वाटाडे भाग ३…. शिवाजी महाराजांच्या बरोबरचे वाटाडे आणि गोंधळाची परिस्थिती!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
16 Apr 2018 - 1:50 pm
गाभा: 

1
वाटाडे भाग ३….
शिवाजी महाराजांच्या बरोबरचे वाटाडे आणि गोंधळाची परिस्थिती!
साधारण रात्री ८ ते ९ च्या दरम्यान महाराजांबरोबरच्या सैन्याने अवघड जागेतून जाण्यासाठी पुसाटी बुरुजाच्या बाजूने दरवाजे किलकिले करून गडाच्या पायऱ्या उतरायला सुरुवात केली असावी. दिवसपाळी आणि सूर्यास्ताला सुरू होणारी रात्रपाळी अशा *दोन शिफ्ट मधे गस्त घालत रात्रभर फिरते राहायचे कंटाळवाणे पण जोखमीचे काम करताना त्यांच्यापैकी ३ ते ५ जण एक पोस्ट ते दुसरी असे करत ‘जागते रहो’ अशा आरोळ्या देत गस्त घालणाऱ्या शिपायांवर मुकादम गिरी करणाऱ्यांना या आरोळ्यांनी गस्ती टोळी कार्यरत आहे. असे दाखवून देता देता एक दोन फेऱ्या मारून पावसापाण्याच्या रात्री जास्त वेळ न घालवता तंबूत येऊन डोळ्यावर पट्टी बांधून विश्रांती घेत पडायचे. काही जणांनी भटारखान्यात जाऊन जेवायचे आणि परत येताना उरलेल्यांना डब्यातून जेवणाची सोय करायची. रात्री ९ नंतर गडावरच्या दरवाजाकडून काही उघडझाप होत नाही ना यासाठी वेगळे तैनात केलेल्यांकडून ‘सब बंदोबस्त ठीक है?’
यावर विसंबून गळक्या तंबूतून ठिबकत पडणारऱ्या पावसात घरच्यांची आठवत काढत बसायची सवय झाली असावी. कदाचित ती रात्र गस्त घालायची शेवटची ठरायची शक्यता उडत आलेल्या बातमीतून समजल्याने चार महिन्यांचा शीण डोळ्यावर अनावर झाला असावा … (*हवाईदलातील प्रत्यक्ष अनुभवातून गस्ती तुकड्यांच्या मनोवृत्तीत शेकडोवर्षांत फारसा फरक पडला नसावा असे जाणवते)
एकदा दरवाज्याच्या समोरील गस्तींना मारून बाजूला केले तर दोन पोस्टमध्ये असलेल्या अंतरामुळे अंधारात एका मागोमाग एक करत सध्याच्या फॉर्मेशनप्रमाणे ४ कंपनीच्या शिपायांना बाहेर काढले गेले. त्यांनी आणखी एका पोस्टमधून गस्तींचा गळा आवळून ती निकामी केल्यावर आता वाटाड्यांच्या टोळींना बाहेर काढून पुढे जायच्या वाटांची चाचपणी करायला पाठवले गेले असावे. मग महाराजांची बुट्टी डोली व त्यांच्या खास रक्षक दलाच्या जवानांना बाहेर पाठवले गेले असावे. त्यातूनच महाराज स्वतः चालत बाहेर पडले असावेत.
आता महाराज वर वर्णन केलेल्या फॉर्मेशनप्रमाणे पक्क्या वाटाड्यांच्या बरोबर झपझप पावले टाकत निघाले असावेत. पूर्ण जथ्थ्यात साधारण तीन ते चार जण वाटेच्या रुंदीनुसार एकत्र चालत असावेत. यामधे प्रत्येक कंपनीच्या साठी जादाची शस्त्रे, कमानी व बाणांचे गठ्ठे, पहारी, घण, इरल्याच्या खाली लपवून ३ ते ४ बुट्टी डोल्यांची कावड खांद्यावर घेऊन जाताना वाटेत विश्रांतीसाठी हातातील काठीला कावडीचे दांडे टेकवून ठेवायची सोय वापर ते खांदे पालट करत असावेत… कावड नेणारे बुट्टी डोलीवाले, वाटाडे हे सैन्याचे ‘मददगार’ पण सैनिक नसलेले असल्याने त्यांना काम झाले की आपापल्या वाटेने परतायची मुभा असावी. जर ते शत्रूच्या तावडीत सापडले तर त्यांना न मारता त्यांना सोडून दिले जात असावे …( सध्या अशांना नॉन कॉम्बॅटंट सिव्हिलियन म्हणून संबोधले जाते)
जर तोतया शिवाजी मलकापूरच्यावाटेने मसाई पठारावरून गेले असे मिलिट्री कमांडर मानतात. म्हणून खऱ्या शिवाजी महाराजांचा मार्ग तो सोडून पर्यायी असला पाहिजे असेही मिलिट्री कमांडर मानतात. तो कोणता असावा? यावर विचार करता असे जाणवते की जर मसाईपठाराच्या दुसऱ्या अंगाने इंजोळे या सध्याच्या नावाच्या खेड्याच्या लगतच्या सखल मार्गाचा वापर केला तर जास्त चढउतार न करता (नकाशात पाहून 800 मीटरच्या कंटूर वरून) वाहत्या प्रवाहाच्या काठाने गेले तर चिखलाचा त्रास कमी होईल. शिवाय आसपासच्या खेड्यातील झोपलेल्या लोकांना जाग न आणता शक्यतो बिनबोभाट पुढे पुढे सरकता येईल. एका विशिष्ठ ठिकाणी ( सध्याच्या मांजरे गावाजवळ) कासारी नदीच्या पात्राला लागले की तो काठ पकडून गजापुरच्या सखल प्रदेशात घेऊन जाईल. ...
खालील नकाशा पहा...
14
त्यांच्या सोबतच्या वाटाड्यांपैकी काहींनी वेगवेगळ्या कारणांनी या रस्त्यावरून पुर्वी गेल्याचे सांगितल्यावर ती वाट पक्की केली गेली असावी. कदाचित अडचण असावी की पुर्ण वाट न माहिती नसल्याने वाटेत थांबून वाटाड्यांचे गाववाले नातलग पकडून त्यांच्या करवी पुढील दिशा निर्देश मिळवायचे असेही ठरले असावे. महाराजांना असा धोका पत्करल्याशिवाय पर्याय नसावा.
असा हा जत्था इंजोळे गावाच्या दिशेने जात असावा. एका बाजूला मसाईपठाराची उंच चढण त्यावरून पडलेल्या पावसाचे ओढे, नाले यांच्या किनाऱ्याला धरून निर्माण झालेल्या प्रवाहाच्या कडेकडेने जात असावा. जर तीन जण साखळीने बरोबर जात होते असे मानले आणि त्यांच्या एकामागे एक असलेल्यांतील अंतर २-३ मीटर (५ ते १०’) मानले तर २०० अशा तीन जणांच्या जोड्यांत ६०० मीटर इतके लांब लचक होते. वाटेत जोरदार सर आली किंवा अन्य कारणांमुळे ते अंतर वाढत जाऊन पूर्ण जथ्था कधी १ किमी पर्यंत लांबलेला होत जात असावा…
काही वाटाडे जथ्थ्यापासून पुढे पुढे जात त्या भागातील त्यांच्या नातेवाईकांला भेटून बरोबर नेण्यासाठी गुपचूप भेटून आणत असतील किंवा निदान सल्ला घेऊन येत असावेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराजांनी ठरवलेली वाट गजापूरला नक्की जाते किंवा नाही याची खात्री वाटाड्यांना असली तरी अधिक पक्के वाटाडे मिळवायला महाराजांनी परवानगी दिली असावी. साधारण दर तासाला (संपूर्ण एक किमी लांबीचा जथ्था) २ किमी गेला असावा असे मानले तर रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत आठ तासांत 16 ते 18 किमी अंतरावर पोहोचलो असावा. खालील नकाशावर सोनुर्ले नावाने खेडे २१ किमी अंतरावर दाखवले आहे. या पुढील वाट नेमकी कशी शोधून पुढे जायचे याची खलबते करत करत बरोबर आणलेल्या न्याहरी खात विश्रांती घेतली असावी. (पुढे चालू…)

15
वरील नकाशात दर्शवलेले 21 किमी अंतर हे पुसाटी बुरुजापासून सध्याच्या वाटेवरून मागे चालत जाऊन तीन दरवाजा ओलांडून खाली आले तर असे दाखवतोय ( ते या नकाशात प्रत्यक्ष दिसत नसले तरी) म्हणून त्यातून कमीकमी 3 किमी वाढलेले आहेत. शिवाय पावसाचा काळ, रात्र हे महत्वाचे फॅक्टर्स गूगल नकाशाला अभिप्रेत नाहीत.
आता खालील नकाशात महाराजांचा जथ्था सोनुर्ले करून पुढे जात असताना डोंगरांच्या कुठल्या घळी सोडून पुढे जायचे यावर समोर पसरलेल्या व खाली आलेल्या ढगांच्या अडथळ्यांना ते विरण्याची वाट पहात बसावे की अंदाजाने जावे असे दोन पर्याय असल्याने वेळ न दवडता पुढे जावे. समजा नंतर वाट चुकीची वाटली तर त्या परिस्थितीनुसार वाट बदलून पुढे काय करायचे ते ठरवावे असा पर्याय निवडला गेला असावा.

50 मीटर इतकी देखील व्हिजिबिलिटी नसेत तर डोंगर-दऱ्या कशा दिसू शकत नाहीत याचा
पुरावा

15

दुर्गविहारी दाखवतात तो नकाशा… त्यांनी लाल ठिपक्यांनी दर्शवलेला मार्ग सध्याचे धारकरी दर वर्षाच्या जून-जुलैत जाताना वापरतात. त्या ऐवजी हिरव्या रंगाच्या डोंगर रांगांच्या खालून जाता येऊ शकेल असे मिलिट्री कमांडर मानतात. परंतु प्रत्यक्ष त्या वाटेने जाऊन पाहिल्या शिवाय त्या मार्गाला पक्का ठरलेला मार्ग असे मानू नये. ही विनंती.
16

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2018 - 2:44 pm | श्रीगुरुजी

वाचतोय. सविस्तर माहिती मिळतेय.

एस's picture

17 Apr 2018 - 4:53 am | एस

वाचतोय. रोचक आहे.

अरविंद कोल्हटकर's picture

17 Apr 2018 - 8:09 am | अरविंद कोल्हटकर

सैन्याविषयीच्या तुमच्या विशेष ज्ञानाचा लाभ तुम्ही वाचकांना करून देत आहात ही निश्चित स्पृहणीय बाब आहे. मला स्वत:ला हे सर्व अपरिचित आहे आणि तथाकथित घोडखिंडीला मी सुमारे २० वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीपलीकडे मला त्या भागाचीहि काही माहिती नाही. तेव्हा लोकांनी वाचावे असे मी काय लिहिणार?

तत्कालीन logistics बद्दलहि मला काही माहिती नाही आणि ऐतिहासिक साधनामधूनहि तसे काही हाती लागत नाही. तुमच्यासारखे आधुनिक युद्धाचे ज्ञान असलेले काही जण आपल्या त्या ज्ञानाने आणि कल्पनाशक्ति वापरून ही पोकळी भरत असतील तर त्याचे स्वागतच आहे.

तेव्हा असेच लिहीत रहा इतके अवश्य सांगतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Apr 2018 - 10:57 am | डॉ सुहास म्हात्रे

शिवाजी महाराज कोणत्या मार्गाने गेले असावेत याचा सविस्तर आणि माहितीपूर्ण उहापोह असलेले सर्वच भाग खूपच रोचक आहेत. त्या विभागात फिरण्याचा प्रसंग न आल्याने मार्गाबद्दल लिहिण्यासारखे हातात काही नाही. मात्र वाचन खूपच रोचक वाटत आहे.

मार्ग ठरवताना मिलिटरी तंत्राने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी तुमचा दीर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण लष्करी कार्यानुभव चांगलाच उपयोगी पडणार आहे... फक्त इथे वापरलेले तंत्र आधुनिक काळातले नाही तर त्याकाळच्या मावळ्यांच्या विचारशैलीत बसणारे असणे जास्त योग्य होईल. याशिवाय याच विषयावरील अगोदरच्या एका भागात लिहिल्याप्रमाणे, मार्गाच्या भूभागाची भौगोलिक रचना ३५० वर्षांच्या निसर्गाच्या आघातांनी बरीच बदललेली असण्याची शक्यताही जमेस धरणे जरूर आहे.

पुभाप्र.

शशिकांत ओक's picture

17 Apr 2018 - 3:15 pm | शशिकांत ओक

मार्गाच्या भूभागाची भौगोलिक रचना ३५० वर्षांच्या निसर्गाच्या आघातांनी बरीच बदललेली

पण सह्य पठार व पर्वतराजी करोडो वर्षांपासून फार मोठा निसर्गकोप होऊन प्रचंड उलथापालथ झाली असेल तर ती कशी असावी याचे पुरावे अन्य गड किल्ले यांच्या सध्याच्या बळकटपणावरून कळून येते. भूकंप कमी हादऱ्याचे, त्सुनामी नाही, ज्वालामुखी नाही, पूर व त्यामुळे जमिनीची धूप शक्य, प्रचंड चक्रवातातून खडक निसटायची शक्यता कमी वाटते. राहता राहिले वडवानल किंवा जंगल आगी... त्यातून खिंडीची उलथापालथ कमी होत असावी...

डोके.डी.डी.'s picture

17 Apr 2018 - 10:57 am | डोके.डी.डी.

Chhan

शशिकांत ओक's picture

21 Apr 2018 - 11:41 pm | शशिकांत ओक

पुढील वेळी पुसाटी बुरुजाच्या पायवाटेने खाली उतरून इंजोळे जवळून सोनुर्ले गावाकडील मार्गाने गजापूरला जायचा प्रयत्न करतील का?

मित्र हो,
माहिती साठी ...
पुढारीच्या बहार पुरवणीच्या ८ क्रमांकाच्या पानावर
लढा पावनखिंडीचा लेख माला चालू आहे...