रायगडावरच्या अपरिचित जागा कोणत्या?

हकु's picture
हकु in काथ्याकूट
1 Mar 2018 - 12:21 pm
गाभा: 

रायगडावर अश्या कोणत्या जागा/कोणती ठिकाणं आहेत की जी सर्वसामान्यपणे अपरिचित असतात? रायगडाचा विस्तार फार मोठा आहे आणि संपूर्ण बघून व्हायला निदान आठवडा लागत असावा असा माझा अंदाज आहे. सामान्यतः आपण ज्या जागा बघतो त्या व्यतिरिक्त काही जागांची माहिती असल्यास कळवावी ही विनंती.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Mar 2018 - 1:46 pm | प्रचेतस

मिपाकर स्वच्छंदी मनोज हा रायगडाचा चालताबोलता कोष आहे. ही माहिती तोच सांगू शकेल.

हकु's picture

1 Mar 2018 - 3:32 pm | हकु

अच्छा, धन्यवाद!

सतिश गावडे's picture

1 Mar 2018 - 2:05 pm | सतिश गावडे

जिथे अजून कुणीही गेले नाही अशा जागा.

अभ्या..'s picture

1 Mar 2018 - 3:03 pm | अभ्या..

कशाला?
ट्रेझर ऑफ अनसीन रायगड......फीलींग आवसम..... असले स्टेटस झळकावयाला?
भरपूर पुस्तके आहेत, अभ्यास करा, जमत नसल्यास प्रत्यक्ष जा, जमेल तितक्या वेळी जा, प्रत्येक वेळी रायगड नव्याने भेटतो.

किसन शिंदे's picture

1 Mar 2018 - 3:42 pm | किसन शिंदे

तू कितीवेळा गेलास बे? =))

अभ्या..'s picture

1 Mar 2018 - 11:25 pm | अभ्या..

चार.

वझेबुवा's picture

1 Mar 2018 - 6:27 pm | वझेबुवा

चांगला विषय घेतलात हकू...

अनुभवी भटक्यांकडून अपरिचित ठिकाणे माहिती करून घेणे आवश्यक आहे.

मला गोनीदांच्या 'शिवतीर्थ रायगड'मधून आडवाटेच्या ३ गुहांची माहिती मिळाली, ज्या मशीदमोर्च्याहून रुळलेली वाट सोडून पाहू शकतो.

आणि मध्ये एफबी वरून 'निसाणीची गुहा' किंवा 'निसाणीचा पहारा' या बद्दल कळले, जेथे जाण्यासाठी महादारवाज्याच्या तटबंदीची वाट पकडावी लागते.

वरील ठिकाणी प्रत्यक्ष गेलो नाहीये, जायची इच्छा आहे.

माहितगारांनी अधिक प्रकाश टाकावा...

सतिश गावडे's picture

1 Mar 2018 - 6:56 pm | सतिश गावडे

माहितगारांनी अधिक प्रकाश टाकावा...

अगदी योग्य मिपाकरास विचारले आहे तुम्ही. माहितगारांनी अधिक प्रकाश टाकल्यावर तुम्हाला अपरिचित जागांच्या निसटत्या बाजूही दिसतील. ;)

माहितगार's picture

6 Mar 2018 - 9:50 am | माहितगार

=))

इथे पहा. अजून एक होता विडिओ, सापडला तर देतो.

लिंक देताना गडबड झालेली दिसतेय. इथे आहे
https://m.youtube.com/watch?v=SgMUTcU76-s

कपिलमुनी's picture

2 Mar 2018 - 3:03 pm | कपिलमुनी

आपण स्वतः न पाहिलेली प्रत्येक जागा अपल्यासाठी अपरिचित असते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Mar 2018 - 6:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण मला वाटले तु रायगडवरच्या तु पाहिलेल्या अनवट जागांबद्दल लिहिशील. त्यामुळे थोडी निराशा झाली धागा उघडल्यावर. असो.

हाहा! धन्यवाद राजेंद्र दादा!
पण अजून तरी तितकी माहिती गोळा करू शकलेलो नाही. पण जितकी जमेल तितकी मिळवत राहीन आणि सांगत राहीन.

प्रसाद गोडबोले's picture

3 Mar 2018 - 10:35 am | प्रसाद गोडबोले

रायगडावर गुप्त खजिना आहे म्हणे कुठेतरी ! सुरतेतुन लुटुन आणलेल्या साधन सामग्रीपैकी काही अति मौल्यवान कला कुसरीच्या गोष्टी आणि हिरे माणके असावीत बहुतेक

फार पुर्वी त्या शोधासाठी कोणातरी माणसाने समाधी उकरायला घेतली होती असे वाचनात आले आहे !

पण माझ्या वैयक्तिकमते खजिना प्रतापगडावर असावा .

ख्या ख्या ख्या

manguu@mail.com's picture

3 Mar 2018 - 7:18 pm | manguu@mail.com

गड किल्ला जेंव्हा वापरायचा बंद केला असेल तेंव्हा सगळी संपत्ती शेवटचे लोक घेऊन गेले असतील की.. ते कशाला तिथे झाकून ठेवतील ?

नाखु's picture

3 Mar 2018 - 7:41 pm | नाखु

त्यांनी काही नर "रत्ने" मागेच सोडली आहेतच याचा प्रत्यय येतो आहे हे लक्ष्यात घेत असलेला नाखु वाचकांची ही पत्रेवाला

ओम शतानन्द's picture

4 Mar 2018 - 7:20 pm | ओम शतानन्द

रायगडावर शिवाजी महाराजांनी आग्रहाने आपल्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांसाठी बांधवून घेतलेली मशीद आहे असा इतिहासकारांनी उल्लेख केला आहे , त्या मशिदीबद्दल अधिक माहिती कुणाला आहे का ?

अर्धवटराव's picture

5 Mar 2018 - 5:35 am | अर्धवटराव

कुठल्या इतिहासकाराने हा उल्लेख केला आहे ?

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Mar 2018 - 11:16 pm | अनिरुद्ध.वैद्य

गुप्त असावी बहुधा.

प्रचेतस's picture

6 Mar 2018 - 9:09 am | प्रचेतस

शां. वि. आवळसकरांच्या 'रायगडाची जीवनकथा' ह्या पुस्तकात मशिदीचा कुठलाही उल्लेख नाहीये (हे पुस्तक रायगडाची इत्यंभूत माहिती देतं). मात्र नाणे (नाना)दरवाजातून वर येताना किंवा चित्त दरवाजातून चढून गेल्यावर वाळसुर्‍याची खिंड पार केल्यावर डाव्या बाजूला थोडे खालचे बाजूस मशिद मोर्चा नावाचे एक ठिकाण आहे, येथे पूर्वी एखादे मेट असावे. मशिद मोर्चा हे नावही बहुधा मूळच्या कागदपत्रांत नाही. रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर गडाचे नाव इस्लामगड झाले तेव्हा ह्या मेटाला मशिद मोर्चा नाव दिले गेले असावे.

ह्याशिवाय जगदीश्वराच्या शिलालेखात देखील इतर सर्व बांधकामांचे उल्लेख असता लेखनिक मशिदीचा उल्लेख करत नाही हे विशेष.

मनो's picture

10 Mar 2018 - 11:37 pm | मनो

हे वाचा.

महाराजांनी कधीही कुठेही मशीद बांधलेली नाही.

https://drive.google.com/file/d/0B_hbiN5lXt31amRIcFlmM09SZ3M/view