हा क्षण भाग २

vishalingle25793's picture
vishalingle25793 in जनातलं, मनातलं
7 Mar 2018 - 10:03 pm

मुंबई-पुणे हाईवे. .. कार ची स्पीड, ताशी ८० किमी. .. आदित्यच्या हातात स्टेरिंग. .. डाव्या बाजूला तन्मयी. .. हातात पार्सल. .. अचानक आदित्य ने ब्रेक मारला. .. समोरून येणारी एक दूसरी फोर व्हीलर अगदी जवळून निघुन गेली. .. आदित्य ने ब्रेक मारण्यास अगदी एका क्षणाचा ही विलंब केला असता तर मोठा अपघात झाला असता. .. दूसरी फोर व्हीलर तशीच समोर निघुन गेली. .. आदित्य आणि तन्मयीने एक वेळ त्या फोर व्हीलर कडे बघितलं. .. ती दूसरी फोर व्हीलर नजरेआड़ झाली आणि आदित्यने स्टेरिंग वर डोकं ठेवलं. .. डोळे घट्ट मिटले. .. आणि कलर सिनेमांमध्ये जश्या ब्लैक एंड वाइट फ्लैशबैक दाखवतात तशी दृष्ये त्याच्या डोळ्यांसमोर फिरायला लागली. ..

"हट्ट ***. .. आदि, गाड़ी बाकी फार छान चालवतोस यार तू. .. थोडक्यात वाचलो नाहीतर आज रात्री उर्वशी आणि मेनका सोबत नृत्य करायची संधी मिळाली असती. ..", सिद्धार्थ. ..
घाटांचा रस्ता. .. अचानक गाडीचा तोल जायला लागला. .. आदित्यने ब्रेक मारला. .. गाडी अगदी दरिपासून फक्त एका फूटाच्या अंतरावर येवून थांबली. ..
"ऐ चुप. .. जोक्स सुचतायेत याला. .. आणि माझी काहीच चुकी नाहीयेय यात. .. टायर पंक्चर झालाय बहुतेक. ..",आदित्य. ..
तिघेही फोर व्हीलर मधून खाली उतरले. .. टायर खरोखरच पंक्चर झालेला. ..
"या तन्मयीला ही बरंच सुचलं ईथे घाटांत फोटोग्राफी चं. .. हिच्या फोटोग्राफी च्या चक्कर मध्ये माझी फोर व्हीलर गेली असती आज. ..",आदित्य. ..
"ये जीव वाचलाय त्याचं काही नाही, कार चं सुचतंय त्याला. .. आणि नेशनल लेवल फोटोग्राफी कॉन्टेस्ट आहे म्हंटलं, या पेक्षा चांगले फोटोग्राफ्स कुठे येतील. .. आजुबाजुला बघ जरा. ..", तन्मयी. ..
"बाकी हे मला पटतंय तन्मयीचं. .. हे ठिकाण खुपच सुंदर आहे. ..", सिद्धार्थ स्टेफनी चेंज करता करता बोलला. ..
"अरे पण जीव गेला असता नं. ..?", आदित्य. ..
"अरे होतं असं कधी कधी. .. गाडीचा टायर पंक्चर झाला यात तिची काय चुकी आहे. ..", सिद्धार्थ. ..
"हो नं सिड? तसा पण गाड़ी तू चालवत होता, चूक तुझी आहे. ..",तन्मयी आदित्य कडे बघुन म्हणाली. ..
"ऐ चुप, तुमच्या दोघांनाही फक्त भांडायला कारण हवं असतं. .. कुणाचीच चूक नाहियेय यात. .. टायर चेंज केलाय, चला निघुया. .. आणि आता गाडी मी चालवणार. ..",सिद्धार्थ. ..
"म्हणजे उर्वशी सोबत नाचायचं पक्क झाल्यासारखं दिसतय तुझं?",आदित्य आणि तन्मयी बैकसीट वर बसले. .. सिद्धार्थने गाड़ी स्टार्ट केली. ..
"मी काय म्हणतोय, मी काहीतरी ठरवलय आताच. .. मी बाबांना सांगणारेय की मला इंजीनियरिंग नाही करायचीय. .. मला लेखकच व्हायचंय म्हणून. ..", सिद्धार्थ. ..
"काका नाही ऐकणार, तुला माहितेय. .. लेखन वगैरे सेफ प्रोफेशन नाही वाटत त्यांना. .. शिवाय तू दरवर्षी प्रथम येतो, तुला कुठल्याही मोठ्या कंपनीत जॉब मिळेल. ..", तन्मयी. ..
"समज आज आपली गाडी सरळ दरीत पडली असती तर? असं समजू नं की सिद्धार्थ राजपूत, आदित्य विनायक, तन्मयी महाजन दरीत पडून गेले. .. सिद्धार्थ, फ़क्त सिद्धार्थ. .. सिद्धार्थ, तन्मयी आणि आदित्यचा हा नवीन जन्म. .. आता तरी आपण आपल्या स्वप्नांसाठी जगायला हवं. .. फक्त विचार करायला आयुष्य खुप लहान आहे. ..", सिद्धार्थ. ..
"काका घराबाहेर काढतील तुला. ..!",तन्मयी. ..
"हम्म्म्म्म. ..", सिद्धार्थ दोन क्षण शांत. ..
"ये आदि, बाबाने घराबाहेर काढलं तर तुझ्या अपार्टमेंट मध्ये राहायला देशील नं काही दिवस?",सिद्धार्थ. ..
"काही पण काय विचारतोस सिड? ऑफकोर्स यार. .. पण मला माहितेय तशी वेळ येणार नाही. ..",आदित्य. ..

तन्मयीने आदित्यचे खांदे हलवले. .. आदित्य पुन्हा वर्तमानात. .. गाड़ी परत स्टार्ट झाली. ..
"हे मी ठरवलंय की मी जॉब सोडणारेय आता. .. आपल्या स्वप्नांसाठी आपल्याला वेळच मिळत नाही, हे जाणवतंय मला. .. मला कळतंय आता सिड ला काय म्हणायचं होतं तर. ..",आदित्य. ..

मुंबई-पुणे हाईवे, वेग ताशी ८० किमी. ..!

तन्मयीने गाडीतला रेडिओ ऑन केला. .. आशा भोसले यांचं "कतरा कतरा" गाणं चालू होतं. .. तन्मयीने ख़िड़कीतून बाहेर डोकावून बघितलं. .. वाऱ्याची एक झुळुक तिच्या चेहर्यावरुन गेली. .. आणि तन्मयी भुतकाळात हरवली. ..

सिद्धार्थ, आदित्य आणि तन्मयी चौपाटिवर बसलेले. .. लाटांना निरखत. .. सिद्धार्थच्या म्यूजिक प्लेयर वर आशा भोसले चं गाणं, "कतरा कतरा". .. आशा भोसले सिद्धार्थची फेवरेट गायिका. .. लता मंगेशकर मात्र त्याला बिलकुल आवडत नाही. ..

"मला वाटतं तू जायला हवं. .. तू इतकी मेहनत घेतलीस या कॉम्पेटिशन साठी. .. तुझं स्वप्न आहे हे. .. तूला यात आंनद मिळतो आणि म्हणून तू जायलाच हवं. ..",सिद्धार्थ. ..
"अरे पण मग परिक्षेचं कसं?", तन्मयी. ..
"बघ तुझ्या सेफ करियर आणि स्वप्नांमधुन तुला एक चूज करायचंय. .. स्वप्नांना करियर करता येईल, करीयर ला स्वप्न नाही करता येत. .. तुला ज्या गोष्टींतून आनंद मिळतो, तू ते च करायला हवं. .. माझं ऐकशील तर तुझ्या स्वप्नांतून अधिक सेफ करीयर निर्माण करशील तू स्वतःसाठी. .. हां, थोडा त्रास होईल पण. .. मला वाटतं तू जायला हवं तिथे. ..",सिद्धार्थ. ..

गाडी थांबली. .. तन्मयी भानावर. ..
"हे जर मी त्या दिवशी सिडचं ऐकलं नसतं तर? आज मी माझ्या स्वप्नांना आणि कदाचित स्वतःलाही हरवून बसले असते. .. थैंक यू सिड. ..",तन्मयी. ..
आदित्यने तन्मयीच्या डोळ्यांत बघितलं. .. तिच्या डोळ्यांत पाणी. .. आदित्यने तिचे डोळे पुसले. .. थोडासा हसला. .. दोघेही गाडीतून उतरले. .. शे-दीडशे वर्षांआधीचा जूना वाडा, पण अजुनही भक्कम. ..
लग्नाची धावपळ चालू. .. सगळे घाईत. ..
दोघेही वाडयात शिरले. .. समोर "ओमिका" ची आई दिसली. .. त्या हातातलं काम टाकून दोघांकडे आल्या. ..
"नमस्कार काकू. .. ओमिका?",तन्मयी. ..
"तिच्या रूम मध्ये आहे, मैत्रिणींसोबत. .. येताना त्रास नाही न झाला? तुम्ही भेटा तिला. .. मी तुमच्यासाठी चहा-पाण्याचं बघते. .."
"कशाला काकू फॉर्मलिटीज. ..? चहा वगैरे नको. ..", आदित्य. ..
"हो नं. .. आम्ही तिला भेटतो आधी. ..", तन्मयी. ..
"अरे, दमला असाल. .. पाणी वगैरे तरी घ्याल नं. .. लांबच्या प्रवासावरुन आलात. .. तुम्ही व्हा समोर, मी पाठविते कुणाला तरी. ..",काकू परत कामाला लागल्या, कुणाला तरी त्यांनी दोघांसाठी चहा आणि नाश्त्याचं बघायलाही सांगितलं, आदित्य आणि तन्मयी सरळ ओमिका च्या रूमकडे चालायला लागले. .. छातीचे ठोके वाढत होते, डोक्यात विचारांनी काहुर माजलेला. .. दोघे ओमिकाच्या रूम पर्यंत पोहोचले. .. एकदा एकमेकांकडे बघितलं. ..
आणि मग हातातल्या पार्सलकडे. ..!

- विशाल इंगळे

-------------------------

कथालेख