अवकाश स्पर्धा (अमेरिकन बाजू)

सतिश म्हेत्रे's picture
सतिश म्हेत्रे in जनातलं, मनातलं
16 Feb 2019 - 5:24 pm

प्रस्तावना
या लेखमालेत माझा कयास मुख्यत्वे अमेरिकेच्या सुरवातीच्या अवकाश मोहिमांच्याविषयी असेल. रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित उपग्रह प्रक्षेपित करून या स्पर्धेत आघाडी घेतली. नंतर त्यांनी पहिला अंतराळवीर देखील अवकाशात पाठवला. याला उत्तर म्हणून अमेरिकेने आधी मर्क्युरी आणि नंतर जेमिनी व प्रसिद्ध अपोलो मोहिमा राबविल्या.
मर्क्युरी मोहिमेचा मुख्य उद्देश एका मानवाला अवकाशात सोडणे व इतर तांत्रिक बाबी चेक करणे असा होता. जेमिनी या मोहिमेचा उद्देश अपोलो मोहिमेसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे हा होता (आवश्यक बाबी त्या त्या वेळी सांगितल्या जातील.) आणि अपोलो मोहीम ही मानवाला चंद्रावर उतरवणे व सुरक्षितपणे परत आणणे हा होता.
या मालिकेत मी सुरवातीला अवकाश स्पर्धेची सुरवात कशी झाली याबद्दल लिहिन. नंतर क्रमाक्रमाने मर्क्युरी, जेमिनी आणि अपोलो मोहिमांच्या विषयी माहिती देईन. सोबतच रशिया मध्ये काय काय घडत होते याबद्दल ही थोडक्यात सांगेन. या लेखात काही इंग्रजी शब्द जशेच्या तसे वापरावे लागतील नाहीतर त्या वाक्याचा (किंवा घटनेचा) नीटसा अर्थ कळणार नाही. पण लेखाच्या सुरवातीला किंवा शेवटी त्या इंग्रजी शब्दांचा अर्थ समजावयाचा प्रयत्न करेन.

तंत्रलेख

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Feb 2019 - 5:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक विषय निवडला आहात. लेखमालेचे स्वागत आहे !

पुणेकर भामटा's picture

16 Feb 2019 - 7:48 pm | पुणेकर भामटा

वाट पहात आहे.

प्रसाद_१९८२'s picture

16 Feb 2019 - 8:42 pm | प्रसाद_१९८२

रोचक विषय आहे हा.
लवकर लिहा.
----
या विषयाला वाहिलेली "BBC Space Race" नावाची ४ भागांची डॉक्युमेंट्री YouTube वर आहे. तीही अतिशय माहितीपुर्ण आहे.

सतिश म्हेत्रे's picture

16 Feb 2019 - 9:33 pm | सतिश म्हेत्रे

यामध्ये त्यांनी wernher von braun आणि Sergei korolel यांमधील स्पर्धा दाखवली आहे. ती मुख्यत्वे त्या दोघांच्या वर भर देते.

टवाळ कार्टा's picture

17 Feb 2019 - 4:11 pm | टवाळ कार्टा

रोचक :)

प्रमोद देर्देकर's picture

17 Feb 2019 - 5:10 pm | प्रमोद देर्देकर

मस्तच ! येवू द्या लवकर .

डाम्बिस बोका's picture

17 Feb 2019 - 11:16 pm | डाम्बिस बोका

रोचक विषय निवडला आहेत. सर्व लेखमालेची आतुरतेने वाट पाहत आहे. जालावर इंग्लिश मध्यें बरेच लिखाण उपलब्ध आहे, पण मराठी वाचायला खूप धमाल येईल.

नावातकायआहे's picture

18 Feb 2019 - 2:51 pm | नावातकायआहे

लवकर डकवा.