

मुलांना आता जीवनात "गे"यता शोधावी लागेल ! :-)

धर्मराजमुटके's picture

24 Sep 2019 - 2:30 pm | धर्मराजमुटके

श्वेता आणि विजया एकमेकींच्या मिठीत पायावर पाय टाकून झोपलेल्या होत्या. अंगावर पांघरून नाही आणि अशा अवस्थेत गाढ झोपेत होत्या.

नक्की कसे समजते कोणी लेस्बियन आहे की गे आहे ते ? म्हणजे पायावर पाय टाकून झोपलेले असल्यामुळे समजते की अंगावर पांघरुण नसल्यामुळे ? काये की कधी कधी मी माझ्या स्वता:च्याच पायावर पाय टाकून झोपतो आणि बरेचदा पांघरुण पण अंगावर रहात नाही. कोणी मला एकपेशीय सजीव तर समजणार नाही ना ???

मिपा वर संग्रहालय उघडले तर भरपूर लोक बघयला येतील

जॉनविक्क's picture

24 Sep 2019 - 6:39 pm | जॉनविक्क

कानडाऊ योगेशु's picture

24 Sep 2019 - 4:23 pm | कानडाऊ योगेशु

इतकी आगपाखड का चालली आहे समजले नाही. लेखक महोदयांनी एक गॉसिपिंग टाईप अनुभव कथन केले आहे. लेखातील नावे जोपर्यंत खरी नाही आहेत तोपर्यंत तरी कोणाला काही आक्षेप असायचे कारण नसावे.

राजे १०७'s picture

24 Sep 2019 - 6:00 pm | राजे १०७

हे कळायला हवं ना.

बॅटमॅन's picture

26 Sep 2019 - 12:48 am | बॅटमॅन

चालायचेच. उलट अशा गे आणि लेस्बियन लोकांना हुडकून हुडकून प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांचा सत्कार केला पाहिजे (चांगल्या अर्थाने सत्कार, वाईट अर्थाने नव्हे). जशी जात-धर्म-लिंग वगैरेवर आधारित आरक्षणे असतात तशी समलिंगी असण्यावर आरक्षणे ठेवली पाहिजेत.

कारण एकच आहे, हे समलिंगी लोक बहुतांशी प्रजा पैदा करत नाहीत. बहुतांशी म्हणायचे कारण की काहीजण स्पर्म इत्यादी देऊन पोरे पैदा करू पाहतात त्यांचा अपवाद. बहुतेकजण (आणि जणी) करत नाहीत, करूच शकत नाहीत कारण समलिंगी सेक्सने प्रजा पैदा होत नाही.

प्रजा पैदा झाली नाही तर लोकसंख्या कमी होईल. सध्या लोकसंख्या इतकी वाढलेली आहे, जर अशा समलिंगी-फ्रेंडली धोरणांचा अवलंब केला तर चार तोंडे कमी पैदा होतील आणि मर्यादित साधने असलेल्या पृथ्वीवरचा ताण जरासा का होईना हलका होईल....

काय बरोबरे का मी म्हणतोय ते? विचारसरणी गेली खड्ड्यात, फक्त आणि फक्त प्रॅक्टिकल विचार आहे हा.

खटपट्या's picture

8 Oct 2019 - 7:45 pm | खटपट्या

सहमत! लोकसंख्या कमी झालीच पाहिजे...

चौथा कोनाडा's picture

9 Oct 2019 - 12:32 pm | चौथा कोनाडा

बॅटमॅन साहेब, लोकसंख्या करण्यासाठी एलजीबीटी वै पहिजे असं काय नै

चाइल्डफ्री इंडिया एक चळवळ आहे, जी अपत्य नको असा प्रचार करत आहे.

हे त्यांच फेसबुक पान आहे:
https://www.facebook.com/childfreeindia/

सुबोध खरे's picture

9 Oct 2019 - 10:33 am | सुबोध खरे

उलट अशा गे आणि लेस्बियन लोकांना हुडकून हुडकून प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांचा सत्कार केला पाहिजे (चांगल्या अर्थाने सत्कार, वाईट अर्थाने नव्हे). जशी जात-धर्म-लिंग वगैरेवर आधारित आरक्षणे असतात तशी समलिंगी असण्यावर आरक्षणे ठेवली पाहिजेत.

जर अशा समलिंगी-फ्रेंडली धोरणांचा अवलंब केला तर चार तोंडे कमी पैदा होतील

लोकसंख्या कमी करण्यासाठी असला अव्यापारेषु व्यापार करण्यापेक्षा संततिनियमन हे लोकांच्या गळी उतरवलं पाहिजे. ते जास्त सोपं आहे .

बर्याचश्या सरकारी नोकरांना डोके नसते असे म्हणतात ते काही खोटे नाही.
त्या दोघी एकमेकांच्या मिठीत किंवा कुशीत झोपल्या म्हणून लगेच लेस्बियन हा शिक्का मारताय..
तुमच्या नसलेल्या मेंदूची कीव करावी वाटते.

आणि बाय द वे समजा त्या दोघी लेस्बियन असल्या तरी त्याच्याशी तुम्हाला काय घेणेदेणे हो?? त्यांनी काय करावे आणि काय नाही हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही नाक खुपसणारे कोण?

कविता१९७८'s picture

14 Oct 2019 - 12:12 pm | कविता१९७८

काय झालं लेस्बियन असली तर?? स्र्टेट असणं किंवा गे असणं किंवा लेस्बियन असणं हे नैसर्गिक आहे, सेक्शुअल ओरीयंटेशन हा चाॅईस नसतोच मुळी, उद्या कुणाच्याही घरात लेस्बियन किंवा गे मिळु शकतात , त्यांनाही सन्मानाने जगण्याचा तितकाच हक्क आहे जितका स्र्टेट लोकांना आहे.

प्रत्यक्षात असे पुढे येऊन बोलायला जमणार नाही म्हणून की ही तर फक्त सुरुवात आहे म्हणून ?

चौथा कोनाडा's picture

16 Oct 2019 - 4:16 pm | चौथा कोनाडा

कथा काल्पनिक असो वा नसो, प्रतिसाद तर ओरिजनल आहे ना !
लोकांनी रिऍक्ट व्हावं म्हणून तर धागा काढलाय ना ! तुमी आपलं क्विक्क पणे "काहीतरी"च प्रतिसाद देता, ओरिजनल नय !

जॉनविक्क साहेब _/\_

जॉनविक्क's picture

17 Oct 2019 - 12:44 am | जॉनविक्क

पटला नाही पण आवडला

नाखु's picture

17 Oct 2019 - 9:03 am | नाखु

(ग)धड्या खालचे प्रश्न :
१ लेखकाला ते लेस्बियन आहेतच असे का वाटले.
२ लेखकाला त्याचा मित्र गे आहे असा संशय आहे, तेव्हा त्याची पडताळणी करण्यासाठी उपाय सुचवा.
३ मानसिक जेलसी आणि वैचारिक जेलुसील यावर दहा ओळीत सटिप माहिती लिहा।

शिक्षकांसाठी पाठ्य बाह्य उपक्रम.
परिसरातील एल जी बीटी संस्थेच्या सभासदांशी लेखकाची गाठभेट घडवून वैचारिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करा, त्याचा खर्च लेखक सरकारी नोकरीत असल्याने आनंदाने करेलच.

"अखिल मिपा कुणाचे काय तर फाटक्यात पाय" या संघ्याच्या ताज्या समीक्षण लेखातील संपादित अंश.

संकलक पांंढरपेशा नाखु

राजे १०७'s picture

17 Oct 2019 - 4:15 pm | राजे १०७

आता मी पेन्शनर आहे. कथा काल्पनिक नाही. दोन्ही मुलींची भेट घडवून देऊ शकतो. मुद्दा हा आहे की त्यावेळी लेस्बिअन काय शब्द आहे आणि त्याचा काय अर्थ आहे हे ग्रामीण भागात कुणाला माहीत नव्हते. मोबाईल वर पोर्न पाहून हे प्रकार/ वर्गीकरण जन्तेला कळले.

जॉनविक्क's picture

17 Oct 2019 - 6:39 pm | जॉनविक्क

मग जाणकारांनी धाग्यावर चर्चेसाठी लावलेली गैरहजेरी अचंबित करणारी ठरते असे खेदाने नमूद करतो

चौथा कोनाडा's picture

17 Oct 2019 - 4:18 pm | चौथा कोनाडा


एल जी बीटी संस्थेच्या सभासदांशी लेखकाची गाठभेट घडवून वैचारिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करा, त्याचा खर्च लेखक .....

मिपा कट्टाच करुयात ना ! खर्च हा धागालेखक मिपाकर करेलच !

राजे १०७'s picture

17 Oct 2019 - 7:08 pm | राजे १०७

नक्की करतो खर्च.

मिपा कट्टाच करुयात ना ! खर्च हा धागालेखक मिपाकर करेलच !

खर्चाचं काय आम्ही आमचा करू न हो.

जॉनविक्क's picture

22 Oct 2019 - 4:47 am | जॉनविक्क

बाकीच्यांचा खर्च धागालेखक करेल.