वाटाडे भाग 5 - प्रत्यक्ष पाहणी आणि निष्कर्ष

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
25 Apr 2018 - 1:36 am
गाभा: 

1

26

भाग 5-


सध्या जातात तो मार्ग विशाळगडावर जायला उपयुक्त आहे? या पेक्षा जवळचा अन्य मार्ग शोधला जावा. हे काम गूगल नकाशातून समजून घ्यायला सोपे जाते. पण प्रत्यक्षात पाहून ठरवणे महत्त्वाचे. या कामासाठी दुर्ग प्रेमींचा सहभाग, ड्रोन शूटिंग, ३ डी कॅमेरा, याच्या उपयोगातून शोध घेतला जावा. पुढील ३ ते ५ वर्षांत याचे परिणाम दिसले तरी खूप झाले... असो.

मिपावरील प्रतिसाद दि 19 एप्रिल रोजी लिहिला गेला, तेंव्हा माझ्या ध्यानी मनी देखील नव्हते की मला अशी कामगिरी करायची संधी पुढील काही दिवसात मिळणार आहे…

एसीच्या वातावरणात बसून कॉफीचा मग हातात धरून गुगलच्या नकाशात डोके खुपसून वाटांचा शोध काढता येईल मात्र त्याला प्रत्यक्ष अनुभवाची जोड नसेल तर त्या जर तरच्या गोष्टी म्हणून पाहिल्या जातील. असे वाटून तिथे प्रत्यक्ष पाहणी करायला कसे व केंव्हा जावे यावर मनात जुळणी करत होतो. सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात समोर अन्य कामांची तातडी असताना पन्हाळ्यातील ठिकाणांचा शोध, इंजोळे ते सोनुर्ले मार्गावर सध्या काय परिस्थिती आहे हे सुस्पष्ट करावे म्हणून जायला शक्य नाही असे वाटत होते. पण ते सहजी शक्य झाले!

त्याचे झाले असे की

एका स्नेहींचा फोन आला. ‘आम्ही इंदोरहून पुण्यात येऊन कोल्हापूर जवळच्या पन्हाळ्याला दि २२ एप्रिलला समारंभात सहभागी व्हायला जात आहोत. आपल्याला निमंत्रण देत आहे.’

‘शक्य दिसत नाही पण घरच्यांना विचारून सांगतो’. पत्नीला कळल्यावर कालीचरण महाराजांच्या कार्यक्रमाला कारने सहकुटुंब जायचे ठरले! माझ्या मनातील इच्छा पुर्ण होणार असे वाटले. आणखी काही घटना घडून त्यांचा कार्यक्रम रद्द झाला. म्हणून दि २१ ला मी एकटाच कालीचरण महाराजांच्या कारने महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पन्हाळ्याला निघालो. एका नातेवाईकांनी कोल्हापूरात भेटायला खूप पूर्वीपासून बोलावले होते. मी त्यांना भेटायला कोल्हापुरात थांबलो. दुसर्‍या दिवशी २२ एप्रिलला एका टॅक्सीमधून आधी कनेरी मठाधिपती अदृश्य स्वामींना भेटलो. तेथील भव्य परिसरात १५ वर्षाखालील मुलांनी दुटांगी धोतराचा काचा मारून उंचनिंच घोड्यावर बसून भरधाव रपेट करून आपल्या साहसाची व पटाईत घोडेस्वारीची प्रात्यक्षिके सादर केली. अशा प्रकारे अन्य ६४ विद्यांचे प्रशिक्षण चालू असल्याचे समजून घेतले. मुलांच्या बरोबरीने मुलींना विविध प्रशिक्षण घेताना पाहून आनंद झाला. असो.

पन्हाळ्याच्या वाटेवर

19
इंजोळे गावाचा फाटा पकडून जाताना एका दुकानदाराने मलाही सामील करा म्हणून आपला व एका फोटो ग्राफरचा मो क्र दिला…
डांबरी रस्ता नागमोडी वळणे घेत संजीवनी शिक्षण संस्था पारकरून पुढे निघाला…
आता पन्हाळ्याचा टीवी टॉवर वगैरे दिसू लागले.

एके ठिकाणी चालकाला खाली उतरवून मोटर सायकल वरील जमलेल्या तरुणांच्या घोळक्याला मला भेटायला बोलवले.
20

ते गाव होते इंजोळे. मी खाली उतरून बोलायला सुरुवात केली तोवर आणखी बरेच लोक जमले. साखरपुड्याच्या निमित्ताने पाहुण्यांना भेटायला आलेल्यांशी मी सुरू केलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. या भागातून महाराज गजापूरला गेले होते? हे माझे म्हणणे त्यांना पटकन मान्य झाले. कारण आजकाल त्या मार्गाने जायची सोय आहे. शिवाय मसाईपठारावरून जायची गरज नाही. घुंगूरहून मांजरेला गेले की कासारी नदीच्या बाजूला गजापूर पूर्वी येत असे आपल्या अनुभवातून ते सांगू लागले…
त्यांनी आपणहून काही मदत हवी तर करायला तयार आहोत म्हणून लगेच कागदावर आपले मो क्र देऊन टाकले. तुम्ही मराठीत मी लिहिलेले लेख जरूर व्हॉट्स अॅप वर पाठवा ते जरूर वाचू…. म्हणून उत्साह वाढवला.
23
घुंगूर गाव आले पाणी पिऊन काही तरूण तरूणींना एकत्र बोलावले. शिवगड प्रेमी उत्साही सदस्यांनी सुचवले की या पुढे रस्त्याची अवस्था कार जाऊ शकणार नाही अशी आहे. पण तुम्ही म्हणता तसे सोनुर्ले कडून बुरांबळवरून पांढरे पाणी पर्यंत आम्ही पायी चालत जाऊ. वाटेत फोटो काढून किती वेळ लागतो, कोणत्या वस्त्या, खेडी लागतात याची माहिती व्हॉट्स अॅप वरून वरचे वर देऊ पण हे काम लगेच होणार नाही. सवडीने करू म्हणून मान्य केले.

25
परतताना कार चालकाच्या सुसाट चालीने जाताना त्याच्या माहितीच्या आधारे संजीवनी संस्थेच्या परिसराला लागूनच्या डांबरी रस्ता पकडून सरळ वर जात तीन दरवाजाच्या प्रांगणात प्रवेश करून थांबलो. पुढे कार साठी रस्ता बंद होता म्हणून परत खाली उतरून वळसा घालून गडावर बाजींच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन कालीचरण महाराजांच्या समावेत भोजन करताना तेथे जमलेल्या तरुणांनी आम्ही या मार्गाचा धांडोळा घेतो. गडावरील काही जागा मी गाईडना दाखवल्या. सध्या मान्यता आहे त्या वाटांशिवाय महाराज कोण कोणत्या मार्गाने खाली उतरून जाऊ शकतात याचा प्रत्यक्ष जाऊन अनुभव मोबाईलवर फोटो सादर करून कळवतो असे ते म्हटले.
26
तबक उद्यानातून दिसणारे मसाई पठार खाली दिसणाऱ्या पेठांची वस्ती... गडाला गराडा टाकला गेला तेव्हा अनेक सरदारांच्या गस्ती तळांच्या जागा इतक्या अंतरावर असाव्यात.
26
पवन किंवा पावन गडाचा परिसर
परतल्यावर एक समूह निर्माण करून त्यांना सहभागी केले आहे. मान्य केल्या प्रमाणे ती उत्साही मंडळी काम करायला पुढे पर्यंत साथ देतील अशी अपेक्षा आहे.

मिपाकरांच्या कडून कोणी या व्हॉट्स अॅप समूहात येऊन आपल्या मदतीची भर घालू इच्छित असेल तर त्यांचे 9881901049 वर स्वागत…

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

25 Apr 2018 - 7:22 am | दुर्गविहारी

मला समुहावर सामील करा. :-)

शशिकांत ओक's picture

25 Apr 2018 - 8:44 am | शशिकांत ओक

आपल्याला निमंत्रण देत आहे.

शशिकांत ओक's picture

13 May 2018 - 11:48 pm | शशिकांत ओक

सागर पाटील यांच्या ग्रुपने पन्हाळा ते पावन खिंड जुलैत दर वर्षी प्रमाणे जाण्याचे करायचे आवाहन केले आहे. त्यांना मी नव्या रस्त्याच्या वाटेने जायला कोणी राजी आहेत का या विचारणेला, 'नाही सध्या कोणी राजी नाही' असे उत्तर आले. काही वर्षांनी इंजोळ्याच्या वाटेने जाणाऱे हळू हळू निघतील...
दुर्ग विहारींना विनंती की आपण त्यांच्याशी बोललात तर काही घडू शकेल काय?

8237079999 (सागर), 9730886354 (रूपेश )
KOLHAPUR HIKERS.COM

शशिकांत ओक's picture

27 Apr 2018 - 7:33 pm | शशिकांत ओक

या ग्रुपमध्ये सामील झाले तर आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Apr 2018 - 9:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रकल्पात मिळालेल्या अनपेक्षित मदतीचा बराच उपयोग होईल यात संशय नाही. पुढचे अपडेट्स वाचण्याची उत्सुकता आहे.

श्रीगुरुजी's picture

28 Apr 2018 - 3:21 pm | श्रीगुरुजी

छान उपक्रम! शुभेच्छा! अत्यंत नाट्यमय जीवन जगलेल्या व दंतकथा वाटावी अशी महान कामगिरी करणार्‍या करणार्‍या शिवाजी महाराज या व्यक्तीने एखाद्याला झपाटले की तो आयुष्यभर झपाटलेलाच राहतो याचा अनुभव येत आहे.

धागालेखक कंबर कसून (आणि 'नाडि' सोडून) या प्रकल्पामागे लागलेले आहेत याचा खूप आनंद होत आहे. विशेषतः त्या त्या ठिकाणच्या रहिवासी तरुणांचा सहभाग/सहकार्य मिळणे फार मदतीचे ठरेल. पुढील सर्व उपक्रमांसाठी शुभेच्छा.

आणखी एक प्रकल्प कुणीतरी हाती घ्यायला हवा तो म्हणजे प्राचीन काळापासून ठाऊक असलेली परंतु आता बंद असलेली वा वापरात नसलेली किल्ले/राजवाडे/गढ्या यातील 'भुयारे'

बंद असलेली वा वापरात नसलेली किल्ले/राजवाडे/गढ्या यातील 'भुयारे'

पॉवर डेमॉन्सट्रेशन करून या सारखे शोध घेतले जाणे आवश्यक आहे. नेमके हेच मी पन्हाळ्यावर तेथील राजेसाहेबांना सुचवले होते. आपल्या गढीत किंवा आपल्या मालकीच्या वाडय़ातील अडगळीतून अनेक वस्तू, शस्त्रे हाती येतील त्यांना सुवस्थित घासून पुसून सादर केले तर ते पैसे मिळवायचे साधन बनेल व अभ्यासकांना नवी साधने उपलब्ध होतील. पाहू ते काही मनावर घेतात का ते...