मदत हवी आहे

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in काथ्याकूट
19 Mar 2018 - 2:32 pm
गाभा: 

आम्ही सेकंड हॅंड चारचाकी गाडी olX वर पाहत आहोत. गाडी मुंबईमध्ये पाहत आहोत (कारण त्या इथे तुलनेने स्वस्त आहेत.) व तीचा वापर कोल्हापूर मध्ये होणार आहे. घरातील सदस्य 4 आहेत. बजेट 1.5 लाख. गाडी पाहताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात. वॅगन आर, अल्टो, स्वीफ्ट उपलब्ध आहेत. सध्या कुणालाही धड ड्रायव्हींग येत नसल्याने थोडे दिवस वापरून गाडी चालवण्याचा सराव झाला की ही गाडी विकून नवी घ्यायची आहे. कुणाला याबाबत काही अनुभव असल्यास सांगा.

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

19 Mar 2018 - 2:45 pm | चांदणे संदीप

सध्या कुणालाही धड ड्रायव्हींग येत नसल्याने थोडे दिवस वापरून गाडी चालवण्याचा सराव झाला की ही गाडी विकून नवी घ्यायची आहे.

नवीन गाडी घ्या व शिका.
१) गाडी चालवायला शिकणे/चालवणे अगदीच काही रॉकेट सायन्स नाही.
२) गाडी चालवायला शिकायला काहीच वेळ लागत नाही. मी स्वतः दोन तासात शिकलो.
३) दीड लाखात गाडी घेऊन ती चालवायला शिकल्यावर विकायला लगेचच काढली तरी सेकंड ओनर कन्सेप्टने तिची मार्केट व्हॅल्यू खूपच कमी होईल म्हणजेच नुकसान. त्यापेक्षा जुनी गाडी घेऊन निवांत वापरा.
४) नवीन गाडी घेतलीत तर १०-१२ वर्षे बघायला नको. अर्थात नीट वापरली तरच!

अजून एक...
कोल्हापुरात राहून मुंबई पासिंगची गाडी घेणे अतिशय ईललॉजिकल वाटतंय. बाकी तुमची मर्जी!

Sandy

पगला गजोधर's picture

19 Mar 2018 - 3:24 pm | पगला गजोधर

ताक फुंकून प्या ..

मुंबई समुद्र प्रदेश आहे , दमट हवामान...
त्यामुळे गाड्या ५ वर्ष्यापेक्षा जुनी असेल तर गाजली किती ते पहा..
साधारपणे जुने मालक
रंगाचा हलका हात मारून ठेवण्याची शक्यता गृहीत धरा ...

पगला गजोधर's picture

19 Mar 2018 - 3:25 pm | पगला गजोधर

जुनी असेल तर *गाजली किती ते पहा..

*गंजली किती ते तपासा

श्वेता२४'s picture

19 Mar 2018 - 3:48 pm | श्वेता२४

हा मुद्दा लक्षात नव्हता आला. सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

मुंबई पासिंग 5 वर्ष जुनी गाडी घेऊन मी पस्तावलो आहे.. 3 लाखाची गाडी, डीड लाख मेन्टेनन्स आणि 2 वर्षांनी सव्वा लाखला विक्री. प्रॉब्लेम एकाच, गंजका पत्रा. MH 12 बेस्ट.

तेव्हा विचार करा. किंवा बेस्ट autogear नवीन घ्या असे सुचवेन.

पगला गजोधर's picture

19 Mar 2018 - 5:02 pm | पगला गजोधर

का कोणास ठाऊक, पण सेकंड ह्यांड गाडी बद्दल एकदम तिटकारा आहे.

कर्ज काढून आल्टो ८०० घ्या .. पण नवी घ्या...

टवाळ कार्टा's picture

19 Mar 2018 - 5:33 pm | टवाळ कार्टा

माझीच गाडी विकायची आहे (इथे झैरात चालेल का?)

पगला गजोधर's picture

19 Mar 2018 - 5:47 pm | पगला गजोधर

टक्कू त्यांना स्कुटी नक्कोय ...

टवाळ कार्टा's picture

19 Mar 2018 - 5:52 pm | टवाळ कार्टा

फक्त पुणेकरच दुचाकीला "गाडी" म्हणातात :प आणि मी पुणेकर नाही

पगला गजोधर's picture

19 Mar 2018 - 5:57 pm | पगला गजोधर

नै तसं पुणेकर केळ्याच्या हातगाडीला सुद्धा गाडी म्हणतात...
पण म्हटलं, काही नवतरुण सुंदर मुलींच्या कॉलेजबाहेर स्कुटीवरून घिरट्या घालत असतात...
:P

टवाळ कार्टा's picture

19 Mar 2018 - 7:56 pm | टवाळ कार्टा

तेच तर....स्कूटी घेउन घिरट्या घालायच्या कि हसर्या चेहर्याने बोलायचे हे समजले पाहिजे....असो....ज्याची त्याची पोच ;)

टवाळ कार्टा's picture

19 Mar 2018 - 7:57 pm | टवाळ कार्टा

आणि पुणेकरांबद्दल बोलण्याइतके ते अजून इतके महत्वाचे नाही झालेत =))

पगला गजोधर's picture

19 Mar 2018 - 8:01 pm | पगला गजोधर

एनी गुड न्यूज टका ?
:)

टवाळ कार्टा's picture

19 Mar 2018 - 8:20 pm | टवाळ कार्टा

बर्याच आहेत

पगला गजोधर's picture

19 Mar 2018 - 8:40 pm | पगला गजोधर

"गुड न्यूज"
"गोड बातमी"

बर्याच ???
लब्बाड..

मराठी कथालेखक's picture

19 Mar 2018 - 5:41 pm | मराठी कथालेखक

तुम्ही नुकतीच गाडी शिकत आहात तर तुम्ही गाडी फारशी नीट तपासून बघू शकाल असे वाटत नाही. माहितीतल्या आणि विश्वासू माणसाकडून गाडी तपासून वगैरे बघणार असाल तर ठीक नाही तर true value (मारुती) वा तत्सम यंत्रणेतून जूनी certified car घ्या.

कंजूस's picture

19 Mar 2018 - 6:59 pm | कंजूस

**गंजली किती ते तपासा**

भारी मुद्दा. रैट.
नवी मुंबईत /वाशी MH43 - त्यातल्या त्यात बरे.
पार्किंग रग्गड असल्याने कमी गंजत असतील.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Mar 2018 - 7:43 pm | राजेंद्र मेहेंदळे

१.लोकल पासिंगची गाडी घ्या(सातारा,सांगली , कोल्हापुर)
२. सेकंड हँड गाडी प्रॅक्टीस साठी घ्यायची तर सँट्रो/अल्टो/वॅगनार मिळाली तर बघा (नॅनो नको, रीसेल किंमत मिळत नाही), ३-४ वर्षांनी विकता येईल
३. खरे सांगयचे तर ड्रायव्हिंग स्कुलमध्ये जाउन शिका आणि नवीनच गाडी घ्या. लोन होइल, इन्शुरन्स होईल, ७-८ वर्षे मस्त जाईल, टेन्शन नको.

सेकंड हँड गाडी प्रॅक्टीस साठी घ्यायची तर सँट्रो/अल्टो/वॅगनार मिळाली तर बघा (नॅनो नको, रीसेल किंमत मिळत नाही), ३-४ वर्षांनी विकता येईल.
या मताशी घरातले सगळेच सहमत आहेत. आणि अल्टो किंवा वॅगन आर पाहत आहोत. स्वीफ्ट पण उपलब्ध आहेत पण 2008 ची व 130000 ला मिळतेय. वॅगन आर 2008 च्या पण याच रेंज मध्ये उपलब्ध आङेत. एक अल्टो 2011 ची 1.20 ला उपलब्ध आहे. रिसेल गाडी असल्यामुळे जाणकार टेक्निशिअन कडून तपासून मगच घेणार आहोत. मला हीच माहिती हवी होता की सेकंड हॅंड गाड्या घेताना लोक कोणत्या कंपनीला प्राधान्य देतात जेणेकरुन 3-4 वर्षांनी विकायचीच झाली तर अडचण होणार नाही. स्वीफ्ट पेट्रोल गाडी बद्दल कुणाला काही माहित आहे का

टेक्निशिअन कडून तपासून मगच घेणार आहोत.

१. आपल्या "नेहमीच्या" मैकेनिकला दाखवण्यात काही अर्थ नसतो. कार खुळखुळा असणे यात गुंतलेले त्याचे हितसंबंध अटळ असतात.

२. इतर कोणी सो कोल्ड "त्रयस्थ आणि विश्वासू" (दोन्ही संज्ञा प्रत्यक्ष आयुष्यात काल्पनिक मानाव्यात) टेक्नीशियन सोबत आला तरी त्याला जितपत तपासणी करायचा वाव मिळतो तेवढ्यात तो फार फार तर बाह्य दोष, गियरशिफ्टचा कडकपणा, सस्पेंशनची स्थिती इतपतच सांगू शकतो. अगदी नजीकच्या काही महिन्यांत कोणते मोठे बारीक दोष उत्पन्न होतील हे खरोखर कोणी तितक्या तपासणीवरुन सांगू शकत नाही.

विकायला काढलेल्या पाच वर्षाहून जुन्या सेकण्डहैंड गाडीत भरपूर दोष असणारच. ते गृहीत धरावेच. अपेक्षा फार न ठेवता आणि रिस्क मान्य करुनच जुन्या कार्स घ्याव्यात. वेअर आणि टियर होऊन होऊन खिळखिळी झाल्याशिवाय, खूप दुरुस्त्या निघू लागल्याशिवाय आणि मेंटेनेंस खर्च भाराभर वाढल्याशिवाय कोणीही कार विकायला काढत नाही. एखाददुसराच अपवाद असेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Mar 2018 - 12:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कार देखो ह्या वेब साईटवरही पाहून घे ग श्वेते.
https://www.cardekho.com/used-car-details/used-Fiat-Linea-2007-2013-T-Je...
फियाटच्या गाड्या जास्त खपत नाहीत मात्र पत्रा ईतर गाड्यांच्या तुलनेत जाड असतो व इंजिन्,सस्पेशंन वगैरे च्या बाबतीतही मारूतीरावांपेक्षा सरस असतात.

सस्नेह's picture

20 Mar 2018 - 12:24 pm | सस्नेह

माईसाहेब, आपल्याला याही विषयात गती आहे वाट्टं ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2018 - 1:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यांच्या ह्यांनी सांगितले असेल (यावेळेस त्या तसे नमूद करायला विसरल्या असाव्यात... होतं असं वयोमानाप्रमाणं) =))

सस्नेह's picture

21 Mar 2018 - 11:22 am | सस्नेह

=))

श्वेता२४'s picture

20 Mar 2018 - 12:57 pm | श्वेता२४

नक्की पाहून घेते.

पगला गजोधर's picture

20 Mar 2018 - 1:31 pm | पगला गजोधर

नै ते ठीक आहे हो माई...
पण डायरेक.... श्वेते ???

श्वेता२४'s picture

20 Mar 2018 - 1:56 pm | श्वेता२४

मी मिपावर नवीन आहे परंतु श्र्वेते म्हणल्यावर असं वाटलं की खूप आधीपासून आहे मी इथे अशी हाक माझ्या जवळच्या मैत्रिणी मारतात त्यामुळे मिपावर माझी पहिली जवळची मैत्रिण म्हणजे माईसाहेब

प्रचेतस's picture

20 Mar 2018 - 5:29 pm | प्रचेतस

माईसाहेब मित्र पण असू शकतो.

चौथा कोनाडा's picture

20 Mar 2018 - 11:00 pm | चौथा कोनाडा

:-)

यांच्या ह्यांनी सांगितले असेल (यावेळेस त्या तसे नमूद करायला विसरल्या असाव्यात... होतं असं वयोमानाप्रमाणं) =))
यावरुन मी आपला अंदाज केला................

मार्मिक गोडसे's picture

20 Mar 2018 - 5:05 pm | मार्मिक गोडसे

मुंबईतूनच गाडी घ्यायची असेल तर एखाद्या डॉक्टरची गाडी घ्या. डॉक्टर आपल्या गाडीची व्यवस्थित देखभाल घेतात. ठेकेदाराची फुकट मिळाली तरच घ्या.

एखाद्या डॉक्टरची गाडी घ्या. डॉक्टर आपल्या गाडीची व्यवस्थित देखभाल घेतात.

हे खूप जणांकडून ऐकलंय. जाहिरातीतही उल्लेख असतो "डॉक्टरची कार", "Used by a Doctor" असं.

ते खरं असेलही, पण कार्यकारणभाव कळला नाही अजून कधी. डॉक्टर का बुवा गाडीची खास काळजी घेत असावेत? इमर्जन्सी व्हीजिटच्या वेळी गाडीने दगा देऊ नये म्हणून? पण तशी तर सर्वांचीच इच्छा असते की गाडीने त्रास देऊच नये. हौ डझ द्याट ड्राईव्ह स्पेसिफिकली डॉक्टर्स टू टेक मोअर स्पेशल केअर ऑफ कार? अं?

सुनील's picture

21 Mar 2018 - 2:10 pm | सुनील

एकेकाळी मुंबईत पारश्याच्या मालकीच्या गाडीला भाव होता. "Parsi owned car" असे आवर्जून लिहिले जाई.

आता मुदलात तेवढे पारसीच राहिले नाहीत (गाडीवालेतर अगदीच कमी).

अलीकडे अनेक ठिकाणी "Parsi owned plots" असाही ठळक रिमार्क हायवेवर जाहिरातीच्या होर्डिंग्जवर केलेला पाहिला. म्हणजे क्लियर टायटलची शक्यता जास्त असा असतो का? की अशी काही जमीनीची कैटेगरी आहे कागदोपत्री? (जशी वतनाची जमीन, इनाम जमीन, वर्ग १, वर्ग २ वगैरे)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Mar 2018 - 2:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"डॉक्टर का बुवा गाडीची खास काळजी घेत असावेत?"
डॉक्टर म्हंटला की तो गाडी त्याचे घर-दवाखाना-होस्पिटल-घर.. ह्या पलिकडे जास्त चालवणार नाही अशी एक समजूत. ताडोबा,पन्हाळा,अनवट किल्ले.. अशा ठिकाणी तो सहसा स्वतःच्या गाडीने न जाता तुझ्या त्या झूम कार वा तत्सम भाड्याच्या गाडीने जाईल.
गाडीची झीज कमी..

पगला गजोधर's picture

21 Mar 2018 - 3:02 pm | पगला गजोधर

माई ... माई ... अगं कुठून गं आणतेस एवढा समजूतदारपणा ??

("तळपाय मळले तर एकवेळ चालेल, पण मन मात्र मळू देऊ नकोस शाम !" असं म्हणणाऱ्याची आठवण करून देणाऱ्या मिपावर फक्त माईंचं .. )

पगला गजोधर's picture

21 Mar 2018 - 3:03 pm | पगला गजोधर

माई ... माई ... अगं कुठून गं आणतेस एवढा समजूतदारपणा ??

("तळपाय मळले तर एकवेळ चालेल, पण मन मात्र मळू देऊ नकोस शाम !" असं म्हणणाऱ्याची आठवण करून देणाऱ्या मिपावर फक्त माईंचं .. )

गाडी घेणार तर ,नवीनच घेणार असा निर्धार करा, संदीप चांदणे यांच्या मताशी एकदम सहमत आणि कोल्हापुरात वापरणार असाल तर चांगल्या पार्किंगची आधी सोय करा. कोल्हापुरात लोक खुप महागड्या गाड्या घेतात अन रस्त्यावर पार्किंग करतात. मग रस्त्यावर खेळणारे खेळाडू ,नविन गाड्याची वाट लावतात. मी तर म्हणेन ज्याची पार्किंगची सोय चांगली आहे त्यांनीच मोठी गाडी घेणे योग्य आहे.

असंका's picture

21 Mar 2018 - 2:13 pm | असंका

नवीच बघा... शिकणार्‍याला विश्वास वाटला पाहिजे गाडिवर... नैतर काही त्रास झाला तर आपलं चुकलं की गाडीचं चुकलं हेसुद्धा लक्षात येणार नाही शिकत असताना...

जर वापरलेली गाडी (हे दुचाकी/तिचाकी/चारचाकी/इ. इ. प्रत्येक गाडीला लागू आहे. यावरून सदरहू प्रतिसादक पुणेरी असावा हे समजण्यास सूज्ञास तोशीस पडू नये) घ्यायचा विचार करत असाल तर गाडी माहितीतल्या कारमालकाकडून घ्यावी. मारुती ट्रु व्हॅल्यू, महिंद्रा फर्स्ट चॉईस इ. च्या नादी लागू नये. असे एजंट सर्वप्रथम गाडीचे रनिंग कमी करतात. उदा. गाडी एक लाख किमी धावली असेल तर हे लोक आधी ते रिडींग तीस-पस्तीस हजारांपर्यंतही खाली आणायला मागेपुढे पहात नाहीत. दुसरे म्हणजे, ते एकशेआठ चेक्स वगैरे वगैरे सर्व दिखाऊ असतं. निव्वळ धूळफेक. अशा एजंटकडून गाडी घ्यायला जाल तर त्याने सांगितलेल्या किमतीत त्याचा किमान तीस टक्के नफा असणार हे नक्की. गाडी किती चालली असावी हे पाहण्याचा ठोकताळा म्हणजे पहिल्या विक्रीची तारीख ते आजचे वर्ष यात किती वर्षांचा कालावधी लोटला आहे त्याला साधारणतः दहा हजार किमीने गुणायचे. हा आकडा प्रत्यक्षात कमीजास्त असू शकतो, परंतु गाडीची झीज किती झाली असावी ह्याचा अंदाज बांधायला उपयुक्त आहे. अजून एक रूळ ऑफ थंब म्हणजे तीस-चाळीस हजार किमीपेक्षा जास्त जुनी डिझेल गाडी आणि पन्नास-साठ हजार किमीपेक्षा जास्त जुनी पेट्रोल गाडी शक्यतो टाळावी. कारण यानंतरच खरा मेंटेनन्स निघायला सुरुवात होते. आणि सीएनजी लावलेली गाडी जुनी घेऊच नये.

इन अ नटशेल, जुनी गाडी घेताना
अ) सेकंड हॅन्ड कार डीलर कडून घेऊ नये. घेतलीच तर जोरदार घासाघीस करायला लाजू नये.
आ) कुठल्याही मॅकेनिकवर कदापिही विश्वास ठेवू नये.
इ) जुनी गाडी आपल्या पाहण्यातली असावी.
ई) सर्व्हिस रेकॉर्ड व इन्श्युरन्स हिस्ट्री तपासून घेणे.
उ) जुनी गाडी ड्रायव्हिंग शिकून हात साफ करून घेण्यापुरती वापरावी (साधारणतः एक वर्ष जास्तीत जास्त.)
ऊ) नंतर ही गाडी विकून नवीन गाडी घ्यावी.

ब्रॅण्डबद्दल : जुनी गाडी किंवा स्वतःची नवीन गाडी घ्यायला बरेच जण मारुतीला प्राधान्य देतात. परवडते म्हणून आणि सेकंडहॅण्ड/थर्डहॅण्ड विकली जाते आरामात म्हणूनही. इतर ब्रॅण्डपैकी आय टेन पाहू शकता.

श्वेता२४'s picture

23 Mar 2018 - 1:24 pm | श्वेता२४

माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले. मी अशाच प्रतिसादाच्या प्रतिक्षेत होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Apr 2018 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण प्रतिसाद !

रूळ ऑफ थंब हे वाचलं आणि "रेल्वेसुद्धा सेकंडहँड विक्रिला उपलब्ध आहे की काय?" असा विचार मनात चमकला ! ;) :) (हघ्यावेसांन)

जर कार पहात असाल तर इ'करंजी मधे कार सेल चालु आहे मारुती सुझुकी शोरुम जवळ कोपु रोडवर. भेट देऊ शकता.
शक्यतो सॅंट्रो किंवा अल्टो घ्या. वॅगन आर स्पीड मधे हेलकावे खाते. आणि अंतर ही लवकर कापत नाही.
सॅंट्रो माझी पहिली पसंती होती. पण सध्या अल्टो वापरतो.

सुबोध खरे's picture

2 Apr 2018 - 8:17 pm | सुबोध खरे

एक वेगळा विचार
नवी गाडी विकत घेणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. नव्या गाडीची सर जुन्या गाडीला कधीही येणार नाही.
जुनी गाडी घेतली आणि एक दोन वर्षांनी विकली तर साधारण लाख रुपये नुकसान ( खरेदी आणि विक्री किमतीतील तफावत आणि जुन्या कारच्या दुरुस्ती वर येणारा खर्च) होईल. यात होऊ शकणाऱ्या कटकटीची मानसिक किंमत किती तो प्रश्न अलाहिदा.
या एक लाख रुपयात आपल्या घरचे सर्व जण ड्रायव्हिंग स्कुलमध्ये शिकून अतिरिक्त पैसे भरून सराव करून भरपूर तयार होऊ शकतील.
पहा विचार करून