काळ्या पिशवीत पिशवीत

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
5 Nov 2008 - 5:49 pm

श्री चतुरंग ह्यांचे 'होता खमंग, होता चकणाहि खास बाकी' हे विडंबन वाचले. त्यावरून लिहावेसे वाटलेले एक विडंबन :)

(श्री विठ्ठल वाघांची क्षमा मागून त्यांच्या 'काळ्या मातीत मातीत' ह्या कवीतेचे/ गीताचे विडंबन करण्याचा प्रयत्न)

काळ्या पिशवीत पिशवीत बॉटल हालते
बॉटल हालते बॉटल हालते

बाईल थयथया नाचते दोस्त घरी बोलवितो
घरी बोलवितो दोस्त घरी बोलवितो

घरन बाबा हाकलतो छंदी फंदीच्या जोडीला
जिभे सरसती नाचे घोट जाताच पोटाला
तरतरी मना येते मती न्हाती धूती होते
रंगीत पान्याच्या वासाची चाहूल आवशीला जाते
भय जिवाला पडते वाट दोस्ताची लागते
दोस्त बॉटल झाकतो मी चकना लपवितो

दोस्ता र आता कलटी र आता पळूया र माझ्या राज्या

पानी खिडकीतन वोतून वाट गुत्त्याची चालूया
तिथे उधार चालेना नगद लागते
अन्ना शेट्टीच्या गूत्त्यात चाल 'पेया'च पूजन
तिथ डोलकर हालती जनू करती भजन
जवा रंगीत पान्यात सोन चांदी लकाकते
सोन चांदी लकाकते आस जिवाला लागते

चाले पानी-चकन्याचा पाठशिवनीचा खेळ
खुर्ची बूडाला लागेना झाला कसला हा गोंधळ
काळ्या टेबला खालन डोला सपान पाहतो
डोला सपान पाहतो अन्ना गालात हासतो
काटा लागतो जिवाला स्वप्न पान्यात सांडत
स्वप्न पान्यात सांडत दुकान अन्नाच चालत

चू भू द्या घ्या

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

5 Nov 2008 - 5:55 pm | लिखाळ

जिभे सरसती नाचे घोट जाताच पोटाला
तरतरी मना येते मती न्हाती धूती होते
जोरदार !! मस्त...

काळ्या टेबला खालन डोला सपान पाहतो
डोला सपान पाहतो अन्ना गालात हासतो
छान मस्त मजा आली :)
-- (तरतरीत) लिखाळ.

सुनील's picture

5 Nov 2008 - 6:04 pm | सुनील

हे कविता पूर्वी कुठेतरी वाचल्याचे आठवते. तुमचीच असेल तर क्षमस्व. अन्यथा ते चौर्यकर्म मानावे लागेल!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मूखदूर्बळ's picture

5 Nov 2008 - 11:10 pm | मूखदूर्बळ

अरेच्चा पूर्वी वाचलीये का ? कुठे बर वाचली आहात ?
मीच लिहीलय पण हे विडंबन :)

प्राजु's picture

6 Nov 2008 - 8:44 am | प्राजु

खूप हसले..
मस्त जमलंय..

चाले पानी-चकन्याचा पाठशिवनीचा खेळ
खुर्ची बूडाला लागेना झाला कसला हा गोंधळ
काळ्या टेबला खालन डोला सपान पाहतो
डोला सपान पाहतो अन्ना गालात हासतो

जबरा... :)- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

6 Nov 2008 - 9:14 am | झकासराव

जबरा जमलय रे विडबंन. :)
सुनिल शेठ हे मुख्यानेच लिहिलेल वरिजनल विडंबन आहे. खात्री बाळगा.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर's picture

6 Nov 2008 - 4:41 pm | विसोबा खेचर

वा वा! सुंदर विडंबन.. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Nov 2008 - 5:00 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त...

बिपिन कार्यकर्ते