शशक - वैकुंठ एकादशी

bhagwatblog's picture
bhagwatblog in जनातलं, मनातलं
21 Feb 2019 - 11:32 pm

वैकुंठ एकादशी
देविकाच्या एका डोळ्यात अश्रु आणि दुसर्‍या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्या डोळ्या समोरून तिचे आयुष्य झरकन तरळून गेले. तिला वडीलांनी कुठल्याही प्रसंगात ठाम राहायला शिकवले होते. देविका साठी अंतिम निर्णायक स्थिती आलीच होती कारण सहा महिन्या पासून तिच्या वडीलांची तब्बेत खराब होती. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा पदरात काहीच यश पडत नव्हते.

मग डॉक्टरांनी तिला अंतिम निर्णय विचारला? तिने दोलायमान स्थितीत एक कठीण पण ठाम निर्णय घेतला. वैकुंठ एकादशीच्या दिवशीच ठीक रात्री बारा वाजताच वडीलांचा व्हेंटिलेटर काढायचे ठरले. अंतिम वेळ जवळ येऊन ठेपली. देविकाने वडीलांचा हसत-हसत कायमचा निरोप दिला. त्याच वेळेस वडीलांची तब्बेत सुधारली. तिला स्वर्गात स्थान भेटले असेल.

कथालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

22 Feb 2019 - 1:33 am | आनन्दा

??

एकविरा's picture

22 Feb 2019 - 12:54 pm | एकविरा

ते नीट समजले नाही शेवटी