कथेसाठी स्वतंत्र विभाग

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
24 May 2018 - 7:44 pm
गाभा: 

मिपावर सर्वात जास्त लिखाण होते ते " लेख" या विभागात.
मुख्य पानावर प्रत्येक वर्गवारीत नवीन येणारे पाच लेख लिस्ट मधे दिसतात.
मात्र बरेचदा मिपावर "लेख" या वर्गवारीत प्रकाशीत होणार्‍या लेखनांची संख्या आणि वारंवारता ( फ्रिक्वेन्सी) जास्त असल्यामुळे नवे लेख लगेच खाली जातात .
काही वेळेस अगदी कमी कालावधीतच पाच पेक्षा जास्त लेख येतात आणि अगदी नवे लेख ही यादीमधे मागे पडतात.
यामुळे ते लिखाण वाचायचे राहून जाते.
सम्पादकाना एक विनंती करु इच्छीतो की मुख्य पानावर लेख , कविता चर्चा भटकंती या प्रमाणे " कथा " या साठी स्वतंत्र वर्गवारी / विभाग सुरू केल्यास नव्याने प्रकाषीत झालेल्या कथा मुख्य पानावर अधीक काळ दिसतील.
तुमचे काय मत आहे?
" कथा " या प्रमाणेच आणखी कोणत्ती नवी वर्गवारी / विभाग सुरू करावेत म्हणजे मिपा वरील लेखाणाची लज्जत अधीक काळ घेता येईल?

प्रतिक्रिया

'कथा' यासाठी नक्की स्वतंत्र विभाग असावा.

जव्हेरगंज's picture

24 May 2018 - 9:40 pm | जव्हेरगंज

जोरदार अनुमोदन!!!

manguu@mail.com's picture

24 May 2018 - 11:23 pm | manguu@mail.com

स्वतंत्र स्थान

रातराणी's picture

25 May 2018 - 10:30 am | रातराणी

हो कथा विभाग वेगळा असावा

कथा कवितांचे वाचन आणि त्याला मिळणारे प्रतिसाद (स्पेशली मिपावर) हा वेगळा प्रकार आहे.
सतत बोर्डावर वरच्या स्थानावर राहणे हे कथेला शक्य होत नाही कारण वाचकांना त्यावर व्यक्त व्हावेसे वाटण्यासारखे नसते. म्हणजे त्यांना कदाचित लिहिलेले आवडते पण त्यावर आपण काही लिहावे अशी धारणा नसते. काथ्याकूटात किंवा सामाजिक / वादग्रस्त विषयावर वगैरे लेखात व्यक्त होण्यासाठी त्यांचे स्वतःचे मत असते ते धागे अपोआप वर राहतात आणि प्रतिसादही जास्त मिळतात. काही प्रथितयश लेखकांची धारणा मी फक्त लिहिणार आणि वाचकांनी वावा करुन जावे अशी असते. हा सोशल फोरम असलेने आणि हे लेखक दुसर्‍यांचा कथा कवितावर अधिकारवाणीने लिहु शकत असले तरी लिहिण्याचे टाळतात. कित्येक वाचक चांगले प्रतिसाद वाचायलाही वारंवार येतात. लेखकांनी केवळ कथा टाकली आणि कौतुकाबद्दल धन्यवाद धन्यवाद उपप्रतिसाद टाकले एवढे करुन भागणार नाही. स्वतः दुसर्‍या लेखकांना प्रतिसाद देणे, नवोदितांना प्रोत्साहन देणे ह्यासाठी तरी प्रतिसाद लिहिले पाहिजेत. अशा प्रथितयश लेखकांच्या प्रतिसादाने इतर वाचक मोटिव्हेट होतील. प्रतिसादासाठी पण आणि काहीजण लिहिण्यासाठी पण.
विभाग काढला तरी ह्या परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही जोपर्यंत सर्वच लेखकांनी हि गोष्ट ध्यानात घेतली नाही.मिपावर लिहिणार्‍या आणि प्रतिसादोच्छुक सर्वच जणांनी जरा विचार करावा की आपण कीती जणांना प्रतिसाद देतोय.

नीलकांत's picture

28 May 2018 - 1:21 am | नीलकांत

सदस्यांची मागणी असल्यास असा विभाग करण्यास हरकत नाही.