मिपा दिवाळी अंक आवाहन

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
12 Sep 2019 - 7:19 pm

.bgimg-1 {
background-image: url("https://i.postimg.cc/tgHfbch4/paper-b.png");
}
p {
margin-left:20px;
margin-right:20px;
text-align:justify;
font-size:19px;
}

मिपा दिवाळी अंक आवाहन

IMG-20190910-WA0007

मंडळी, गणपतीबाप्पांना निरोप देऊन झालेला आहे, श्रीगणेश लेखमालाही सुफळसंपूर्ण झाली आहे आणि आता सगळ्यांना वेध लागले असतील ते येणाऱ्या दिवाळीचे. दिवाळी म्हटली की दिव्यांच्या रोशणाईच्या, उटण्याच्या, अत्तरांच्या, रांगोळीच्या रंगांच्या आणि फराळाच्या खमंग सुवासाच्या आठवणी आपसूकच प्रत्येकाच्या मनामध्ये रुंजी घालायला लागलेल्या असतील. अशी काही काही समीकरणं आपल्या डोक्यात फिट बसलेली असतात. ह्याबरोबरच मराठी माणसासाठी या समीकरणाचा आणखी एक पैलू आहे, तो म्हणजे दिवाळी अंक. दिवाळी अंकांशिवाय आपली दिवाळी अपूर्णच.

सालाबादप्रमाणे या वर्षीसुद्धा आपल्या मिसळपावचा दिवाळी अंक वाजत गाजत येणार आणि नेहमीप्रमाणेच लेख, प्रवासवर्णनं, कथा, कविता, व्यंगचित्रं अशा चौफेर वाचनफराळाने हा अंक सर्वांगसुंदर नटणार! अर्थात, तुम्ही सगळ्यांनी हातभार लावल्याशिवाय हे शक्य नाही.

तर मिपाकरहो, आहात ना तयार? तुम्हां सर्वांना लिहायला सुरुवात करण्याची मनःपूर्वक विनंती आहे. आपल्याला जे आवडेल, रुचेल ते लिहा. फक्त दिवाळी हा आनंदाचा सण असल्याने, लिखाणाला उदासीची, हिंसेची वा बीभत्सतेची छटा शक्यतो नको.

तसंच, नेहमीच्या लिखाणाखेरीज आम्ही तुमच्यासाठी एक लेखनविषयसुद्धा घेऊन येतो आहोत. त्या विषयाला धरूनसुद्धा तुम्ही आपलं लेखन पाठवू शकाल.

विषय (थीम) आहे : रसग्रहण.

कशाला म्हणावं रसग्रहण? एखाद्या विषयाच्या अनुषंगाने सुचलेले विचार आणि त्या अनुषंगाने इतर संदर्भ देताना, सोप्या आणि सहज भाषेत केलेलं अभ्यासपूर्ण आणि/ किंवा माहितीपूर्ण लेखन वा विचारांची मांडणी. मात्र, मांडणीत विद्वत्तेपेक्षा रसिकतेची अनुभूती यावी. रसग्रहणाने विषयाच्या आशयाचा विविध पातळ्यांवर शोध घ्यावा. त्यातील सौंदर्यस्थळं उलगडावीत, वाचकांना रसग्रहण वाचताना विषयाचा कौतुकपूर्ण परिचय व्हायला हवा.

रसग्रहण म्हणजे समीक्षण नाही, इतकं लक्षात ठेवता पुरे.

तर, कशाचं रसग्रहण करायचं आहे?

आपण रसग्रहण हा विषय केवळ पुस्तक, चित्रपट, नाटक वा गाणं ह्यापुरता मर्यादित राखणार नाही आहोत. रसग्रहण ही संकल्पना पुढे नेत, खाद्यसंस्कृती, स्थळ, भाषा, साहित्यप्रकार, लेखकाची लेखनशैली, आवडते लेखक, कलाकार, स्थापत्यकला, एखाद्या काळाविषयी (period), चित्रकला, फोटोग्राफी, नृत्य, नाट्य, संगीत असे अनेक विषय ह्या संकल्पनेमध्ये समाविष्ट होऊ शकतील. तुमच्या आवडीचा विषय तुम्ही निवडू शकाल.

ह्या विषयाला धरून लेखन दिलंत, तर रसग्रहणाचा विषय आम्हाला कळवायला विसरू नका.

अर्थात, विषय दिला म्हणजे फक्त त्यासंबंधित साहित्य स्वीकारणार असं नाही. विषयाधिष्ठित किंवा आपल्याला सुचलेल्या विषयावर अशा दोन्ही प्रकारच्या लेखनाची आम्ही वाट बघत आहोत. लेखाबरोबर प्रकाशचित्रे दिल्यास शक्यतो स्टॅण्डर्ड आकारातील - उदाहरणार्थ, ६४० x ४८०, १०२४ x ७६८ वगैरे, कसल्याही प्रकारे कोडींग वा Formatting न करता पाठवावीत, ही विनंती.

लेखन देण्याची मुदत १० ऑक्टोबर, २०१९.

आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीवर व्यनिने पाठवा किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर ईमेलने पाठवा. काही प्रश्न, अडचणी असतील तर आमच्याशी (साहित्य संपादक) संपर्क साधा. दिवाळी अंकात आपलं लिखाण पाठवताना ते आधी कुठेही (म्हणजे छापील स्वरूपात आणि डिजिटल स्वरूपात - अगदी स्वतःच्या फेसबुक भिंतीवरसुद्धा) प्रकाशित झालेलं नाही, याची काळजी घ्या.

तसा आपल्याकडे अजून वेळ आहे, तेव्हा होऊ जाऊ द्या लेखनाला सुरुवात! एक से बढकर एक लेख, कविता, कथा येऊ द्या मिपाकरहो, आम्ही तुमच्या लेखनाची वाट पाहत आहोत.

तेव्हा, लागा लिहायला!

टीप : आलेल्या साहित्यापैकी दिवाळी अंकासाठी निवडलेले लेख प्रकाशित करून झाल्यानंतर जे अप्रकाशित लेख आणि इतर साहित्य प्रशासनाकडे असेल, ते सदस्य स्वत: प्रकाशित करू शकतील. तसंच मिपा दिवाळी अंक प्रकाशित झाल्यानंतर आपलं अंकातलं समाविष्ट लिखाण लगेचच इतरत्र प्रकाशित करू नये, अशी विनंती.

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

20 Oct 2019 - 9:43 am | कुमार१

आवडले !

चौकटराजा's picture

21 Oct 2019 - 8:37 am | चौकटराजा

दिवाळी अंकासाठी पर्याप्त पेक्षा जास्त लिखाण आले व आता उरलेले लेख नेहामीच्या विभागात देउन क्षमस्व असे सान्गणे सम्पादाकाना प्राप्त यातच मिपाचे यश आहे .( यशो आहे !!! ))))) ) !

बिपीन सुरेश सांगळे's picture

21 Oct 2019 - 8:41 am | बिपीन सुरेश सांगळे

काल दोन अंक हातात पडले .
प्रसिद्ध विनोदी दिवाळी विशेषांक - आवाज आणि श्री व सौ .
विनोद आवडणाऱ्यांसाठी आवाज नेहमीच पहिली पसंती आहे .
श्री व सौ मध्ये कथा आहेत .
आणि राजन खान यांच्या ' खुद्द आणि पाऊस 'या कादंबरीचा पहिला भाग आहे .
मी आपल्याशी हे नम्रपणे शेअर करू इच्छितो -
या अंकांमध्ये माझ्या कथा आहेत .
आवाज - विनोदी कथा
अन श्री व सौ - ऐतिहासिक , काल्पनिक दीर्घ कथा .
( हे कुठे टाकावे हे न कळल्याने इथे टाकले आहे , क्षमा असावी .)

यशोधरा's picture

21 Oct 2019 - 11:46 am | यशोधरा

अरे वा! वाचणार. धन्यवाद इथे सांगितल्याबद्दल.

बिपीन सुरेश सांगळे's picture

21 Oct 2019 - 8:46 am | बिपीन सुरेश सांगळे

मसाप पुणे यांची दिवाळी अंक स्पर्धा आहे . त्यामध्ये ऑन लाईन चाही
विभाग आहे .
साहित्य संपादक टीमला योग्य वाटल्यास त्यामध्ये मिपाचा अंक पाठवता येईल .
शुभेच्छा

गुल्लू दादा's picture

21 Oct 2019 - 9:28 pm | गुल्लू दादा

मग नोंदवून टाका की मिपा चा सहभाग. परिवार अजून मोठा होण्यास मदत होईल आपला.

गुल्लू दादा's picture

21 Oct 2019 - 9:28 pm | गुल्लू दादा

मग नोंदवून टाका की मिपा चा सहभाग. परिवार अजून मोठा होण्यास मदत होईल आपला.

जव्हेरगंज's picture

21 Oct 2019 - 2:02 pm | जव्हेरगंज
जव्हेरगंज's picture

21 Oct 2019 - 2:05 pm | जव्हेरगंज
सर्वसाक्षी's picture

21 Oct 2019 - 7:24 pm | सर्वसाक्षी

चेपु ने अवैध प्रतिसाद दिला असे दाखवले जात आहे