सदुपयोग

गणेश.१०'s picture
गणेश.१० in काथ्याकूट
2 May 2018 - 10:46 am
गाभा: 

फारश्या वापरात नसलेल्या वडिलोपार्जित घराचा सदुपयोग कसा करता येईल यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
ठिकाण: अहमदनगर शहर
क्षेत्रफळ: साधारण 600 चौरस फूट, जुनं बांधकाम परंतु राहण्यायोग्य
हेतू: not-for-profit and not-for-donation (कालसापेक्ष स्वार्थ)
बरीच वर्षे कायमच राहत नसल्याने तिथे कार्यरत सामाजिक संस्थांबद्दल काहीही माहिती नाही. तसेच काही कायदेशीर सोपस्कारही पार पाडावे लागतील का?
अनुभवी मंडळींनी कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद.

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 May 2018 - 6:44 pm | पैसा

पण हल्ली कोणालाही आपले घर किंवा जमीन वापरायला देताना नीट विचार करावा. कितीही चांगली संस्था असेल तरी भाडेकरूंना काढून लावणे फार कठीण असते. त्याचे home stay टाईप काही करता येत असेल तर बघा.

अत्यंत सहमत. १०१% बरोबर.

गणेश.१०'s picture

3 May 2018 - 3:08 pm | गणेश.१०

homestay ही कल्पना नगरसारख्या छोट्या, पर्यटन मूल्य नसणाऱ्या शहरात तरी शक्य नाही.
संस्थांविषयी काही विशिष्ट माहिती स्वानुभवातून/ऐकिवात असल्यास खूप मदत होईल.

मार्मिक गोडसे's picture

2 May 2018 - 9:38 pm | मार्मिक गोडसे

कॉलेज विद्यार्थ्यांना भाड्याने देता येईल.

गणेश.१०'s picture

3 May 2018 - 3:20 pm | गणेश.१०

भाड्याने न देण्याची कारणे खाली प्रतिक्रियांमध्ये विशद केली आहेत.
पण पर्याय चांगला... शिक्षण घेणाऱ्यांना नक्कीच कमी खर्चात/मोफत निवार्याची गरज अधिक असते

एकूण तुम्ही जवळपास राहात नाही बहुतेक. अथवा एकेक दिवसांच्या बैठकींसाठी भाड्याने देता येईल.
अन्यथा पैसा यांचा सल्ला बरोबर.

गणेश.१०'s picture

3 May 2018 - 3:52 pm | गणेश.१०

बरोबर. वर्षातून १-२ वेळा जाणं-येणं होतं. नगरसारख्या छोट्या शहरात आपण सुचवलेला पर्याय उपयोगी नाही. खाली प्रतिक्रियांमध्ये अधिक माहिती दिली आहे.

घर विकून येणाऱ्या पैशातून काही उपयोगी सामाजिक काम करता येईल. (२ महिन्याआधी नगरमध्येच असलेले घर मी विकले). तुमचा हेतू चांगला असला तरी त्यातून डोक्याला फार ताप होतो आणि ते निस्तरण्यापेक्षा विकलेले चांगले.

गणेश.१०'s picture

3 May 2018 - 3:32 pm | गणेश.१०

घर न विकण्याची कारणे खाली प्रतिक्रियांमध्ये विशद केली आहेत.
नगरकर असल्याने आपल्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल.
काही विशिष्ट माहिती असल्यास सवडीनुसार इथे टाकावी.

मराठी कथालेखक's picture

3 May 2018 - 12:45 pm | मराठी कथालेखक

घर भाड्याने देणे वा विकणे कधीही उत्तम.
वापरात नसलेले किंवा नजीकच्या भविष्यात वापरण्याची शक्यता नाही अशी स्थावर मालमत्ता विकणे हेच मोठे सामाजिक कार्य आहे !!

गणेश.१०'s picture

3 May 2018 - 3:47 pm | गणेश.१०

आपल्या मताशी सहमत. परंतु न विकण्याची काही कारणे खाली प्रतिक्रियांमध्ये स्पष्ट केली आहेत.

प्रतिक्रियांसाठी सर्वांचे धन्यवाद.
बराच विचार करून घर न विकण्याची किंवा भाड्याने न देण्याची खालील कारणे आहेत:
१) हे घर वडिलोपार्जित आहे, साधारण ५० वर्षांपूर्वी बांधलेलं पण अजूनही ३० वर्षे व्यवस्थित राहील असं.
२) घरातच छोटंसं मंदिर असून वर्षातून फक्त १-२ वेळा आणि तोही 'घरगुती' उत्सव साजरा केला जातो. आणि फक्त तेव्हाच घरी जाणं-येणं होतं.
३) मंदिर घरापेक्षाही जुनं (साधारण ४ ते ५ पिढ्यांपासून) आहे. त्यामुळे भावनिक गुंतवणूक सर्व कुटुंबाची आहे.
४) घर रिकामं ठेवलं तर त्याचं आयुष्य कमी होण्याची शक्यता. आणि मोबदला घेऊन दिलं तर आपुलकीने सांभाळ होण्याची शक्यता कमी.

कोणीतरी विश्वासू (आणि मुख्य म्हणजे गरजू) माणसं भेटतील अशी आशा आहे. म्हणून हा 'मिपा'प्रपंच.

पैसा's picture

3 May 2018 - 4:12 pm | पैसा

३/४ विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांना कमी पैशात राहायला देणे हा चांगला पर्याय आहे. ते सुटीला घरी जातील. एखाद्या संस्थेला वगैरे दिलं तर उत्सवाच्या वेळी तुम्हाला राहायला कसे मिळणार?

गणेश.१०'s picture

5 May 2018 - 8:57 pm | गणेश.१०

राहण्याचा तसा प्रश्न नाही. आणि उत्सव अगदीच घरगुती.

मराठी कथालेखक's picture

3 May 2018 - 4:13 pm | मराठी कथालेखक

प्रश्न भावनिक आहे म्हंटल्यावर मिपाचर्चेचा विशेष काही फायदा होईल असे वाटत नाही.

गणेश.१०'s picture

5 May 2018 - 9:07 pm | गणेश.१०

मिपावरील चर्चेमुळे बरेच पर्याय (निदान माझ्या) समोर आले. आणि सर्वांच्या प्रतिसादामुळे थोडा हुरूप आला.

व्यविस्थीत मेंटेन करण्याच्या अटीवर विद्यार्थ्यांना देणे केंव्हाही योग्य. ही ऑफर कॉलेजच्या प्राध्यापकांना सांगीतली तर ते गरजू आणि योग्य विद्यार्थी सुचवतील.

गणेश.१०'s picture

5 May 2018 - 9:10 pm | गणेश.१०

आपली सूचना छान. माझ्या स्वतःच्या (निवृत्त झालेल्या) शिक्षकांनाही विचारतो.

माहितगार's picture

4 May 2018 - 8:05 am | माहितगार

ओके तुमचा दृष्टीकोण लक्षात आला.

मला खालील पर्याय सुचले

१) चित्रकला / संगित अथवा छंद कलावर्ग साठी भाड्याने देणे

२) एखाद्या स्थानिक महिला अल्प बचत गट वगैरेला घरगुती खाद्य पदार्थ किंवा मोक्याच्या जागी असल्यास विक्रि केंद्र म्हणून उपलब्ध करुन देणे .

३) एखादे वाचनालय

४ ) विद्यार्थी अभ्यासिका

या पर्यायांमध्ये तुमच्या मंदिराचा उत्सवाच्या काळात छंदवर्ग किंवा महिला व्यवसाय तात्पुरता बंद ठेवणे शक्य व्हावे . ( मी नगरचा नाही )

गणेश.१०'s picture

5 May 2018 - 9:04 pm | गणेश.१०

राहण्याचा तसा प्रश्न नाही कारण उत्सव अगदीच घरगुती.
एकंदरीतच मिपावरील चर्चेमुळे बरेच पर्याय समोर आले. धाग्यावर प्रगती कळवत राहील पुढे. सर्वांचे आभार.

कपिलमुनी's picture

5 May 2018 - 10:13 pm | कपिलमुनी

अभ्यास वर्ग किंवा एखाद्या समाजसेवा संस्थेला द्या