टोलनाक्यावरील टोळधाड , आपणास योग्य वाटते का ?

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
25 May 2018 - 5:27 pm
गाभा: 

टोलनाक्यावरील टोळधाड , आपणास योग्य वाटते का ?

मी गेले काही वर्षे हा अनुभव घेत आहे . मला ऑफिसला पोहोचण्यासाठी वाशी खाडी पूल पार करावा लागतो . गेले काही वर्षांपासून तिथे हळूहळू वाहतूक पोलीस , आर टी ओ यांनी आपापले बस्तान बसवले आहे . एकतर टोल द्या आणि याच ससेमीराही सोसा .
मला जवळ जवळ पाच एक मिनिटे टोलनाका पार करायला लागतात . माझ्या नेहेमीच्या निरीक्षणावरून हे पठ्ठे जवळजवळ दहा ते पंधरा दुचाकीस्वार बाजूला घेतात . जे अडकतात ते बाजूला गाडी उभी करतात आणि बाकीचे जीव मुठीत घेऊन निघून जातात .
हा आकडा माझ्या निरीक्षणाचा तर विचार करा दिवसभरात किती जण त्रस्त होत असतील .
मलाही दोन तीन वेळा अडवले होते . माझी अक्षरशः पंधरा वीस मिनिटे फुकट गेली होती आणि मी शंभर रुपये टेकवून तिथून सटकलो होतो .
आपलं यावर काय मत आहे ? टोलनाका असल्या कारणाने तिथे कुठल्याही गाडीचा वेग मंदावणे साहजिकच आहे पण हे असे अडवणे योग्य आहे का ?

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

25 May 2018 - 5:45 pm | मराठी कथालेखक

आपण शंभर रुपये नेमके का दिलेत ? पोलिसाने काय त्रुटी दाखवली होती ? माझ्या मते खालील गोष्टी चोख असतील तर कसलाही दंड चिरीमिरी देण्याची गरज नाही
१) ड्रायविंग लायसन्स
२) चालू PUC
३) चालू विमा पॉलिसी
४) RC book ची प्रत (खासगी वाहनांनी मूळ RC book जवळ बाळगण्याची गरज नाही )
५) सीटबेल्ट लावलेले असणे

मराठी कथालेखक's picture

25 May 2018 - 5:45 pm | मराठी कथालेखक

६) काचांवर काळी फिल्म नसावी

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 May 2018 - 5:55 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आणि मी शंभर रुपये टेकवून तिथून सटकलो होतो

इथेच सगळी गडबड आहे.

खिलजि's picture

25 May 2018 - 6:59 pm | खिलजि

काय राव , अहो तुम्ही नवीन दंडाची लेखमाला वाचलेली दिसत नाय वाटत . खूप सारे प्रकार आहेत त्यामध्ये . मला दोनदा पकडले होते ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या टोलनाक्यावर . माझ्या गाडीला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत आणि घेतली तेव्हा फेंट कलरची काच होती जी आता पण आहे . तेव्हा ती मान्यताप्राप्त होती आता ती नाही असे अडवणुकीनंतर वाटते . आणि यांच्यासोबत हुज्जत कोण घालत बसणार . इकडून तिकडून कुठलातरी दंड आकारणार आणि पावती फाडणार एव्हढेच माहिती याना.
आणि माझा मुद्दा दुचाकीस्वारांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आहे . बरे हि जी काय पद्धत ते अवलंब करत आहेत तिला पण दाद देण्यासारखी आहे . टोलनाक्यावर सरळ गाडी अडवणे आणि तिचे मूल्यमापन करणे . म्हणजे या लोकांसाठी आपण एक अर्धा तास तरी राखून ठेवायचा का म्हणून ? आपण किंवा हे दुचाकीस्वार काय दहशतवाडी आहेत कि काय ? रात्री ते फुंकणी घेऊन बसतात ते वेगळे . तो एक मोठा हाथोडा बसतो जर कुणी टाळली होऊन निघाला असेल तर . हा प्रकार ठीक आहे पण हि लुटालूट जरा योग्य वाटत नाही .

जेम्स वांड's picture

25 May 2018 - 7:21 pm | जेम्स वांड

मिपावर भाषेची आयमाय करीत दिलेल्या प्रतिसदांना काय शिक्षा/दंडविधान असावं असं एक सहज आपलं वाटून गेलं.

मराठी कथालेखक's picture

26 May 2018 - 10:35 am | मराठी कथालेखक

फेंट कलरची काच ? की काचेवर फेंट फिल्म ? आता कोणत्याच फिल्मला परवानगी नाहीये बहूधा. त्यामुळे फिल्म काढलेलीच बरी.
दुचाकीस्वारांबद्दल बोलत असाल तर माझा असा अनुभव आहे की हेल्मेट घातलेले असताना सहसा थांबवतही नाहीत. अर्थात एकूणच कागदपत्रे चोख असतील आणि कोणताही नियम तोडला नसेल तर घाबरण्याचे कारण नाहि.

हो फेंट फिल्म आहे . अजूनही आहे . पकडतात कधी कधी त्यावरून . काढून घेईन लवकरच . पण ती फॅक्टरी कोटेड होती बरं का . तेव्हा तो नियम नव्हता पण आता आहे त्यामुळे ती काढून टाकणे भाग आहे .
अजुन एक , ते दुचाकीस्वारांनाच तर जास्त त्रास देतात . हेल्मेट घाला नाही तर नका घालू . बरे ते नवीन नियमावली तर एव्हढी लांबलचक आहे कि विचारून सोया नाही . त्या नियमावलीत बसणारी गाडी खास करून दुचाकी तर नक्कीच नसते आणि तिथेच या लोकांचे फावते .
सिद्धेश्वर विलास पाटणकर

सिद्धेश्वर विलास पाटणकर

मराठी कथालेखक's picture

28 May 2018 - 7:53 pm | मराठी कथालेखक

पण ती फॅक्टरी कोटेड होती बरं का . तेव्हा तो नियम नव्हता पण आता आहे त्यामुळे ती काढून टाकणे भाग आहे

बरोबर आहे, तेव्हा नियम नव्हता तर कंपनीने दिली पण आता नियम बदललाय तर काढणेच ठीक राहील.

बरे ते नवीन नियमावली तर एव्हढी लांबलचक आहे कि विचारून सोया नाही . त्या नियमावलीत बसणारी गाडी खास करून दुचाकी तर नक्कीच नसते आणि तिथेच या लोकांचे फावते .

या नियमांचं उदाहरण देता येईल का ? आणि कोणतीही दुचाकी या नियमात का बसत नाही ? निदान नवीन दुचाकी तर बसलीच पाहिजे. जुनीही बसेलच पण मालकाने योग्य ती काळजी घ्यायला हवी.

  • वेळचे वेळी PUC , इन्शुरन्स काढणे.
  • निदान उजवीकडचा आरसा सक्तीचा असतो , तो तरी दुचाकीला असावा, म्हणजे तुटला असेल तर नवीन बसवावा
  • तुटलेले साईड इंडिकेटर्स , दिवे बदलावेत
  • पंधरा वर्ष झाल्यावर पुन्हा रोड टॅक्स भरुन पासिंग करावे.
मराठी कथालेखक's picture

28 May 2018 - 7:54 pm | मराठी कथालेखक

फॅन्सी नंबरप्लेट बनवू नये !!

अभ्या..'s picture

28 May 2018 - 9:04 pm | अभ्या..

कसं आहे ना लेखकराव,
ट्रॅफिकवाला थांबवतो त्यावेळी रस्ता हेच कोर्ट आणि तो पोलीस म्हणजेच जज असतो. फॅन्सी नंबरप्लेट सोडाच आदर्श नंबरप्लेट कशी असते हेच कुठला पोलीस सांन्गु शकतो ह्याची शंका आहे. एकजण म्हणाला एरियल फॉन्ट मध्ये सगळे पाहिजे, दुसरा म्हणाला रेडियम अलावूड नाहीच. रिफ्लेक्टिव्ह मटेरियल चालत नाही, व्हीनाईल अथवा पेंट पाहिजे. एकजण म्हणाला नबरशिवाय एक्स्ट्रा डॉट पण चालणार नाही. एकजण म्हनतो अल्युमिनियम डाय एम्बोस्ड प्लेट चालत नाही. बनवणार म्हणतो ही गव्हरमेन्ट अप्रुवड आहे. काढायचे ठरवावे तर हजार गोष्टी काढतात. त्यांच्या समोर फॅन्सी सोडाच, नंबरप्लेट नसलेल्या बुलेट पळत असतात. दादा भाऊ लिहिलेल्या स्कॉर्पिओ फॉरचूनर कधी ट्रॅफिकवाल्यासमोर थांबलेल्या पाहिल्या का? नॉर्मल चालणार्या वाहतुकीला थांबवून पोलिसांनी लायसन डॉक्युमेंट चेक केलेच पाहिजेत का? वाहतूक नियमन हे म्हणजे फक्त गाड्या थांबवून तोल नाक्याप्रमाणे तोल वसुली करणे आहे काय? त्यांच्याकडून पैसे स्वीकारणे किंवा दंड आकारने हा भाग काढून घेतला पाहिजे. त्यासाठी दुसरा काहीतरी पर्याय हुडकला पाहिजे. पियुसी तर सर्रास नवीन गाड्यालाही मागतात. तो बूर्दंड नागरिकांनी का भरावा?

सुबोध खरे's picture

30 May 2018 - 6:59 pm | सुबोध खरे

मी मूळ नंबराची पाटी (गाडीबरोबर आलेली) कधीही बदलत नाही. जर पोलिसाने हि चालणार नाही म्हणून सांगितले तर स्वच्छ शब्दात सांगेन याच पाटीवर गाडी पास झाली आहे तुम्ही म्हणता म्हणून बदलणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. आपला पंजीकरण, विम्याचा कागद यांची झेरॉक्स, प्रदूषण चाचणी आणि आपले लायसन्स बरोबर असेल तर पोलीस अजून काहीही विचारत नाहीत असा गेल्या बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे.
नियमांच्या अधीन राहून गाडी चालवली तर तुम्हाला फारसा त्रास होत नाही

मराठी कथालेखक's picture

30 May 2018 - 7:04 pm | मराठी कथालेखक

नवीन गाडीला सहा महीने पीयूसी मागता येत नाही.

ट्रॅफिकवाला थांबवतो त्यावेळी रस्ता हेच कोर्ट आणि तो पोलीस म्हणजेच जज असतो.

असं काहीही नसतं. जर तो कारणाशिवाय दंड मागत असेल आणि समजवूनही ऐकत नसेल तर तेव्हा दंड भरावा आणि मग रीतसर तक्रार करावी.

एकजण म्हणाला एरियल फॉन्ट मध्ये सगळे पाहिजे, दुसरा म्हणाला रेडियम अलावूड नाहीच. रिफ्लेक्टिव्ह मटेरियल चालत नाही, व्हीनाईल अथवा पेंट पाहिजे. एकजण म्हणाला नबरशिवाय एक्स्ट्रा डॉट पण चालणार नाही. एकजण म्हनतो अल्युमिनियम डाय एम्बोस्ड प्लेट चालत नाही.

शक्य आहे , हे सगळंच चालत नसेल. तुम्ही संबंधित कायदा/नियम मूळातून वाचा म्हणजे तुमच्या शंकांचे निरसन होईल.

त्यांच्या समोर फॅन्सी सोडाच, नंबरप्लेट नसलेल्या बुलेट पळत असतात. दादा भाऊ लिहिलेल्या स्कॉर्पिओ फॉरचूनर कधी ट्रॅफिकवाल्यासमोर थांबलेल्या पाहिल्या का?

तुमचं म्हणणं खरंय पण आता मुद्दा हा नव्हता .. बरोबर ना ?

सुबोध खरे's picture

30 May 2018 - 7:07 pm | सुबोध खरे

नवीन गाडीला सहा महीने पीयूसी मागता येत नाही.
नवीन गाडीला PUC कंपनीने करून दिलेलं असतं. ते आपल्या कागदपत्रांसोबत असतंच.
मागता येत नाही- असा कोणताही नियम नाही

मराठी कथालेखक's picture

30 May 2018 - 7:44 pm | मराठी कथालेखक

आत नियम बदलला असल्यास माहित नाही,
मी माझी शेवटचे वाहन २०१२ मध्ये घेतले होते. तेव्हा कंपनीने असे काही PUC दिल्याचे स्मरणात नाही. मी सुद्धा पहिले PUC सहा महिन्यानंतर काढले

सुबोध खरे's picture

30 May 2018 - 8:13 pm | सुबोध खरे

माझ्या आठवणीत २००७ साली घेतलेल्या होंडा युनिकॉर्नला असे प्रमाणपत्र होंडा कंपनीकडून मिळालेले होते. त्यानंतर २०१७ मध्ये मुलासाठी डॉमिनर घेतली त्याचेही प्रमाणपत्र बजाज कडून मिळालेले आहे.

जेम्स वांड's picture

25 May 2018 - 7:21 pm | जेम्स वांड

प्रतिसादांना असे वाचावे

मदनबाण's picture

25 May 2018 - 7:59 pm | मदनबाण

वर्दीतील टोलभैरव ! मला अनेक वेळा पकडले आहे, कागदपत्र वगरै मागतात आणि ती दाखवली कि सोडतात. पुर्वी टोलनाके नव्हते तेव्हा ही मंडळी सुद्धा नव्हती !
ट्रकवाल्यांकडुन सुद्धा हेच मग तो अडवताना इतर वाहनांचा अपघात होइल का ? ट्रॅफिक जाम होइल का इ इ इ विचार ते करत नाहीत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanati

उपेक्षित's picture

25 May 2018 - 9:08 pm | उपेक्षित

मागच्याच आठवड्यात चिपळूणला गेलो होतो सासुरवाडीला, जाताना खेड-शिवापूरला अडवले सगळे व्यवस्थित होते पण insurance ची mail वरची कॉपी दाखवली तर चालणार नाही बोलला original पाहिजे बोलला मग मात्र मी जरा वैतागून बोललो कि काय मामा insurance ची mail कॉपी चालते कि राव कशाला त्रास देताय उगाच तर चक्क मामा सॉरी बोलले आणि सोडून दिले लगेच. (लहान मुलगी होती म्हणून असेल कदाचित)
येताना मी एकटाच होतो, पारगाव खंडाळाला टोल प्लाझानंतर अडवले तिथे mobile insurance कॉपी दाखवली तर काही न बोलता लगेच सोडून दिले.

सांगायचा मुद्दा आपण जरा नेट लावले आणि आपल्याकडे सगळे कागद असले कि पैसे नाही द्यावे लागत. हुशः

आनन्दा's picture

25 May 2018 - 9:32 pm | आनन्दा

मलाही पकडलं कोल्हापूर टोलनाक्यावर. पण माझा एकंदर उद्धटपणा बघून त्याला कळलं की इथे काही मिळणार नाही.
मग सोडून दिलं. अर्थात कागद पूर्ण होते मात्र1

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2018 - 9:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी शंभर रुपये टेकवून तिथून सटकलो होतो .

असे करणार्‍यांना "सिस्टिम"ला दोष देण्याचा अजिबात अधिकार नाही... किंबहुना, तेच "सिस्टिम" बिघडवण्याचे काम करत असतात आणि इतरांचा त्रास वाढवत असतात.

कपिलमुनी's picture

26 May 2018 - 11:53 am | कपिलमुनी

योग्य !
पूर्ण पावतीचा दंड भरावा किंवा काहीही भरू नये.

चूक तुमची मग दोष पोलिसांचा कसा ?
आपण जर मागितलेली कागदपत्रे सादर केली तर 100₹ टेकवायची गरजच काय ??

आनन्दा's picture

26 May 2018 - 9:12 am | आनन्दा

फॅक्ट इस

बाईक वरून फिरणारे बरेच जण ओरिजिनल आणि इन्शुरन्स सोबत बाळगत नाहीत.
कायद्याने ते सोबत असले पाहिजे, पण बाईकमध्ये हे कागद ठेवायला सोया नाही. त्यामुळे पोलिसाने पकडले की कायद्याने दंड आहे, पण सामान्यपणे पोलीस इन्शुरन्स मागत नाहीत.
टार्गेट चा दट्ट्या असेल तर मात्र सगळं तपासतात. त्यातून हा सगळा घोळ तयार होतो

अभिजीत अवलिया's picture

26 May 2018 - 10:54 am | अभिजीत अवलिया

आता असे कागदपत्रे जवळ बाळगायची काहीच गरज नाही. ही डीजी लॉकर सुविधा वापरावी.

https://www.loksatta.com/pune-news/digital-locker-scheme-for-vehicle-doc...

मराठी_माणूस's picture

27 May 2018 - 9:36 am | मराठी_माणूस

मूळात टोलचा अत्याचार केंव्हा संपणार ?

मूळात टोलचा अत्याचार केंव्हा संपणार ? हेच म्हणतो...