दाराआडचे घड्याळ

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
5 Apr 2019 - 8:04 pm

.

एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर ?
स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार...
जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ...
.

आणि एक वाळूचे घड्याळ...

.

अजुनही मागे मागे....
जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र
.

भिंतीवर कोरलेले सावलीचे घड्याळ...
.

आणखी कितीतरी चित्रविचित्र घड्याळं...
...

आणि खूप खूप पूर्वी वाळूत खोवलेला लाकडाचा एक तुकडा....
.

पूर्वी कधीतरी सव्वा अकरा वाजता बंद पडलेलं ते घड्याळ
जर्जर इमारतीच्या तुटक्या दाराआडून बघतच रहाते...
बघतच रहाते...
.

अदभूतकालगंगाकाहीच्या काही कविताजिलबीमाझी कवितारतीबाच्या कवितासंस्कृतीइतिहासकविताप्रेमकाव्यसाहित्यिकजीवनमानतंत्रदेशांतरराहती जागामौजमजा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Apr 2019 - 8:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

सचित्र कविता आवडली
फारच आवडली.
भिंतीवर कोरलेले सावलीचे घड्याळ पहिल्यांदा पाहिले मस्त आहे.
पैजारबुवा,

टिक टिक टिक...
चलती जाए घडी...
दोन घडीचा डाव म्हणत म्हणत घड्याळांची अंगडी टोपडी बदल्याचे गीत बनवून वेळात वेळ काढून टाकलेला धागा भावला.

पाषाणभेद's picture

6 Apr 2019 - 3:43 pm | पाषाणभेद

घंटा नाहीये का घड्याळात?
अन चित्रमय विडंबन आवडले.
अन आधूनीक चित्रकलेत ते डोळे बाहेर येतात, दोन नाकं, एकच कान असं असत ते मुळ कवितेत फिट बसते.

दुर्गविहारी's picture

6 Apr 2019 - 9:44 pm | दुर्गविहारी

"आज्जीजवळी घड्याळ, कसले आहे चमत्कारिक" हि मुळ कविता आणि
"शरदाजवळी आहे घड्याळ, कसले चमत्कारिक" हे विडंबन आठवले.

पैजारबुवा, नंदा करमरकर, पाषाणभेद आणि दुर्गविहारी, अनेक आभार.
'दाराआडची मुलगी'च्या मूळ कवियत्रीने कवितेचा एक सुंदर घाट निर्मिला आहे, त्या घाटावर येऊन काव्यगंगेत डुबकी मारण्यात एक आगळीच मौज आहे. 'शिव कन्या' यांना अनेक धन्यवाद.

खरंय चित्रगुप्त साहेब ,, खरंय ,, शिवकन्या याना मनापासून धन्यवाद .. त्यांच्या त्या कवितेमुळे , या सुंदर कविता वाचनात आल्या आणि थोडे हलके हलके वाटत आहे ..

चित्रगुप्त साहेब आपण तर कमालच केली .. काय सुंदर सचित्र कविता केल्या आहात आपण .. हि कविता तर अफलातून झालेली आहे . एक काम करतो ह्हीला प्रिंटवतो आणि माझ्या मुलांना वाचायला देतो , निदान त्यांना घड्याळ कशी कशी सुधारत गेली ते चांगलेच समजेल ..

नाखु's picture

10 Apr 2019 - 11:04 pm | नाखु

वर्तमानकाळ.
फक्त चालू वेळ,ना भविष्याचे डोलारे ना भूतकाळातील गाठोडी

फक्त "आनेवाला पल जानेवाला है" इतकंच सागणारे काटे असोत कि आकडे बोलतात.

आजीचे घड्याळ अंगिकारायचा अल्प प्रयत्नशील नाखु पांढरपेशा

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2019 - 5:15 pm | चौथा कोनाडा

वाह, मस्तच !

दाराआडच्या कविता
(खरंतर यांचा एक वेगळा कवितासंग्रह (मिपा वर आणि छापील सुद्धा) प्रकाशित करायला पाहिजे. इतक्या या वैविध्यपूर्ण आणि सुरेख आहेत)
च्या निमित्तानी ही सुरेख स-चित्र कविता वाचायला मिळाली.
घड्याळांचा सुंदर हा परामर्श घेतला आहे.