रुपक२

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
9 Nov 2008 - 12:35 pm

एका गावात दोन संन्यासी रहात होते. एक गुरु होता. दुसरा शिष्य होता. दोघे ब्रम्हचारी
एक दिवस दोघेजण एका गावाला निघाले. वाटेत शिष्य गुरुला बरेच प्रश्न विचारत होता. गुरुजी त्याच्या शंकांचे निरसन करत होते.
ब्रम्ह काय आहे आणि प्रणव म्हणजे काय अशा गहन विषयांवर त्यांची चर्चा चालली होती. त्यामुळे वेळही बरा जात होता. रस्ता चालण्याचे शीणही जाणवत नव्हते.
वाटेत एके ठिकाणी एक नदी आडवी वहात होती. नदी काठावर एक तरुण स्त्री उभी होती.
गुरु शिष्य नदी पार करण्यापुर्वी थोडे विश्रान्तीसाठी तेथे थाम्बले.
त्या तरुणीलाही नदी पार करायची होती. तीने पाहिले दोन संन्यासी चालले आहेत . एक तरुण आहेत एक थोडे वयस्कर आहेत त्या तरुणीने शिष्याला विचारले. मला नदीपलीकडे जायचे आहे . मला मदत कराल का?
शिष्याला एक तरुणी ब्रम्हचर्याला असा प्रश्न विचारते हेच आश्चर्याचे वाटले.
तो म्हणाला "माते आम्ही ब्रम्हचारी आहोत. स्त्री स्पर्ष आम्हाला वर्ज्य आहे. आम्ही तुला मदत करु शकत नाही. तुझा जागी कोणी एखादा पुरुष असता तर केली असती मदत. माझा नाईलाज आहे"
ती तरुणी खिन्न झाली. तिलाही नदीपलिकडे जायची घाई होती. थोडावेळ विचारकरुन तिला रहावले नाही म्हणून तीने थोडे धाडस करुनच गुरुला विचारलए."गुरुवर मी अबला आहे तुम्ही मला नदी पार करायला मदत कराल?"
गुरुजीनी शिष्याचे उत्तर ऐकले होते. ते म्हणाले अवश्य करेन मदत. गुरुने त्या तरुणीला खांद्यावर बसवले आणी नदी पार करुन दिली. त्या तरुणीने गुरुंचे आभार मानले आणि ती पायौतार होउन आपल्या वाटेने निघुन गेली.
शिष्याला फार आश्चर्य वाटले. तो मनातल्या मनात विचार करु लागला की गुरुजी ब्रम्हचारी असूनही त्यानी स्त्री स्पर्ष वर्ज्य मानला नाही. हे कसे काय?"
गुरु शिष्य दोघेही पुन्हा मार्गाक्रमण करु लागले. पण आता शिष्य काहीच विचारत नव्हता. दोघेही मौन होते. दिवसभर शिष्याच्या मनात तीच गोष्ट घोळत होती. राहुन राहुन त्याला तोच प्रश्न पडत होता.
चालताचालता दिवस सम्पला. वाटेत आडोसा पाहुन थाम्बले आणी सकाळे उठून आन्हिके उरकुन पुन्हा मार्गाक्रमन करु लागले.
शिष्य अजूनही तोच विचार करत होता. गुरुंच्या लक्षात आले की शिष्य कालच्या त्या प्रसांगानन्तर गप्पगप्प आहे. त्यानीच न रहावुन शिष्याला विचारले. बाळा तु काल दुपारपासून एकही प्रश्न विचारला नाहीस.
शिष्य म्हणाला एक विचारु ?गुरुवर तुम्ही रागावणार तर नाही ना?
गुरु म्हणाले "अरे विचार ना? तो तुझा हक्क आहे? गुरुने शिष्यावर प्रश्न विचारला म्हणून रागवायचे नसते"
शिष्य म्हणाला" आपण ब्रम्हचारी; आपल्याला स्त्री स्पर्ष वर्ज्य...पण मग काल तुम्ही त्या स्त्रीला खांद्यावर बसवुन नदी पार करुन दिलीत. हे चूक नाही का?"
गुरुला हा प्रश्न अपेक्षीतच असावा. ते काहीसे हसले. म्हणाले अरे तीला काल मदतीची गरज होती आपण तीला मदत केली ...झाले इतकेच त्यात वासनेचा लवलेषही नव्हता.
आणि मी तर त्या स्त्रीला काल त्या नदीकाठी खांद्यावरुन उतरवल्यावरच सोडून दिले. तू कशाला विचारात तीला इथपर्यन्त आणलेस? त्या विचारापायी तु तुझ्या प्रश्न विचारणे विसरलास. नाहक चिन्तेत वेळ घालवलास. शिकण्याचा आनन्द हरवलास

आपली अवस्था शिष्यासारखी असते. एखादी गोष्ट त्यावेळीच सोडुन दिली तर अनावश्यक चिन्ता ताण तेथेच सोडले जातात. पण आपण भूतकाळातली एखादी गोष्ट इतकी जतन करतो की त्याचा आपल्याला त्रास होतो.
झाली गोष्ट तीथेच सोडून देतो तो वर्तमानात जगतो. आनन्दात रहातो.
मागे झालेली भांडणे/ कटू प्रसंग विसरुन नव्याने आयूष्याला सामोरे जाण्यात खरा आनन्द आहे.
.........................स्वामी विजुनीष भौ.
(मूळ रुपक खलील जिब्रान )

संस्कृतीप्रतिभा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Nov 2008 - 1:00 pm | बिपिन कार्यकर्ते

हे रुपक माझ्या अत्यंत आवडत्या रुपकांपैकी आहे. जर का खरोखर यातील शिकवण आचारात आणता आली तर काय पाहिजे अजून?

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

9 Nov 2008 - 1:43 pm | टारझन

आम्ही हे कलम आमच्या टाऋग्वेदाच्या प्रकरण २५च्या १२२व्या अध्यायामधे टाकू .. यामुळे येणार्‍या युगात आमचा ग्रंथ वाचुन समस्त सृष्टीजणांना स्वामी विजुनिषांची देखिल आठवण होइल ...

-ब्रम्हर्षी(टार्शिष्ट)

रामदास's picture

9 Nov 2008 - 3:21 pm | रामदास

कधीतरी वाचलेलं आठवतय,पण तुमच्या शब्दात वाचून मजा आली.

विनायक प्रभू's picture

9 Nov 2008 - 7:26 pm | विनायक प्रभू

गूरु कडून कायच शिकला नाय. स्त्री वर्गाला मदत करायला मागे पडू नये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2008 - 9:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गूरु कडून कायच शिकला नाय. स्त्री वर्गाला मदत करायला मागे पडू नये.

प्रभूदेवा, तुम्ही ते गुरू नव्हतात ना ... चुकीचा गुरू निवडू नये यावर पुढचं रूपक पाडणार, आपलं लिहिणार का इजाभौ? ;-)

विसोबा खेचर's picture

9 Nov 2008 - 11:21 pm | विसोबा खेचर

ही ओशोची कथा आहे ह उल्लेख यायला हवा होता..

तात्या.

लिखाळ's picture

9 Nov 2008 - 11:31 pm | लिखाळ

बरोबर. मी सुद्धा ही गोष्ट ओशोंनी सांगितलेल्या झेन कथांत वाचली आहे.
गोष्ट छानच आहे.
मी पूर्वी इथे लिहिली होती.
-- लिखाळ.

विजुभाऊ's picture

10 Nov 2008 - 1:11 pm | विजुभाऊ

मूळ कथा खलील जिब्रान च्या मॅड मॅन या पुस्तकात आहे.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम