सुरतच्या वखारीतील बदमाश अँथनी स्मिथ भाग १

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
3 Sep 2018 - 12:53 pm

'त्या अँथनी स्मिथपेक्षा जगात इतका नास्तिक नालायक इसम जगायच्या लायकीचा नसावा' हे वाक्य आहे सुरतच्या कौन्सिल ने इस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या ३१ मार्च १६६५ च्या पत्रातील आहे!
गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या Shivaji : His Life and Times या इंग्रजी ग्रंथातून सुरतच्या वखारीतील मुख्य कार्यालयातील हकिकती वाचताना आणखी एका गणंगाची रंजक माहिती हाती आली. ती सादर...
त्यामधून शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीच्या कारवाईची माहिती समजून घ्यायला सोपे जाते.
शिवाय त्या निमित्ताने दोन बंगाली इतिहासकारांच्या मधील मतांतरे समजतात. यातून मेहेंदळे यांनी इतिहासकार म्हणून पुराव्यांचा समतोलपणा साधणारे अभ्यासक म्हणून कसे प्रयत्न केले आहेत ते ही प्रकर्षाने जाणवते.
(घटनेत नाट्यमयता यावी म्हणून खालील घेतलेले लेखन स्वातंत्र्य माझे आहे)
" सगळीकडे धमाके होत होते. घरांना आगीलावून शिवाजीचे सैनिकांनी दुकाने, जडजवाहीर, किमती कापडचोपड जे हाताला लागेल ते सुरतच्या बाजारातून लुटून शिवाच्या समोर आणून टाकत होते आणि परत आणखी आणायला जात होते. मी असा आपल्या स्वालीतील वखारीकडून लपत छपत आपल्या मुख्य इमारतीच्याकडे येत होतो. त्या डच इमारतीपाशी पकडले हो मला! आणि तलवारींचा धाक दाखवून मला घेऊन चालले. वाटेत आणखी काही पकडून घेऊन झाले. हबशी लोकांचा तो नाही काऽऽ तो रेऽऽ काळाकुट्ट फेर्‍या मारत असतो त्यांच्या देशाच्या राजासाठी, तोही आला गप गुमान! आम्हाला केलं उभं त्या लबाड शिवा समोर. तेवढ्यात सुरतच्या सरदार खानचा वकील पण नेमका तिथे भेटायला आला होता.
'काय रे तुझा सरदार बायल्या निघाला. कुठे लपून बसलाय?' शिवा आणि त्यांच्यात झकाझकी सुरू झाली.
'आम्ही नाही बायले तूच आहेस. सूरतचा माल चोरून नेतोस काय' ? असे त्याने म्हटले. मग अचानक त्या वकीलाने लपवलेला सुरा हातात घेऊन शिवावर हल्ला केला. त्याचा सुरा धरलेला हात शिवाच्या अंगरक्षकाने तलवारीने छाटून टाकला. मग तो शिवाच्या अंगावर कोसळला. दोघे धडपडत उठले. हेऽऽ सगळे रक्ताने भरले शिवाचे कपडे. तिकडे त्या वकिलाचे डोके धडापासून तोडले शिवाच्या रक्षकांनी. रक्ताने माखलेले ते दृष्य पाहून सगळेच घाबरून गेले. पण मी कसला भितोय! शिवाने खवळून आमच्याकडे पहात म्हटले, 'एकेकाला समोर आणा'. अन मग एकाचे डोके उडवले गेले. पुढच्यांना दोन्ही हात तर एकाला उजव्या हाताच्या मनगटाला गमवावे लागले. आता माझी बारी होती. मी धिटाई दाखवून इंदुस्तानीत बोलायचा प्रयत्न केला. माझा उजवा हात तोडण्याची आज्ञा शिवाने केली. आता कारवाई होणार इतक्यात मी डोक्यावरची हॅट काढली अन मला मारूनच टाका. म्हणजे सुटेन'असे ओरडून म्हणालो. ते माझे रूप पाहून शिवाने हाताने थांबवून मला बाजूला केले. अन मी वाचलो! 'हॅट काढल्यावर मला पाहून घाबरला रे तो'!
परत जाऊन मुख्य कौन्सिलर समोर उभा राहिलो तेंव्हा हा आपल्या कडील कैदी पळाला केंव्हा आणि पकडला जाऊन देखील शिवाच्या कचाट्यातून त्याने जीवंत कसा सोडला? म्हणून सगळे चकित झाले राव!
... वरील घटना आपल्या मित्रांना तो रंगवून सांगत असे. ते सुरतेच्या मुख्यालयातील एक निवासी पाद्री रेव्हरंड एल इस्कालियट ऐकून होता. ती हकीकत त्यानी आपल्या मित्राला पत्राद्वारे कळवले. ते मेहेंदळे यांनी शोधून ग्रंथात नोंदले.
... सुरमा भोपाली अंगात संचारला असावा अँथनी स्मिथच्या!
...
जिगरबाज अँथनी स्मिथची आधीची एक एक लफडी पुढील भागात...
भाग १ समाप्त.

मांडणीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

3 Sep 2018 - 6:36 pm | दुर्गविहारी

मनोरंजक हकीगत. खरतर शिवाजी महाराजांनी हाती आलेल्या शत्रूला सोडल्याची फारशी उदाहरणे नाहीत. अपवादापैकी हे एक असावे. याच्याबध्दल सविस्तर वाचायला आवडेल. पुढचा भाग लवकर टाका.

ज्योति अळवणी's picture

3 Sep 2018 - 7:15 pm | ज्योति अळवणी

आवडलं.पुढचा भाग लवकर टाका

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2018 - 12:00 am | डॉ सुहास म्हात्रे

रोचक माहिती. काय काय गमती धुंडाळून काढत असता तुम्ही ! :)

अजून लिहा अशी माहिती. वाचायला खूप मजा येते.

ह्या संदर्भामध्ये 'लंडन गझेट' च्या सोमवार फेब्रुअरी १७ - गुरुवार फेब्रुअरी २०, १६७२ ह्या दिवशीच्या आवृत्तीमधील खालील उल्लेख मनोरंजक आहे. मजकुरामधील जुन्या प्रकारची इंग्रजी अक्षरे, उदा f सारखा दिसणारा s, लक्षणीय आहेत.



सुरतेवर हल्ला झाल्यावर ती बातमी लंडनला कशी आणि केव्हा पोहोचली हे वरील उतार्‍यातून कळते. सुरतेमधील इंग्लिश वखारीच्या अध्यक्षाने पाठवलेल्या मजकुराचा हा सारांश आहे आणि तो पाठविणारा बातमीदार सध्याच्या सीरियामधील अलेप्पो येथून बातमी लिहीत आहे. १६७०चा सुरतेवरील हल्ला ताजा असल्याने अशा हल्ल्यांच्या शक्यतेमुळे व्यापारी वर्ग मुंबईकडे जाणे पसंत करीत आहेत असा तो मजकूर आहे. तारायन्त्र वा अन्य कोठलेच आधुनिक दळणवळणाचे साधन हाताशी नसण्याच्या दिवसातील बातम्यांचा हा वेग मजेदार वाटतो.

(अवान्तर - अन्य एका कारणासाठीही वरील उतारा मनोरंजक आहे. पोप ग्रेगरीचे १५८२ सालापासून सुधारित कॅलेंडर ब्रिटनमध्ये मान्य व्हायला सप्टेंबर १७५२ पर्यंत वेळ लागला आणि तोपर्यंत तेथील तारखा ग्रेगरीपूर्व कॅलेंडरच्याच चालू होत्या. त्यानुसार १७ फेब्रुअरी १६७२ ह्या दिवशी सोमवार आहे. ग्रेगरी कॅलेंडरप्रमाणे १७ फेब्रुअरी १६७२ ह्या दिवशी बुधवार पडतो.

१७५२ मध्ये ब्रिटनमध्ये ग्रेगरीचे कॅलेंडर मान्य होईपर्यंत ते कॅलेंडर ब्रिटनच्या कॅलेंडरच्या ११ दिवस पुढे गेले होते. ३ सप्टेंबर १७५२ ते १३ सप्टेंबर १७५२ हे ११ दिवस ब्रिटनच्या कॅलेंडरमधून पूर्णपणे गाळून दोन्ही कॅलेंडरे बरोबर आणण्यात आली. १७० वर्षांमध्ये हा ११ दिवसांचा फरक पडला. १६७२ पर्यंतच्या ९० वर्षांत हाच फरक ५.८ किंवा ५ पूर्ण दिवस इतका होता. ह्याच वेळी दुरुस्ती केली असती तर ब्रिटनच्या कॅलेंडरामध्ये १७ फेब्रुअरीनंतर सोमवारनंतर ५ दिवस पूर्ण वगळून २३ फेब्रुअरीस मंगळवार पडला. ग्रेगरीमधील २४ फेब्रुअरीला बुधवार ह्याच्याशी हे जुळते.

ह्या बातमीपत्रामध्ये अजूनहि एक मनोरंजक बाब आहे. बातमीपत्र अलेप्पोहून १९ नोवेंबर १६७२ ला रवाना झाले असे स्पष्ट लिहिले आहे. तर मग ते १७ फेब्रुअरी १६७२ च्या गझेटमध्ये कसे छापले गेले? हा बहुतेक मुद्राराक्षसाचा अथवा 'उसंडु*'चा परिणाम असावा आणि बातमीपत्राची खरी तारीख १९ नोवेंबर १६७१ असावी. १६७० च्या घडामोडी अलेप्पोपर्यंत पोहोचायला १ वर्ष पुरे आहे, २ ची आवश्यकता नाही.

* उसंडु ऊर्फ 'उपसंपादकाच्या डुलक्या' असे एक मनोरंजक सदर जुन्या 'अमृत' डायजेस्टमध्ये येत असे त्याची आठवण झाली.)

धन्यवाद अरविंद सर,
हा धागा सुरु करण्यात अशी रंजक आणि ज्ञानात भर पडेल अशी माहिती सादर करणे असाही हेतू आहे.
आपल्यासारख्या शोधक नजरेने चौफेर पहाणार्‍या व्यक्तीमत्वामुळे मिसळपाव चविष्ट आणि चटकदार होण्यासाठी मदत होते आहे.
भारतीय पंचांग आणि ग्रेगोरियन कॅलेंडर यांचा मेळ बसवूनच नाडी ग्रंथातील ताडपत्रावरील कोरून लिहिलेले जन्म दिनांक कसे बरोबर येतात याचा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या १२७५ सालातील जन्म दिनांकासंदर्भात ११ दिवसांचे, वारांचे करेक्शन केले जाते का हा शोध पण माझ्या मनात संमिलित होता. त्यात ते सर्व तिथी, वारासकट १०० टक्के फिट्ट बसलेले होते! यातून नाडी ग्रंथ भविष्य कर्त्या महर्षींच्या बद्दल माझा अहोभाव जागृत व्हायला मदत झाली...
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या एकाच ताडपट्टीवर चार महर्षींच्या कथनातून महाराजांचे महान जीवन कार्य व्यक्त होताना पाहून झालेला आनंद मला पुढच्या शोधकार्याला प्रेरित करत गेला.

शब्दबम्बाळ's picture

5 Sep 2018 - 5:04 am | शब्दबम्बाळ

रोचक माहिती! :)

राही's picture

4 Sep 2018 - 10:47 pm | राही

लंडन गॅझेट मधील उपरोल्लेखित उताऱ्यातला 's' हा शब्दाच्या मध्ये आला तर तो f सारखा छापला गेला आहे पण शब्दाच्या शेवटी आलेला 's' मात्र सध्याच्या 's' प्रमाणेच छापलेला दिसतो.
ह्याला काही कारण असू शकेल का?

१६व्या शतकातील इंग्रजी लेखनकलेची वैशिष्ट्ये
‘s’ and ‘f’ can be very confusing if you are not used to reading old scripts. The long ‘s’ carried on being used in printing, even in the nineteenth century, and many people mis-read it as ‘f’ because they do not expect an ‘s’ to be formed in this way.
अधिक माहितीसाठी येथे टिचकी द्या.

https://www.nottingham.ac.uk/manuscriptsandspecialcollections/researchgu...

अभ्या..'s picture

4 Sep 2018 - 11:17 pm | अभ्या..

राहीताई,
ह्याच्या समकालीन 1631 च्या "पापी दुष्ट लोकांचे बायबल" म्हणून प्रसिद्ध असलेल्या बायबलच्या पानात हाच प्रकार आहे. त्या बायबल मध्ये मोझेसला दिलेल्या आज्ञामध्ये एका आज्ञेत नॉट हा शब्द प्रिंटरकडून राहिल्याने राजाने त्याच्या साऱ्या प्रति नष्ट करायला लावल्या. 11 प्रति अजून शिल्लक आहेत.
त्या काळी कॉपर एन्ग्रेव्हिंग प्लेटस वापरून छपाई होत असे. कदाचित ऑप्टिकल स्पेसिंग (दोन अक्षरातले ठराविक अंतर जे सर्व अक्षरासाठी समान नसते. मोठ्या ए शेजारी व्ही आल्यास कमी असते. म्हणजे मेकॅनिकल स्पेसिंग पेक्षा नजरेला चांगले दिसणारे स्पेसिंग) करताना छोट्या एस शेजारी एल किंवा आय आले तर नजरेला वेगळे अक्षर दिसू शकते त्यासाठी तसे केले असू शकते. अजूनही शक्यता असू शकतात ती माहिती काढून सांगेन.
https://www.prepressure.com/images/wicked-bible-adultery.jpg

अरविंद कोल्हटकर's picture

5 Sep 2018 - 12:15 am | अरविंद कोल्हटकर

ह्यासाठी अधिक माहिती येथे पहा.

Battels (Battles), Countrey (Country) अशी स्पेलिंग्ज उल्लेखनीय आहेत. मुंबईची पुढची भरभराट ह्या घटनांमधून सुरू झाली असे लेखाचा दुसरा भाग दर्शवितो.

शशिकांत ओक's picture

5 Sep 2018 - 2:18 pm | शशिकांत ओक

सुंदर संदर्भ...

ट्रम्प's picture

5 Sep 2018 - 5:59 pm | ट्रम्प

शिवाजी महाराजाबद्दल इतिहासातील माहितीचा दुर्मीळ खजिना मिपा वाचकांसमोर सादर केल्याबद्दल धन्यवाद , अशीच माहिती सादर करत रहा , देव तुमचे कल्याण करो .

शशिकांत ओक's picture

6 Sep 2018 - 11:09 am | शशिकांत ओक

सका सकाळी कमोडच्या सीटवर बसलेल्या अवस्थेत जागतिक राजकारणाचा विचार करून ट्वीट वरून परराष्ट्र धोरण, अर्थिक प्रतिबंध, आदि किरकोळ गोष्टींचा निचरा करणारे, आपल्या सवंगडी सहकार्‍यांना रातोरात पिंक स्लिपने घरी बसवण्यात पटाईत कामे करणारे म्हणून आधुनिक जमदग्नी ट्रंप मिसळपाव वर आहेत याचा आदरयुक्त दरारा वाटत आहे...

शशिकांत ओक's picture

18 Sep 2018 - 3:49 pm | शशिकांत ओक

धन्यवाद...
ट्रम्प महाशय... (हलक्याफुलक्या मनाने घ्या)
आपल्याला नावाने पुण्यात सध्याच्या शिवाय कुठे नवे नवे टॉवर्स बनवायचे ठरतेय? कमोडवरून ट्वीट करून कळवलेत तर आवडेल.