झोपेत मृत्यू

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Apr 2019 - 4:51 pm

झोपेत मृत्यू -बातमी वाचताना तो हबकला
मग आश्चर्य चकित झाला
मग विचार करू लागला
कस वाटत असेल ?
पत्नी सकाळचं स्वयंपाकाच्या गडबडीत
मुले कामाला कॉलेज मध्ये जाण्याचा घाईत
अन आपण मात्र चरनिद्रेचा आस्वाद घेत आंथरुणार पहुडलेल
मुलगी विचारात असेल आई बाबा अजून झोपला आहे ?
हो ग झोपू देत दमतो बिचारा गाडा ओढत
काम आटोपपल्यावर ती चहाचा कप घेऊन आत येते
अन कप हातातून गाळून पडतो
-
तो कल्पना विश्वात रमला असतो
अहो कुठे तंद्री लागली सकाळचं ?ती विचारते
अ ग काही नाही अन तो झोपेत मृत्यू बातमीवर बोलू लागतो
काही तरीच काय तुमचं ?काहीतरी वाचता अन बसता पतंग उडवत विचाराचे
तो हसला
ती म्हणाली -आपलं ठरलं आहे ना जीवन यात्रा बरोबर संपवायची
ठरवून काय फायदा ते का आपल्या हातात असते ?
नसेल पण इछया धरायला काय हरकत आहे ?
*
तो जरा उशिरानेच उठला
रात्री कम्प्युटर वर सिनेमा पाहात होता
बाहेर आला
स्वयंपाक गृहात शांताता होती
हि उठली नसावी बहुतेक म्हणत तिच्या खोलीत गेला
ती शांत झोपलेली होती
त्याने हाक मारली
पण एक नाही दोन नाही
त्याने तिला गदगद हलवले
देहातून प्राण पाखरू उडालेल होते
जानव्ही त्याने टाहो फोडला
हृदय विदीर्ण झाले
त्याने हाय खाल्ली
अन तो पण तिच्या भेटीला गेला
-
त्याची हाक ऐकताच तिचा आत्मा त्याच्या जवळ आला
आपलं ठरलं आहे ना जीवन यात्रा बरोबर संपवायची
बघा तसच झालं म्हणत तिने त्याला मिठी मारली
देहात वायु स्वरूप देह मिसळले
आत्म्या च मिलन झाले
सायुज्य भाव ते अनुभवू लागले
अन आत्मे ब्रह्माण्ड ऊर्जेत विलीन झाले
-
दोन जीवांचा ८४ लक्ष योनीचा प्रवास सुरु झाला

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

> देहातून प्राण पाखरू उडालेल होते > इथेच थांबायला हवं होतं.

अन्या बुद्धे's picture

15 Apr 2019 - 3:37 pm | अन्या बुद्धे

हेच म्हणतो

विजुभाऊ's picture

15 Apr 2019 - 12:53 pm | विजुभाऊ

वाचून जागेपणीच ठार मेलोय

अँड बेस्ट अघोरी स्टोरी ऑफ २०१९ अवॉर्ड गोज टू "" झोपेत मृत्यू ""