हॅलेचा धुमकेतु आणि त्याचे शेपुट

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in काथ्याकूट
2 May 2018 - 7:24 pm
गाभा: 

युरोपमध्ये १५ व्या शतकात एकदा, १६ व्या शतकात एकदा आणि सतराव्या शतकात दोनदा धुमकेतु दिसल्याच्या नोंदी एडमंड हॅले या शास्त्रज्ञाला सापडल्या. हॅले ने एकुण २४ अशा धुमकेतुंच्या सांस्कृतिक नोंदी तपासल्या व त्या २४ पैकी वरील ४ नोंदींमध्ये त्याला साम्य जाणवले. इस वी १७०५ मध्ये त्याने, केवळ वरील निरिक्षणांच्या ऐकीव नोंदीचा आधार घेऊन, व न्युटोनियम भौतिकशास्त्राच्या सिध्दांताच्या मदतीने, एक नवीनच मत मांडले. त्याच्या ,मते, वरील चार धुमकेतु हे वेगवेगळे नसुन तो एकच धुमकेतु आहे व तो दर ७६ वर्षांनी पृथ्वीच्या जवळुन जातो. हॅले च्या सिध्दांतानुसार त्या धुमकेतुची पुढची पृथ्वी फेरी इसवी १७५८ होणार. अगदी ठामपणे त्याने हे भाकित केले होते. त्याने केलेले भाकित खरे की खोटे हे पाहण्यासाठी मात्र तो राहिला नाही. १७४१ मध्ये तो अनंतात विलीन झाला. १७५८ साल उजाडले. आणि हॅले ने केलेली भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली.
जगभरातील खगोल अभ्यासकांनी एकमुखाने, ह्या धुमकेतुचे नाव हॅलेचा धुमकेतु ठेऊन, एडमंड हॅलेला अजरामर केले.
या धुमकेतुची पुढची पृथ्वी फेरी २०६२ साली होणार आहे. आपण तो पर्यंत जगलो तर पाहुच आपण तो धुमकेतु.
धुमकेतुला एक शेपुट असते. त्यात असंख्य छोटे छोटे बाष्प-वायु-धुळ आणि खडक जनित वाळुच्या आकाराचे घटक असतात. ही शेपटी करोडो किमी लांबीची असते. हॅलेचा धुमकेतु जरी पुढे निघुन गेला असला तरी, त्याच्या शेपटाचा भाग दरवर्षी पृथ्वीच्या कक्षेशी मिळतो. शेपटीतील ज्या घटकांतील बाष्प निघुन जातात, ते मोकळे होऊन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या योगाने पृथ्वीच्या वातावरणात खेचले जातात. त्यांचा आकार अगदी छोटा असतो. सगळ्यात मोठा आकार शेगदाण्या एवढा असु शकतो. पृथ्वीच्या वातावरणात येताणा, वातावरणाशी घर्षणाने हे घटक जळु लागतात व पडताना व जळताना असे दोन्ही एकाच वेळी आपणास दिसले तर आपण त्यास उल्का म्हणतो.
असाच उल्का वर्षाव , ५ मे २०१८ (५ तारखेची रात्र आणि ६ तारखेची पहाट), ला होणार आहे. चंद्रप्रकाशाचा उल्का दिसण्यावर विपरीत परीणाम होईल. तासाला किमान ३०० उल्का पाहण्याची संधी हा उल्का वर्षाव देतो, पण या चंद्रप्रकाशामुळे तितकेसे दिसणार नाहीत.

पुर्व दिशेकडुन, उगवत्या कुंभ (aquarius) राशी मधुन या उल्का वर्षावाचा उद्भव होणार आहे.

हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

2 May 2018 - 8:15 pm | मार्मिक गोडसे

उल्कावर्षावाची न विसरता update दिल्याबद्दल धन्यवाद! किती वाजेपर्यंत दिसेल उल्कावर्षाव? कारण थोडं उशीरा बघितल्यास चंद्र पूर्वेकडून माथ्यापर्यंत आल्यास किंचित त्याच्या प्रकाशाची तीव्रता कमी झालेली असेल.

टवाळ कार्टा's picture

2 May 2018 - 8:57 pm | टवाळ कार्टा

अरेरे....हुकणार यावेळी

manguu@mail.com's picture

2 May 2018 - 10:01 pm | manguu@mail.com

१. पॅरीस की कुठल्याशा शहरात फिरून हॅलेने लोकसंख्या , मृत्यु संख्या , त्यावेळी असलेले वय , मृत्युची कारणे याबाबतचे टेबल तयार केले. ते हॅले लाइफ टेबल ह्या नावाने आजही इन्शुरन्स क्षेत्रात वापरतात.

२. एक मोठा फुगा घेऊन त्यात हॅले काही काळ पाण्याखाली जिवंत राहिला. हा फुगा म्हणजे पाणबुडीचा पणजोबा.

३. हॅलेच्या कॉमेटची कक्षा इ इ शोध लावला. त्याच्या पुढच्या भेटीचे भाकीतही त्याने लिहून ठेवले , पण कॉमेटच्या दुसर्या भेटीवेळी हॅले जिवंत नव्हता. ते भाकीत मात्र तंतोतंत जुळले.

एक शोध जमिनीवरचा , एक शोध पाण्यातला आणि एक शोध आकाशातला ! अल्ला मेहेरबान !!

हेमंत ववले's picture

3 May 2018 - 11:32 am | हेमंत ववले

समुद्रात जाऊन वाट चुकणे, दक्षिण आकाशाचा नकाशा बनवणे आदी देखील त्याचे योगदान अजोड आहे

दुर्गविहारी's picture

3 May 2018 - 10:48 am | दुर्गविहारी

मागे बहुतेक १९८७ मधे हा हॅलेचा धुमकेतु आला होता, तेव्हा त्याचे दर्शन घेतले होते. पुन्हा होइल कि नाही हे माहिती नाही. ;-)
या विषायावर श्री. वा.मो.कोळेकर यांनी "धुमकेतु" हे उत्तम पुस्तक लिहीले होते. हे माझ्या कडे होते. या पुस्तकाने धुमकेतुविषयी माझी उत्सुकता प्रचंड चाळवली गेली. पुढे १९९८ च्या आसपास हेल-बॉप हा धुमकेतु अतिशय स्वच्छ दिसत होता. बाकी धुमकेतुची माहिती देणारा सविस्तर धागा काढताय का बघा.
यावेळच्या उल्का वर्षावाची आधी माहिती दिल्याबध्दल धन्यवाद. नक्कीच पहाण्याचा प्रयत्न करेन.

हेमंत ववले's picture

3 May 2018 - 11:47 am | हेमंत ववले

आम्ही बच्चे होतो हॅलेच्या वेळी. किंवा आम्हाला कुणी असे काही घडणार आहे हे सांगितल्याचे देखील नाही आठवत. ९८ चे तुमच्याकडुन आता समजत आहे. आपल्या कडे अडचण हिच आहे, की ह्या गोष्टी अनेकांना माहितच नसतात. आपण आपापल्या मित्रपरीवारास या बाबत जागरुक करणे गरजेचे आहे.

हॅलेचा धूमकेतू बघण्यात आला आहे १९८६ साली .
खूप लहान होतो त्यावेळेस,पण रोज पेपर वाचण्याची आवड होती आणि त्यावेळेसच्या जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी आणि मासिकांनी हॅले च्या धूमकेतू येण्याआधीच भरपूर लेख लिहून वातावरण निर्मिती करून ठेवली होती . दहा कोटी किलोमीटर लांब शेपटी ,ताशी दोन लाख किलोमीटर चा वेग ,बर्फ़ाने आणि इतर पदार्थ व वायूंने बनलेला वगैरे माहिती वाचून अचंबा वाटलेला ,आणि दर ७६ वर्षांनी येतो हेही वाचण्यात आल्याने आता नाही तर कधीच बघायला मिळणार नाहीअशी भावना होती . त्या मुळे त्याला बघण्याची उत्सुकता ही होतीच मग जेव्हा तो आला तेव्हा त्याला बघण्यासाठी रोज संध्याकाळी सगळे बालमित्र एकत्र जमून मोकळ्या मैदानात जात असू.
माझ्या आठवणीप्रमाणे सतत दोन आठवडे या चंदेरी धूमकेतूने दर्शन देऊन आकाशाची शान वाढविली होती.

दीपक११७७'s picture

4 May 2018 - 6:14 pm | दीपक११७७

ह्या धुमकेतु वर एखादा उपग्रह लाँच करायला हवा जेणे करुन या विषयी आणखी माहिती जगाला मिळु शकेलं.