उल्का वर्षाव पुन्हा एकदा

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in काथ्याकूट
17 Apr 2018 - 4:28 pm
गाभा: 

काळोख्या,निशब्द,शांत नी पुर्ण अशा मध्यरात्री आकाशामधुन एखादा तारा निखळून पडताना जर आपण पाहीला तर आपल्या, त्या आकाशाप्रमाणे शांत झालेल्या, चित्तावर प्रकाशाची एक रेघोटी लकाकत चमकुन जाते. जीवनाचे एक नवीन तत्वज्ञान अशा वेळी जन्म घेऊ शकते नव्हे घेतेच. आपल्या असण्या आणि नसण्या मध्ये तत्वतः काहीही भेद नाही या अभेदाचा साक्षात्कार त्या निमिष मात्रात होऊ शकतो.
कल्पना करा, तुम्ही चटईवर पाठ टेकुन, कसल्याही चिंतेशिवाय, आकाशाकडे नजर लावुन, ह्या अंतरीक्षाचा मागोवा घेताय. आणि अशा वेळी एकापाठोपाठ एक, अनेक तारे निखळून पडताना आपण पाहु शकलो तर?
ही नुसतीच कल्पना नाही. येत्या २२ तारखेला, म्हणजे रविवारी मध्यरात्री (रविवार व सोमवार दरम्यानची रात्र) आपण असाच उल्का वर्षाव पाहणार आहोत.
हा उल्का वर्षाव कधी कुठे व कसा पहावा, याविषयी सोबतच्या व्हिडीयोमध्ये सविस्तर माहीती मिळेल.

विडीयो पहा

प्रतिक्रिया

हेमंत ववले's picture

17 Apr 2018 - 4:30 pm | हेमंत ववले

मागील वर्षीच्या एका उल्का वर्षावाच्या निमित्ताने मी लिहिलेल्या एका लेखामध्ये, काहींनी खंत व्यक्त केली होती की त्यांना ठाऊक नव्हते उल्का वर्षाव कधी होता ते. म्हणुन आगाऊ सुचना व माहीती करीता इथे लिहिले आहे एवढेच.

सुधीर कांदळकर's picture

17 Apr 2018 - 7:35 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद

कंजूस's picture

18 Apr 2018 - 6:18 am | कंजूस
कंजूस's picture

18 Apr 2018 - 6:18 am | कंजूस

धन्यवाद.
उल्कावर्षावाने मला सतत हुलकावणीच दिली आहे. कट्टी केलीय. ढग /पाऊस येतो. :-(

नाही येणार पाऊस किंवा ढग या वेळी. अवश्य वेळ काढा व पहा.

दुर्गविहारी's picture

19 Apr 2018 - 7:55 pm | दुर्गविहारी

धाग्याबध्दल धन्यवाद. यावेळी नक्की बघण्याचा प्रयत्न करेन

मार्मिक गोडसे's picture

22 Apr 2018 - 11:35 am | मार्मिक गोडसे

फक्त आज मध्यरात्री संपूर्ण महाराष्ट्रात ५ तासाचे भारनियमन वीज महामंडळ करू शकेल का? वीज महामंडळात आहे का येथे कोणाची वट?

हेमंत ववले's picture

24 Apr 2018 - 5:44 pm | हेमंत ववले

असे होऊ शकले तर....लांब कुठे जावे लागणार नाही. आशावादी होऊ यात आपण, बाकी काय करणार

मार्मिक गोडसे's picture

23 Apr 2018 - 12:57 am | मार्मिक गोडसे

तासाभरात तीन उल्का पडतांना दिसल्या.

हेमंत ववले's picture

24 Apr 2018 - 5:40 pm | हेमंत ववले

आम्ही किमान ५० एक उल्का पडताना पाहु शकलो, त्यात फायरबॉल्स (कदाचित - कारण ते आकाराने मोठे होते आणि पृथ्वीच्या वातावरणात अगदी आमच्या जवळ पर्यंत पडताना दिसल्यासारखा भास व्हायचा) देखील पहावयास मिळाले. डिसेबर मधील उल्कावर्षावापेक्षा हे तुलनेने कमी होते, पण हे ही नसे थोडके. पहाटे साडे चार पर्यंत जागे होतो आम्ही.

चित्रगुप्त's picture

23 Apr 2018 - 6:32 am | चित्रगुप्त

लेखात दिलेला दुवा उघडल्यावर "Lyrid Meteor Shower 2018 from Pune.... Cost – 1400 Rs per person"
.... हे वाचून व्हिडियो बघण्याऐवजी आधी जालावर उल्का वर्षावाविषयी माहिती वाचली. तासाभरात फार तर फार दहा - पंधरा उल्का दिसतात असे वाचल्याने रात्री जागून वाट बघत बसण्याचा बेत रद्द केला होता.

अशा वेळी एकापाठोपाठ एक, अनेक तारे निखळून पडताना आपण पाहु शकलो तर?

आणि 'उल्का वर्षाव' हे शब्द दिशाभूल करणारे आहेत.

हेमंत ववले's picture

24 Apr 2018 - 5:37 pm | हेमंत ववले

उल्का वर्षाव हा शब्द आहे. केवळ शब्द. आणि त्याचाच आंग्ल भाषेतील समानार्थी शब्द आहे मीटीओर शॉवर. त्यामुळे दिशाभुल होण्याचे कारण नव्हते. आणि माझा तसा हेतुदेखील नव्हता.
जिथे, चुकुन आख्ख्या रात्री एखादा उल्का पडताना पाहुन आपण ( निरागस मने ) हर्षाने उल्हसित अचंबित होतो होतो तेथे, तासाला १८ ते २० उल्का पडताना पाहुन नक्कीच भारी वाटते. आणि पाहील्या देखील उल्का पडताना. अर्थात मागील वर्षीच्या म्हणजे डिसेंबरच्या वर्षावाइतका धो धो पाऊस या वेळी नव्हता ते देखील खर आहे. आणि तशी स्पष्ट कल्पना देखील व्हिडीयो मध्ये आहे.
दिशाभुल करणे हा हेतु नव्हता. न कळत तसे झाले असल्यास क्षमा करावी.
पण उल्का आणि फायरबॉल्स या वेळी ही पाहीले आम्ही.