हा क्षण भाग ४

vishalingle25793's picture
vishalingle25793 in जनातलं, मनातलं
7 Mar 2018 - 10:13 pm

भाग पहिला

भाग दुसरा

भाग तिसरा

"Set wide the window. Let me drink the day." - Edith Wharton
-------------------------

काळे सर आणि त्यांची क्लासरूम. .. मला पडलेल्या अनेक कोडयांपैकी हा व्यक्ती एक कोडंच. .. साधारणतः तिशीतला, नेहमी चेहऱ्यावर हास्य असणारा, प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक क्षणातही आनंद शोधणारा हा व्यक्ती. .. फॉर्मल जीन्स, काहीतरी इंस्पिरेशन कॉट असणारी प्लेन टी-शर्ट किंवा चेक्स चं शर्ट, डोळ्यावर काळ्या फ्रेम चा फायबर चा चष्मा, जीन्स च्या खिशाला ला निळ्या आणि लाल रंगाचे पेन. .. खरं सांगायचं तर हा व्यक्ती मला शिक्षक वगैरे अजिबात वाटत नाही. .. कारण तो तसा वागत हि नाही. .. कुणी पहिल्यांदा बघितलं तर वेड्यात काढावा असा हा विक्षिप्त व्यक्ती. .. पण आयुष्य जगायचं कसं हे शिकविण्या साठी या व्यक्तीसारखा शिक्षक भेटणे कठीण. .. काळे सर आणि त्यांची क्लासरूम. .. क्लासरूम? ?? छे. ..! एका इंग्लिश लिटरेचर च्या शिक्षकाची क्लासरूम कशी असावी? गार्डन. ..! महाविद्यालयाच्या भव्य परिसरातलं भलं मोठं तळं, त्याच्या अवतीभोवती फळा-फुलांची सुंदर बाग, तळ्याच्या किनाऱ्यावरून संध्याकाळचा मावळतीचा सुंदर सूर्य दिसावा अशी बसण्यासाठीची छोटीशी जागा. .. कॉलेज च्या कॅन्टीन चा कट्टा असावा तशी गोलकार बसण्याची व्यवस्था. .. तळ्याकिनारची हि जागा म्हणजे काळे सरांची क्लासरूम. ..!
बाकी सरांची शिकवणी एकदम भन्नाट. .. कुणीही आजपर्यंत या व्यक्तीचा एकही क्लास बुडविलेला नाही. .. ५ जून २०१६ चा तो दिवस. .. जागतिक पर्यावरण दिवस. .. गेल्याच आठवड्यातला. .. शनिवार. .. सकाळ चं सुंदर वातावरण, आजूबाजूला उमललेली सुंदर फुले, पक्ष्यांचा मधुर आवाज, दोन पावसानंतरची ती सुखावणारी सोनेरी माती. .. सगळं सगळं मला अजूनहि जसंच्या तसं लक्षात आहे. .. सकाळचे ५:३० वाजलेले. .. पाहिल्या शिकवणीची वेळ. .. आम्ही सगळे मुख्य इमारतीपासून १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आमच्या क्लासरूम मध्ये पोहोचलो. .. रस्ता पायदळी तुडवत. .. आम्ही म्हणजे सुरज, अमन, प्रिया, नीधी, सनम, आणि. .. आणि ओमिका. .. गुलाबासारखी कोमल, त्यासारखीच सुंदर, त्यासारखीच नाजूक, गुलाबाच्या पाकळ्यांसारखेच सुंदर ओठ, आणि त्यावर थांबलेल्या दवासारखे चकाकणारे डोळे. .. नक्षत्रांभोवती किनार ओढवी तसं डोळ्यांभोवती काजळ, नागीणीसारखी सळसळणारी तिच्या चेहऱ्यावरची बट. .. जगातल्या सगळ्या उपमा तिला दिल्या तरी कमीच पडतील कदाचित. .. तिला शब्दांत मांडणेच अशक्य. .. तांबड्या रंगाच्या सोनेरी नक्षीच्या साडीत अगदी गुलमोहरासारखी दिसत होती. .. ती माझ्याच जवळ येवून बसली. .. माझ्या हाताला तिच्या हातांचा स्पर्श झाला आणि उगाच मनात गुलमोहराचा गंध दरवळल्यासारखं झालं. ..
माझं ओमिकावर प्रेम तर नाही नं. ..? तिच्या सोबत असल्यावर मला स्वतःचं हि भान राहत नाही. .. प्रत्येक क्षणी फक्त तिच्या सोबत राहावंसं वाटतं. .. ती सोबत असताना मी तिच्याच सारखा वागतो. .. का?

मिसेस सरपोतदार आल्या होत्या गेल्या आठवड्यात. .. माझ्यासाठी बर्थडे प्रेझेंट घेवून. .. मिसेस सरपोतदार दरवर्षी या दिवशी काही नं काही बर्थडे प्रेझेंट घेवून येतात. .. बर्थडे स्पॉइल करायला माझा. .. मला या बाईला भेटण्याची मुळीच इच्छा नाही हे कळत कसं नाही तिला. ..

२९ मे. .. माझा वाढदिवस. .. मस्त सिलेब्रेट करत होतो आम्ही. .. आदित्य आणि तन्मयी पण आलेले. .. भन्नाट मस्ती चालू होती. .. तेवढ्यात मिसेस सरपोतदारांचा उपहारगृह प्रवेश. .. मी सांगितलं त्यांना मला तुम्हाला भेटायची मुळीच इच्छा नाही, मला नेहमी भेटायचा प्रयत्न करत जाऊ नका म्हणून. .. आणि मी सरळ निघून आलो इकडे तळ्याकिनारी. .. एकटाच. .. पण जाता जाता मला मिसेस सरपोतदारांच्या डोळ्यांत पाणी दिसलं. .. नकळत माझे पण डोळे कधी भरून आले मला कळलंच नाही. ..

काय माहित किती वेळ बसलो असेल मी तिथे एकटाच. .. क्षितिजाच्या पल्याड जात भास्कराला निरोप देत बघत. .. नेहमी सोनेरी किरणांनी भरलेलं हे सुंदर वाटणारं आकाश आज मला मुळीच सुंदर वाटलं नाही. .. उलट हळूहळू वाढत जाणारा अंधार मला हवाहवासा वाटायला लागला. .. घराकडे परतणाऱ्या पक्ष्यांचा आवाज मला आज कर्कश वाटत होता. .. इतक्यात कुणाचा तरी हात माझ्या खांद्यावर पडला. .. मी वळून बघितलं. .. ती ओमिका होती. .. ह्या परिस्थितीतही तिच्या पांढऱ्याशुभ्र ड्रेस वर च्या गुलाबी नक्षी च्या किनारी आणि मॅचिंग इअररींग्स आणि ब्रॅसलेट कडे माझं लक्ष गेलंच. .. पलीकडे सूर्य मावळला होताच आणि इकडे चंद्र उगवला होता. .. ओमिका माझ्या शेजारी येवून बसली. .. तळ्यातल्या संथ पाण्याकडे आम्ही बघत होतो. ..

"तू असा का वागलास तुझ्या आई सोबत?", ओमिका शांत स्वरात म्हणाली. .. तिची नजर अजूनही पाण्याकडेच होती. .. मी शांतच होतो. .. हळूच तिने माझ्याकडे बघितलं. ..
"तन्मयी आणि आदित्य ने सांगितलंय मला सगळं. .. तू असं वागायला नको होतं. ..", तन्मयी. ..
"मग कसं वागायला हवं मी?", माझा आवाज आता शिथिल झाला होता पण माझ्या मनात अजूनहि मिसेस सरपोतदारांबद्दल राग होताच, " मी ३ वर्षांचा होतो, ताई ७ वर्षांची. .. सगळं व्यवस्थित होतं, कशाचीही कमी नव्हती, जेव्हा मिसेस सरपोतदार यांनी बाबांशी घटस्फोट घेतला आणि दुसरं लग्न केलं. .. आम्हाला एकटं सोडून. .."

"कशाचीही कमी नव्हती. ..? नक्की? ?? हे तू अगदी विश्वासाने सांगू शकतोस?", तन्मयी. ..

"म्हणजे?", मला तन्मयी चा रोख कळलाच नाही. ..

"शांततेने ऐकून घेशील माझं म्हणणं? म्हणजे फक्त ऐकून घे. ..! बघ पटलं तर. .."

"हम्म्म. .."

"माणूस सातत्याने प्रेमाच्या शोधात असतो. .. आणि दुर्दैवाने माणूस लग्न व्यवहारासारखा करतो. .. लग्न हा व्यवहार नाही. .. तडजोड हा प्रकार येथे लागू होत नाही. .. मग माणसाला ज्या गोष्टीची गरज असते, त्यालाच माणूस मुकतो. .. प्रेम. .. कधी कधी माणसाला हेच प्रेम दुसऱ्या व्यक्ती कडून मिळते. .. जगातील बहुतेक घटस्फोटाचं हे च कारण असतं. ..!
तुझ्या आईने घटस्फोट घेतला पण तुम्हाला एकटं नाही सोडलं, नाहीतर तू निघून गेल्यावर त्यांचे डोळे कधीच भरून नसते आले. .. दरवर्षी न चुकताही तुला भेटायला म्हणून. ..", ओमिका दोन क्षण थांबली. .. माझ्याकडे बघितलं. .. "जगात आनंदी राहायचं असेल नं तर साधा सरळ नियम आहे सीड, 'ऍक्टसेप्ट'. ..!"

ओमिकाचं मला सगळंच पटतं असं नाही. .. 'ऍक्टसेप्ट'. .. सनम चं ब्रेकअप झालं तेव्हा पण तन्मयीने हे च वाक्य वापरलं होतं, "आपल्या घरात बघ अनेक वस्तू असतात. .. उदा. सोफा, दार वगैरे. .. त्या दारावरचे परदे, किंवा सोफ्यावरच्या चादरी पण बदलवत असतो आपण नेहमी. .. चादरी बदलवणे शक्य नसलं तर किमान सोफ्याची जागा तरी बदलवतो आपण. .. कारण माणूस हा बदलप्रिय प्राणी आहे. .. त्याला सातत्याने काहीतरी नवीन हवं असतं. .. आणि त्यासाठीच माणूस झगडत असतो. .. हि गोष्ट प्रेमात का लागू होऊ नये? जगात आनंदी राहायचं असेल नं तर साधा सरळ नियम आहे, 'ऍक्टसेप्ट'. ..!"

प्रत्येक सिच्युयेशन ला 'ऍक्टसेप्ट' करायचं? ??

असो. .. ५:३५. .. काळे सरांचा वर्गप्रवेश. .. २ फोर व्हिलर, आणि एक २ व्हिलर असूनहि हा व्यक्ती मुख्य इमारती पासून इथवर सायकल नेच येणार. .. आज सरांच्या प्लेन व्हाईट टी-शर्ट वर,
"carpe diem
seize the day"
,असं ब्लॅक अँड रेड अक्षरात इंग्रजीत लिहिलेलं होतं. .. आजवरच्या अनुभवांतून आजचा विषय आमच्या लक्षात आला होता. ..

"गुड मॉर्निंग सर. ..", आम्ही सारे सोबतच म्हणालो. ..

"गुड मॉर्निंग. .. आज आपण लेक्चर राहू देऊ. .. त्यापेक्षा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ..", आम्ही सारे आश्चर्याने सर कडे बघत होतो,"मला आता येताना नं आज त्या पिंपळाच्या झाडावर दोन सुंदर सुतार पक्षी दिसले. .. तुमच्यापैकी कितींनी ते पक्षी बघितलेत. ..?"

आम्ही सारे शांत. ..

"कुणीच नाही? बरं जाऊ द्या. .. फार सुंदर आहेत ते पक्षी कुणाला बघायचे असतील तर बघून घ्या. .."

"सर आतापर्यंत ते पक्षी तिथे राहले असतील का?", सूरज उवाच. ..

"बरोबर, मग तुम्ही पण येता येताच का नाही बघितलेत ते पक्षी. ..?"

"सर तुमचं लक्ष गेलं, सगळ्यांचंच कसं जाईल नं. .. आम्ही वर्गाचा विचार करत होतो येताना. .. आणि तेव्हा ते पक्षी असतील तिथेच कशावरून नं. ..", प्रिया. ..

"बरं मग काय काय बघितलंत तुम्ही? बाभळीला घरटं बांधणारी चिमणी, गुलाबाच्या फुलांवरचे दव, जास्वंदाच्या फुलावरची फुलपाखरे तरी?"

आम्ही सगळे गप्प. ..

"बघा, शिकवणीच्या विचारात तुम्ही हे सारं बघितलंच नाहीत. .. तुम्ही हे सारं सारं मिस केलं. .. आणि मी शिकवणी पण घेणार नाही आहे. .. मग आता?

रॉबर्ट हेररिक ची एक कविता आहे. .. त्याच्या सुरुवातीच्या काही ओळी आहेत. .. त्या अश्या. ..
Gather ye rose-buds while ye may;
Old Time is still a-flying;
And this same flower that smiles today,
Tomorrow will be dying.
काहितरी जास्त मिळविण्याच्या अपेक्षेत आपण बहुतेक दा आपल्याकडे जे आहे ते पण गमावून बसतो. .. जसं तुम्ही गमावलंय, फुलांचं उमलनं, फुलांचं हसणं, पाकळ्यांवरचे दव. .. हे सारं नसेल पुढच्या क्षणी. .. उद्या कदाचित फुल पण नसेल. .. म्हणून एक म्हण आहे. .. इंग्रजीतली. .. 'stop and smell the roses'
थांबा. .. थांबा आणि अनुभवा या फुलांच्या गंधांना, या क्षणांना. ..
'take the cash and let the credit go'. .. पुढे काय होईल, काय मिळेल त्याचा विचार सोडा, या क्षणी जे जे आहे त्या क्षणांत जगा. .. दुरून डोंगर साजरे असं म्हणतात. .. 'the grass is always greener on the other side'. .. भविष्यात आपण ठरवू तसंच सगळं होत नसतं. .. म्हणून भविष्याचा विचार सोडा. .. या क्षणांतला आनंद घ्या. .. 'Better an egg today than a hen tomorrow'. ..

हेनरी डेव्हिड म्हणतो,
You must live in the present, launch yourself on every wave, find your eternity in each moment. Fools stand on their island of opportunities and look toward another land.
There is no other land; there is no other life but this.

प्रत्येक क्षण सातत्याने भूतकाळात जमा होत आहे. .. हा क्षण परत येणार नाही. ..! प्रत्येक जाणारा क्षण आपल्याला एक एक पाऊल पुढे घेऊन जातोय, अंताकडे. ..!

कुण्यातरी जे. फर्निस चं एक वाक्य आहे, Never forget that you must die; that death will come sooner than you expect... God has written the letters of death upon your hands. In the inside of your hands you will see the letters M.M. It means "Memento Mori" - remember you must die.

वर्जिल च्या एका ओळीचा माझ्यावर फार प्रभाव आहे,
Death twitches my ear. 'Live,'he says, 'I am coming.'

म्हणून जगा, पुढचा विचार न करता जगा, या क्षणांत. ..
Dream as if you will live forever; Live as if you will die today.

'A simple definition of life: The chance'
मी इतकंच म्हणेल कि dont miss this chance. ..!

Don't be fooled by the calendar. There are only as many days in the year as you make use of. ..

कुठेतरी वाचलेली एक कविता ऐकवतो,

I looked after an old lady and she always used to say
‘Three things never come back…
The spoken word, the sped arrow, and the neglected opportunity’
I look back on my life, yes I have regrets
Of the things I’ve done, or I haven’t done
The things I’ve said or I haven’t said
We must remember, life is all too short
None of us know what is around the corner
So seize the moment and do it now
Grab every opportunity you can
Tell people around you that you love them
For tomorrow may never come…
Carpe Diem – seize the day. .."

आम्ही सारे सरांकडे फक्त बघत होतो. ..

"चॅप्टर थ्री, टॉपिक नाईन्थ, पेज नंबर वन वन ऐट. ..! कार-पे डी-एम. ..!
एन्जॉय दी प्रेजेन्ट अँड डोन्ट वरी अबाऊट दी फ्युचर. ..
फाईन्ड आऊट अँड स्टडी मोअर अबाऊट दिज टॉपिक, अँड वी विल डिस्कस अबाऊट इट इन अवर नेक्स्ट लेक्चर. ..
आणि परत जाताना निसर्ग जे दाखवेल त्याचा आनंद घ्या, डोन्ट मिस इट. ..! थँक यु. ..! !!"

क्रमश:. ..

© विशाल इंगळे

कथालेख

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

8 Mar 2018 - 11:16 am | विजुभाऊ

मायला........... काय भन्नाट लिवतोय रे हा गडी.
लैच भारी. वातावरण यक्जॅक्ट हुबं केलंय .
आपल्या कडून मुंबैत असाल तर एक झकास पावभाजी आणि पुण्यात असाल तर मस्तानी कबूल.

पद्मावति's picture

8 Mar 2018 - 2:10 pm | पद्मावति

चारही भाग वाचले. मस्तच लिहिताय.

आनन्दा's picture

8 Mar 2018 - 2:14 pm | आनन्दा

छान लिहिताय..
पण एक विनंती आहे.
थोडी गॅप टाका. लेखन तयार असेल तरी आम्हाला पचवायला थोडा वेळ द्या..