तलवारी आणि अन्य पाते असलेली शस्त्रे

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
4 May 2018 - 6:41 pm
गाभा: 

तलवारी आणि अन्य पाते असलेली शस्त्रे भारतात पूर्वापार कुठे बनवली जात असत यावर लेख किंवा पुस्तके असतील तर संदर्भ हवेत...
एक संदर्भ मला मिळाला...
https://thecustodiansin.wordpress.com/2016/03/12/a-brief-history-of-wootz/

1

अशी शस्त्रे बनवायला लागणाऱ्या धातूंच्या खाणी सध्या कुठे आहेत...

प्रतिक्रिया

शेखरमोघे's picture

4 May 2018 - 9:34 pm | शेखरमोघे

मी कुठे तरी भारतातील सन्थाल लोक (सध्याचे झारखन्ड वगैरे भागातील आदिवासी) जुन्या काळात/काही शतकान्पूर्वी लोखन्ड कसे बनवत त्याबद्दलचा हल्ली घेतलेला शोध यावर एक documentary पाहिली होती. त्या काळातील process ची माहिती असणारे लोक अमाप धडपडीनन्तर शोधल्यानन्तर त्याकरता लागणारे योग्य दर्जाचे खनिज (Fe2O3 content असलेले) हे शोधण्यापासूनच या लोकानाही फारशी माहिती सध्या नाही हे documentary पहाताना लक्षात येत होते.

Vikings देखील अशाच पद्धतीने लाकडापासूनचा कोळसा वापरून steel बनवत असे वाचले/documentary मध्ये पाहिले होते.

थोडा शोध घेतल्यावर काही सन्केत स्थळे मिळाली
http://eprints.nmlindia.org/1220/1/imai(237).pdf
https://en.wikipedia.org/wiki/Asur_people
इतर काही उपयोगी माहितीकरता
https://www.youtube.com/watch?v=ereJcjDAKLM
https://www.youtube.com/watch?v=GicwSlSmaeE

जेव्हा ११/१२व्या शतकात अरब योद्धे ( Saladin वगैरे) वापरत असलेल्या तलवारीना Damascus blades असल्याचे वाचले होते, त्यावरून मिळालेली आणखी माहिती
http://globalblog.posco.com/hero-islam-saladins-damascus-blade/

विजयनगरच्या साम्राज्यातही बरीच लोखन्डी शस्त्रात्रे बनवली जात आणि त्यान्ची निर्यातही होत असे
http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/104955/11/11_chapter%2...

शशिकांत ओक's picture

4 May 2018 - 10:32 pm | शशिकांत ओक

विजयानगर राज्यातील शस्त्र निर्मितीचा उल्लेख...

In fact iron ore was mined to a considerable extent around the capital and it is said there was a factory at
Kuditini near the capital city.2 3Generally the king appointed his trusted officers and servants to transport these materials to the feudatories.

ते राज्य विलयाला गेल्यावर शस्त्र निर्मिती चालूच असावी. कारण कोणत्याही सैन्याला त्या शिवाय पर्याय नाहीच. उलट नव्या पद्धतीने,युक्तीने शस्त्र सज्जता ही काळाची गरज आहे. ज्यांना आधुनिक शस्त्र बनवता येत ते नंतर राज्य करतात...
विविध संदर्भांबद्दल आभार...इतर विचारकांच्या प्रतिसादाची अपेक्षा...

जेम्स वांड's picture

4 May 2018 - 11:04 pm | जेम्स वांड

समजून घ्यायचे असले तर पुण्यात कॅम्प, कॅन्टोन्मेंट बोर्ड बिल्डिंग जवळ कुठंतरी एका खास समाजाची वस्ती असते, त्या समाजाला 'शिकलगार' समाज म्हणतात, बहुतेक सगळे शीख लोक ह्या समाजात असतात, हल्ली जरी त्यांनी शस्त्रनिर्मिती वगैरे पारंपरिक उद्योग बंद केला असला तरी त्यांना काहीतरी पारंपरिक ज्ञान ह्या विषयात नक्कीच असावे, फायदा होईल कदाचित तुम्हाला.

शशिकांत ओक's picture

4 May 2018 - 11:50 pm | शशिकांत ओक

सुऱ्या कात्र्यांना धार लावायची कामगिरी करून पोटभरू शिकल (सिक्कल - तलवार) गार त्यांचे पूर्वज तलवारींची निर्मिती कशी काय केली जात होती यावर प्रकाश टाकू शकतील असे वाटले तरी ते कितपत खात्रीचे मानावे हा प्रश्न असेल.

जेम्स वांड's picture

5 May 2018 - 8:28 am | जेम्स वांड

डोमीनंट असणाऱ्या देशात असे प्रश्न वरचेवर पडणे साहजिक आहे, पण एकंदरीत पूर्ण माहिती म्हणजे हवेत गोळीबार नसेल असे काहीसे वाटते. छोट्या छोट्या परंपरा उदाहरणार्थ लग्नातील काही वेगळ्या रीतिरिवाज वगैरे प्रकारातून कदाचित त्या (शस्त्रनिर्मिती) पेशाबद्दल थोडी माहिती, काही ट्रेसेस मिळू शकतील.

शशिकांत ओक's picture

5 May 2018 - 8:25 pm | शशिकांत ओक

तशी शस्त्र निर्मिती आजही कायम चालू आहे... बिहार शरीफ, उन्नाव, कासगंज वगैरे ठिकाणी कट्टे मिळतात. अमृतसरला सुवर्ण मंदिरालगदच्या परिसरात रंगीबेरंगी तलवारींची, बर्च्यांची दुकाने सजली आहेत. पण त्यांनाही सैन्याला पुरवठा करणाऱ्यांची ठिकाणे 'मालूम नहीं साहब' या उत्तराने संपतात!

आनन्दा's picture

5 May 2018 - 8:32 am | आनन्दा

अवांतर : https://www.misalpav.com/node/42550 इथे विचारा, त्यांची वट आहे.

शशिकांत ओक's picture

5 May 2018 - 8:29 pm | शशिकांत ओक

तो धागा वाचून नवा धागा टाकायची सुरसुरी आली. या बद्दल धन्यवाद. तिथे जेम्स ना तर इथे आपल्याला!

अशी शस्त्रे बनवायला लागणाऱ्या धातूंच्या खाणी सध्या कुठे आहेत...

अश्या खाणी आज यांत्रिकीकरणाच्या जमान्यात असतील?

अशा खाणी सध्याच्या कार्यपद्धतीने चालवता आल्या (आणि खनिजान्चा साठा अजूनही पुरेसा/हव्या त्या दर्जाचा असला) तर अजूनही चालतील पण जुन्या कार्यपद्धतीने चालवता येणे अशक्य कारण तसे करताना जो खर्च होईल तो न परवडणारा ठरेल (अशा व्यवसायाचा खर्च इतका अवाढव्य असेल की तो इतर कुणाबरोबरही स्पर्धेत टिकणार नाही).

अफगाणिस्तानात अशा तर्‍हेच्या परिस्थितीचे उत्तम उदाहरण आहे. अफगाणिस्तानात मेस अयनाक या ठिकाणी बुद्धकालापासून मोठ्या प्रमाणात स्थानिक खनिजापासून ताम्बे बनवले जात असे आणि जवळच त्या काळातला एक महत्वाचा बुद्धकालीन विहार्/भिक्षु निवास भरभराटीला आला होता. त्या खनिजान्च्या साठ्यापासून "सध्याच्या कार्यपद्धतीने" ताम्बे बनवण्याकरता चीनचे चाललेले प्रयत्न अनेक कारणान्मुळे (ज्यान्चा खनिजान्चा साठा अजूनही पुरेसा/हव्या त्या दर्जाचा असण्याशी काहीही सम्बन्ध नाही) लाम्बणीवर पडत आहेत. जास्त माहितीकरता:
https://thediplomat.com/2017/01/the-story-behind-chinas-long-stalled-min...

https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_mines_in_India
काही नव्याने सुरू झालेल्या असाव्यात. शेवटी यामधून लोखंड गाळून ते जिथे जिथे शस्त्रे बनवली जात होती तिथपर्यंत पोहोचवून विकणे हा व्यवसायही गरजेचा असल्याने तो कोण कसे करत? महाराजांच्या संदर्भात इतके शोधकार्य झाले आहे त्यातून तपशील मिळवला गेला आहे का?

चीन मध्ये गूगल what's app, Facebook प्रकार बंद आहेत असे ऐकले होते... Turbo VPN app वापरून हॉटेल चे WiFi varun आरामात मिपा लिहितोय...
सध्या शीयांग मध्ये terracotta warriors museum पाहायला आलोय. त्या मूड मध्ये ही link सापडली.
चीन मध्ये तलवारी वर लेख मिळवून सादर करण्यात येत आहे.
http://www.shadowofleaves.com/sword-history/chinese-sword-history/

What makes the study of the Chinese sword tradition a real challenge is that those who are studying it in our time must be explorers and pioneers, not passive consumers. There is much to be done in uncovering and translating the old texts that have survived. Even more exciting is the fresh look that we can get at the achievements of the past, by studying blades that have been carefully polished and restored.

भारताला देखील ते सर्व लागू पडते असे वाटते.

अरविंद कोल्हटकर's picture

9 May 2018 - 10:43 pm | अरविंद कोल्हटकर

तलवारी आणि अन्य पाते असलेली शस्त्रे भारतात पूर्वापार कुठे बनवली जात असत यावर लेख किंवा पुस्तके असतील तर संदर्भ हवेत असे तुम्ही विचारले आहे,

अगदी असे नाही पण प्राचीन भारतीय शस्त्रांबद्दल 'Nitiprakashika' नावाचे एक संस्कृत पुस्तक संस्कृत अभ्यासक गुस्ताव ओपर्ट (Gustav Oppert) ह्यांनी १८८२ साली मद्रासहून प्रकाशित केले होते. ते archive.org येथे उपलब्ध आहे. पुस्तक छोटेखानी आहे आणि त्याच्या दुसर्‍या अध्यायात अनेक भारतीय शस्त्रांची नावे आहेत. तिसरा अध्याय विशेषेकरून ’असि’ म्हणजे खड्ग (तलवार) ह्या शस्त्राविषयी आहे. (सावधगिरीचा इशारा - आपली आशा फार पल्लवित होऊ देऊ नका. पुस्तकामध्ये फापटपसाराच फार आहे. शस्त्र तयार कसे होते, धातु कोठला वापरला जातो, कोठे तयार होते असली भरीव माहिती तेथे जवळजवळ नाही.)

'The Book of the Sword' ह्या नावाचे रिचर्ड बर्टनलिखित पुस्तकहि archive.org येथे उपलब्ध आहे. त्यात ’तलवार’ ह्या शस्त्राचा प्राचीन काळापासूनचा जागतिक इतिहास दिला आहे. प्राचीन भारतालाहि त्यात थोडी जागा मिळाली आहे पण उपलब्ध माहिती बहुतांशी dismissive स्वरूपाची आहे.

थोडे अवान्तर. स्पेनमधील टोलीडो (Toledo) हे ऐतिहासिक शहर अनेक शतके मुस्लिम मूरिश सत्तेखाली होते आणि ह्या मूरिश लोकांनी अरब देशांमधून धातुकाम, कांचकाम अशी कौशल्ये तेथे आणली होती. टोलीडो शहर तलवारी बनविण्यासाठी प्रसिद्ध होते. शिवाजीमहाराजांची ’भवानी तलवार’ ही एक Toledo Blade असावी असा एक तर्क वाचला आहे. सध्या खर्‍याखुर्‍या तलवारींना मागणी कमी आहे पण टोलीडोमध्ये टूरिस्टांसाठी देखाव्याच्या तलवारी विकण्याचा मोठा व्यवसाय आहे. मी टोलीडोला फेब्रुअरी २०१५ मध्ये भेट दिली होती. तेथील तलवारींच्या दुकानाचे मी घेतलेले चित्र पुढे दाखवीत आहे.

टोलीडोमधील तलवारींचे दुकान

तुम्ही चीनमध्ये शिआन शहराजवळील Terracotta Warriors Museum पाहायला गेल्याचा उल्लेख आहे. मीहि तेथे दोन वर्षांपूर्वी गेलो होतो. तेथे निवडक वस्तूचे जे म्यूझिअम आहे तेथे चार घोड्यांच्या रथाची प्रतिकृति आहे. ती पाहिली का? महाभारतात आणि संस्कृत ग्रन्थांमध्ये अनेकदा वर्णिलेले रथ असेच असणार.

तसेच शिआनमधील Grey Goose Pagoda ला भेट दिली का? Xuanzang (ह्युएन्त्सांग) येथून भारताकडे निघाला आणि भारतातून परतल्यावर ह्याच शहरात राहिला आणि बरोबर नेलेल्या सुमारे ६०० संस्कृत ग्रन्थांचे चिनी भाषेत भाषान्तर करण्यात त्याने आपले उरलेले आयुष्य वेचले.

कोल्हटकरसाहेब, आपले प्रतिसाद फार माहितीपूर्ण असतात. काहीतरी वाचनीय गवसल्याचे समाधान वाटते. आभार!

शशिकांत ओक's picture

13 May 2018 - 11:19 pm | शशिकांत ओक

निवडक वस्तूचे जे म्यूझिअम आहे तेथे चार घोड्यांच्या रथाची प्रतिकृति आहे. ती पाहिली का?

यावरून जाणवले की पूर्वीपासून मला वाटे की सारथी व योद्धा यातील समन्वय साधायचा असेल तर योध्याला सारथ्याशेजारी बसले पाहिजे ना की त्याच्या मागे...
1

गामा पैलवान's picture

10 May 2018 - 2:46 pm | गामा पैलवान

ओकसाहेब,

भारतातल्या पारंपरिक लोहनिर्मितीविषयी हा लेख तुमच्या थोडाफार उपयोगी पडावा : अगरीयांच्या शोधात

आ.न.,
-गा.पै.

शेखरमोघे's picture

14 May 2018 - 8:26 am | शेखरमोघे

Vikings च्या काळातल्या लोखन्ड बनवण्याबद्दल माहिती :
http://www.hurstwic.org/history/articles/manufacturing/text/bog_iron. आणि
https://www.youtube.com/watch?v=j33LogIy-mo

तलवारींची निर्मिती वरून... विषय ताजमहलाकडे वळवतो...
शेखर मोघे अमेरिकेत असतात हे त्यांनी केलेल्या व्य. सं. मधून समजले. त्यांना जे सुचवले ते याठिकाणच्या अन्य विदेशी सदस्यांसाठी सुचवतो... " जर तुम्हाला आवड आणि सवड असेल तर... एक विचारणा अशी की ताजमहाल मधील फवारे पाण्याने उडवायला विजेची सोय नसताना काय तंत्र वापरत होते? नदीचे पात्रातील पाणी २०० शे फूट इतके वर आणून ते परत अशा दाबाने सोडायला हवे की पहिला ते शेवटचा फवारा यातून पाणी समान उंचीवर उडेल? एबा कोच म्हणून इतिहास तज्ज्ञ ऑस्ट्रियन बाई आहेत त्यांच्या ताजमहाल वरील पुस्तकात काही माहिती असेल असे वाटते. ते पुस्तक भारतात पटकन मिळेल असे नाही. व मागवले तर काही पानांच्या मजकुरासाठी भरमसाठ शुल्क परवडतही नाही. तिथे कुठे मोठ्या लायब्ररीतून काही झेरॉक्स काढून या विषयावर प्रकाश टाकणारी लेखने मिळू शकतील का? शेखर मोघे यांच्या शिवाय आपल्याला पैकी कोणाला जमले फावल्या वेळात तर चांगलेच आहे.