मंत्रीमंडळ विस्तार..

गाभा: 

राम राम मडळी,

मिपाचे आजपर्यंतचे मंत्री..

चतुरंग, केशवसुमार, धोडोपंत, विकास, नीलकांत, प्रा डॉ बिरुटे, प्रियालीदेवी.

मिपाचा रोजचा वाढता पसारा लक्षात घेता आम्ही मिपाच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करायचे ठरवले आहे... या संकेतस्थळाच्या मंत्रीमंडळात कोण मंडळी आहेत ही माहिती सर्वांना असावी या धोरणानुसार आम्ही हा मंत्रीमंडळाचा विस्तार जाहीर करत आहोत...

मंत्रीमंडळाचा विस्तार -

चतुरंग, केशवसुमार, धोडोपंत, विकास, नीलकांत, प्रा डॉ बिरुटे, प्रियालीदेवी, मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा.

आम्ही काही एका विश्वासाने या मंडळींना संपादनाचे अधिकार दिले आहेत आणि त्याचा ते योग्य तो वापर करतील अशी आम्हाला खात्री आहे..संपादक मंडळींनी घेतलेल्या निर्णयात आम्ही ढवळाढवळ करत नाही...

आजपर्यंत मिपावरच्या थट्टामस्करीच्या, खेळीमेळीच्या वातावरणाला धक्का लाग्णार नाही परंतु त्याचसोबत उगीच कुणावर वैयक्तिक चिखलफेक होणार नाही, हे या मंडळींनी पाहावे..

उगाचच्या उगाच वातावरण तापवणारे सामाजिक, राजकीय आशयाचे लेख आणि त्यावरील प्रतिसादात योग्य ते बदल करण्याचे अथवा ते अप्रकाशित करण्याच्या अधिकारांचाही या मंडळींनी योग्य तो वापर आवर्जून करावा...

ललितलेखनात, लेखन संदर्भानुसार शिव्या-ओव्या आल्यास त्याला संपादक मंडळाची हरकत नसावी.. :)

मिपाच्या या धोरणाचे कुठे उल्लंघन होते आहे असे वाटल्यास संपादन मंडळाने अवश्य हस्तक्षेप करून सदर लेखन त्वरीत अप्रकाशित करण्याची कडक कारवाई करावी...

हे ऑनलाईन संस्थळ आहे, परंतु सर्वच संपादक नेहमीच मिपावर ऑनलाईन असतील असे नाही. तरी मिपावर उगाचच्या उगाच चिखलफेक करणारा काही आक्षेपार्ह मजकूर हजर असलेल्या संपादकाने अप्रकाशित करावा...त्याकरता इतर संपादकांशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही...

मिपावरचे आजपर्यंतचे खेळीमेळीचे, माफक थट्टामस्करीचे, मजामस्तीचे वातावरण तसेच ठेऊन कुठला मजकूर आक्षेपार्ह आहे व कुठला नाही, हे ठरवण्याची पात्रता वरील सर्व मंडळीत आहे अशी आम्हाला खात्री आहे, विश्वास आहे...

कुणा सदस्याला काही अडचण आल्यास वरील मंडळींशी त्वरीत संपर्क साधावा...

मिपाचे आजवरचे तसेच विस्तारीत मंत्रीमंडळ मिपाची वाटचाल योग्य दिशेने करतील असा आम्हाला विश्वास आहे...

कळावे,

मिसळधर्म जागवावा,
मिसळधर्म वाढवावा..!

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर.

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा.
पब्लिक लोक्स .. आपली जबाबदारी वाढलीये .. हाबिणंदण म्हणन्यापेक्षा फक्त शुभेच्छा आणि सहकार्याचं अश्वासन देतो.

मिसळपाव नवनिर्माण सेना झिंदाबाद

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा

नव्या संपादक मंडळाच्या सदस्यांचे अभिनंदन!

-(शुभेच्छुक) ऋषिकेश

अभिनंदन!

संपादकांचे अभिनंदन!

रेवती

अगदी हेच म्हणते. :)

मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा

ह्या ताज्या दमाच्या संपादकमंडळींचे अभिनंदन! आपणा सर्वांवरची जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्हा सध्याच्या संपादकांची वाटून घेतल्याने थोडी कमी झाली आहे, असा दुहेरी आनंद आहे!! ;)

चतुरंग

अभिनंदन!!

जबाबदारीचे वाटप, सहकार्याची भावना, धोरणाची अंमलबजावणी या बद्दल समाधान व्यक्त करतो.
प्रकाश घाटपांडे

सर्वांचे अभिनंदन !!! :)

मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व
धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर

बॅ.वि.दा.सावरकर

हाबीनंदण :)
काश, असेच राज्य आणि केंद्र सरकारातली मंत्र्यांची नाव दिल खुष होण्यासारखी असती.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

ए ते हाबीणंदन म्हणण बंद करा बगु, च्यायला त्या हबशी टार्याने नसत्या किळसवाण्या गोष्टी आणल्यात इकड

सर्व नवीन ताज्या दमाच्या संपादक मंडळीना हार्दिक शुभेच्छा.
वेताळ

नवीन मंत्रिगणांचे अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

हार्दिक शुभेच्छा.

मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा. संपादक मंडळात सहभागी झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन !!!

लोकांच्या सहभागाने मिपाची वाटचाल दमदार बनवणारे, संस्थळ अधिक लोकाभिमुख करणारे संस्थळाचे मालक तात्यांचेही आभार !!!

-दिलीप बिरुटे

मी प्राडॉशी सहमत आहे. महान तात्यांचा विजय असो. दिग्विजयी तात्या आग्गे बढो हम तुम्मारे सातै. तुम्ही मराठीसाठी जे उत्तुंग काम केलंय त्यासाठी तुमचे देऊळच बांधले पायजेलाय तात्या. अगदी नगमासारखे , खुशबूसारखे. तात्या विठ्ठाल आन् अनुष्का रुकमाई. काकडआरती , तात्याचाळिसा कुणीतरी रचा रे. हेड पुजारी प्राडाँच्यासंगतीनं आम्हीपण पठण करू.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ह्या मिपा-मातबर-मांदियाळीत आमचाही पाट मांडल्याबद्दल तात्या सरपंचांचे आणि शुभेच्छांबद्दल मंडळींचे मनःपूर्वक आभार. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ह्या मिपा-मातबर-मांदियाळीत आमचाही पाट मांडल्याबद्दल तात्या सरपंचांचे आणि शुभेच्छांबद्दल मंडळींचे मनःपूर्वक आभार

वा पाट मांडण्याची उपमा आवडली... :)

बसून घ्या रे सगळ्यांनी, गरमागरम भात आणतोच आहे! :)

आपला,
(कधीच कुणाशी पाट न मांडलेला वाढपी!) तात्या.

पाट मांडणे! वा मराठी भाषा काय श्रीमंत आहे! :)

हेच म्हणतो. नंदनबरोबर अस्मादिक म्हणजे सचिन तेंडुलकर बरोबर गल्लीतील टेनिसबॉल चषक स्पर्धेतील "लईभारी" ब्याट्स-मनची टीममधे वर्णी लावल्यासारखे आहे ! ;-)
(नंद्या , सांभाळ , तुला एखाद दिवस नॉन स्ट्रायकर एंडवरून रनाऊट करणार मी ! हाहा. )

विनोद बाजूला ठेवायचा तर, सरपंचांचे आणि येथील माझ्या मित्रमंडळींचे अनेक आभार.

सरपंचांनी नेमलेल्या सर्व नविन पंचांचं (पंच्यांचं नव्हे) मनापासून अभिनंदन. नविन नावं खरंच सर्वमान्य अशीच आहेत.

बिपिन कार्यकर्ते

मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा -
मनःपूर्वक अभिनंदन!

:)

मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा

अभिनंदन!!माझे पोस्ट संपादित नाही हा करायचे. मी अभिनंदन केलेलं आहे.

नवीन संपादकांचे अभिनंदन. आणि जुन्या संपादकांचंही (काय आहे, तुम्ही लोकं संपादक झालात तेव्हा मी नव्हते ना इथे पडीक!)

धोंडोपंत यांच्या विनंतीवरून संपादक मंडळातून त्यांचे नाव कमी करण्यात आलेले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी...

तात्या.

धोंडोपंतांनी स्वतःहुन आपले नाव कमी करुन घेतल्याबद्दल आम्हाला आनंद झाला.
गेल्या काही दिवसातली त्यांची वैयक्तीक शेरेबाजी व काही धाग्यात वापरलेली काहीशी "बोचरी, पुर्वगॄहदुषीत, बेभान, पातळी सोडुन , अनावश्यक कठोर " भाषा पाहुन आम्हाला ते यापुढे "संपादकपदाची" जबाबदारी "शांतपणाने, मनात काही न राखता, निस्पॄहपणे" पार पाडातील का याबाबत शंका होतीच ...

कालच्या त्यांच्याच धाग्यातल्या "देवघर ते बेडरुम" या विधानाने आम्ही थोडे चिंतीत झालो होतो. निश्चितच एका संपादकपदावरच्या व्यक्तीने असे बेजबाबदार विधान करणे योग्य नव्हते.
असो. त्यांनी "राजीनामा" दिल्याचे पाहुन आम्हाला बरे वाटले :)

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना , http://chhota-don.blo

सहमत आहे.
योग्य निर्णय.

आम्हाला ही आनंद झाला.

-इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

राजीनाम घेतला की दिला? नाव कमी करण्यात आलेले आहे...हे वाचून घेतला असावा असेच वाटले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बाकी वादात पडायचे नाही.

धोंडोपंतांची काही वाक्ये (त्यांच्या स्वभावाप्रमाणे) जरा जास्तच होती, हे कबूल.

तरीही, त्यांच्या शैलीला आणि स्पष्टवक्तेपणाला आपला सलाम!

चतुरंग, केशवसुमार, धोडोपंत, विकास, नीलकांत, प्रा डॉ बिरुटे, प्रियालीदेवी, मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा.

अभिनंदन!!
बर झाल!
आमच्या तात्याचा जरासा त्रास कमी झाला !
संजीव