COPYRIGHTS बद्दल माहिती हवीये.

किरण नाथ's picture
किरण नाथ in जनातलं, मनातलं
21 Mar 2018 - 1:09 pm

जर आपल्याला कोणत्याही पुस्तकाचा अनुवाद करायचा असेल किंवा एखादा video अनुवादित करायचा असेल तर त्याचे COPYRIGHTS कोणाकडे आहेत हे कसे शोधावे व त्याचा अनुवाद करण्याची परवानगी कशी घ्यावी, तसेच एखाद्या पुस्तकावरून किंवा कथेवरून जर videos बनवायचे असेल तर काय काय कायदेशीर बाबी बघाव्यात व त्याचे हक्क कसे घ्यावेत या बद्दल कृपया माहिती द्यावी.

साहित्यिकमत

प्रतिक्रिया

पण मिपावर धागा काढून विचारायचे कधी डोक्यातच नाही आले. धागा काढल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार!

माझा कॉपीराईट मिळवण्याबद्दलचा एक अनुभव:

http://copyright.gov.in/

ह्या साईटवरती मी माझ्या एका कवितेसाठी कॉपीराईट नोंदवला. आवश्यक ते डॉक्युमेंट्स स्पीड पोश्टाने त्यांच्या ऑफिसला पाठवले. फी भरली.

तीन वर्षे झाली तरी अजून कॉपीराईटचं सर्टिफिकेट घरी आलेलं नाही. साईटवर पाठवलं असा शेरा आहे. फोन केला तर उचलत नाहीत किंवा बिझी असतो नेहमी. ईमेल तर पाण्यासारखे वाहिले! पण काही उपयोग झाला नाही. रिप्लायचं देत नाहीत. ट्विटरवर PMO ऑफिसलाच लिहिले सरळ, मोदींना टॅग केले तरी काही उपयोग झाला नाही.

शेवटी कॉपीराईट ऑफिसला हात टेकले! ___/\___

Sandy

माहितगार's picture

21 Mar 2018 - 3:29 pm | माहितगार

माहिती आधिकारींचे संपर्क क्रमांक या दुव्यावर दिसतात त्यावरुन प्रयत्न करुन पहा . जस्ट सहज सुचले म्हणून फायदा होतो का माहित नाही.

चांदणे संदीप's picture

21 Mar 2018 - 4:53 pm | चांदणे संदीप

धन्यवाद माहितगार!

हाही प्रयत्न करून पाहतो.

Sandy

चांदणे संदीप's picture

21 Mar 2018 - 4:58 pm | चांदणे संदीप

रजिस्ट्रारचा नंबर वैध नाही म्हनतेंत आणि डेप्युटी फोन उचलत नाहीत. मेलामेली त्या आयडिंशी अनेकदा करून झालेली आहे.

"चलो दिल्ली" च करावं लागणार बहुतेक! :(

Sandy

माहितगार's picture

21 Mar 2018 - 6:12 pm | माहितगार

http://www.ipindia.nic.in/contact-us.htm

पेटंट ऑफीसच्या क्रमांकावर पुन्हा एकदा नंबर मागून पहावे असे वाटते.
किंवा https://spicyip.com/contact-us या स्पायसी आयपी वाल्यांना इमेल करुन संपर्काचे काय करावे या बद्दल सल्ला विचारुन पहावा

माहितगार's picture

21 Mar 2018 - 6:20 pm | माहितगार

रविशंकर प्रसाद साहेब त्यांच्या पिए साहेबांची मदत आगून बघा . दिल्लीला जाण्या पुर्वी शेवटचा ट्राय म्हणून

गामा पैलवान's picture

21 Mar 2018 - 7:04 pm | गामा पैलवान

संदीप चांदणे,

पैसे भरूनही यथोचित सेवा मिळाली नाही म्हणून ग्राहक मंचाकडे तक्रार करता येईल काय?

आ.न.,
-गा.पै.

नीलकांत's picture

21 Mar 2018 - 1:25 pm | नीलकांत

कुठल्याही पुस्तकावर पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव असते त्यासोबतच प्रताधिकार सुध्दा दिलेले असतात. मराठीत हे प्रताधिकार सहसा पुरूष लेखक असेल तर त्याच्या पत्नीच्या नावे असतात असे निरिक्षण आहे.
व्हिडीओ जर ऑनलाईन असेल तर त्याचा सोर्स शोधता आला तर त्याच्या निर्मात्यापर्यंत जाता येईल. व्हिडीओ ऑफलाईन असेल तर सुरूवातीला किंवा शेवटी श्रेयनामावली असते त्यातून ही माहिती कळू शकेल.

माहितगार's picture

21 Mar 2018 - 3:53 pm | माहितगार

अनुवाद करण्यासाठी अधिकार मागण्याचा अनुभव नाही. कॉपीराईट फ्री करुन द्या अशी विनंती करण्याचा जरासा अनुभ्व आहे. कॉपीराईट विषयक अल्पसे लेखन मिपावर केले आहे ते तोंड ओळखीस कदाचित उपयोगी पडेल का माहित नाही. सध्या गेल्या काही महिन्यापासून मी टच मध्येही तरीही जे माहिती होते त्यावरुन यथामती खालील प्रमाणे.

१) लेखी पत्रव्यवहार लेखी संवाद करण्याची मानसिक तयारी हवी .

२) वर नीलकांतांनी म्हटले तसे ; कुठल्याही पुस्तकावर पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव असते त्यासोबतच प्रताधिकार सुध्दा दिलेले असतात. ते पहावे

३) लेखक आणि प्रकाशन भारतातील आहे का भारता बाहेरील आहे पहा

४) लेखक आणि प्रकाशकांच्या उपलब्ध पत्त्यांची संपर्क पत्त्यांची नोंद घ्या

५) लेखक अद्याप जिवंत आहे का मृत्यू पावला आहे याची काही प्राथमिक माहिती आंतरजालावर मिळते का पहावी

६) लेखक मृत्यू पावला असेल तर त्या देशाच्या नियमाने कॉपीराईट अजून चालू आहे की संपला आहे ह्याचा प्राथमिक अंदाज घ्यावा. अत्यंत सरावल्या शिवाय तुमचे अंदाज प्राथमिकच असतील हे गृहीत धरून चला आणि सविस्तर मार्गदर्शनासाठी कॉपीराईट विषयात काम करणार्‍या अनुभवी वकीलाचा सल्ला घेणे प्रशस्त असावे. वकीलाच्या सल्ल्यानुसार पत्र व्यवहार करावा

उत्तर दायकत्वास नकार लागू

जयन्त बा शिम्पि's picture

21 Mar 2018 - 9:13 pm | जयन्त बा शिम्पि

गीत रामायणाच्या हीरक वर्ष निमित्त मी गीत रामायणावर एक लेख मालिका लिहुन प्रकाशित करण्यापूर्वी, गदिमां च्या पुढच्या पिढीकडून अशी परवानगी मिळवली होती व त्यांनीही ती आनंदाने दिली होती. योगायोगाने त्याच वर्षी "गीत रामायण " या अजरामर साहित्याला ६० वर्षे पुर्ण झालेली होती.

चौथा कोनाडा's picture

21 Mar 2018 - 11:27 pm | चौथा कोनाडा

रोचक विषय अन उदबोधक चर्चा !

चाळता चाळता बौद्धिक संपदा & कॉपीराईटमधील आंतरराष्ट्रिय तज्ज्ञ डॉ. मृदुला बेळे यांची माहिती मिळाली.
त्यांनी लोकसत्ता मध्ये या वर एक सदर लिहिले होते ते आठवले.

यू ट्युबवर खालील क्लिप मध्ये त्यांचा सहभाग असलेली चर्चा सापडली:

जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिनानिमित्त विशेष कार्यक्रम : डॉ. मृदुला बेळे

किरण नाथ's picture

22 Mar 2018 - 11:22 am | किरण नाथ

क्लिप पाहिली. खूप चांगली माहिती आहे त्यात.

प्रभादेवी,दादर येथे फिल्म इन्स्टिट्युट/लॅबमध्ये सिनेमातील गाणी,दृष्ये यांचे वापरण्यासाठीसे पैसे भरून राइट्स मिळतात हे माहित आहे. उदा० मराठी मालिकेत पात्र एखादे हिंदी गाणे गातो आहे तर त्याचा राइट विकत तिकडून घेतात.
पुस्तकांसबंधी त्यात्या लेखक/प्रकाशकाकडून हक्क-कधी-कशाचे-किती काळासाठी-मोबदला वगैरे करार करून सक्षम रेजिस्ट्रारकडे नोंद करावी लागेल.