नेट बॅंकिंग्च्या विश्वासार्हते बद्दल

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
4 Apr 2018 - 9:27 am
गाभा: 

मी सारस्वत बॅंकेतून नेट बॅंकिंग द्वारे पुणे महानगरपालिकेचा प्रॊपर्टी टॆक्स हा दिनांक १ एप्रिल रोजी भरला. पण बॅंकेच्या स्टेटमेंट मधे तो ३१ मार्च रोजी डेबीट पडला. हे कसे काय झाले. मी बॅंकेला या बाबत ईमेलद्वारे विचारणा केली आहे त्यांचे अद्याप उत्तर आले नाही. ही बॅंकींग प्रणाली मधील तांत्रिक चूक असावी असे मला वाटते पण यातून सिस्टिमच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न निर्माण होतो. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपते. मी भरलेला टॆक्स हा नवीन आर्थिक वर्षात होता. पण तो स्टेटमेंट मधे सरत्या आर्थिक वर्षात दाखवतो आहे. ही चूक कितपत गंभीर आहे? बॅंकेच्या घोटाळ्यांमुळे हल्ली बॅंकेकड पहाण्याचा दृष्टीकोण हा संशयी झाला आहे. जाणकारांच्या दृष्टीने यात काही गफला तर नाही ना?

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

4 Apr 2018 - 9:59 am | श्रीगुरुजी

>>> ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपते. मी भरलेला टॆक्स हा नवीन आर्थिक वर्षात होता. पण तो स्टेटमेंट मधे सरत्या आर्थिक वर्षात दाखवतो आहे. ही चूक कितपत गंभीर आहे?

अजिबात गंभीर नाही.

मी ICICI आणि HDFC Bank चे Net Banking वापरतो. दोन्ही अतिशय सुरक्शित आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Apr 2018 - 11:11 am | प्रकाश घाटपांडे

त्याच दिवशी मी अ‍ॅक्सेस बँकेतून दुसरा टॅक्स भरला तो मात्र बरोबर १ तारखेलाच डेबीट पडला.

शशिकांत ओक's picture

20 Apr 2018 - 8:56 am | शशिकांत ओक

नमस्कार आपल्या विचारणेचे उत्तर दिले गेले आहे... https://www.google.co.in/amp/s/yourstory.com/2017/03/neft-and-rtgs-close...

रविवारी केलेल्या transactions ची पोस्टिंग डेट पुढच्या वर्किंग डेची पडते. इथे 1 एप्रिल रविवार आणि 2 एप्रिल क्लोजिंगचा ऑफ डे असल्याने (आणि 31 मार्च नॉर्मल वर्किंग डे असल्याने) अशी अलिकडची पोस्टिंग केली गेली असणार. यात एरर नाही.

अगदी एटीएममधूनही रविवारी कॅश काढून पहा, रिसीटवर सोमवारची तारीख दिसेल.

गंभीर असो नसो. बँकेला पत्र लिहून पोच घ्या. पत्रात, चुक पूर्वलक्षी प्रभावाने दुरूस्त करायची विनंती करा.

कंजूस's picture

4 Apr 2018 - 3:28 pm | कंजूस

भारतात सर्वर आहेत का? अमेरिकेत कार्लटनमध्ये असले तर?

प्रकाश घाटपांडे's picture

4 Apr 2018 - 4:13 pm | प्रकाश घाटपांडे

ते माहित नाही. आपल्या बँकेचा सर्वर कुठे आहे हे कळ्ण्याची सोय काय आहे.

आलमगिर's picture

5 Apr 2018 - 12:07 am | आलमगिर

भारतातच आहेत मुंबईमधे

या अॅप्समध्ये पाहता येते सर्वर कुठे आहे. website seo check शोधा.

स्टेट बँक - जयपूर
एचडीउफसी - मुंबई
आइसीआइ - दिल्ली

गवि's picture

5 Apr 2018 - 9:09 am | गवि

नाही.

वेबसाइटचा सर्व्हर आणि कोअर बैंकिंग सिस्टीमचा सर्व्हर यात घोळ होतोय.

फायनांशियल सर्वर, जिथे या सर्व एंट्रीज / ऑथेंटिकेशन्स होतात तो कुठे असेल ते असं नाही कळणार.

सुनील's picture

5 Apr 2018 - 9:42 am | सुनील

कुठल्याही सिस्टीममध्ये वेब-सर्वर, अ‍ॅप-सर्वर आणि डेटबेस-सर्वर असे तीन वेगवेगळे सर्वर्स असतात.

घरगुती जमा-खर्चासारख्या छोट्याशा सिस्टीममध्ये ह्या तीनही कामांसाठी एकच संगणक पुरेसा असतो. परंतु, बँकांसारख्या मोठ्या आस्थापनांसाठी हे वेगवेगळे असतातच.

खरे तर, एक सर्वरही पुरेसा नसतोच. अनेक सर्वर्सची साखळी करून, लोड-बॅलन्सींग करावे लागते. पण तो वेगळा विषय.

सदर बाबतीत, बँकांचा डेटाबेस सर्वर कुठे आहे, ते समजणे महत्त्वाचे. आणि ते असे पटकन समजणार नाही.

शिवाय बैंक्सबाबत DR सर्वरही असतात आणि ते अनेकदा मूळ सर्वरच्या शहराखेरीज अन्य दूरच्या शहरात असतात. काही वेळा ट्रांजेक्शन्स DR सर्वरवर शिफ्ट झालेली असू शकतात. त्यामुळे लोकेशन नेमकं कळणं कठीणच आहे. फक्त इंसायडर सांगू शकतो.

कंजूस's picture

5 Apr 2018 - 2:21 pm | कंजूस

आपल्या मिपाचा सर्वर --
Los Angeles,California,US
Lat/Long : 34.0522/ 118.244

मायबोली :
Ashburn , Virginia,US
Lat/Long : 39.0437/ 77.4875

ऐसीचा सर्वर : Scotssdale, Arizona,US
Lat/Long : 33.602/ 111.888

हे सर्वर खरे असतील तर बँकांचेही असतील?

State bank site:https-retail dot onlinesbi dot com/retail/login.htm
Server : Jaipur, Rajasthan, India
Lat/Long : 26.9167/75.8167

Axis bank site: https - axisbank dot com
Server : New York city, New York ,US
Lat/Long : 40.7143/ 74.006

फक्त axis bank server -New York city दाखवतो. बाकीच्या बँकांचे भारतात आहेत!!

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Apr 2018 - 3:46 pm | अनिरुद्ध.वैद्य

फक्त फ्रंटएण्डचे एण्ट्री पॉईंट्स आहेत. त्याव्यतिरिक्त भरपुर मोठं जाळं असत, जे विस्तृत प्रणालींमध्ये विभागलं असत. ते अंतर्गत सर्व्हर्स देशभरात कुठेही असु शकतात. वर सुनील यांनी व्यवस्थीत सांगितले आहे.

नेट बँकिंग साइटवरून आणि। कधी अॅपमधून वापरतो स्टेट बँकेचे. ( विंडोज फोन)

ट्रेड मार्क's picture

5 Apr 2018 - 1:54 am | ट्रेड मार्क

बँकेचा दिवस संपल्यावर सगळे ट्रान्झॅक्शन्स पोस्ट करण्यासाठी एक बॅक एन्ड प्रोसेस रन केली जाते. उदा. - बँकेच्या शाखेचे व्यवहार ५ वाजता संपत असतील तर प्रोसेस ९ वाजता सुरु होऊन ११ ला संपत असेल. बऱ्याचदा याच प्रोसेसद्वारे बँकेच्या कामकाजाची पुढची तारीख पण मार्क केली जाते. म्हणजे ११.१५ वाजता केलेले व्यवहार कदाचित तुम्हाला पुढच्या तारखेचे पण दिसू शकतील. तारीख बदलण्याचं काम हे या प्रोसेसच्या अगदी शेवटी केलं जातं.

आता नेहमीच ही प्रोसेस व्यवस्थित चालते असं नाही. काही वेळा काही तांत्रिक कारणाने प्रोसेस ऍबॉर्ट होते किंवा थांबवली जाते. जर का काही कारणाने प्रॉसेस अजून सुरूच झाली नसेल तर रात्रीच्या १२ नंतर सुद्धा आधीच्या दिवसाचीच तारीख राहील. ३१ मार्च हे आर्थिक वर्षअखेर असल्याने बाकी सर्व व्यवहार संपायला आणि समजा अजून काही आधीच्या वर्षातले ताळमेळ जुळायला वेळ घेतला जातो. त्यामुळे त्यांनी बॅक एन्ड प्रोसेस कदाचित चालूच केली नसावी. त्याने तुम्हाला काही त्रास होईल असं मला वाटत नाही.

अर्थात हे मी काही वर्षांपूर्वी दुसऱ्या एका बँकेत केलेल्या कामाच्या अनुभवावरून सांगत आहे. प्रत्यक्ष सारस्वत बँकेत कसं कामकाज चालतं याची मला माहिती नाही. या घटनेवरून नेट बॅंकिंग्च्या विश्वासार्हते बद्दल प्रश्न निर्माण व्हावा असं मला वाटत नाही. घोटाळे, गफलती तर संगणकीकृत व्हायच्या आधी पण होतंच होते. आता कदाचित घोटाळ्यांची पद्धत आणि गफलतींची प्रक्रिया बदलली असेल. पण या प्रकरणात तुमचे पैसे कुठे गहाळ झाले असं वाटत नाही. फक्त आधीच्या दिवसापासून अकाउंट बॅलन्स चेक करून खात्री करून घ्या.

manguu@mail.com's picture

5 Apr 2018 - 7:17 am | manguu@mail.com

बॅंक अवर्सनंतर पुढच्या तारखेने एंट्री व्हावी , हे समजण्यासारखे आहे. मागच्या तारखेने होणे प्रथमच ऐकले

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2018 - 10:38 am | प्रकाश घाटपांडे

मलाही तसेच वाटले होते. की समजा सिस्टिम आर्थिक वर्षाच्या कारणामुळे बंद ठेवली असेल तर पुढच्या दिवशी ट्रान्सॅक्शन होईल. हा लोनचा हप्ता असतात तर?

पैसा's picture

5 Apr 2018 - 11:24 am | पैसा

पण हा टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स म्हणून कोणत्या तारखेला जमा दाखवतो आहे ते प्रॉपर्टी टॅक्स रीसिटवर बघून घ्या. तिथेही ३१ मार्च असेल तर तो गेल्या वर्षीचा समजून रिफंड मागावा लागेल असे वाटते. या मूर्ख लोकांसमोर शहाणपण, कॉमन सेन्स इत्यादी चालत नाही. सी ए च्या पोराने advance टॅक्स कॉलम चुकवल्यामुळे जरुरीहून जास्त इन्कम टॅक्स भरूनही माझ्या नवऱ्याला गेली ३ वर्षे एकच नोटीस येत आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2018 - 1:29 pm | प्रकाश घाटपांडे

प्रॉपर्टी टॅक्स पावतीवर मात्र तारीख १ दाखवत आहे

मग ती १ तारीखही तुम्ही कन्सिडर करु शकाल.

त्यांच्या स्टेटमेंटची प्रिंटमध्ये बघा.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2018 - 1:45 pm | प्रकाश घाटपांडे

म्हणजे फिजिकल पासबुक प्रिंट ना? ती पहातो

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Apr 2018 - 3:48 pm | अनिरुद्ध.वैद्य

मुळे घोटाळा झालेला असु शकतो. मुख्य म्हणजे पैसे व्यवस्थीत दुसर्‍या खात्यात पोचले, हे महत्वाचे. नाहीतर बर्‍याचदा तिथेच बोंब पडते गेटवे टाईम आउट होउन!