आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने ..

डिस्कोपोन्या's picture
डिस्कोपोन्या in काथ्याकूट
20 Mar 2018 - 3:56 pm
गाभा: 

आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने ,

मध्यंतरी पुण्यात (तसं हे सगळ्याच शहरात घडतंय,पन पुण्यात फार चर्चा झाली ) चिमण्या अचानक कमी झाल्या त्याला मोबाइल टावर्स च्या EM रेडिएशन ला जबाबदार धरल गेल पण सत्य हे आहे की, पुण्यातल्या किराणा भुसार व्यापार्यांनी भूतदया या गोंडस नावाखाली फक्त पराव्यांना दाना पानी देऊन त्यांची संख्या अतिप्रचंड वाढवली ...आणि त्यामुळे चिमन्या कावळे यांच्या नैचरल हैबिटैट चा imbalance झाला आणि संख्या कमी झाली...आणि पक्षी म्हणजे फक्त पारवे नाहीत ....या पारव्यांची संख्या प्रचंड वाढल्याने इतर पक्षी विशेषतः चिमण्या कमी होतात तसेच हे पारवे जवळ जवळ आपल्याच घरात असल्यासारखे बिनधास्त घरट करून राहतात ...आणि मेडिकली प्रूव झालय् की पारवे आपल्या अजुबाजुला जास्त असतील तर त्या परिसरात श्वसन रोग वाढतात....

पारव्यांची संख्या कमी करण्यासाठी काही tried &tasted उपाय -

१.घरात मस्त मांजर पाळने, आणि त्याला फक्त दुधावर न पोसणे, हां एक खात्रीशिर उपाय आहे, मांजर खोडकर आणि पारवे धीट असतात त्यामुळे नेहमीच यांचा एनकाउंटर होतो आणि मांजर पारव्यांची शिकार करून संख्या कंट्रोल मधे ठेवते, आणि बॅलन्स मेन्टेन झाला की चिमण्याची संख्या नक्की वाढते. मांजर चिमण्याशी सहसा खेळत नाही, खेळल तरी चिमणी मांजराला खुप कमी वेळा सापडते. मांजरा मुळे घरात पाली, झुरळ सुद्धा नियंत्रित राहतात .

२. ज्यांना मांजर फोबिया आहे त्यानी , आमच्या घरात एक टेस्टेड उपाय केलाय त्याप्रमाणे मांजर किंवा कुत्र्याचे सॉफ्टटॉय जिथे जिथे पारवे नेहमी येतात तिथे म्हणजे टेरेस बालकनी वगेरे ठिकाणी ठेवावे आणि हे सॉफ्टटॉय बदलत राहावे आणि त्याची जागा सुद्धा नेहमी बदलत रहावी, किमान आपल्या आसपास त्यांचा वावर कमी होण्यास नक्की मदत मिळते.
इत्यादी इत्यादी ...

काहीही करा पन या पारव्यांचे जास्त लाड करू नका ....

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

20 Mar 2018 - 5:37 pm | प्रसाद गोडबोले

एका चिमणी अभ्यासकाचे लेक्चर अटेन्ड केले होते त्यात त्याने चिमण्यांची संख्या कमी का होत आहे ह्यावर चिकित्सा केली होती :

त्याच्या मते - चिमण्यांची संख्या कमी होण्याचे सर्वात मोठ्ठे कारण म्हणजे प्रदुषण ! चिमण्या जरी दाणे खात असल्या अतीही चिमण्यांची पिले लहाअन्पणी फक्त लहान लहान किटक खाऊनच जगु शकतात , वाढत्या प्रदुषणामुळे ह्या किटकांची संख्या कमी होत गेली आणि त्यामुळे आपोआपच चिमण्याची संख्याही कमी होत गेली ! प्रदुषण कमी झाले तर छोटेमोठे किटक वाढतील अन चिमण्याही !

अर्थात मोठ्ठ्या स्क्लेल वर हे होणे तुर्तास तरी अशक्य दिसते !

अन्य अभ्यासक मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडतील !

माहितगार's picture

21 Mar 2018 - 10:56 am | माहितगार

पर्यावरणाचे माहित नाही, संस्कृती कदाचित तशीही बदलली असती, पण आठवणीत असताना संस्कृती बदलते तेव्हा काही तरी कुठेतरी चुकल्यासारखे वाटते. अगदी मागच्या पिढी पर्यंत चिउताई लहान्ग्यांच्या गोष्टीत असत, मोठ्यांमध्येही जसे बाळ असत तश्या चिमणाबाई पण असत, कालाय..

सुखीमाणूस's picture

21 Mar 2018 - 12:00 am | सुखीमाणूस

फार घाण करतात.अतिशय घाणेरडा पक्षी आहे.
आणि चिवट पण....

त्याना दाणे खायला घालणारे व्यापारी ही भूतदया थाम्बवतील तर बरे!!!

१) चिमण्या हव्या का कबुतर नको नक्की कोणता मुद्दा घ्ययचा ते कलळलं नाही.
२) काल खफवर चिमणीचं घरटं कसं बनवायचं - म्हणजे आपण नाही बनवायचं, घरट्यासाठी योग्य जागा करून द्यायची ते लिहिले होते.
३) युअरोपात बय्राच चौकात कारंजे आणि जवळच कबुतरांना दाणे टाकण्याची जागा असे (फोटोंत ) पाहतो.

बरेच दिवस मोबाईल टोवरच्या वाढत्या संख्येमुळे चिमण्या कमी होत आहेत असे एकत होतो, पण हि लिंक काहीतरी वेगळेच सांगत आहे.
मातीअभावी हरवल्या चिमण्या

हि आणखी एक लिंक
चिमण्याचे संरक्षण, संवर्धन दुर्लक्षित

विशेष म्हणजे जश्या चिमण्या कमी झाल्या तसे बुलबुल पक्ष्यांची संख्या वाढल्याचे माझे निरीक्षण आहे.
अर्थात अगदीच निराश होण्याचे कारण नाही. त्यादिशेने सकारात्मक पावले पडत आहेत.
चिमुरड्यांनी साकारली पाच हजार घरटी

सांगलीतील चिमण्यांच्या संख्येमध्ये चौपट वाढ
अश्या प्रकारची घरटी बनवून आपण चिमण्याना वाढण्याची संधी देउ शकतो.
चिमण्यांनीही स्विकारली कृत्रिम घरटी

आमच्या घरी टांगलेल्या एका कृत्रिम घरट्यात आजवर असंख्य चिमणा-चिमणींचे संसार फुलले आहेत. पुठ्ठ्यापासून बनवले आहे. आता थोडे कमकुवत झाले आहे, पण त्यात चिमण्यांची पिल्लं आहेत. त्यामुळे ते काढून त्याजागी दुसरे टांगता येत नाहीये. आता सांप्रत बिऱ्हाड उडून निघून गेले की मग किमान पाचेक घरटी एकत्रच बसवायचा विचार आहे.

सस्नेह's picture

21 Mar 2018 - 9:23 pm | सस्नेह

चिमण्यांची अपार्टमेंट ? :))

बोलघेवडा's picture

21 Mar 2018 - 10:19 pm | बोलघेवडा

एससाहेब, एखादा फोटू बिटू टाका ना त्या घरट्याचा! म्हणजे आम्हालाही काही तयार करता येईल. कृती लिहिल्यास उत्तम.

घरटे कसे करायचे ( खोका फक्त, गवतकाडी चिमण्याच आणणार) त्याचे डिजाइन अमच्या येथे मिळेल.