निष्ठा आणि लोणी

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
10 Apr 2018 - 2:31 pm

एका जंगलात त्या जंगलाचा राजा सिंह रहात होता, त्याला काही उंदरांनी सतावून सोडले होते. ते उंदीर तो झोपलेला असताना त्याची आयाळ कुरतडत, त्याला त्रास देत. इतका मोठा सिंह पण उंदरांचा बंदोबस्त करू शकत नसे. म्हणून मग त्याने एक मांजर नोकरीवर ठेवले. मांजर सिंहाला त्रास देणाऱ्या उंदरांना खात असे. त्यामुळे सिंहाची झोपही नीटपणे व्हायला लागली. याबदल्यात सिंह मांजराला रोज दूध देत असे. एके दिवशी अतिउत्साहाने मांजराने सगळेच उंदीर फस्त करून टाकले. पुढेपुढे सिंहाला उंदरांचा उपद्रवच राहिला नाही मग त्याला प्रश्न पडला की आपण मांजराला अजूनही दूध का बरे देतो आहे ? त्याने मांजराला नोकरीवरून काढून टाकले.

<टाइम प्लीज>
ज्यांना पॉपकॉर्न खाऊन घाण करायची आहे त्यांनी
https://www.misalpav.com/node/41559
इथे व्यक्त व्हावे.
</टाइम प्लीज>

डॉक्टरला पेशंटची जात, प्रांत, पक्ष पाहून चालत नाही. पेशंटचा जीव वाचवणे हाच डॉक्टरचा धर्म.

तसंच काहीसं माझं होतं.
निवडणूका लागल्या की माझी कामाची व्यस्ततासुद्धा वाढते. "रा गा" पासून ते लिंबगावच्या सरपंचापर्यंत अनेक लोक येत जात असतात.

परवा रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर हात धुवून बाहेर येत होतो तर काही मंडळी पडवीत येऊन बसली होती. विचारणा केली असता कळले की हा समाजवादकांचा गट होता. त्यांना माझा सल्ला हवा होता.
मी म्हटले, "समाजवादकांनो, तुम्हाला माझा कशाच्या बाबतीत सल्ला हवा आहे. तुम्ही कोणती निवडणूक लढवणार आहात ?"
तेव्हा सगळे एका सुरात मला म्हणाले, "आम्ही कोणतीच निवडणूक लढवत नाही, जो जो सत्ताधारी किंवा आम्हाला मलई देऊ शकेल त्याची बी-टिम म्हनून आम्ही काम करतो. हे आमचं चोरटं प्रेम असतं. ज्याच्यासाठी आम्ही काम करतो, त्याच्याशी आमचा काही संबंध आहे याचा आम्ही संशयसुद्धा येऊ देत नाही"
मी - "ओह आय सी, पण मग तुम्ही माझ्याकडे का आलात सल्ल्यासाठी ?"

समाजवादक - "आजवर आम्ही बर्‍याच लढाया केल्या. मुख्यतः जाती अंताच्या"
मी - "त्या कशा ?"
समाजवादक - "आम्ही दरवर्षी जाती अंताचा जंगी कार्यक्रम करतो"

मी - "म्हणजे नेमकं काय करता तुम्ही मंडळी ?"

ashutoshjog@yahoo.com

समाजवादक - "दरवर्षी आम्ही गळ्यातली जानवी काढून टाकण्याचा कार्यक्रम करतो"
मी - "वा ! फारच छान, मग झाला का जाती अंत ?"

माझ्या बोलण्यावर ८५ वर्षाचे एक समाजवादक आजोबा भयानक भडकले मला म्हणाले, "आम्ही बरा होवू देऊ जाती अंत. सिंहाने पाळलेल्या मांजराने जर सगळे उंदीर खाऊन टाकले तर सिंह त्या मांजराला नोकरीवर ठेवेल का ?"

दुसरे समाजवादक - "समाजातून जाती पाती नष्ट झाल्या तर आम्ही कसली डोंबलाची जाती अंताची लढाई करणार ? दरवर्षी जानवी काढून टाकण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही आधी जानवी गळ्यात घालतो. मग ती काढण्याचा कार्यक्रम करतो"

मी - "तुम्ही महा बिलंदर आहातच, मग माझ्याकडून सल्ल्याची कसली अपेक्षा करता ?"

७५ वर्षाचे समाजवादक आढ्याकडे पहात, चष्मा काढून पुसत पुन्हा डोळ्यावर चढवत गंभीर आवाजात म्हणाले, "मागच्या वर्षी आम्ही खूप छान योजना आखली होती."

मी - "कसली योजना ?"

७५ वर्षाचे समाजवादक - "या योजनेचं गुप्तनाव होतं राष्ट्रव्यापी सामुहीक बोंबठोक योजना"

आशु - "म्हणजे नेमकं काय करणार होतात ?"

८५ वर्षाचे समाजवादक - "संध्यानंद, पोलिस टाइम्स इ पेपरमधे येणार्‍या बातम्या आम्ही गोळा केल्या होत्या"

मी - "पण त्या गोळा करून तुम्ही काय करणार होतात ?"

८५ वर्षाचे समाजवादक - "कुणा मुस्लिम मुलीला भाड्याने जागा मिळाली नाही, कुणा मुस्लिम तरूणाला नोकरी मिळाली नाही. उत्तर प्रदेशात कुणाचा खून झाला. अशा बातम्या आम्ही जमवल्या होत्या. तोच तर आमचा दारुगोळा होता. बिहार निवडणूक लागली की त्या दारुगोळ्याची वात पेटवायची हे आमचे ठरलेले होते. २०१४ पासून देशात असहिष्णूता वाढीस लागली असून या सगळ्याला मोदी जबाबदार आहेत अशी देशभरात सामुहीकरित्या बोंब ठोकण्याची आमची योजना होती."

आशु - "अहो पण त्या मुलीचे तिच्या रूम पार्टनरबरोबर भांडण झाले होते. तिथे धर्माचा काय संबंध ? आणि उत्तर प्रदेशात जी हत्या झाली तिथल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची होती. अखिलेश यादवचे समाजवादी पक्षाचे सरकार तिथे होते. त्याला एकदा तरी जाब विचारलात का ?"

७५ वर्षाचे समाजवादक - "तुम्ही फार प्रश्न विचारता बुवा. लोक इतका खोलात जाऊन विचार करीत नाहीत. आपण शक्य तितक्या मोठ्या आवाजात बोंब ठोकायची म्हणजे माहोल आपोआप तयार होतो."

मी - "ओह आय सी"

७५ वर्षाचे समाजवादक - "दुसरी गोष्ट, तुम्ही आत्ता म्हणालात अखिलेश यादवला जाब विचारला का ? अहो तो तर आमचा ज्युनियर सिंह(मुलायमसिंहांचा पुत्र). मांजराने सिंहाला उपद्रव देणार्‍या उंदरांचा बंदोबस्त करायचा असतो. सिंहाला उलटे प्रश्न विचारायचे नसतात"

मी - "मग आता काय अडचण आहे ?"

८० वर्षाचे समाजवादक - "याही वर्षी आम्ही जाती अंताच्या लढाईची मोठी योजना केली होती, सामुहीकरित्या जात टाकण्याचा म्हणजेच जानवी त्यागण्याचा कार्यक्रम करणार होतो. पण त्यावर पाणी फिरवलं कुणी तरी"

मी - "का ? काय झालं ? तुमच्या कार्यक्रमाच्या मैदानावर पाऊस बिऊस झाला की काय ? "

८० वर्षाचे समाजवादक - "पाऊस नाही झाला पण आमच्या मालकानेच यू टर्न घेतला. त्याने अचानक आपण जानवेधारी हिंदू ब्राह्मण असल्याचे जाहीर केले आहे. आता कोणत्या तोंडाने आम्ही जाती अंताची भाषा करू ?
ज्याच्यासाठी केला एवढा अट्टाहास, त्याने आमचा शेवटचा दिवस काही गोड होवू दिला नाही"
(सगळे जण डोळे पुसतात)

मी - "आधी डोळे पुसा, दीर्घ श्वास घ्या. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणा आणि आता नवीन कार्यक्रम हाती घ्या "

समाजवादक एका सुरात - "कोणता ?"

मी - "ज्या अर्थी 'त्या'ने यू टर्न घेतला त्या अर्थी त्याला आता तुमच्या भावनांची कदर राहीलेली नाही."

ashutoshjog@yahoo.com

समाजवादक - "खरंय खरंय, पण कार्यक्रम कोणता ?"

मी - "तुम्ही नोटाबंदी विरोधात जशी बोंब ठोकली होती तशीच त्याच्या जानवे धारण करण्याविरोधात बोंब ठोकायची"

हे ऐकून ८५ वर्षाच्या आजोबांना दरदरून घाम फुटला. ते म्हणाले, "हे कसं शक्य आहे ? अहो ज्या काँग्रेसच्या आणिबाणीविरोधात लढण्याचे नाटक केले त्याच काँग्रेसचे आज प्रवक्ते पद पटकावले आहे आणि आता हे काय भलतेच सांगताय"

मी - "छ्या छ्या, अहो मगाशीच तुम्ही सिंह, मांजर वगैरे ऐकवलेत. पूर्वी तुमच्या उंदीर खाण्यामुळे सिंहाची झोप नीट होत असे. त्या बदल्यात तो सिंह तुम्हाला दूध, लोणी देत असे."

समाजवादक - "हो हो देत असे. हे खरंय "

ashutoshjog@yahoo.com

मी - "तर मग लक्षात घ्या आपले प्रेम मालकावर नाही. आपली निष्ठा आहे लोण्याशी. तुमच्या जुन्या मालकाकडे आता सत्तेचे लोणी कुठाय ? तो तुम्हाला काय देणार ? "

समाजवादक "ते ही खरंच"

मी - "मग तुमचा जाती अंताचा कार्यक्रम तसाच सुरु ठेवा. यंदाच्या कार्यक्रमात त्या जानवेधार्‍याचा जोरदार निषेधही नोंदवा. म्हणजे तुम्ही आपली तत्वे सोडल्याचा आरोपही कुणी करणार नाही. फारच जंगी कार्यक्रम केलात तर दिल्लीतल्या नव्या चाणाक्ष सत्ताधार्‍याच्याही नजरेत भराल. नव्या सत्ताधार्‍याची बी-टिम म्हणून नक्की काम मिळेल. मालक बदलावा लागला म्हणून काय झालं ? "

यावर मात्र ७५ ते ८५ सगळेच समाजवादक खूष झाले.

जाताना एकमेकांना टाळ्या देत म्हणत होते, "मालक बदलावा लागला तरी चालेल, आपली निष्ठा लोण्याशी"

-
ashutoshjog@yahoo.com

समाजविचार

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

11 Apr 2018 - 8:41 am | ज्योति अळवणी

झक्कास... आवडलं

विजुभाऊ's picture

11 Apr 2018 - 8:46 am | विजुभाऊ

मस्त

आपली निष्ठा लोण्याशी - हे तर राजकारण्यांचं ब्रीदवाक्य (सगळ्यांचाच खरंतर, पण राजकारण्यांची भूक जब्बरदस्त म्हणून त्यांना जास्त शिव्या )

मंदार कात्रे's picture

12 Apr 2018 - 8:27 pm | मंदार कात्रे

आपली निष्ठा आहे लोण्याशी. +१

आशु जोग's picture

13 Apr 2018 - 12:02 am | आशु जोग

याला जातीअंताची लढाई हे शीर्षक अधिक शोभून दिसेल का

आणि असल्यास शीर्षक कसे बदलून घ्यायचे ?

जंतांची लढाई असे छान वाटेल.
करूयात काय चेंज?

आशु जोग's picture

13 Apr 2018 - 9:06 am | आशु जोग

त्यापेक्षा नोकरी गेली मांजराची हे अधिक योग्य वाटते