हिंदू धर्म छोटे मोठे प्रश्न

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Mar 2018 - 1:02 pm
गाभा: 

हिंदू धर्म - हिंदू आणि धर्म म्हणजे काय अशा विषयां वाद विषयांबद्दल हा धागा नाही . छोटे मोठे प्रश्नांची उत्तरे शोधणे असा उद्देश आहे.
१) वाल्मिकी रामायणातील संपूर्ण व्यक्तीनाम सूची कुठे मिळेल ?

* खाली प्रतिसादात समीर वैद्यांनी रोमन लिपीत व्यक्तीनाम सुची उपलब्ध असलेला पिडीएफ दुवा दिला आहे. या सूचीतून निश्चितपणे संस्कृतोद्द्भव असलेली संस्कृतोत्भवद्भव असण्या बद्दल शंका असलेली नावे वेगवेगळी करण्यात जाणकारांचे सहकार्य उपयूक्त ठरेल असे वाटते.

वाल्मिकी रामायणातील संपूर्ण व्यक्तीनाम सूची (फक्त मुख्य नावे नाही तर सर्वच्या सर्व व्यक्ती नावांची सूच) मी आंतरजालावर जरा धांडोळा घेतला तर ५००० रामायणातील संस्कृत शब्दांची सूची दिसली (पण त्याची खातरजमा कशी केलेली आहे माहित नाही) पण त्यात सर्वाधिक वापरलेल्या शब्दांच्या क्रमवारीने आहे. म्हणजे काही नावे एकेकदाच आली असतील तर त्यात असणार नाहीत . कदाचित यूनिकोडात नसल्यामुळे गूगल सर्चात व्यक्ती नाव यादी येत नसेल पण पिडीएफ दुवा कुणाला माहित असेल असे होऊ शकते म्हणून ही पृच्छा .

व्यक्ती नाम यादी संबधीत अजून काही प्रश्न डोक्यात येतील असे वाटते पण ते सविस्तर यादी वाचल्या नंतरच नक्की करता येऊ शकतील असे वाटते .

२) हिंदू धर्मीय देवतांच्या तिथ्यांचे जयंत्यांचे स्रोत नेमके कोणते ? म्हणजे जसे की राम नवमी कृष्ण जयंती हनुमान जयंती इत्यादी नेमकी कोणती तिथी असावेत हे त्या त्या रामायण महाभारत ग्रंथात आहे कि ह्या तिथ्या पुराणे अथवा नेमक्या कोणत्या ग्रंंथातून सुचवल्या गेल्या आहेत की तसे कोणतेच स्रोत ठाऊक नाहीत .

३) व्यास महाभारत आणि वाल्मिकी रामायणात कॉमन नसलेले तुमच्या परिचयातील संस्कृत शब्द, मला स्वतःला आढळलेले असे शब्द म्हणजे चित्र, नन्द , मन्दीर हे शब्द रामायणात दिसले महाभारतात मिळाले नाही पण महाभारतात असे आढळल्यास अशा श्लोकाचा संदर्भ द्यावा. आणि असे अनकॉमन असामायिक आणखी शब्द सुचवावेत

४) माझ्या वाल्मिकी रामायण वाचनात उपनिषद आणि ब्राह्मण ग्रंथ* यांचा प्रत्यक्ष उल्लेख आला नाही. तसा तो कुठे असल्यास जाणकारांनी ससंदर्भ कल्पना द्यावी हि विनंती.

* (ब्राह्मण ग्रंथ म्हणजे ब्राह्मणांनी लिहिलेले ग्रंथ नव्हे तर तो अध्यात्मिक ग्रंथ रचनेतला एक टप्पा आहे. ज्यांना कल्पना नाही त्यांच्यासाठी)

५) वाल्मिकी रामायणातील दोन प्रसंग वाल्मिकी रामायणाच्या नेमक्या कोणत्या (संस्कृत) आवृत्तीतून येतात, आवृत्ती कांड, सर्ग आणि श्लोक क्रमांकासहीत माहिती हवी आहे.

५ अ) वाल्या कोळी ते वाल्मिकी हि महाराष्ट्रातील प्रचलीत कथेचे गूगलवर तुरळक हिंदी इंग्रजी संदर्भ दिसतात पण कथा नेमक्या कोणत्या संस्कृत ग्रंथातून घेतली गेली याचा आदमास येत नाहीए.

५ ब) युद्धकांडात रावणाने सगळे लढू शकणारे सोबती गमवल्यावर कोणतेसे अस्त्र मिळवण्यासाठी तो एक पुजा करण्यास घेतो , ती पुजा थांबवण्यासाठी वाली पूत्र अंगद मंदोदरीला वेठीस धरतो असे काहीसे वर्णन एका इंग्रजी लेखकाच्या पुस्तकात मिळाले पण इतर भारतीय खासकरुन वाल्मिकी रामायणा च्या कोणत्या आवृत्तीतून संदर्भ येतोय ते कळाले नाही.

प्रतिक्रिया

माहितगार's picture

26 Mar 2018 - 7:58 pm | माहितगार

धागा शीर्षक जरा व्यापक केले आणि अजून एक प्रश्न जोडला

पगला गजोधर's picture

26 Mar 2018 - 8:15 pm | पगला गजोधर

हिंदू धर्मीय देवतांच्या तिथ्यांचे जयंत्यांचे स्रोत नेमके कोणते ? म्हणजे जसे की राम नवमी कृष्ण जयंती हनुमान जयंती इत्यादी नेमकी कोणती तिथी असावेत हे त्या त्या रामायण महाभारत ग्रंथात आहे कि ह्या तिथ्या पुराणे अथवा नेमक्या कोणत्या ग्रंंथातून सुचवल्या गेल्या आहेत की तसे कोणतेच स्रोत ठाऊक नाहीत .

याविषयी मला दुसऱ्याचा (पुस्तक लेख इ )संदर्भ देता येत नाही.

माझ्या स्वतःच्या अल्पमतीनुसार,

तुम्ही वैदिक देवतांच्या तिथ्यांचे जयंत्यांचे रोपण (सुपरइम्पोज), कॉम्पुटरवर, पंचांगआधारित शेतीचे कृषीकॅलेंडर (भारतीय उपखंडाचे) , जर काही असेल तर करून पहा.

कृषीविषयक अर्थप्रवाह (अग्रेगेरिअन कॅशफ्लो) व वतांच्या तिथ्यांचे जयंत्यां यात काही परस्पर संबंध आढळतो का ?
जाणून घ्यायला मी स्वतः उत्सुक आहे .

समीर वैद्य's picture

2 Apr 2018 - 4:17 pm | समीर वैद्य

खालील दुवा मदत करू शकतो. पृष्ठ क्र. १८९३ वर नावांची सूची आहे.
https://www.gutenberg.org/files/24869/24869-pdf.pdf

ऊपयूक्त माहितीसाठी अनेक आभार

५) वाल्मिकी रामायणातील दोन प्रसंग वाल्मिकी रामायणाच्या नेमक्या कोणत्या (संस्कृत) आवृत्तीतून येतात, आवृत्ती कांड, सर्ग आणि श्लोक क्रमांकासहीत माहिती हवी आहे.

५ अ) वाल्या कोळी ते वाल्मिकी हि महाराष्ट्रातील प्रचलीत कथेचे गूगलवर तुरळक हिंदी इंग्रजी संदर्भ दिसतात पण कथा नेमक्या कोणत्या संस्कृत ग्रंथातून घेतली गेली याचा आदमास येत नाहीए.

५ ब) युद्धकांडात रावणाने सगळे लढू शकणारे सोबती गमवल्यावर कोणतेसे अस्त्र मिळवण्यासाठी तो एक पुजा करण्यास घेतो , ती पुजा थांबवण्यासाठी वाली पूत्र अंगद मंदोदरीला वेठीस धरतो असे काहीसे वर्णन एका इंग्रजी लेखकाच्या पुस्तकात मिळाले पण इतर भारतीय खासकरुन वाल्मिकी रामायणा च्या कोणत्या आवृत्तीतून संदर्भ येतोय ते कळाले नाही.

प्रचेतस's picture

13 Apr 2018 - 9:17 am | प्रचेतस

५ अ) वाल्या कोळी ते वाल्मिकी हि महाराष्ट्रातील प्रचलीत कथेचे गूगलवर तुरळक हिंदी इंग्रजी संदर्भ दिसतात पण कथा नेमक्या कोणत्या संस्कृत ग्रंथातून घेतली गेली याचा आदमास येत नाहीए.

५ ब) युद्धकांडात रावणाने सगळे लढू शकणारे सोबती गमवल्यावर कोणतेसे अस्त्र मिळवण्यासाठी तो एक पुजा करण्यास घेतो , ती पुजा थांबवण्यासाठी वाली पूत्र अंगद मंदोदरीला वेठीस धरतो असे काहीसे वर्णन एका इंग्रजी लेखकाच्या पुस्तकात मिळाले पण इतर भारतीय खासकरुन वाल्मिकी रामायणा च्या कोणत्या आवृत्तीतून संदर्भ येतोय ते कळाले नाही.

हे संदर्भ मी वाचलेल्या (वि.म. प्रत आणि भालबा केळकर प्रत) ह्या दोन्ही ठिकाणी नाहीत.

माहितगार's picture

27 Apr 2018 - 9:04 am | माहितगार

प्रयत्नपूर्वक माहिती देणार्‍या प्रतिसादासाठी अनेक आभार . ( मी प्रतिसाद बर्‍याच विलंबाने पाहीला त्याबद्दल क्षमस्व)

Jayant Naik's picture

29 Apr 2018 - 5:02 pm | Jayant Naik

प्रयत्न आवडला. तुम्ही म्हणता तश्या किती तरी शंका आहेत. या निमित्ताने थोडा अभ्यास होईल. धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.

हि कथा बहुदा नंतर घुसडली असावी . रामायणात याचा उल्लेख मला तरी सापडला नाही. माझ्या एका विद्वान मित्राने खालील दोन श्लोक वाल्मिकी बद्दल पाठवले आहेत .

"Valmiki Ramayana itself describes Valmiki (autobiographical) as one of the descendants of 'Pracheta' and, in another place, belonging to 'Bhrigu' gotra.

प्रचेत्सोऽहं दशमः पुत्रो राघवनंन्दन |
न स्मराम्यनृतं वाक्यमिमौ तु तव पुत्रकौ || 96:16

संनिबद्धं हि श्लोकानां चतुर्विंशत्सहस्रकम् |
उपाख्यानशतं चैव भार्गवेण तपस्विना || 94:24"

माहितगार's picture

30 Apr 2018 - 12:25 pm | माहितगार

@ प्रचेतस, तुमची आठवण केली गेली आहे हो :)

@ जयंत नाईक, हे श्लोक नेमक्या कोणत्या कांडात येतात ते बघतो. माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करुन प्रतिसाद देण्याबद्दल अनेक आभार .

माहितगार's picture

30 Apr 2018 - 1:51 pm | माहितगार

संदर्भ मराठी विश्वकोशात वाल्याकोळी दंतकथेची माहिती आहे , पण दंतकथेचा प्रथम ज्ञात स्रोत दिलेला नाही.

आपण उधृत केलेले श्लोक उत्तरकांडात येतात , वाल्मिकींची काही माहिती बालकांडात येते पण क्रिटीकल एडिशन नुसार हे दोन्हीकान्ड प्रक्षिप्ततेत मोडतत . उर्वरीत कांडामध्ये केवळ युद्धकांडाच्या शेवटी फलश्रूतीत कवि म्हणून वाल्मिकींचा उल्लेख येतो अर्थात या आणि इतर प्रक्षिप्ततांवर वर स्वतंत्र धागा लेख बनवून तयार आहे . जरासा अद्ययावत झाला की मिपावर टाकण्याचा मानस आहे .

माहितगार's picture

30 Apr 2018 - 3:32 pm | माहितगार

ओके दासबोध दशक सोळावा : सप्ततिन्वय समास पहिला : वाल्मीकि स्तवननिरूपण मध्ये अंशतः वाल्हाकोळी असा उल्लेख दिसतो, पण पूर्ण दंतकथा नाही पण .............पूर्वीं केली दृष्ट कर्में । परी पावन जाला रामनामें । नाम जपतां दृढ नेमें ...........उफराटे नाम म्हणतां वाचें । पर्वत फुटले पापाचे । ध्वज उभारले पुण्याचे । ब्रह्मांडावरुते ॥ ९ ॥ वाल्मीकें जेथें तप केलें । तें वन पुण्यपावन जालें । शुष्क काष्ठीं अंकुर फुटले । तपोबळें जयाच्या ॥ १० ॥ पूर्वी होता वाल्हाकोळी । जीवघातकी भूमंडळीं । तोचि वंदिजे सकळीं । विबुधीं आणि ऋषेश्वरीं ॥ ११ ॥ उपरती आणि अनुताप । तेथें कैंचें उरेल पाप । देह्यांततपें पुण्यरूप । दुसरा जन्म जाला ॥ १२ ॥ अनुतापें आसन घातलें । देह्यांचें वारुळ जालें । तेंचि नाम पुढें पडिलें । वाल्मीक ऐसें ॥ १३ ॥ वारुळास वाल्मीक बोलिजे । म्हणोनि वाल्मीक नाम साजे । ...

पण दृष्टकर्माचे पुर्ण वर्णन या दासबोध समासात तरी येताना दिसत नाही आणि समर्थांचा या कथेचा स्रोत कोणता याचाही उल्लेख नाही . उलटपक्षी स्मासाच्या सुरवातीस

* भविष्य आणी शतकोटी । हें तों नाहीं देखिलें दृष्टीं । धांडोळितां सकळ सृष्टि । श्रुत नव्हे ॥ २ ॥
* नसतां रघुनाथावतार । नाहीं पाहिला शास्त्राधार । रामकथेचा विस्तार । विस्तारिला जेणें ॥ ४ ॥

हे जे दोन श्लोक आहेत यांचा नेमका अर्थ काय होतो ?

दासबोध सन्दर्भ , ,

माहितगार's picture

30 Apr 2018 - 4:08 pm | माहितगार

ओके तरुणभारत मधील दिपाली पाटवदकर यांच्या लेखानुसार वाल्याकोळीची कथा अध्यात्म रामायणातून येते. अर्थात या माहितीस दुजोर्‍याची गरज वाटते.

ईंगजी विकिपीडियातील उल्लेखानुसार अध्यात्म रामायण हे ब्रह्मांड पूराणास बरेच नंतर जोडलेले प्रकरण आहे आणि कदाचित १४ व्या शतलातील रामानंद या कविंनी लिहिले असावे . अर्थात या सर्व माहितीस अधिक दुजोर्‍यांची गरज असावी. संदर्भ ईंग्रजी विकिपीड्या लेख ब्रह्मांड पुराण ; अध्यात्म रामायण , रामानंद

१) मंदिर शब्दाबद्दल मागे एकदा लिहिले आहे.
२) रामायण कथेचा काळ, सध्याचा संपात बिंदू कोणत्या काळात निश्चित करण्यावरून आला हे रामायण कथेतल्या काही उल्लेखांवरून टिळकांनी गणिताने काढले ते Orion पुस्तकात सापडेल. तर तो काळ इपू अडिच हजार वर्षं. त्या काळात कथेमध्ये येणारी पात्रे अमुक देवांचे अवतार लिहिले आहे तरी त्या सर्वांनाच देवपण दिले नसावे. ते नंतर कधीतरी जनमानसात रूढ झाले असेल. त्यामुळे ग्रंथ आधार नसावा.