नोकरी मिळवताना २) रेस्युमे सर्वसामान्य माहिती - हेडर

रानरेडा's picture
रानरेडा in काथ्याकूट
24 May 2018 - 12:29 am
गाभा: 

मागील लेख
http://www.misalpav.com/node/42558
http://www.misalpav.com/node/42654

रेस्युमे मध्ये काही सर्वसामान्य माहिती द्यावी लागते. या माहिती ने नोकरी मिळण्यात फरक पडत नाही ( बर्याच अंशी ) पण हि माहिती देण्याची गरज असते , तसेच हि माहिती प्राथमिक डेटाबेस बनवायला उपयोगी असते त्यामुळे द्यावी लागते .

हे आहे

१)नाव ( पूर्ण) - हे मोठ्या फॉन्ट मध्ये बोल्ड करून लिहा

२) जन्मतारीख
३)वय ( हे जन्म् तारखे वरुन काढता येते - पण असलेले बरे)
४) लिंग
५) लग्न झाले कि नाही ? (Marital Status) , मुले

संपर्क -
६)मोबाईल फोन नंबर
७)इतर फोन नंबर ( असेल तर)
८)इ मेल
९)पत्ता ( लोकल )
१०)पत्ता ( मूळ )

सोशल मेडिया
११)लिंकडीन
१२) फेसबुक ( जरुरी नाही पण जर फेसबुक ठीक असेल तर लिंक द्यावी - अनेकदा उमेदवाराची सोशल प्रोफाईल बघतात. चुकीची प्रोफाईल बघण्य पेक्षा योग्य लिंक दिलेली बरी .)
१३) इतर सोशल नेटवर्क - जर कामाशी सम्बन्ध असेल तर. जर वाचनीय ब्लॉग लिहीत असाल तर लिंक द्यायला हरकत नाही

आता काही टिप्स

१)नाव - पूर्ण लिहा . मला एकदा एका मराठी इंटरव्युव्हर ने वडिलांचे नाव लावायला लाज वाटते का असे विचारले होते.
२)जन्मतारीख - फक्त आकड्यात लिहिल्यास गोंधळ होऊ शकतो . तारीख -अक्षरी महिना - मग वर्ष असे लिहा
३)वय - जवळची एक तारीख ( शक्य तो वाढ दिवसाची ) घेवून त्या दिवशी काय वय असेल ते लिहा उदा - . ( Age - 25 as Of July 15, 2018)
४)लिंग - खूप जण विसरतात . आपल्याला वाटते कि नावावरून कळेल कि नाही, पण इतर प्रांतातील लोक, विदेशी लोक, सोफ्टवेअर यांना कळत नाही,
५)Marital Status - Simple ठेवा – उदा - Unmarried / Married / Married with one son and one daughter

६)मोबाईल फोन नंबर - विदेशी नोकरी चा चान्स असेल तर पूर्ण लिहा - +९१- टाकून
७)इ मेल - प्रोफेशनल वाटेल असा आय डी घ्या . नाव - पुढे आकडा किंवा अर्थपूर्ण शब्द. शक्यतो जी मेल. आणि आपण काम करीत असतो तिकडचे मेल आजिबात नको! raunchyrahul, sensualdude असले आय डी मी बघितले आहेत ...
८)पत्ता ( लोकल ) पत्ता ( मूळ ) - पत्र येईल इतपत च द्या . मुलीनी डिटेल मध्ये पत्ता देवू नये. पण द्यावा . कोठले मूळ आहे वगैरे विचारले जाते अनेकदा.

सोशल मेडिया - लिंकडीन - नोकरी शोधताना अत्यंत म्ह्तेअचे सोशल नेटवर्क . या वर शक्यतो एक डिटेल प्रोफाईल टाका . नन्तर या वर एक लेखच टाकीन
फेसबुक - या वर पण डिटेल मध्ये लिहीन . फेसबुक प्रोफाईल अनेकदा बघितली जाते . जर ठीक प्रोफाईल असेल तर लिंक द्यावी या मताचा आहे.लिंक देताना ती छोटी आणि निट करता येते - तशी करावी.
https://www.facebook.com/help/329992603752372/

हि बरीच माहिती आहे जी जागा अडवते . तर मी एक फॉर्म्याट पहिले कि कमीत कमी जागेत हि सर्व माहिती बसवता येते . मला आवडले म्हणुन देत आहे .
खालील फोटो पहा. हे मी
Left Justified, Centre Justified and Right Justified अशा तिन्ही प्रकारे देत आहे.

https://photos.app.goo.gl/xPdATg7lWvPGoP2V2

Resume

आणि हा रेस्युमे वर रेस्युमे , बायो डेटा , करिक्युलम व्हिएटे असे काहीही टायटल देऊ नका , जागा महत्वाची आहे आणि रेस्युम हे डॉक्युमेंट पाहून रेस्युम आहे ते सहज कळते.
पुढील भागात आपण रेस्युमे चा महत्वाचा भाग म्हणजे माहिती कशी द्यावी हे बघू,
धन्यवाद
हेमंत वाघे
hemantwaghe@gmail.com
https://naukrishodh.blogspot.in/

प्रतिक्रिया

रेस्युमे चा फोटो टाकला आहे का? दिसत नाहीये. बाकी माहिती छान दिली आहे. पुभाप्र.

अनिंद्य's picture

24 May 2018 - 11:37 am | अनिंद्य

सहज सोप्या पद्धतीने माहिती देत आहात, अनेकांना कामी येऊ शकेल.
एखादे प्रकरण इंडस्ट्री / सद्य कामाचे स्वरूप बदलू इच्छिणाऱ्या अनुभवी लोकांसाठीपण लिहा ही विनंती.

raunchyrahul, sensualdude असले आय डी मी बघितले आहेत ... :-) :-) :-) ... मी पण !

manguu@mail.com's picture

24 May 2018 - 12:02 pm | manguu@mail.com

छान

दुर्गविहारी's picture

24 May 2018 - 7:48 pm | दुर्गविहारी

खुपच महत्वाची माहिती देत आहात. धन्यवाद.

मस्त माहिती आहे. अनेकजनांना ऊपयोग होईल याचा. जॉब करायचा नाही हे शिक्षण घेतानाच ठरवल्याने पुढील पायऱ्या आपोआप टळल्या. पण या अशा निवडीमागे एवढी प्रोसेस चालते हे माहीतच नव्हते. इंट्रेस्टींग आहे.

२) जन्मतारीख
३)वय ( हे जन्म् तारखे वरुन काढता येते - पण असलेले बरे)
४) लिंग
५) लग्न झाले कि नाही ? (Marital Status) , मुले

ह्या गोष्टी अमेरिकेत तरी विचारल्यास गोत्यात येऊ शकता. मी पहिल्यांदा इन्टरव्ह्यू घेण्यासाठी बसलो असताना मला एच.आर. ने सांगितले होते की ह्या गोष्टी अजिबात विचारू नकोस नाहीतर उमेदवार discriminationचा खटला भरू शकतात.

बाकी लेखमाला आणि माहिती छानच.

नितिन थत्ते's picture

25 May 2018 - 10:52 am | नितिन थत्ते

भारतात देखील मुले किती असे कोणी विचारत नाही. (मॅरिटल स्टेटस मात्र लिहीत आलो आहे मी)

कानडाऊ योगेशु's picture

25 May 2018 - 11:31 am | कानडाऊ योगेशु

Career Objective लिहावे कि नाही लिहावे?

manguu@mail.com's picture

25 May 2018 - 12:36 pm | manguu@mail.com

Career Objective

सगळ्यात खोटारडा भाग

मेन ऑब्जेक्तीव पैसाच असते , ते सोडून बाकीचे काहीतरी लिहितात

रानरेडा's picture

25 May 2018 - 2:13 pm | रानरेडा

करिअर ऑब्जेक्टिव्ह या विषयावर माझी दोन सिनिअर बॉस बरोबर चर्चा झाली होती . आम्ही Recrutment company newsletter काढत होतो . रेस्युम टिप्स वर चर्चा चालली होती .
त्याचे हेच म्हणणे पडले कि लोक हे इकडून तिकडून बघून लिहितात . कधी कधी क्लार्क साठी अर्ज करणारा सी इ ओ ला साजेशे लिहितो . अनेकदा करिअर ऑब्जेक्टिव्ह चा अर्थ विचारला तर माहित नसतो . याउप्पर जर कधी यावर चर्चा केली , ह्या ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी काय केले असे विचारले कि उमेदवाराला उत्तर देता येत नाही . आणि काही वेळा एखदा खडूस इंटरव्यू घेणारा असेल किंवा उमेदवाराचा स्ट्रेस इंटरव्यू घ्यायचा असेल तर त्याला इंटरव्यू च्या सुरुवतीला च या करिअर ऑब्जेक्टिव्ह वरुण घे घे घेतल्याची उदाहरणे आहेत.
तर या चर्चेत असे मत झाले कि करिअर ऑब्जेक्टिव्ह आजीबात लिहू नये . सरळ सोपे ( आणि आपल्याला समजावता येईल असे ) एक करिअर ऑब्जेक्टिव्ह इंटरव्यू ट विचारले तर सांगण्यास तयार ठेवावे ,

वय, लिंग आणि कल, लग्न आणि मुलं बाळं या फारच वैयक्तिक गोष्टी झाल्या.

या लिहाव्यात?

त्याचप्रमाणे रेझ्युमे, सी.व्ही., बायो डेटा यांत फरक काय?

manguu@mail.com's picture

26 May 2018 - 9:25 am | manguu@mail.com

लग्न , मुले , संसारात रमलेली लोक चंचल नसतात , जॉब धरसोड करत नाहीत , extra काम पडले तरी मुकाट्याने करतात, इतरांना फायद्याचे ठरतात

एकटे लोक , परीक्षा आहे , म्हणून तात्पुरती नोकरी करणारे इ इ लोक महाचंचल असतात, extra काम करत नाहीत , नोकरीतील इतरांना खड्ड्यात घालायचे पुण्यकर्म करतात

रानरेडा's picture

26 May 2018 - 5:31 pm | रानरेडा

लग्न झालेली लोक रिस्क टेकर नसतात , किंवा लवचिक हि नसू शकतात . अचानक झालेल्या बदली ला कोण चांगला प्रतिसाद देईल? कधी कधी काम चालू असताना अचानक काही तरी होरे आणि अर्जंट टूर ला जावे लागते . अशा वेळी एकट्याचा प्रतिसाद काय असेल ? त्यामुळे काही जागा साठी अविवाहित लोकांना पाधान्य असते . सेल्स मध्ये हे सर्वात खालच्या जागेसाठी - सेल्स मन साठी अनेकदा दिसते .

पहिल्यांदा रेझ्युमे, सी.व्ही., बायो डेटा यांत फरक ?? असावा . यावर नेत वर खूप चर्चा मिळेल . बर्याच अंशी एकच . वर एक तर असे काही टायटल देवून जागा वाया घालवू नका .

आता वय, लिंग आणि कल, लग्न आणि मुलं बाळं या फारच वैयक्तिक गोष्टी झाल्या. या लिहाव्यात?
१) मुलं बाळं न लिहिणे हे ठीक आहे - पण काही वेळा विचारले जाते .
२) लिंग - हे नंतर कसे लपवणार ? हेल्मेटकिंवा बुरखा घालून जाणार का ? अनेकदा नावावरून गेस मारला जातो - तो चुकीचा ठरू नये म्हणून. आणि दुर्दैवाने अनेक जॉब विशिष्ट लीन्गासाठी असू शकतात म्हणुन . समानतेच्या किती हि गप्पा मारल्या तरी अनेक कंपनी चे सेल्स फोर्स हे पुरुषी च असते .
३) वय - या साठी जर काही निकष असतील तर तर पुढील माहितीवरून एक दोन वर्षांच्या फरकात वय कळू शकते . थारीविक शिक्षणाला किती वर्ष लागतात याचे आडाखे आणि अनुभव . आणि अनेकदा वय जास्त आणि अनुभव आणि शिक्षण याट काही फटी ( ग्याप) असतील तर मध्ये काही ब्रेक असतील ते कळते . आणि हे लपवले तर निवडीचा चान्स जाऊ शकतो

सर्वात महत्वाचे एक आहे -
या माहिती ने नोकरी मिळण्यात फरक पडत नाही ( बर्याच अंशी ) पण हि माहिती देण्याची गरज असते , तसेच हि माहिती प्राथमिक डेटाबेस बनवायला उपयोगी असते त्यामुळे द्यावी लागते .

बर्याच अंशी का कि दुर्दैवाने या माहितीचा चाळणी लावायला उपयोग केला जातो. आणि आज ना उद्या हे कळणार असतेच . काही जॉब फक्त पुरुषासाठी किंवा स्त्रिया साठी असतात . तसेच लग्न झालेला पुरुष हि काही नोकर्यात नको असतो . आणि अनेक कंपनी फॉर्म भरून घेतात आणि यात खोटी माहिती लिहिलीत तर काढण्याची कारवाई झाली आहे.

आणि उमेदवारासाठी सगळ्यात त्रासाची गोष्ट असते इंटरव्यू च्या २ किंवा ३ राउंड झाल्यावर अशा तांत्रिक मुद्द्यावर बाद होणे . यात उमेदवारांचे २-३ दिवस , त्यांचे सुट्टी सर्व काही वाया जाते . त्यामुळे अशी माहिती योग्य वेळी देणेच योग्य. हीच गोष्ट फेसबुक ची .एकाच नावाने १०-२० प्रोफाईल पण दिसतात आणि चुकीची प्रोफाईल बघून स्क्रीनिंग स्टेज लाच नाकारले जाण्याचा धोका असतो .

तसेच जेंव्हा एका जागे साठी शेकडो अर्ज येतात , किंवा हजारो तेंव्हा काही एक फिल्टर लावावा लागतो . कामानुसार फिल्टर ठरलेले असतात . हि माहिती नसेल - आणि असे अर्ज १०-२० टक्के जरी असले तरी सरळ ते बाजूला ठेवून बाकीच्या अर्जा मधून योग्य ते उमेदवार निवडले जातील . इतका थोडा वेळ असतो हा निर्णय घ्यायला कि निवड करणाऱ्या ला कोठलाही त्रास होऊ देवू नये . मी १० अशी माहिती देणाऱ्या उमेदवारांना फोन करणार , काही फोन लागणार नाही , काही माहिती देणार नाही , काहींची माहिती यायला वेळ लागणार - काही attitude देणार - तेव्हड्या वेळात १०० अधिक रेस्युमे वाचून २० ते ३० अजून बरे उमेदवार मिळविण कि . जर एखादी कठीण जागा असेल तर शोध घेतला जातो . पण सर्वसामान्य जागा साठी एक सोडा शंभर मिळतील अशी परिस्थिती आहे . जिकडे सरकारी प्यून च्या जाहिराती साठी इंजिनिअर , डॉक्टर ,MBA आणि PhD अर्ज करतात - तिकडचे हे भीषण वास्तव आहे .

म्हणजे हि माहिती काही ठिकाणी स्क्रीनिंग ला वापरली जाते . तरी नसल्यास फार बिघडत नाही , पण..... आणि लिंग लिहावे करण सोफ्टवेअर ला किंवा बर्याचदा वाचणार्या माणसाला हि नावावरून काही कळत नाही .

manguu@mail.com's picture

26 May 2018 - 11:52 am | manguu@mail.com

डबल जॉब असेल तर एक दाखवला , एक न दाखवला तर चालते का ?

रानरेडा's picture

26 May 2018 - 5:13 pm | रानरेडा

तुमच्या कामाच्या स्वरूपा वर ते अवलंबून आहे.
तसे कि बहुतेक सर्व नोकरी वेळी आपण जो करारनामा करतो ( नोकरीच्या अटी ) त्या निट बघा, बहुतेक सर्व नोकरी पूर्णवेळ असतात आणि अनेक ठिकाणी तुम्ही त्या साठी पूर्ण वेळ देण्याची अपेक्षा असते. काही नोकरीत तर फावल्या वेळात शिकवणे , क्लास घेणे यालाही प्रतिबंध असतो, काही ठिकाई याची पूर्वकल्पना देणे अपेक्षित असते .

आणि या गोष्टी लपवणे - आणि जर या गोष्टी उघडकीस आल्यातर एथिकल इशू होऊ शकतो . काही वेळा कंपनी ला वाटले तर सरळ काढून टाकू शकते. . आणि नंतर हि गडबड केली तर मार्केट मध्ये नाव खराब होण्याचा धोका असतो .

manguu@mail.com's picture

27 May 2018 - 12:06 am | manguu@mail.com

medical professionals doctors दोन तीन ठिकाणीही attach असतात,

एका नोकरीतील प्रोफाइल दुसरीकडे relevent असेलच असे नाही, या base वर disclose नाही केले तर चालेल का ?

एकाjob साठी private hospital चा experience अपेक्सित आहे , मी govt plus private असे दोन्ही जॉब करत असल्याने माझ्या बायोडेताट दोन्हीही आहेत

आता private hospital job सोडून दुसर्या private hospital चा जॉब हवा आहे , जॉब consultant बोलतो की govt hosp चा पार्ट skip करा .... त्यांना फक्त private hospital चाच exp हवा आहे , तितकाच लिहा

रानरेडा's picture

27 May 2018 - 12:54 am | रानरेडा

medical professionals doctors दोन तीन ठिकाणीही attach असतात,
मला आपली हि केस माहित आहे . आणि सरकारी इस्पितळ आणि private हॉस्पिटल मध्ये अनेक डॉक्टर काम करतात . अनेक शिकवणारे मोठे डॉक्टर हि असे करतात . माझ्या माहितीत याला डॉक्टर साठी परवानगी आहे .

आपला हा जॉब कॉन्सुलटन्ट मेडिकल रिक्रूटमेंट मधील स्पेशालीस्ट आहे का ? कारण असे असेल तर आणि त्याला अनुभव असेल तर ठीक आहे.
पण आपण इतर सम व्यावसाईक डॉक्टर चा सल्ला घ्यावा असे मी सुचवेन .

कारण मी एका अर्थाने बघतोय कि सरकारी इस्पितळात काम करणाऱ्या डॉक्टर ला प्रचंड पेशंट सांभाळण्याचा अनुभव असतो . आणि ते पण सरकारी खाक्यात राहून आणि अतिशय कमी संसाधने असताना . मी नक्कीच याला अधिक वेटेज देईन . सरकारी कोलेज च्या डॉक्टर ना एव्हडी किमत असते कारण त्यांचा पेशंट सांभाळण्याचा अनुभव ... ( हे मला अनेक लोकांनी सांगितले आहे ) .

वर आहे ते मला वाटत आहे . जर याला परवानगी असेल ( अधिकृत असेल) तर लिहिण्यास हरकत का नसावे ? आधी आपण कॉन्सुलटन्ट ला नियम आणि हे नेहमीचे आहे हे सांगा. मला वाटत आहे कि तो इतर इंडस्ट्री चे नियम आपणास लावत आहे आणि त्याला डॉक्टर ची मेडिकल रिक्रूटमेंट चा अनुभव नसावा. (असे मला वाटते)
पुढील वाटचालीस शुभेच्छा !!

manguu@mail.com's picture

27 May 2018 - 1:58 am | manguu@mail.com

ही दोन भिन्न क्षेत्रे आहेत, dual जॉब अलाउडही आहे, पण त्यांना एकाच क्षेत्रातला का consider करायचा आहे , ते तेच जाणोत

क्षमस्व आपला नंबर डिलीट झाला आहे ;) .. तर जमल्यास संपर्क करावा , मला असे वाटत आहे कि हा कॉन्सुलटन्ट ला मेडिकल चा अनुभव नाही
- हेमंत वाघे

माझीही शॅम्पेन's picture

28 May 2018 - 4:11 pm | माझीही शॅम्पेन

एक सांगा मिपवर पडिक असतो ते आणि मिपा वरील टोपण नाव पण बायो-डेटा मध्ये टाकाव का ;)

नितिन थत्ते's picture

28 May 2018 - 4:33 pm | नितिन थत्ते

हॅ हॅ हॅ.

दिवसातले २५ तास मिपावर पडिक असलेलं कळलं तर नोकरी देणार नाहीत.

रानरेडा's picture

28 May 2018 - 6:49 pm | रानरेडा

तुम्ही जर चांगला कन्टेन्ट लिहीत असाल आणि तो वाचनीय असेल तर काय हरकत आहे ?
चांगले लिहिणे म्हणजे चांगले कम्युनिकेशन करणे असे मानले जाते . आपण नेट , ब्लॉग आणि समाज माध्यमे विशेषतः फेसबुक आणि ट्विटर वर काय टाकता हे बघितले जाते. अर्थात इंकडे मिपावर अनेकजण टोपण नावाने लिहितात . पण हे अनेक ठिकाणी होतो . तांत्रिक रेस्युम बघताना काही ठिकाणी मी काही फोरम , ब्लॉग किंवा अगदी फेसबुक , यु ट्यूब चे सन्दर्भ पहिले आहेत.
१) हा कन्टेन्ट अतिरेकी एका बाजूला झुकणारा नाही ना हे पहिले पाहिजे . राजकीय कन्टेन्ट धोकादायक ठरू शकतो
२) पडीक असणे - कोठल्या वेळी पोस्ट केली हि वेळ बघितली जाऊ शकते . पण थोड्या कामाच्या वेळी केलेल्या पोस्ट ने फार प्रॉब्लेम येऊ नये .

अर्थात मराठी कनेन्ट ला एक लिमिटेड व्हॅल्यू आहे . कारण बाकीचे बरेचसे अमराठी असल्याने तुमची काय लिहिले हे समोरच्या ला कळू शकत नाही , किंवा त्याला इंप्रेस करू शकत नाही . एक मराठी पुस्तकाऐवजी २-४ इंग्लिश मधील छापून आलेले लेख अधिक प्रभावशाली असतात . मी पण पुस्तक लिहिण्याचे कारण MBA ची प्लेसमेंट हे होते , दुर्दैवाने ते प्लेसमेंट नन्तर प्रकाशित झाले. ;(

पुढच्या नोकरी साठी किंवा टॉप मॅनेजमेंट स्कुल च्या ऍडमिशन साठी ब्लॉग सुरु करणारे ( आणि त्यात हि चोरून कन्टेन्ट टाकणारे ) माहित आहेत . काही जण तर यु ट्यूब साठी हि व्हिडीओ बनऊन स्वतःचे चॅनेल बनवत आहेत .

ब्लॉग , यु ट्यूब , सोशल मीडिया याने इमेज बिल्डिंग आणि पर्सनल ब्रॅण्डिंग हि एक स्ट्रॅटेजि होऊ शकते. यावर जर काही अधिक माहिती मिळाल्यास इकडे लिहीनच.

मी यावर्षी पन्नासेक मुलाखती घेतल्या. 3 ते 12 वर्षांचा अनुभव असा बराच मोठा स्केल होता. (माझा स्वतःचा अनुभव 5 वर्षांचा आहे).

अर्थात जागा ह्या सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील नव्हत्या त्यामुळे शेकड्यांनी recruit करणाऱ्या मोठ्या कंपन्यामधील मुलाखती घेणारे आणि माझा अनुभव यात जमीन अस्मानाचा फरक असावा.

माझ्या काही सुचवण्या:

१. Resume वाचायला 1 किंवा 2 मिनिटं मिळतात. त्यामुळे दोन पानांपेक्षा जास्त मोठा resume वाचणे शक्य होत नाही. मी 16 पानांचा resume पाहिला आहे. अर्थात असले सुम्भ पटकन जळून जातात. पदाच्या लायकीप्रमाणे resume असावा. मी घेतलेला एका अत्यंत चांगल्या उमेदवाराचा resume धड एका पानाचाही नव्हता. त्यात कोणतीही खाजगी माहिती नव्हती. किंबहुना जन्मतारीख, लग्न झालंय का, पासपोर्ट पॅन नंबर, फालतू अवर्ड्स, आणि शेवटचे डिक्लेरेशन यांची काडीमात्र आवश्यकता नाही.
2. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये resume पाठवणारे आणि तो मागणारे दोन्हीही नग म्हंटले पाहिजेत. पीडीएफच हवी. पूर्णविराम. टाइम्स न्यू रोमन असले फॉन्ट वापरत असाल तर कृपया बदला. गुगलचे रोबोटो, नोटो किंवा गेलाबाजार कॅलिब्रि असे नेत्रसुखावह फॉन्ट वापरा. Resume गूगल डॉक्स वर संपादित करा. तिथे उत्तम टेम्प्लेट्स मिळतील. तिथून पीडीएफ सुद्धा उतरवरून घेता येतील.
3. सॉफ्टवेअरवाल्यांसाठी : github किंवा stackoverflow च्या तुमच्या प्रोफाईलच्या लिंक्स असतील उत्तम. आमच्याकडे याला फार प्राधान्य आहे. अश्या लिंक्स देणारा आणि मागणारा असे जुळले तर तुम्ही योग्य कंपनीत आहात याची खात्री. जर हे काय हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हे क्षेत्र सोडलेले बरे.
4. साधारणतः फॉरमॅट :

1. नाव, ईमेल, फोन नंबर, skypeid
2. स्किल सेट आणि तुम्ही काम केलेल्या technologies
3. Relevant projects आणि employment history (links असतील तर त्यांच्यासहित)
4. github, stackoverflow यांच्या लिंक्स
5. Academics (महत्वाचे तेवढेच, पदानुसार)
6. Certificates, professional trainings, diplomas, patents, significant awards

5 व 6 भारी असतील तर पहिल्या पानावर टाकायला हरकत नाही.
कंपन्यांमधले थातुरमातुर अवार्ड टाकायची गरज नाही.