FLAME

राजे १०७'s picture
राजे १०७ in जनातलं, मनातलं
18 Sep 2019 - 11:03 pm

वीस बावीस वर्षे वयाचे आम्ही एका कॉलेजात शिकायला होतो. मी, सात्या, पव्या, आस्क्या, राजू आणि गुडघ्या एका रुमवर रहात होतो. आमच्या घरमालकाची मुलगी मला लयी लाईन देत होती पण राजाला ते देखवलं नाही. राजानं तिला बहीण मानावं असं फर्मान सोडले. आमच्यात राजा सभ्य नि निर्व्यसनी असल्यानं, हुशार मुलगा रुम पार्टनर आहे म्हटल्यावर आमच्या खोडींकडे बाकीचे कानाडोळा करत. त्यामुळे त्याचं ऐकणं भाग होतं. मी पण उजीवर (उज्वला) लाईन मारणं सोडून दिले. गुडघ्याला मात्र राजाचा लयी राग आला.
एक दिवस गुडघ्यानं मला एक पोरगी दाखवली. म्हणला हिला मी पटवणारच. पोरगी धिप्पाड , भरलेली व जवान होती. मोठ्या खानदानी घरातली वाटत होती. गुडघ्या मला रोज बरोबर नेत असे मग आम्ही तिची शाळा सुटली की पाठलाग करत असू. हळूहळू तिच्या लक्षात आलं. मला असं करताना जाम हसायला यायचं पण गुडघ्या दटावायचा " बाप्या लेका हरामखोरा गप चल की" त्या पोरीला आमचा पाठलाग आवडायला लागला आहे हे कळून आले. थोड्या थोड्या अंतराने ती सिंहिणावलोकन करुन आमच्या कडे तिरप्या नजरेने पाहून घेई.
आता गुडघ्यानं आणि मी तिचं घर पाहून घेतले. लगेच गुडघ्यानं तिकडं रुम बघायला सुरुवात केली. आम्हाला शेजारच्या गल्लीत रुम मिळाली. आधीची रुम गुडघ्यानं कांगावा करत हिथं पाणी नाही, लोक चांगले नाही अशी कारणं देऊन सोडायला लावली. गुडघ्याचा मेंदू गुडघ्यात असल्यानं त्याच्या नादाला कोणी लागायचं नाही. मग गेलो तिकडे रुमवर.
त्या मुलीच्या घरी पाण्याचा मोठा हौद होता. आम्हाला पाण्याची काही कमी नव्हती तरीही गुडघ्या मला " बाप्या चल पाणी आणू" म्हणून तिच्या हौदावर नेत असे. तिलाही ठराविक वेळ माहित असल्याने नजरेने एकमेकांकडे कटाक्ष टाकत असत. मी बळंच हसू दाबायचो. पण आतमध्ये फार गुदगुल्या व्हायच्या. गुडघ्या मार खायची वेळ आली तर मला पुढे करेल कदाचित असे वाटून मी त्याला स्वातंत्र्य देऊन टाकले.
गुडघ्यानं मला FLAME विषयी पहिल्यांदा सांगितले.
आपलं नाव व मुलीचं नाव इंग्रजीत लिहायचे. कॉमन अक्षरं काट मारून बाद करायची व उरलेली अक्षरं मोजायची. मग एफ वरून मोजत ई वर जायचं. पाचपेक्षा जास्त असतील तर परत ई वरून एफ कडे यायचं. जास्त असतील तर परत ई कडे मोजत जायचं. शेवटच्या अक्षरावरून रिलेशनशिप कशी राहील हे कळणार.
उदा.
F = friendship
L= love
A= attraction
M= marriage
E= enemy
मग काय मलाही चाळाच लागला. मुलींच्या नावाबरोबर स्पेलिंग लिहून flame पैकी काय येते याचा. पुढेपुढे हवेतल्या हवेत ही गणितं मला करता येऊ लागली. असो गेले ते सोनेरी दिवस. उरल्या केवळ आठवणी. गुडघ्याची प्रेमकहाणी मात्र पुढे सरकली नाही.

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

19 Sep 2019 - 3:08 am | गामा पैलवान

अहाहा राजे, काय आठवण आणवून दिलीये म्हणून सांगू. माझ्या जवानीचा जलवा होता फ्लेम टेस्ट! जेव्हा मी जवान होऊ घातलो होतो तेव्हा लिहिलेला पहिला बेसिक ( = Beginners Allpurpose Symbolic Instruction Code ) प्रोग्राम हाच होता. मुद्दाम मुलांची दोन्ही नावं टाकून होमोगिरी कितपत जुळेल ते पाहायचो.
आ.न.,
-गा.पै.

राजे १०७'s picture

19 Sep 2019 - 6:23 am | राजे १०७

धन्यवाद गापै.

चौथा कोनाडा's picture

20 Sep 2019 - 2:21 pm | चौथा कोनाडा

भारी ...... रोमॅण्टिक दिवस !

राजे १०७'s picture

20 Sep 2019 - 3:10 pm | राजे १०७

धन्यवाद चौ को.

विस्मृतीत गेलेल्या F L A M E ची flame प्रज्वलीत केलीत.

राजे १०७'s picture

20 Sep 2019 - 3:38 pm | राजे १०७

ठेंकू गड्डा जी.

मराठी कथालेखक's picture

21 Sep 2019 - 1:09 am | मराठी कथालेखक

कॉलेज जीवनात फ्लेमचं व्यसन न लागलेला तरुण विरळाच