"मोहरलेले" 13 तास पुणे - गोवा रेस दिवस दुसरा.

अजित पाटील's picture
अजित पाटील in भटकंती
21 Feb 2018 - 11:12 am

वाचण्या आधी काही सूचना !
एकूण वर्णाचा वेळ 13 तास !
एकूण अंतर 230 किलो मीटर !
एकूण लिहायला लागलेला वेळ 10 तास !
एकूण वाचायला लागणार वेळ किमान अर्धा तास !
एकूण तेवढा वेळ ठेऊन,सगळंच वाचा तर मजा !
एकूण वेळ सांगणं हे निमित्त,बाकी ही सगळीपण मजा!

"सरफरोशी तमन्ना आज हमारे दिल मे है !
देखना है जोर किताना बाजुये कातिल मे है !"

दिवस पहिला पासून पुढे 
क्रमशः
आदल्या दिवशी झोपताना वाघोलीला गेलेल मन त्वरित कागला आणणे अत्यंत आवश्यक होतं.
कारण किमान सहा तासाची झोप आवश्यक होती.
सकाळी साडेचार ला उठलो .सगळे ठीक ठाक होते .
हो ना!, उठल्यावर कुठे काय दुखतय, खुपतय असे असले की बोंबलल . पण सगळे ओके मस्त आंघोळ करून सगळ्या गोष्टी अंगावर चढवून शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार झालो रेस च्या पुढच्या आणि शेवटच्या टप्प्या साठी. "कागल" ते " गोवा डोना पोला" एकूण अंतर 230 km पण आव्हान होते
" चोरल्याच्या घाटाच "
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोल्हापूर पर्यंतचा रस्ता माहीत होता, सरळ होता ,फक्त खाली मान घालून पॅडल मारायचं एवढंच होत. आत मात्र तस न्हवते .आदल्या दिवशी मीटिंग मध्ये विशी ने सगळी वळणे रस्ते हे सगळंच विडिओ मध्ये दाखवले होते पण कुठे लेफ्ट, कुठे राइट , सगळी पोजीशन एकदम टाईट. सगळं डोक्याच्या वरून अर्धाफूट गेले. मी आपली त्याच्या ऑफिसला मस्त ब्लॅक एक्सप्रेसो प्यालो आणि मजा करता निघून आलो, बघू म्हटलं होईल तस ,
पण आता मात्र ते चेंनमा सर्कल ,क्लॉक टॉवर, सीचोलिम ,बिचोलीम ब्रिज वरून जायचं ,
खाली उतरायचं ,हे सगळं डोक्यात थैमान घालत होत कागल ते बेळगाव सरळ रस्ता होता .
बेळगाव नंतर जरा अडथळ्यांची शर्यत होती .
"हरी उपर हवाला " ! असे म्हणून 6.30 ला गारवा सोडला. आणि खऱ्या अर्थाने गारवा सुटलाच एक एक रायडर सुसाट वेगाने निघाला साधारण कागल सोडल्या नंतर हायवे एखाद्या अजगरा सारखा वाटत होता लांबच लांब जाऊन जणू म्हणत होता ,
"धर की लेका लवकर येऊन "!

एखाद्या "रोलर कोस्टर राइड " सारखा हा टप्पा आम्ही पार करत होतो मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे पहिल्या दिवसा नंतर एक ठराविक 5 ते 7 जण सोडले तर नंतरच्या सगळ्यान साठी हा एक " माईंड गेम " होता .जो " टिकेल तो पोहचेल" आणि 
"टिकणे न टिकणे " हे सगळं तुम्ही ज्या विविध परिस्थितीतून जात असता,
त्यात तुम्ही स्वतःला कसे 
"टिकवता " यावर अवलंबुन असते .
पहिला टप्पाच जरा मोठा होता.
बेळगाव पासून पुढे, उजवीकडे ,डावीकडे हे सगळं सुरू होणार होत. आदल्या दिवशी रात्री गारवा हॉटेल वर
"यो यट्झ" म्हणजेच "यतीश" आणि 
"ओहो अभि "म्हणजेच आपला "अभिजित" येऊन धडकले .कायम चेहऱ्यावर हास्य असणारा अभि हळूच लाख मोलाची टीप देऊन गेला .माझ्याशी छान चर्चा करून योजना सांगितली दर अर्ध्या तासाने एक सिप मरायचाच ! 
तहान लागो अथवा न लागो .आणि दार दोन तासाने काही तरी खायचे ."खायला " नाही म्हणायचे नाही. यतीश च्या डोळ्यातलं कौतुक लपत न्हवते .आधीच्या अनेक गोष्टी केवळ आणि केवळ यतीश मुळेच पार पडल्या आणि त्या मुळेच ही रेस माझ्या कडून पार पडली असे म्हणायला हरकत नाही.
120 km च अंतर गाठताना अभिच्या सगळ्या टिप्स खूप खूप कामी आल्या. आधी मी मला जेव्हा गरज वाटेल तेव्हा पाणी प्यायचो ,पण आता मात्र अभि ने सांगितल्या प्रमाणे साधारण दर अर्ध्या तासाच्या नाहीतर 5 km वर एक एक घोट आत जात होते . रस्ता मागे पडत होता समोरून सकाळी एवढं वार होत की उतारावर पण पॅडल मारावे लागत होते .
कालच्या संपूर्ण दिवसात न दिसलेली मंडळी आज मात्र थोड्या थोड्या अंतराने दिसत होती. योगेश ,परितोष,प्रशांतजी ,सौरभ ,विशी अशी दिग्गज मंडळी साधारण आस पास होती. सगळे ओके ओके चालले होते माझं टार्गेट फास्ट जाणे न्हवतेच मुळी, मला फक्त हे आव्हान पूर्ण करायचं होतं.


सगळं ऑल वेल असताना अचानक हाताचे पंजे जाम दुखायला लागले .
कालचे 13 तास आणि सकाळचं जेम तेम 4 तास झाले असतील आणि हँडल धरून धरून हात दुखायला लागले असे काही होईल असे वाटलंच न्हवते .एक वेळ अशी आली की सायकल सोडून बसावेसे वाटू लागले. पण सकाळी ठरवले होत काही ही झालं तरी बेळगाव ला पहिला स्टॅम्प घेतल्याशिवाय थांबायचे नाही.
मग शरीर आणि मनाचे एक युद्ध सुरू झालं. हे होणार होत याची कल्पना होती, पण ते एवढ्या लवकर होईल असे वाटले न्हवते .काय करावे काय करावे कळत नसताना मनोज आणि अजित दादा त्यांच्या स्टाइल मध्ये "दादा लै भारी असे"! ओरडत आले .
अगदी गर्दीत तू वाट काढत येणाऱ्या अँबुलन्स सारखी,मला ही जोडी वाटली .दादा ना सांगितले हाथ खूप दुखतोय एखादे रिस्ट चे बॅन मिळाले तर घेऊन द्या बेळगावातून.! गाडी ओके म्हणून सुसाट पुढे मी आपलं हाताच्या वेदनांना समजावत , "की थोड्या वेळाने उपचार होणार आहेत" ! . "जस्ट आपण बेळगाव पर्यंत जाऊ "होईल हा सगळे ! चला चला लवकर ! परत पॅडल मारू लागलो. सायकलिस्ट ला ना असे स्वतःशी बोलायला जमले पाहिजे लांब पल्याच्या लोकांना तर जमेलच पाहिजे, मग वेळ आणि प्रवास कुठे आणि कसा निघून जातो याचा थांग पत्ता लागत नाही .कधी आपले आपल्याला ओरडायच!, तर कधी आपले आपल्याला शाब्बास म्हणायचे!, कधी आपले आपल्यालाच बूस्ट करायचं ,तर कधी आपलं आपल्यालाच समजावत जात राहायचं !,
तर असे मी आपले आपल्याला समजावत समजावत जात राहिलो बेळगावच्या त्या वळणाच्या शोधता जिथे मला पहिला स्टॅम्प मिळणार होता, पहिला ब्रेक मिळणार होता ,माझ्या हातात स्प्रे मिळणार होता, मला रिस्ट कॅप घालायला मिळणार होती. एवढ्या गोष्टी मग काय मार पॅडल मार पॅडल आणि मार पॅडल .
बेळगावच्या अलीकडे वार खूप जोरात होत. आपोआपोच वेग खूप कमी होत होता कधी कधी सायकल एकदम थांबायची कळायचे नाही फक्त गेर कमी केल्याचं आवाज आणि परत मार पॅडल.
तर बेळगावच्या अलीकडे तवंडीचा एक छोटासा घाट लागतो .घाट छोटासा आहे पण समोरून येणार वार आणि सरळ चढ घाम काढत .घाट सुरू होण्या आगोदर मी आपला खाली मुंडी घालून पॅडल मारत होतो .वर बघण्याचा प्रश्नच नाही मग एकदम एका वळणावर 
"हाय वे " च रूपांतर "घाटात" झाले सायकल पुढे जायचं ना. एकदम थांबलीच मला वाटले पंचर काही खरं नाही !खाली वाकून पाहिले तर हवा होती .मग काय झालं कळेना खाली बघितले तेव्हा गेर "तीन बाय पाच " वैगरे होता सहज वर बघितले तर तवंडीचा घाट मोठा आ वासून हसत हसत उभा होता !
मग लक्ष्यात आले अरे चढ सुरू झाला आहे .आणि आपण मात्र त्याच गेर वर आहोत .
"खट ,खट ,खट ,खट्याक sssखट्याक sss"
"डायरेक्ट एक एक "आणि मग वारी परत सुरू झाली. आणि मग मी पण माझी बॉडी "एक बाय एक" वर टाकली. बस संपवायचंच आता काहीही होऊ दे. घाट संपला मस्त उतार सुरू झाला आणि सुसाट सायकल मारत पुढचे दोन चढ उतार लीलया पार केले. आणि बेळगाव 5 अशी पाटी दिसली भन्नाट दुखाणार्या हातानेच जोर केला आणि 5 km च्या आधीच बेळगावची टीम स्वागताला हजार होती .

सायकल अक्षरशः सोडली जर्सी काढली अनिरुद्ध नि गाडीच सीट रिकांम करून दिल .संपूर्ण हातावर स्प्रे चा आखा डबा संपवला .त्यावर स्लीव चढवल्या पाणी ,मीठ, एनरजल, केळी ,झाली तेवढ्यात मनोज ने बँडेज आणून दिले .रविवार मेडिकल बंद .त्याला ते गुंडाळणार मिळालं ते आणून दिल. हॅट्स ऑफ खरोखर इच्छा झाली आणि ती ICC ने पूर्ण केली नाही असे झालंच नाही. तात पुरत्या त्यांना बॅगेत टाकलं आणि निघायची घाई केली. कारण चोरल्या पर्यंत अडथळ्यांची शर्यत होती. रस्ता नाहीत न्हवता ,आणि "बेळगावाचा जावई" " परितोष " निघाला होता .आता जावई म्हटल्यावर याला सगळे माहीतच असणार मग मी आपलं त्याला फोल्लो करत करता क्लॉक टॉवर गाठले .तेवढ्या हा पठयां उतारावर कुठे गायब झाला कळलेच नाही ,आता काय बोलणार त्याला तरी ,शेवटी सासुरवाडीत माणूस हरवायचाच. मग मी आपला चोरला ,चोरला असे ओरडत निघालो. मधेच एक मेडीकल दिसलं म्हणून थांबलो मला जस हवं होत तस ते बँडेज मिळाले ,पण ते पण एकच शेवटचं ,मग माझ्या लक्षात आले लढाई अजून खूप बाकी आहे .निसर्ग तुम्हला खूप हिंट देत असतो तुम्हला त्या "डीकोड" करता आल्या पाहिजे ते जर जमलं ना मग तुम्हला कोणीच रोखू शकत नाही .
मग ते एक मिळालेल बँडेज घेतल आणि उजव्या हाताला लावून निघालो तो पर्यंत विशी मागून आला काय झाल असे विचारल्यावर त्याला सांगितलं मग आम्ही एकत्र दोघे निघालो. आता ऊन वरून चांगलेच आग ओकत होत .साक्षात विशी बरोबर असल्याने आता रस्त्याची चिंता न्हवती ,अजून एका मेडिकल मध्ये थांबलो पण नाही मिळाले मग त्या एका उजव्या हातावर लढत आम्ही निघालो .आधीच बराच वेळ गेला होता शेवटच्या वळणावर बेळगाव मधील कार्यकर्त्या बरोबर फोटो काढला आणि त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर प्रयाण केले .त्याचा म्हणण्या नुसार अजून 15 km वर जंम्बोटी गाव लागेल त्यानंतर खरा चोरला सुरू होईल .म्हणजे 15 कमी तर वार पण नाय बघायचे मी ठरवले आता 15 काय 40 km असलेल्या दुसरच्या चेक पॉइंटलाच जाऊन थांबायचे पॅडल मारायला सुरुवात केली. हळू हळू मी दोन तीन रायडर ला गाठत पुढे गेलो जोश वाढला दोन तीन "रोड बाईक "मागे राहिल्या ,चला - चला ,मारा - मारा ,आता किमान याना पुढे नाही जाऊन द्यायचं. थोडा रस्ता खराब होता गर्दी होती पण कशाचीच पर्वा न करता मी सुसाट निघालो. मन खाली हाथ समोर आणि पाय गोल गोल गोल पॅडल मारतायेत अचानक वेग कमी कमी झाला, सायकल चलेनाशी झाली ,मला कळेना तवंडीच आठवले पटकन गेर कमी केलं ,आता " एक एक " वर तरी सायकल चालेना ,आता आधी " वर " आणि मग एकदम "खाली" टायर कडे बघणे गरजेचं होतं .आधी समोर बघितलं चढ तर नाहीना? नाही ! सरळ आहे रास्त मग पार वाकून बघितले. "खल्लास टायर पंचर" !
"विष्णूचा अकरावा अवतार "असलेला 
"अजित पाटील" मागून आला कुठे काय हवं आणि कुठे अडचण तिथे दादा हजर. देवच पावला ,कारण माझे तर हाथ थरथरत होते .मनोज आणि अजित म्हणाले तुम्ही बसा आम्ही करतो .ही खरी ताकत आहे icc ची माझ्या कडे एक्स्ट्रा ट्यूब होती ती दिली .चाक खोलून सगळे सोपस्कार होई पर्यंत मागे टाकलेल्या सगळ्या रोड बाईक एक एक करत वाकुल्या दाखवत पुढे निघून गेल्या .

दुपारी 1 ते 2 च ऊन ,चार पाच गार पाण्याच्या बाटल्या घेतल्या लिंबाचा अर्क होता ते टाकून मस्त लिंबू पाणी करून सगळ्यांना पाजलं ,जरा ड्राय फ्रुटस खाल्ले साधारण अर्धा पाऊण तास ब्रेक झाला. आता मात्र निघणे अत्यंत गरजेचे होते .देवाला पार्थना केले अरे होऊ दे की पूर्ण ,नंबर बिंबर नकोय फक्त पूर्ण करायची आहे .जोरदार सावली करत,
त्याने जणू ओके चा इशारा केला .
मग मी, माझी सायकल आणि चोरला ,विषय संपला !


दोन्ही बाजूला झाडांची दाट सावली, गार वारा आणि अफलातून चढ ,एखाद्या सायकलिस्ट ला अजून काय पाहिजे असते .मजल दर मजल करत मी घाट चढत होतो ."डेल्टा" नावाचा दुसरा चेक पॉईंट कुठे आहे काही माहीत नाही .आणि ठरवले विचारायचे पण नाही. जात राहायचं आपण टप्प्यात आलो की आपली प्रेमाची मंडळी नक्कीच आपल्याला बघत बघत येताना दिसतील .आणि तसेच झालं साधारण 10 km राहिले असताना ICC चा तगडा हिरो "द रॉक "
"विशाल सागर" दादा भली मोठी गाडी घेऊन समोरून आला दादा काही खायला पाहिजे का? 
पाणी पाहिजे का ?
वेळ होऊन गेली आहे बोल काही पाहिजे असेल तर!


मी सरळ नाही म्हणालो आधीच ब्रेक मुळे जवळपास तास भर गेला होता .माझे आपले काम चालू रस्ता बंद! चले चलो विशाल सागर दादा बऱ्याच वेळा मागून सावकाश येत होता. मला खूप भारी वाटत होतं. आपल्या साठी एवढा मोठा माणूस थांबला होता मग दादाचा शूट ,फोटो त्याच्या "ट्रान्स " वर तो फॉरचूनर मध्ये आणि मी माझया सायकल वर नाचत नाचत मजा करत चोरल्याचा निसर्ग अनुभवत होतो .फारच अविस्मरणीय होत सगळं पण मी ठरवले होत पाय टेकायचा नाही. आणि शेवट पर्यंत नाहीच टेकवला याच साक्षिदार आपला रॉक आहेच .
आता मात्र भूक पण लागली होती पण "डेल्टा "
काही येत न्हवत .मागून येणार "रॉक "जणू खुणावत होता गडाचे दोर कापले आहेत आता लढून मरा नाहीतर, उडया मारून मरा ! मग लढूनच मेलेलं काय वाईट ?"हान गाव वाल" असा आतून आवाज आला. आणि पुन्हा जोर चढला .
दोन चढ उतार गेल्या नंतर अक्षरशः कुठे आहे " डेल्टा" असे झाले .पण अजून " डेल्टा " काही आले नाही .मारा नाहीतर मरा पण" डेल्टा " येऊ द्या ,अजून एक चढ उतार झाला .आणि समोरून अविनाश आणि दीपक फोटो काढत आले. वा !मनात म्हटलं आता "डेल्टा" दूर नाही ,हे आल्यावर "रॉक" गपकन पुढे निघून गेला. मी सायकल मारतच होतो .अवि आणि दीपक माझे आदल्या दिवशीच रूम पार्टनर मला फुल्ल जोश देत होते. दादा आता काहीच नाही पुढे 30 कमी km नुसता उतार आहे तू जिंकलंस त्या उताराच्या मोहात पुढचे 3 - 4 km कधी आणि कुठे गेले कळलेच नाही. मोह वाईट हे खरं पण इथे तो उपयोगाला आला आणि एका छोट्याशा वळणा नंतर साक्षात "गणेशाचे" दर्शन झालं . साक्षात गणपतीला पाहून झाला नसता एवढा आनंद "गझब गणेश" म्हणजेच गणेश भाऊ भुजबळ यांना बघून झाला. ते म्हणजेच दुसरा चेक पॉईंट "डेल्टा" होते. बापरे केवढा आनंद झाला.


दोन ला पोहचायचे तिथे साडे तीन झाले .थोडा डाळ भात भाऊंनी खायला दिला .मग एक "स्पेशल चहा" झाला, पाणी, एनेरझल ,सगळं झालं .फोटो झाले आता फक्त सुटायचं होत कारण उतार खूप होता आणि अंधार पडयाच्या आत घाट उतरायचं होता .उशीर झाला तर सायकल टेम्पोत आणि स्वप्न धुळीला मिळणार होती . पाच मिंट शांत बसलो आणि निघालो काहीही झाले तरी टेम्पोत बसणार नाही खाली तिसऱ्या पॉईंट ला अजितदादा आहेत असे कळले साधारण 30 ते 35 km उतार पण तरी हळू जा असे सगळ्यांचे मत. समोरून ट्रक जोरात येत आहेत .रस्ता खणला आहे दोन्ही बाजूला जपून !.
ओके! म्हणालो आणि निघालो माझा गेलेला वेळ भरून काढण्याची हे एकमेव संधी होती .मग कशाचाही विचार न करता सुसाट निघालो रस्त्याच्या अगदी मध्यातून ,मनात एकच विचार ,
"सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल मे है "!
उतारावर काही दिसत न्हवते ,निसर्ग ,गम्मत ,मजा सगळं विसरून फक्त एकाग्र झालो वेगावर आणि देवाच्या कृपेने सगळा टप्पा व्यवस्थीत पार पडला. बिचोलीम ला अवि ,अजित दादा ,मनोज दादा आणि दीपक मला पाहून आनंदित झाले दादा रेस मारली. आला तुम्ही गोव्यात खल्लास .!
अविने सांगितले तू हा पल्ला 20 मिंट आधी गाठला आता फक्त 40 कमी राहिले होत .


माझ्या नंतर सगळ्यांना टेम्पोत आणणार असे अजित दादांनी सांगितलं आणि थरकाप उडाला मी म्हणालो ,
मी निघतो ,तुम्ही या याना गोळा करत .काहीही होउदे टेम्पोत यायचं नाही. पूर्ण दमलेले होतो, विझणारा दिवा जसा जोरात फडफडतो तशी माझी अवस्था होती. ताकत न्हवती ,पण फडफड जोरात चालु होती .आणि ही फडफड मला अजून 40 km म्हणजे कमीत कमी दोन ते अडीच तास टिकवायची होती .
सूर्य देवाने हाथ टेकले मला कंटाळून तो पण अगदी कल्टी मारायच्या बेतात होता .
त्याची कल्टी ,दमलेला मी ,गोव्याच ट्रॅफिक आणि माहीत नसलेला रस्ता या मुळे वार्षिक परीक्षेचा सर्वात अवघड पेपर शेवटच्या दिवशी असल्यावर होते तशी अवस्था माझी झाली होती .त्यात ती टेम्पोची भीती. मनात विचार केला काहीही झालं तरी याना सापडायचे नाही बस नुसतं पॅडल मारत होतो.
चढ उतराची रांगोळी चालूच होती .कुठे लेफ्ट कुठे राइट आता डोक्यात काहीच घुसत न्हवते नुसतं पणजी विचारात विचारत जात होतो .लाईट चालू झाल्या होत्या. पार पार संपलो होतो .मांडावी नदी नंतर वळण आहे एवढंच लक्ष्यात ,पण मांडवी काही येत न्हवती, आणि रेस पूर्ण करण्याची खाज काही संपत न्हवती. इकडे खिशात दोन तीन वेळा फोन वाजला फक्त अजित दादा किंवा क्रू पैकी कुणाचा नाहीना एवढंच बघायचं आणि ठेऊन द्यायचा .13 तास संपायला फार कमी वेळ राहील होता किती अंतर आहे कुठे आहे काही माहीत नाही ,बस जात होतो ,जात होतो. अश्यातच पाटी दिसली पणजी 3 km वा भारी पण रस्ता बरोबर आहे की नाही माहीत नाही तेवढ्यात परत फोन," विष्णूचा अकरावा अवतार अजित दादा "
जेव्हा जेव्हा अडचणीत आलो तेव्हा तेव्हा धावून आले "दादा कुठे आहात"? 
"माहीत नाही !पणजी 3 km चा बोर्ड आहे ."
एवढंच बोललो लोकेशन पाठवा येतो ,लोकेशन पाठवे पर्यंत दोन्ही बुलेट आल्या .अवि न दीपक ,अजित दादा आणि मनोज ,बरोबर आहे बरोबर आहे आलात तुम्ही फक्त पाच मिंट राहिली आहेत .चला माझ्या मागे या. काय आनंद झाला म्हणून सांगू मला वाटले आता उचलतायेत मला, मी पुन्हा सगळी शक्ती लावून सुटलो. मांडवी क्रॉस केली आणि एक वळणावर अजित दादा गेले पुढे मात्र अवि आणि दीपक म्हणले रस्ता इकडे आहे तू इकडून ये ! मी त्यांना म्हणलो आता सोडून जाऊ नका रस्ता कळत नाहीये .दोघेही म्हणाले तुझ्या साठीच आलो आहे .चल पुन्हा येरे माझ्या मागल्या धर हँडल मार पॅडल एक चढ आला वेग जवळपास नाहीच अगदी सरळ रस्त्यावर पण "एक एक "किंवा फार तर "एक तीन ,चार "अशी सायकल चालवत होतो.
दीपक ला विचारले अजून किती आहे रे ??????
तो जेव्हा सात आहे असं म्हणलं तेव्हा मला सात असमानच दिसले .
सायलिस्ट
"जेव्ह असे विचारायला लागतो तेव्हा त्याच त्यांनी समजून घ्यायचं" ,
"जेव्हा सरळ रस्त्यावर एक बाय दोन किंवा तीन वर सायकल चालते तेव्हा समजून घ्यायच ",
"मी पण समजून घेतले होत की आता खरच दमलो आहे "शरीर आणि मनाची जोरदार लढाई सुरू होती. आणि मी सांगितल्या प्रमाणे ही लढाई तुम्ही जिंकणे जास्त गरजेचे असते मग शरीरात ताकत अजिबात नसली तरी चालत .
ट्यूब लेस टायर प्रमाणे मनाच्या शक्तीवर तुमचं शरीर जात राहत .बस मी ही तसाच जात राहिलो .आणि मग हे सात पण संपले सर्वात अवघड शेवटचे सात. शेवटच्या " टफ 40 "तले "अवघड सात " आणि मी फिनिश लाईन गाठली.

 

 

वेळ 13 तास पेक्षा जास्त झाला होता. पण सगळे खूप खुश आणि आनंदी होते "21 रोडबाईक "मध्ये "MTB" वर येणार मी एकटाच होतो .मला सगळ्यात जास्त आनंद होता की मी ठरल्या प्रमाणे प्रथम रेस पूर्ण केली .जीवनातील एक सर्वात मोठी ध्येय पूर्ती !.विलक्षण अविस्मरणीय अनुभव.! लिहलेला प्रत्येक क्षण जगलो अत्यंत आनंदाने कारण त्याला प्रेमाची झालर लावायला पदोपदी जीवाभावाची माणसे होती .खास करून
"अमेझिंग अजित"
"विस्फोटक विशी"
"ग्रेट गजू"
"ओहो अभि"
"यो यट्झ"
"गझब गणेश"
"दीपक नाईक"
"अविनाश द लोणावळा लायन" ,
"मनोज" ,
"अजित गोरे", 
"द रॉक विशाल सागर "
"अमित खरोटे "
"अजय"
"हाजी "
माझे मित्र 
"केदार देव" ,"राजेश शेट्ये","प्रवीण "आणि नजर चुकीने कोणी राहिले असतील तर ,
ते सगळे ही सर्व अशी मंडळी.
ज्यांच्या शिवाय हे शक्य न्हवते या पुढे अनेक मोठ्या गोष्टी घडतील, नवीन नवीन विक्रम प्रस्थापित होतील,
पण 
"मंतरलेले पहिल्या दिवसाचे 13 तास "
आणि
"मोहरलेले दुसऱ्या दिवसाचे 13 तास" 
आयुष्यात पुन्हा मिळणार नाही हे नक्की .


शंकर उणेचा.
०४.१२.२०१७

प्रतिक्रिया

बाप्पू's picture

21 Feb 2018 - 3:21 pm | बाप्पू

वाह....!!!
मस्तच. एवढा स्टॅमिना कसा काय आणता बुआ ???
आम्ही जिम मध्ये १५-२० मिनटे सायकल चालवून पण जग जिंकल्या सारखा आव आणतो. :))

टेम्पो !!
शेवटचे सात!!
भारी।

झेन's picture

22 Feb 2018 - 8:44 pm | झेन

तूमची मानसिक ताकत, निर्धार जबरदस्त.
मंतरलेले. . .मोहरलेले. . झपाटलेले चालू राहूदे thumpsup

सुरेख वर्णन केलंय!!

धन्यवाद!!