कानात इअरफोन घालून रस्त्यावर चालणाऱ्यांवर काही कायदा आहे कि नाही ?

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
7 May 2018 - 2:13 pm
गाभा: 

मी दिवसातून दोन तीन वेळा तरी हुज्जत घालतो या अश्या लोकांबरोबर . रस्त्यावर कानात बोळे घालून फिरतात आणि हॉर्न वाजवत राहिलो कि असे मागे वळून बघतात कि जणू आपलीच चूक आहे . रस्ता ह्यांच्या बापजाद्यांनी बांधला आहे अशी त्यांची भावना असते . बरं , या प्रकारांमध्ये महिलावर्गाहि मोठ्याप्रमाणावर सामील असतो . त्यांना शिवराळ भाषा वापरू शकत नाही पण तो भार दुसरा कुणीतरी लगेच उचलतो . पुढे जाऊन शिव्या देणं हे कुठल्याही वाहनचालकाला क्रमप्राप्त असते . मला आपले मत किंवा आलेले अनुभव याविषयासंबंधी ऐकायला आवडतील .

त्याच काय आहे , कि या प्रकरणांमुळे मला नेहेमी कार्यालय गाठायला उशीर होतोच होतो . किमान आठवड्यातून दोनदा तरी .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 May 2018 - 2:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पूर्वी मॅच असली की कानाला ट्रान्सिस्टर लावून लोक फिरायचे. पण एक कान 'चालू' असायचा. रस्त्यावर चालण्याचा मान प्रथम पादचार्याला असतो रे सिद्धेश्वरा. (अमेरिका,युरोपमध्ये राहणारे ह्यास नक्की दुजोरा देतील).
घरातून थोडा आधी निघत जा उशीर होत असेल तर.

माईसाहेब , अहो इथेच तर सर्व गडबड आहे . लवकर काही निघू शकत नाही आपण कामावर जायला आणि जरी लवकर निघालो ना तरी येनकेन प्रकारे दुनियादारी आडवी येते . त्यामुळे मी कधीही निघालो ना तरी स्टेशनरोडावर राहत असल्याने , लोकांची वर्दळ आली आणि त्याबरोबर त्यांची कानातली बोन्डेही आली . कुणी एखादा उलटून बोलला आणि जरा जास्तच बोलला तर सरळ गाडी लावतो आणि हुज्जत घालत बसतो . हे बऱ्याचदा झालेलं आहे . कधीकधी तर प्रकरण हमरीतुमरीवर पण जाते .
एकदा मगदूमबाबाच्या उरुसाची गर्दी होती . मी आणि माझा भाऊ आम्ही ताईकडून येत होतो . गर्दी होती हे मान्य आहे पण लोकांनी रस्त्यावर ठाण मांडून बसणं हे मान्य नाही . तेव्हा नुकताच दंगलीचा काळ ओसरून गेला होता . लोकांच्या जखमाहि बऱ्यापैकी ताज्या होत्या . एका टवाळखोर काम्पुबरोबर भावाची बाचाबाची झाली , रस्त्यात उभे राहण्यावरून . मग प्रकरण शिवीवरून थेट मारामारी पर्यंत पोचलं . भावावर हात टाकताक्षणी माझ्यातलं पण जनावर जागं झालं . मग काय दिसेल त्याला झोडत सुटलो दोघेही . तोबा गर्दी उसळली होती रस्त्यावर . त्यातल्या एकाची मी दाढी उपटली तेव्हा ते प्रकरण भलतीकडेच निघाले होते . त्याला धार्मिक रंग देण्यात आला होता . आम्ही काही हटायला तयार नव्हतो . एकाने त्याला धर्माचा मुलामा द्यायचा प्रयत्न केला तेव्हा लगेच त्याला मी तिथेच रोखला . त्यात उरूस , पोलिसांनी सोडवायचा प्रयत्न केला तेव्हा चुकून माझ्याकडून पोलिसालाच प्रसाद मिळाला . तेव्हा ते प्रकरण आमच्या घरात इतके गाजले कि काय विचारून सोय नाही. चांगले सात आठ तास पोलीस स्टेशनमध्ये होतो . अशी प्रकरण घडताच असतात ओ , माई . पण एक मात्र नक्की आजही रस्त्यावरून चालताना कुणी कानात बोळा घालून अडवातिडवा चालत असेल ना तर तिडीक डोक्यात जाते माझ्या . माई जेव्हा या कामाच्या व्यापातून मुक्त होईन ना तेव्हा खरी मजा येईल . मी आणि फक्त हे बोळेवाले असतील रस्त्यावर . लोकांना फुकटचा चित्रपट दाखवत सुटेन .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

चित्रगुप्त's picture

8 May 2018 - 6:14 am | चित्रगुप्त

रस्त्यावरून चालताना कुणी कानात बोळा घालून अडवातिडवा चालत असेल ना तर तिडीक डोक्यात जाते माझ्या .

हे वाचून का कुणास ठाऊक, पण हे आठवले:
.

खिलजि's picture

8 May 2018 - 12:40 pm | खिलजि

चित्रगुप्त साहेब हे बाकी भारी काम आहे . त्रास होतो म्हणून कानच कापून टाकला यांनी .

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2018 - 1:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या त्या अवस्थेचे कारण 'मानसिक आजार' नसून 'ट्रायजेमिनल न्युराल्जिया' हे होते. या आजारात, छोट्याश्या उत्तेजनाने (उदा: चेहरा जरासा खाजवणे, दातांना ब्रश करणे, इ) रुग्णाच्या डोके, चेहरा, कान इत्यादी भागात इतक्या तीव्र कळा येतात की रुग्णाचे वागणे वेडाचा झटका असल्यासारखे दिसू शकते. किंबहुना, या रुग्णांचे सुरुवातीचे निदान काही वेळेस (चुकीने) मनोरुग्ण असे केले जाते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2018 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

रस्त्यावर चालण्याचा मान प्रथम पादचार्याला असतो रे सिद्धेश्वरा. (अमेरिका,युरोपमध्ये राहणारे ह्यास नक्की दुजोरा देतील).

चूक.

१. सर्व प्रकारच्या पादपथावरून चालण्याचा पहिला मान पादचार्‍याचा असतो.

२. एखाद्या कुंपण असलेल्या जागेतील (उदा: सोसायटी, संस्थेचे आवार, इ) रस्त्यांवर चालण्याचाही पहिला मान पादचार्‍याचा असतो.

३. सार्वजनिक रस्त्यांवरच्या झीब्रा स्ट्राईप्सवरून चालण्याचा पहिला मान पादचार्‍याचा... त्यातही जेव्हा पादचार्‍यांसाठी हिरवा दिवा असतो तेव्हा तो मान भरभक्कम असतो, जेव्हा पादचार्‍यांसाठी लाल दिवा असतो तेव्हा तो मान पहिला समजला जात असला तरी जरासा कमी प्रतिचा असतो.

४. झीब्रा स्ट्राइप्स सोडून सार्वजनिक रस्त्यांवरच्या इतर भागावर पहिला मान वाहनांचा असतो. (कडक वाहतूक नियमांच्या अथवा वाहतूक न्यायालयाच्या नस्त्या कटकटी मागे लागू नयेत यासाठी पाश्चिमात्य देशांत, गाव-शहराच्या हद्दीत वाहनचालक प्रत्यक्षात तो मान पादचार्‍याला देतात, ही वस्तूस्थिती असली तरीही.)

बिटाकाका's picture

7 May 2018 - 2:36 pm | बिटाकाका

नियम आहेत की! पण एकूणच रस्त्यावर नियम न पाळणार्यांमुळे नियम पाळणाऱ्यांना त्रास होतो असेच चित्र दिसते आहे. सिग्नलला थांबलो तर मागचा हॉर्न वाजवून आपली इज्जत काढतो राव. काही कळेचना नियम पाळायचे की नाही.

जेम्स वांड's picture

7 May 2018 - 2:45 pm | जेम्स वांड

मागच्याने हॉर्न मारून मारून आपली इज्जत कशी जाते म्हणे? आपण थांबायचं घट तिथेच, तू तुझी काशी घाल म्हणावं मी सिग्नलला हिरवा रंग येउस्तोवर इथून हलणारच नाही!

बिटाकाका's picture

7 May 2018 - 3:03 pm | बिटाकाका

अहो कॅबवाले, रिक्षावाले, बसवाले हे लोकं रस्ता काढून सिग्नल तोडण्यासाठी किंवा सिग्नल सुटल्यावर विचित्र नजरेने बघत जातात आणि जणूकाही आपणच मूर्ख आहोत असे भासवतात किंवा बऱ्याच वेळेस भांडणावरच आल्यासारखे येतात. कुणाशी नडावे , कुणाशी नाही हेही कळेना. आम्हाला माहिती आहे या सिग्नलला थांबायची गरज नाही अशा थाटात वागत असतात. मागे एकदा असंच एका चौकात एका माणसाचं आणि रिक्षावाल्याचं वाजलं तर त्या रिक्षावाल्याने डायरेकट रिक्षातून रॉडच काढला. आजूबाजूचे लोक मध्ये पडले म्हणून मिटलं. म्हणून मी जागा असेल तर बाजूला सरकून अशा उद्धट लोकांना पुढे जाऊ देतो. भांडण कुठेपर्यंत पोहोचेल सांगता येत नाहीये. आपण बाचाबाची किंवा गुद्दागुद्दीपर्यंत निभावून नेऊ शकतो :):).

जगप्रवासी's picture

7 May 2018 - 11:21 pm | जगप्रवासी

मागून हॉर्न वाजवत असतील तर मी गाडी थोडी बाजूला घेऊन जागा देतो आणि पुढे जायला जागा देतो कोण मूर्खांसोबत हुज्जत घालून स्वतःचा मूड खराब करून घेणार.

जेव्हा माझ्या कारला रिव्हर्स हॉर्न होता तेव्हाची गोष्ट ....

सिग्नलला थांबलेलो असताना कुणी मागचा फारच हॉर्न वाजवायला लागला तर सरळ रिव्हर्स गिअर टाकायचो. रिव्हर्स हॉर्न वाजायला लागला कि मागचा फुल कन्फ्युज :)

हा प्रयोग बऱ्याच वेळा केला.

बिटाकाका's picture

8 May 2018 - 7:18 am | बिटाकाका

ह्याह्यह्या!!

विशुमित's picture

8 May 2018 - 12:41 pm | विशुमित

खत्रूड आयड्या आहे ही.!

खिलजि's picture

8 May 2018 - 12:43 pm | खिलजि

नवीन भर पडलीय युक्तीमध्ये

टवाळ कार्टा's picture

7 May 2018 - 3:18 pm | टवाळ कार्टा

+१११११

रच्याकने असाच प्रकार कानात बोंडे घालून बाईक चालवणार्यांचा असतो

अहो टकाशेठ, हा मुद्दा तुम्ही भारीच उचललाय . हे मात्र खरे आहे . आजकाल याचे प्रमाण वाढले आहे आणि मला वाटते ते धोकादायकही आहे .

अक्षय कापडी's picture

7 May 2018 - 6:14 pm | अक्षय कापडी

आत्तांपर्यत रस्त्याच्या बाबतीत बनवलेला एकतरी नियम पाळला गेला आहे का वाहनचालकाकडुन नविन नियम बनवा म्हणे तुम्ही तरी पाळता का नियम एकतरी नियम तोडत असालच की आजकालचे लोक इयरफोन वाल्यांवर का भडकता काय माहीत आणी जाउद्या आत्ता. गाणे एकायचीत मला तेही इयरफोन लावुन

माहितगार's picture

8 May 2018 - 10:29 am | माहितगार

एक मिनीट, एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन होत नाही !

चुकून कधीही माझ्या गाडीच्या मध्ये येऊ नकोस मित्रा . यायचंच असेल तर आधी स्वतःच एखादं छायाचित्र मला पाठवून ठेव . मी माझ्या मित्रांवर कधीही हात उगारत नाही . मी फक्त हा एकाच नियम मनापासून पाळतो .

चुकून कधीही माझ्या गाडीच्या मध्ये येऊ नकोस मित्रा . यायचंच असेल तर आधी स्वतःच एखादं छायाचित्र मला पाठवून ठेव . मी माझ्या मित्रांवर कधीही हात उगारत नाही . मी फक्त हा एकाच नियम मनापासून पाळतो .

हात न उगारता डैरेक्ट गाडीच घालता का अंगावर?
एखादा जेसीबी, रोडरोलर, मॉन्स्टर ट्रक तरी घ्या निदान.

माहितगार's picture

8 May 2018 - 12:22 pm | माहितगार

रागावलेला सज्जन सज्जन नसतो असे नव्हे ;)

अभ्यासेठ तू तो एकदम जान है यार अपनी . तुझ्यासाठी कायपण मित्रा . तू समोर आलास ना तर तुला ओळखण्यासाठी मला तुझ्या फोटोची गरज नाही पडणार . इथे आत कोरलंय तुला मी . तुला तर गाडीची चवीचं देऊन टाकेन आणि पायी चालत जाईन .

विशुमित's picture

8 May 2018 - 12:44 pm | विशुमित

<<<तू समोर आलास ना तर तुला ओळखण्यासाठी मला तुझ्या फोटोची गरज नाही पडणार >>
==>> आखा सोलापूर पालथा घातला तरी ओळखू शकणार नाही तुम्ही त्यांना. पैज लावून सांगतो.

सस्नेह's picture

8 May 2018 - 3:05 pm | सस्नेह

कसा ओळखेल ?
अभिजी सोलापुरात असतात कुठे हल्ली :D

अभिजीत अवलिया's picture

8 May 2018 - 1:24 pm | अभिजीत अवलिया

इथे आत कोरलंय तुला मी

रामभक्त हनुमान तसे अभ्या.. भक्त खिलजि.

खिलजि's picture

8 May 2018 - 1:28 pm | खिलजि

लालभक्त मित्रा

अभ्या..'s picture

8 May 2018 - 4:37 pm | अभ्या..

ह्ये जिगर.
आमच्या ग्रामदैवताचे नाव तुमचे म्हनल्यावर काय हो, नादच करायचा नाही.
.
पुन्हा एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र.
सिध्देश्वर महाराज की जय

खिलजि's picture

8 May 2018 - 4:52 pm | खिलजि

मग काय . लवकरच लालवंताची आरती सादर करणार आहे . बघू कधी उजाडतंय ते ह्या गोष्टीला .

ह्या ह्या ह्या , अभ्याने इअर फोन घातला असेल तर काय कराल खिलजी ;)
अभ्या १ न म्ब र आगाउ आहे असे नमुद करते न पळते +)))))))

खिलजि's picture

9 May 2018 - 4:35 pm | खिलजि

मी कि नाही , त्याला चिऊकाऊच्या गोष्टी सांगेन .

एक होती चिऊ ,

एक होता काऊ ,

पियुशा कि नाही तुला बोलते

एक नंबरचा आगाऊ

ह्ही ह्ही ह्ही ह्ही

खिलजि's picture

8 May 2018 - 12:47 pm | खिलजि

का ओ. असं का बोलताय राव तुम्ही . ढाण्या वाघ आहे माझा मित्र सोलापुरातला आणि मला सांगा असेपण वाघ उरलेयत किती ? त्यातही ढाण्या वाघ कमीच असतील . मग त्याला ओळखायला काय सोप्प आहे कि राव ? एक इकडे मुंबईला आणि दुसरा सोलापूरला .. (हलकेच घ्या मी म्हणतोय )

खरंय चिडचिड होणं स्वाभावीक आहे. इयरफोन कानाला लावून चालणं किंवा ड्राइव करणं हे बाकीच्यांसाठी आणि त्यांच्याकरतासुद्धा घातक आहे. यूपी मधे नुकताच झालेल्या बस अपघाताविषयी वाचलेलं आठवून आजही शहारा येतो.

एकदा सिग्नलला एकजन अगदी गाडीला खेटून ऊभा राहीला. वर गाडीवर हात ठेऊन ठेकाही थरला. मी काच खाली घेऊन लिप सिंगीग करावे तसे शिव्या देत असल्याचा अविर्भाव केला. त्याने घाईत बोळे काढून विचारले 'काय म्हणालात? मी म्हणालो 'गाडी हलली तर तोल जाईल तुमचा' तर म्हणाला 'तुम्ही काही तर वेगळे बोलतात, मी ऐकले' त्याला म्हणालो 'मग सांग मी काय म्हणालो' आजुबाजूचे हसले. माझं काम झालं.

शिवाजी नाठे's picture

9 May 2018 - 12:12 am | शिवाजी नाठे

किती हि काळे मांजरे आडवे गेले तर काही होत नाही पण कानात बोळे घातलेले माकडे आडवे आले कि अपशकुन होणारच

सुधीर कांदळकर's picture

9 May 2018 - 10:30 am | सुधीर कांदळकर

हा अनुभव येऊनही आपल्याला उशीर होतो याच अर्थ आपले टाईम मॅनेजमेन्ट चुकले असे आपल्याला वाटत नाही का? लोक चुकीचे वागाहेत यात संशय नाही. परंतु त्यासाठी लढा देतांना उशीर झाल्याचे समर्थन नको. डू लाईक रोमन्स डू व्हेन यू आर इन रोम. तुम्ही तसे करू नका पण जरा अगोदर निघून आणि मुख्य म्हणजे स्वत्।चे डोके थंड ठेवून पाहा की. टाईम मॅअनेन्टबरोबर स्ट्रेस मॅनेजमेन्ट पण करा. ज्या क्षणी तुम्हाला राग येणार नाही त्याक्षणी तुमचा विजय झाला असे समजा.

आमच्या इथे कोळंब पुलाआधी रस्ता किंचित डावीकडे वळतो. तिथे एक मासेवाली बसते. ते मासे घ्यायला तिहेरी पार्किंग होते. वळणापलीकडचे काहीही दिसत नाही. तरी फारसे कोणी चिडत नाही. आपण जनमानस बदलू शकत नाही.

खिलजि's picture

9 May 2018 - 2:54 pm | खिलजि

आपण बरोबर असाल कदाचित पण माझ्या निरीक्षणानुसार हे जे दुकानदार लोक किंवा धंदेवाले आहेत ना त्यांच्यामुळे लोक रस्त्यावर चालतात . पर्याय नसतो बिचार्याना . बोलूही शकत नाही . खाली पर्याय आहेत त्यापैकी एकाची मी नेहेमी निवड करतो

१ बोचरी बडबड करणे , आडवं कानात बोळे घालून येणार्याला पण आणि त्याच्या बाजूला पदपथावर जो कुणी धंदेवाला असेल त्यालापण . त्या धंदेवाल्याला जाणवून देणे कि साल्या तुझ्या ह्या अतिक्रमणामुळेच लोक रस्त्यावर आले आहेत .

२ बी एम सी चा एक हॉटलाईन नंबर आहे " १९१७ " इथे सरळ तक्रार नोंदवतो . त्यांच्याकडून टोकं नंबर घेतो आणि वेळ मिळेल तास पाठपुरावा करतो जेणेकरून तो धंदेवाला मेटाकुटीला येईल .

३ समोरून माझ्या बडबडीला प्रत्युत्तर आले तर सरळ गाडी बाजूला लावणे आणि वाग्युद्धाला सुरुवात करणे . प्रकरण हाताबाहेर जाताच इतरही तयारी ठेवतो .

४ आतापर्यंत फार कमी वेळा मला प्रतिकार झालेला आहे . ह्याचा अर्थ एकतर लोकांकडे वेळ नसतो या गोष्टींना किंवा मी बरोबर असतो माझ्या जागी .

सतिश पाटील's picture

9 May 2018 - 12:13 pm | सतिश पाटील

दुनिया मे २ टाइप का सोचनेवाला लोग होते है. १- जो चल रहा है उसको वैसे ही चलने दो २- जो चल रहा है उसको बदलना है.

लोकांमधे बदल होईल याची अपेक्षा ठेवू नका, त्यांना बदलायला जाल तर तुम्हालाच लैय त्रास होईल. स्वतः मधेच थोड़े बदल करा.
वर सुधीर कांदळकर यांनी म्हटल्याप्रमाणे वागून बघा.

जरा अगोदर निघून आणि मुख्य म्हणजे स्वत्।चे डोके थंड ठेवून पाहा की. टाईम मॅअनेन्टबरोबर स्ट्रेस मॅनेजमेन्ट पण करा. ज्या क्षणी तुम्हाला राग येणार नाही त्याक्षणी तुमचा विजय झाला असे समजा.

With earphones on, Tamil Nadu tourist didn’t hear dad’s warning to duck as stones rained down

Rajavel suspected nothing when he spotted a group of 30-40 men standing a few metres away by the roadside as the bus carrying his family and other tourists went past Narbal on Srinagar-Gulmarg road on Monday.
“It started all of a sudden. Stones started hitting all four buses carrying the tourists. There was very little time to react. Some of us yelled at other passengers to duck and take cover. Only my son, who had earphones plugged in, didn’t hear me,” Rajavel told TOI.

काश्मिर पहायला गेलेल्या चेन्नईच्या कुटूंबातला कमावणारा तरुण मुलगा दगड फेक करणार्या गुंडांच्या दगड फेकीला बळी पडला.
त्याची चुक एकच होती. कानात इअरफोन घालून बसच्या खिडकीपाशी बसलेल्या ह्या तरुणाला त्याच्या वडीलांची चेतावणी ऐकू आली नाही,

त्यापेक्षा एक भारी प्रकार आम्च्या इथे आहे. एका वर्दळीच्या रस्त्यावर तिकाटणे आहे. तेथेच एक प्रसिध्द मंदीर आहे. प्रचंड वाहतूक, लोक, भाविक, हातगाड्या ह्यांची नुस्ती झुंबड उडालेली असते दिवसभर. एक म्हातारा, ज्याचे दोन्ही पाय अधू आहेत तो एका दुकानाच्या पायरीवर बसून असतो. त्याच्या मनात आले की खुरडत खुरडत तो रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला जाऊन बसतो. त्याचा रस्ता पार करण्याचा कार्यक्रम जवळपास २० मिनिटे चालू असतो. हा प्रफॉर्मन्स जवळपास दिवसातून ७ ८ वेळा पार पाडला जातो. एकतर आमच्या गावात करमणूक कमी असल्याने आणि मूळतःच लोकांना वेळ भरपूर असल्याने मस्त ट्राफिक जाम घडवला जातो. ह्या म्हातार्‍याला कुणी काही बोलल्यास वस्सकन अंगावर येतो. जास्त पॉवरफुल माणूस असल्यास तेथील दुकानदार त्या म्हातार्‍याची बाजू घेऊन भांडतात. एकूणच भारी एंटरटेनिंग प्रकार असतो.

टवाळ कार्टा's picture

10 May 2018 - 12:21 am | टवाळ कार्टा

-11111

महेश हतोळकर's picture

9 May 2018 - 4:03 pm | महेश हतोळकर

बसमध्ये बसून प्रवास करत असताना त्याने हेडफोन्स वर गाणी ऐकली ही त्यांची चूक झाली.

बाकी दगडफेक करणारे सामाजिक बांधिलकी जपत अशा चूका करणाऱ्यांना प्राणदंड देऊन कायद्याची मदतच करतात आहेत.

खिलजि's picture

9 May 2018 - 5:20 pm | खिलजि

अहो असं नका बोलू ओ साहेब . तो गेला तो कुणाचा तरी मुलगा होता . आपण वैतागतो हे खरं आहे पण कुणाला प्राणदंडाची शिक्षा व्हावी हे खरंच मान्य नाही , निदान मला तरी . तो दुर्दैवी बाप किती रडला असेल . खरंच वाईट वाटत हे सगळं ऐकल्यावर .

महेश हतोळकर's picture

9 May 2018 - 5:37 pm | महेश हतोळकर

माझा प्रतिसाद डांबिस००७ यांना होता.

http://www.misalpav.com/comment/995493#comment-995493

हो समजलं ते पण खूप वाईट वाटलं ते ऐकून . असो

मनिमौ's picture

10 May 2018 - 6:34 am | मनिमौ

अस असेल तर पुढे यायला जे दुर्दैवी लोक रोज जंगली महाराज रस्त्यावरून प्रवास करतात त्यांना विचारा.
सर्व प्रकारचे हौशे नवशे गौशे इथेच दिसतील.
रस्त्याच्या दोन्ही बाजूस शंभर लोकांची पंगत ऊठेल असा फुटपाथ असताना हे सज्जन भर रस्त्यावरून रमत गमत चालतात.
दुहेरी कार आणी बाईक पार्किंग तर सर्रास आहे.
उरली सुरली कसर जिमखाना बस स्टाॅक च्या इथले फेरीवाले आणी रिक्षावाले भरून काढतात.
दुर्दैवाचे दशावतार चपलख ही म्हण बसेल माझ्या एकेककळच्या आवडत्या रस्त्याला.

अत्रन्गि पाउस's picture

10 May 2018 - 9:46 am | अत्रन्गि पाउस

आमच्या घराजवळ एक शाळा
सकाळ दुपार संध्याकाळ शाळा भरणे सुटणे - एका हातात लेकरू, कानात इयर फोनचे बोंडूक, शाळेच्या गेट च्या जास्तीत जास्त जवळ वाहन लावायची असोशी, उलट सुलट पार्किंग आणि ह्याच वेळी आम्हाला घरी जायचं असेल तर हे सगळ भोगाव्च लागत

पहिला अडथळा आडवा आला रे आला कि मी माझ्या गाडीचा हॉर्न दाबतो, गाडीचा वेग मिनिमम करून जाऊ लागतो ते थेट शेवटचा अडथळा पार पडे पर्यंत ...

ह्यात होत अस कि आपल्या रस्त्यात वावरण्याने इतरांना होणाऱ्या त्रासाबद्दल अनभिद्न्य असणारे ह्याचं बर्यापिकी प्रबोधन होत ....

त्या गर्दीत वाट काढत शाळेत जायला वैत्ताग्लेली चिल्ली पिल्ली , ते ह्या हॉर्न ने अजून कावरी बावरी होतात ते मात्र फार वाईट वाटते ...पण त्याला नाईलाज असतो ...

पण कानातले बोंडूक काढून वैतागलेल्या जनते कडे बघून प्रचंड आसुरी आनंद मिळतो ....

मराठी_माणूस's picture

11 May 2018 - 6:00 pm | मराठी_माणूस

अजुन एक अति प्रसन्न करणारे दृश्य : चार चाकी चे चाक एका हाती आणि दुसर्‍या हातात फोन वर काही तरी बघत वाहन चालवणे.

समोर जाणारी चार चाकी जर हळु जात असेल तर ९९% तो फोन वर बोलताना सापडतो. अशा वेळेस अर्थातच तो सुचना न देता वाहन वळवतो. आजुबाजुच्या क्षुद्र लोकांकडे बघण्याची त्याची अजिबात ईच्छा नसते.

बिटाकाका's picture

18 May 2018 - 10:23 am | बिटाकाका

समोर जाणारी चार चाकी जर हळु जात असेल तर ९९% तो फोन वर बोलताना सापडतो.

लै येळा सत्य!

मला पडणारा नेहमीचा प्रश्न. हे लोक नक्की काय ऐकत असतात?

सुधीर कांदळकर's picture

18 May 2018 - 10:18 am | सुधीर कांदळकर

त्याच काय आहे , कि या प्रकरणांमुळे मला नेहेमी कार्यालय गाठायला उशीर होतोच होतो . किमान आठवड्यातून दोनदा तरी .

हे आहे. रहदारीला अडथळा होतो हे नाही. म्हणून माझा तसा प्रतिसाद आहे. नियम मोडणार्‍यांना जबर शासन झाले पाहिजे अशाच मताचा मी आहे. दंड वा शिक्षा होत नाही आणि झालीच तर अतिशय मामुली. म्हणूनच हे प्रकार वाढलेत. एकेकाला किमान आठवडाभर तुरुंगात विनाचौकशी सडवले की आपोआप सारे वठणीवर येतील. वा तिथल्या तिथे कानाखाली जाळ काढू शकणारे लोक हवेत. पिंपळे सौदागरमध्ये आमच्या घराशेजारी एकदा रात्री दीडदोन वाजता चारपाच मद्यपी तरूण चालले होते. कुठूनतरी दहाबारा स्थानिक गुंड आले. काहीही न बोलता, भांडण वा आरडाओरडा न करता एकेकाला रट्टॆ देऊन घरी पाठवले. बोलेगे तो और पिटेंगे म्हणून हळू आवाजात दम देऊन फटकावले.असे पाहिजे. बळी तो कान पिळी हेच खरे.