साहित्यिकांची संघटना

फुंटी's picture
फुंटी in काथ्याकूट
4 May 2018 - 11:29 pm
गाभा: 

इतर व्यावसायिकांच्या संघटना ,घोळके असणे समजू शकतो.पण साहित्याकांच्या संघटनांची काय आवश्यकता असावी?? लिहिणाऱ्या हातांना ,विचारवंतांना व्यासपीठ मिळावं इतपत संघटन ठीक आहे पण त्यापुढे जाऊन कंपूबाजी सुरू होते तेथे प्रतिभा नाहीशी होते असे वाटत नाही का?

प्रतिक्रिया

मग साहित्य संमेलन दुसरे काय असते?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 May 2018 - 1:14 am | माईसाहेब कुरसूंदीकर

प्रतिभा नाहीशी कशी होईल? सिने व टी.व्ही.आर्टिस्ट असोसियेशन आहेच की. सिने-संगीत्कारांची पण असोसियेशन आहे. गरज आहे की नाही माहित नाही. सहसा दबाव गट म्हणून अशा संस्था स्थापन केल्या जातात. क्वचित दुरुपयोगही केला जातो.

चित्रगुप्त's picture

5 May 2018 - 1:35 am | चित्रगुप्त

कंपूबाजी सुरू होते तेथे प्रतिभा नाहीशी होते

अरे फुंट्या, खरे प्रतिभावंत कंपूबाज नसतात, असे 'ह्यांचे' मत.
-- बाईसाहेब फुलसुंगंधीकर.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 May 2018 - 2:04 am | माईसाहेब कुरसूंदीकर

माणसांच्या प्रतिभेचा हिशोब आपण ठेवत असणारच. तेव्हा आपले मतही कळू द्या.
विचित्र्गुप्त

कंपूबाजी करून सरकारी मलिदा खाणे हे असल्या संघटनांचे मुख्य काम असते. गोव्यांत पहा अतिशय भिकार दर्जाचे कोंकणी लेखन अत्यंत भिकार दर्जाची पुस्तके लिहितात आणि सरकारी सबसिडी खाऊन मोकळे होतात. असल्या संघटनेमुळे खऱ्या प्रतिभावान लेखनाला प्रकाशक नजरअंदाज करतात.

खर तर असे अनेक राजहंस बदक बनून एखाद्या कळपात घुसून जाताना पाहिलं की वाईट वाटत.

सबसिडी नसेल तर संघटनाही होणार नाहीत, मिपावर कुठे आहेत?

हल्ली असे कवी,लेखकांचे कंपू बरेच आढळतातआर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले हे लोक छोटेखानी कार्यक्रम ,कविसंमेलन वगैरे आयोजित करतात.एखादा नामवंत पाहुणा स्तुती करायला बोलवतात.लोकही सामाजिक दर्जाचं द्योतक म्हणून अशा कार्यक्रमाला हजेरी लावतात.एकमेकांची स्तुती करून,सर्वांच मिळून एखाद पुस्तकं प्रकाशित करून घरी येतात.फेसबुकवर फोटो अपलोड होतात,तेच लोक त्यावर कमेंट टाकतात.एकमेकांच्या आधाराने लेखक,कवयित्री,कलाकार म्हणून मिरवतात.त्या गृपच्या बाहेरच्या सदस्याला सादरीकरण करू देत नाहीत.वेगळा विचार त्यांना रुचत नाही.प्रेमाचं,निसर्गाच दळण तर इतक दळल गेलंयकी आता काही वाचवत नाही की काही लिहवत नाही.

माहितगार's picture

5 May 2018 - 4:09 pm | माहितगार

.

....त्या गृपच्या बाहेरच्या सदस्याला सादरीकरण करू देत नाहीत.

लिहिण्यासाठी मिपा आहे आणि सादरीकरण मिपा कट्ट्यावर करा , हाकानाका