गीतेतील विशिष्ट ७ श्लोक आणि त्यांचे परस्परसंबंध

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
19 Feb 2018 - 4:06 pm

भगवदगीतेतील मोक्ष, देव देवता आणि परमेश्वर या संदर्भातील विविध अध्यायातील काही (एकमेकांशी परस्पर संबंध असणाऱ्या) श्लोकांचा एकत्रित सलग भावार्थ
- गीतेवरील विविध पुस्तकांवर आधारित

प्रथम सगळे श्लोक पाहूया:

भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ४६
|| यावानर्थ उदपाने सर्वत: संप्लुतोदके ||
|| तावान्सर्वेषु वेदेषु ब्राम्हणस्य विजानात: ||

भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ५६
|| दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ||
|| वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ||

भगवद्गीता: अध्याय ७ श्लोक २१
|| यो यो यां यां तनु भक्त: श्रद्धायार्चीतुमीछति ||
|| तस्य तस्याचालाम श्रद्धां तामेव विदधम्यहम ||

भगवद्गीता: अध्याय ९ श्लोक २३
|| येSप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ||
|| तेSपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्

भगवद्गीता: अध्याय ९ श्लोक २५
|| यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः ||
|| भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोSपि माम् ||

भगवद्गीता: अध्याय १० श्लोक २
|| न में विदू सुरगण: प्रभावं न महार्ष्य: ||
|| अहमार्दीर्ही देवानां महर्षी ना च सर्वश: ||

भगवद्गीता: अध्याय ११ श्लोक १५
अर्जुन उवाच:
|| पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्‍घान्‌ ||
|| ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ||

एकत्रित भावार्थ:

छोट्या तळ्याद्वारे होऊ शकणाऱ्या सर्व कार्यांना मोठ्या जलाशयाद्वारे (समुद्र) सुद्धा पूर्ण केले जाऊ शकते पण समुद्राचे कार्य तळे करू शकत नाही. मग छोट्या तळ्याकडे का बरे जावे? त्याचप्रमाणे, सर्व वेद वाचून त्याप्रमाणे आचरण आणि कर्मकांड करणाऱ्या व्यक्तीपेक्षा ज्याला सर्व वेदांचे मूळ उद्देश आणि अंतिम ध्येये (मोक्ष) माहित आहेत ती व्यक्ती सर्व वेद जाणणाऱ्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे.

म्हणजेच परम ईश्वर (श्रीकृष्ण) ज्याला जाणून घ्यायचा आहे त्याने इतर सगळ्या देव देवतांची भक्ती केलीच पाहिजे असे नाही कारण सगळे देव देवता आणि संपूर्ण ब्रम्हांडे शेवटी त्या अमूर्त आणि अथांग अशा परम ईश्वराचेच तर भाग आहेत आणि त्यातच शेवटी सामावले जातात. मग सरळ परम ईश्वराचीच भक्ती केली तर इतर देव देवतांची भक्ती केल्यासारखेच आहे आणि त्याहून सुद्धा अधिक बरेच काही आहे. परमेश्वर श्रीकृष्ण स्वत: (समुद्र) सांगत आहेत की कुणी मनुष्य एखाद्या देव देवतेची (तळे) भक्ती करत असेल तर त्या देवतेवर त्याची श्रद्धा मीच स्थिर करतो कारण ते देव देवता माझेच अंश आहेत. इतर देव देवता हे फक्त भौतिक जगातील भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नेमून दिलेले अधिकारी आहेत. (उदा: लक्ष्मी - पैसा; धन्वंतरी - आरोग्य; गणपती - बुद्धी वगैरे). ज्यांना स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे ते देव देवता यांची पूजा करतात. पण स्वर्गातील पुण्य भोगून झाल्यावर त्यांना पुन्हा पृथ्वीवर मानव जन्म घेऊन यावेच लागते तसेच पाप करणारे नरक भोगून झाल्यावर पुन्हा प्राणी जन्म घेतात! म्हणजे कर्म आणि फळ यांची अनंत साखळी तयार होते. कर्म करणे आपल्या हातात असते पण त्याचे फळ कसे, केव्हा, कुठे, कोणत्या जन्मात आणि किती मिळेल हे भगवंतांच्या हातात असते. ही कर्म फळ साखळी कायमची तोडायची असेल (मोक्ष) तर गीतेत अनेक उपाय दिलेत. त्यापैकी दोन आहेत परमेश्वराची भक्ती आणि निष्काम कर्मयोग!

निष्काम कर्मयोग म्हणजे सध्याच्या मानव जन्मातील प्रत्येक चांगले कर्म फळाची अपेक्षा न करता (आणि फळ मिळाल्यास ते न स्वीकारता) परमेश्वराला अर्पण करत राहणे आणि मागील कर्मांचे बरे वाईट फळ भोगतांना तटस्थ वृत्तीने भोगणे!

पण परम ईश्वराची प्राप्ती म्हणजे काय? मोक्ष! आणि मोक्ष म्हणजे काय? तर स्वर्ग-नरक आणि जन्म-मृत्यूच्या (विविध मानव प्राणी पक्षी जीव जंतू योनी) फेऱ्यातून सुटका होऊन आत्मा कायम शाश्वत परम ईश्वराच्या भगवदधामाकडे परतणे! मोक्ष हेच अंतिम ध्येय आहे, हे जो जाणतो तो फक्त त्या शाश्वत परमेश्वराची भक्ती करतो आणि असा माणूस इतर देव देवता यांची पूजा करत नसेल तरी तो देव देवता यांची पूजा करणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतो. श्रीकृष्ण म्हणतात की, इतर देव देवतांची पूजा करणारे शेवटी अप्रत्यक्षरीत्या माझीच पूजा करतात पण ते त्रुटीयुक्त असते. तसे केल्याने भौतिक इच्छा पूर्ण होतात ज्या आणखी कर्म निर्माण करून जन्म मृत्यूचे फेरे वाढवतात जो वेदांचा मूळ उद्देश नाही. आपल्याला मोक्षाचा वृक्ष हवा आहे आणि सांगा बरे तुम्ही वृक्ष वाढण्यासाठी फांद्यांना (देव देवता) पाणी देता (पूजा करता) की वृक्षाच्या मुळांना (परमेश्वर भक्ती)?? देवांना आणि महर्षींना सुद्धा माझी उप्तत्ती माहिती नाही. माझे जन्म, कर्म आणि दिव्य स्वरूप अलौकिक आहे जे कुणी साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. कारण देव, महर्षी (ब्रम्हा विष्णू महेश आणि सर्व ब्रम्हांड) यांचे आदिकारण (स्रोत) मीच आहे.

(शेवटी विशिष्ट दृष्टी दिल्यानंतर अर्जुनाला विश्वरूप दर्शनामध्ये सर्व जगांतील सर्व देव देवता आणि ऋषी महर्षी तसेच सूर्य, चंद्र, ग्रह, तारे वगैरे श्रीकृष्णांच्या आत विलीन होत असतांना दिसतात!)

संस्कृतीधर्मलेख

प्रतिक्रिया

arunjoshi123's picture

19 Feb 2018 - 4:29 pm | arunjoshi123

छान.

manguu@mail.com's picture

19 Feb 2018 - 6:04 pm | manguu@mail.com

छान

निष्काम कर्मयोग म्हणजे सध्याच्या मानव जन्मातील प्रत्येक चांगले कर्म फळाची अपेक्षा न करता (आणि फळ मिळाल्यास ते न स्वीकारता) परमेश्वराला अर्पण करत राहणे
हे म्हणजे भारतीय वा हिंदु मानस फार सहजतेने जणु हे शक्य सत्यच आहे अशा अर्थाने या मुद्द्याला प्रतिसाद देते असे दिसुन येते.
म्हणजे प्रत्येक कृती मागे एक हेतु एक मोटीव्हेशन हे अंगभुत असतेच असते. त्या हेतु शिवाय माणुस कृतीप्रवृत्त होऊ शकत नाही. तुम्ही निष्काम विदाउट डिझायर कृतीप्रवण कसे होणार ? (चांगले कर्म कोणते ? हा पुन्हा वेगळा मुद्दा पण तो बाजुला ठेवला तरी नुसतं कुठलीही कृती कुठलाही माणुस करण्याची बाब ही मोठी विचारणीय आहे .
" ह्युमियन अकाऊंट ऑफ मोटीव्हेशन " मध्ये याच धर्तीवर मुलगामी विचार मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. यात सर्वसाधारणपणे बिलीफ्स (श्रद्धा या अर्थानेअपेक्षीत नसुन डिस्क्रीप्शन ऑफ वर्ल्ड या अर्थाने घेतले जाते. तर बिलीफ्स स्वतः जग बदलत नाहीत. म्हणजे बिलीफ्स असणे व बदलणे याने इटसेल्फ जग बदलत नाही. उदा. एक असे उदाहरण दिले जाते की माझ्या मोटारसायकलचे दोन्ही चाक हवेने भरुन फुगलेले आहेत हा माझा बिलीफ आहे व मी जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा चाक तपासुन बघतो व एकच चाक हवेने भरलेले आढळते तेव्हा बिलिफ मध्ये बदल होतो इतकेच. मात्र कृती चा उगम सुरुवात होण्यासाठी इच्छे ची डिझायरची जरुरी असते. जेव्हा इच्छा निर्माण होणार तेव्हाच " बिलीफ वुइल मुव्ह अस " म्हणजे उदा. जेव्हा मला मोटारसायकल चालवण्याची " इच्छा" निर्माण होणार त्तेव्हाच मी चाकात हवा भरण्यास "उद्युक्त" होणार. अर्थात माझ्या इच्छा माझ्या बिलीफ वर ( एक चाकात हवा नाही या बिलीफ वर ) अवलंबुन असणार. म्हणजे मुलभुत डिस्क्रीप्शन ऑफ रीअ‍ॅलीटी हे माझ बिलीफ ठरवणार पण माझी इच्छाच त्याला त्या रीअ‍ॅलीटीला बदल करण्याची कृती करण्यास प्रवृत्त करणार अशा दिशेने ह्युम आपली मांडणी करतो.
पण गीतेत जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती अशी की विदाउट डिझायर तुम्ही कृती करा. जी कसे शक्य आहे?

मारवाजी, इथे भगवंतांना फळाची अपेक्षा ही स्वार्थासाठी नको असे म्हणायचे आहे. कारण फळाची अपेक्षा केल्यास/ठेवल्यास त्या कर्माच्या फलपूर्तीसाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि जन्माला आल्यानंतर पुन्हा कर्म करणे आलेच त्यामुळे हि कर्म बंधनाची अनंत साखळी तयार होते आणि माणूस यातच अडकून पडतो आणि सुखदुःखाचे अनुभव घेत राहतो.
यातून बाहेर पडायचे असल्यास संचित कर्माचे फळ भोगणे आणि पुन्हा नवीन कर्म बंधन न होऊ देणे. संचित कर्माचे फळ हे एकतर भोगून अथवा गुरुकृपेने व ईश्वरकृपेने काही प्रमाणापर्यंत नष्ट करता येते. दुसऱ्या बाबतीत म्हणजेच नवीन कर्मबंधन निर्माण होऊ नये म्हणून केलेल्या कर्माच्या मोबदल्यात स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता ते कर्म ईश्वराला अर्पण करणे होय.
उदाहरण द्यायचे झाल्यास समजा एक व्यक्ती समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करत आहे परंतु त्या कार्यामुळे त्याचे नाव व्हावे, गौरव व्हावा किंवा समाजात सन्मान व्हावा अशी इच्छा धरून ते कार्य करत असेल तर ती व्यक्ती कर्मबंधनाला पात्र होईल. जर या कार्यामुळे त्याच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी याच जन्मात झाल्या तर ठीक परंतु त्या तश्या नाही झाल्या तर ती इच्छा संचित कर्म म्हणून राहील आणि ते भोगण्यासाठी त्याला पुन्हा फिरून जन्म घेऊन यावे लागेल. परंतु तेच कार्य स्वतःच्या भल्याची कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ इतरांचे कल्याण व्हावे या हेतूने केली असेल आणि परमेश्वराजवळ केलेले कर्म अर्पण केले असेल तर त्या कर्माचे फळ भोगावे लागत नाही. आज अनेक जण दानधर्म करतात, गरिबांसाठी शाळा, वाटसरूंसाठी पाणपोई याची व्यवस्था करतात परंतु केलेल्या कार्याचा दिखावा करण्यासाठी स्वतःचे नावही लावतात कारण त्यामागे अंशतः का होईना पण आपले नाव, ख्याती व्हावी असा उद्देश्य असतो. परंतु तेच काम कोणी स्वतःच्या नावलौकिकासाठी न करता केवळ लोकांचे भले व्हावे म्हणून पडद्याआडुन करत असेल तर तो कर्मबंधनास अपात्र असेल.

manguu@mail.com's picture

20 Feb 2018 - 2:38 am | manguu@mail.com

१. निष्काम कर्मयोगामुळे सगळेच मोक्षास गेले तर मग पुढे खेळ चालणार कसा ?

२. फळ हे फक्त स्वत:च्या कृतीने भोगले जाते का ? इतरांच्या श्रमाचे फळ खाल्ले तरीही कर्मबंधन आलेच ना ?

म्हणजे मी माझे हित न पहाता , इतरांचे कल्याण करायचे.

पण माझा शेजारीही त्याचे हित न पहाता इतरांचे कल्याण करणार.. त्या इतरांमध्ये मीही आलोच ना ?

म्हणजे मी ८ आंबे आणले .. मोह नको , कर्मबंधन नको म्हणून मला ० ठेवून सगळे वाटून लागले.

पण पलीकडच्यानेही ८ आंबे आणले , तोही ० ठेवून इतराना वाटणार तर त्यात मलाही १ आंबा येणारच ना ?

manguu@mail.com's picture

20 Feb 2018 - 2:38 am | manguu@mail.com

१. निष्काम कर्मयोगामुळे सगळेच मोक्षास गेले तर मग पुढे खेळ चालणार कसा ?

२. फळ हे फक्त स्वत:च्या कृतीने भोगले जाते का ? इतरांच्या श्रमाचे फळ खाल्ले तरीही कर्मबंधन आलेच ना ?

म्हणजे मी माझे हित न पहाता , इतरांचे कल्याण करायचे.

पण माझा शेजारीही त्याचे हित न पहाता इतरांचे कल्याण करणार.. त्या इतरांमध्ये मीही आलोच ना ?

म्हणजे मी ८ आंबे आणले .. मोह नको , कर्मबंधन नको म्हणून मला ० ठेवून सगळे वाटून लागले.

पण पलीकडच्यानेही ८ आंबे आणले , तोही ० ठेवून इतराना वाटणार तर त्यात मलाही १ आंबा येणारच ना ?

manguu@mail.com's picture

20 Feb 2018 - 2:39 am | manguu@mail.com

वाटून टाकले.

मारवा's picture

20 Feb 2018 - 8:00 am | मारवा

तुम्ही म्हणता
दुसऱ्या बाबतीत म्हणजेच नवीन कर्मबंधन निर्माण होऊ नये म्हणून केलेल्या कर्माच्या मोबदल्यात स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता ते कर्म ईश्वराला अर्पण करणे होय.

हे नक्की कसे करता येते यावर कृपया खुलासा करावा उदाहरणार्थ

१- स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता हे पुर्ण निरपेक्ष होणे कसे असते याचे उदाहरण कसे असेल ? जसे समजा एक व्यक्ती असे म्हणाला मी स्वतःसाठी काहीही नको केवळ कुटुंबासाठी वा समाजासाठी अमुक एक काम करतो. त्याचे फलस्वरुप मला पैसा मिळतो. आता हा पैसा एक महीना काम करुन मिळालेला २०००० रुपये. हे जे फल आहे एक महीन्याच्या कर्माने निर्माण झालेले. हे मी स्वतःसाठी केलेले नाही.
२-आता हे एक महीन्याचे कर्म मला ईश्वराला अर्पण करायचे आहे तर ते नेमके कसे " अर्पण " करणार म्हणजे प्रोसीजर काय असेल नियम काय आहेत अर्पण करण्याचे
वा किमान हे अर्पण झाले की अनर्पित आहे हे नेमके कसे ठरते ? म्हणजे मनातल्या मनात विचार करावा की झाले ? म्हणजे असे दोन जण आहेत सुरेश व रमेश दोघांनी वरील प्रमाणे १ महीना कर्म केले तर एकाचे अर्पण झाले एकाचे नाही असे कसे ठरविता/बघता/समजता येते नेमके ?
३- सर्वात महत्वाचा भाग असा की २०००० चे जे फल आहे त्याची प्राप्ती चे मुळ मोटीव्हेशन समजा स्वतःसाठी नाही इतकेच पुरेसे आहे का ? म्हणजे मोठ्या फलाच्या साठी लहान मायनर फलांचा त्याग यात अपेक्शीत आहे का ? म्हणजे स्वार्थत्यागातुन "अधिक श्रेष्ठ " क्वालिटी च्या फलाचा हेतु मनात ठेऊन जर काम होत असेल तर पुन्हा फलहेतु आलाच ना ? जरी ईश्वरप्राप्ती श्रेयसप्राप्ती इ.इ. अध्यात्मिक उच्चत्त्म फले "त्या जगातील " असली तरी फलहेतु अपरीहार्यपणे येत नाही का ? ईश्वराला अर्पण करण्याचा हेतु ?

"१- स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता हे पुर्ण निरपेक्ष होणे कसे असते याचे उदाहरण कसे असेल ? जसे समजा एक व्यक्ती असे म्हणाला मी स्वतःसाठी काहीही नको केवळ कुटुंबासाठी वा समाजासाठी अमुक एक काम करतो. त्याचे फलस्वरुप मला पैसा मिळतो. आता हा पैसा एक महीना काम करुन मिळालेला २०००० रुपये. हे जे फल आहे एक महीन्याच्या कर्माने निर्माण झालेले. हे मी स्वतःसाठी केलेले नाही"
---- असे कोणतेही कार्य ज्यातून तुम्हाला कोणताच मोबदला अपेक्षित नाही. एकदमच सोपे उदा द्यायचे झाल्यास गरजूना केलेले सत्पात्री दान. मग ते अन्नदान असेल, विद्यादान असेल किंवा पैश्याने केलेले दान ही असेल. परंतु केलेले दान हे स्वकमाईचे हवे. जर असे दान तुम्ही कोणतीच स्वार्थ अपेक्षा न ठेवता आणि त्यातून कोणताही मोबदला मिळण्याची इच्छा न धरता केलात तर ते निरपेक्ष दान.

"२-आता हे एक महीन्याचे कर्म मला ईश्वराला अर्पण करायचे आहे तर ते नेमके कसे " अर्पण " करणार म्हणजे प्रोसीजर काय असेल नियम काय आहेत अर्पण करण्याचे
वा किमान हे अर्पण झाले की अनर्पित आहे हे नेमके कसे ठरते ? म्हणजे मनातल्या मनात विचार करावा की झाले ? म्हणजे असे दोन जण आहेत सुरेश व रमेश दोघांनी वरील प्रमाणे १ महीना कर्म केले तर एकाचे अर्पण झाले एकाचे नाही असे कसे ठरविता/बघता/समजता येते नेमके ?"
---मी सर्वज्ञ नाही परंतु जेवढे वाचले आहे किंवा बुद्धीला आकळले आहे त्यावरून सांगतो. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये कर्मफळ अर्पण करण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यावरून केवळ देवाचे स्मरण करून मनात स्वार्थबुद्धीची कोणतीही अपेक्षा ना ठेवता केलेले कर्म तुला अर्पण करतो असे म्हणले तरी पुरेसे असावे. मनोभाव सर्वात महत्वाचा. तरीही याविषयी काही शंका राहिल्यास जाणकारांकडून अथवा मोठ्या अधिकारी व्यक्तींकडून खात्री करून घ्यावी.

३- सर्वात महत्वाचा भाग असा की २०००० चे जे फल आहे त्याची प्राप्ती चे मुळ मोटीव्हेशन समजा स्वतःसाठी नाही इतकेच पुरेसे आहे का ? म्हणजे मोठ्या फलाच्या साठी लहान मायनर फलांचा त्याग यात अपेक्शीत आहे का ? म्हणजे स्वार्थत्यागातुन "अधिक श्रेष्ठ " क्वालिटी च्या फलाचा हेतु मनात ठेऊन जर काम होत असेल तर पुन्हा फलहेतु आलाच ना ? जरी ईश्वरप्राप्ती श्रेयसप्राप्ती इ.इ. अध्यात्मिक उच्चत्त्म फले "त्या जगातील " असली तरी फलहेतु अपरीहार्यपणे येत नाही का ? ईश्वराला अर्पण करण्याचा हेतु ?
---- कर्मफळ अर्पण करण्याचा हेतू समजला तर याचे उत्तर आपोआप मिळेल. मेख ही आहे की कर्मसिद्धांताच्या नियमाप्रमाणे केलेल्या कर्माचे मूग ते चांगले असो की वाईट, फळ हे मिळतेच. मनात राहिलेली कोणतीही इच्छा अथवा वासना पूर्ण झाली नाही तर ती संस्काराच्या रूपाने अपूर्ण राहिलेल्या कर्मस्वरूपात राहते आणि इच्छा फलद्रूप झाली मगच ते कर्म संपते. पण तेच कर्म कोणत्याची फळाची आशा न धरता केले अथवा ईश्वराला अर्पण केले तर त्याचे फळ मिलावयाची गरज संपते. म्हणूनच चांगले कर्म मग ते निष्काम नसेल तर कधी ना कधी चांगले फळ मिळवून देईन परंतु अश्या चांगल्या कर्माची चांगली फळे भोगताना पाय घसरला तर अनेक वाईट कर्मे तयार होण्याचा संभव असतो जे शेवटी नुकसानदायकच ठरू शकते. म्हणूनच श्रीकृष्ण गीतेमध्ये सर्वच कर्म ईश्वराला अर्पण करावयास सांगतात. आणि हे आपल्याला रोजच्या जीवनात दिसून येतेच. काहीजण तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतो आणि जन्मभर फारसे कष्ट ना करता देखील खूप विलासी आयुष्य जगतो तर दुसरीकडे जन्मभर दिवसाला १०-१५ तास राबूनही काही लोक पॉट भरेल एवढेही कमाऊ शकत नाहीत. कोणतेही व्यसन नसलेल्या माणसाला अचानक कँसर अथवा भयानक व्याधी होऊन तो दगावतो तर अनेक वर्ष दारू सिगारेट ची व्यसन असणारी मंडळी बऱ्यापैकी निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगतात. हा सगळा कर्माचा खेळच आहे. आणि खेळवणारा तो परमेश्वर आहे.

गरजूना दान मी करीन.
खड्ड्यात पडलेल्याला मी वर काढीन.
अंधारात चाचपडणार्याला मी दिवा दाखवीन.

....
म्हणजे ह्यांचं कर्मफळ ० व्हावे म्हणून इतरानी मायनसमध्ये जायचे का ?

निष्काम कर्मयोगामुळे सगळेच मोक्षास गेले तर मग पुढे खेळ चालणार कसा ?---- manguu, या पृथ्वीवर असे किती जण असतील जे निष्काम कर्मयोगाचे तंतोतंत पालन करून मोक्षास जातील? कृष्णानेच गीतेत म्हणले आहे की १०००० तुन एखादाच माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो आणि अश्या हजारो प्रयत्न करणाऱ्यातून एखादाच मला येऊन मिळतो. या कलियुगात तर अध्यात्माची वाट चोखाळणारे आधीच कमी त्यात मोक्षाची वाट ही अवघड त्यामुळे मोक्षास जाणारे जीव त्याहूनही कमी. त्यामुळे हा खेळ पुढे अनंत युगे चालत राहील यात शंका नाही

फळ हे फक्त स्वत:च्या कृतीने भोगले जाते का ? इतरांच्या श्रमाचे फळ खाल्ले तरीही कर्मबंधन आलेच ना ? ---- हो. कारण इतरांच्या श्रमाचे फळ खाणे हेही एक कर्म आहेच. या कर्मामुळे कदाचित एक दिवस असा येईल कि त्या व्यक्तीच्या श्रमाचे फळ दुसराच कोणीतरी खाऊन जाईल मगच ते कर्म सुटेल

म्हणजे मी ८ आंबे आणले .. मोह नको , कर्मबंधन नको म्हणून मला ० ठेवून सगळे वाटून लागले. पण पलीकडच्यानेही ८ आंबे आणले , तोही ० ठेवून इतराना वाटणार तर त्यात मलाही १ आंबा येणारच ना ? ----हा आंबा स्वीकारावा की नाही याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तुम्ही तो एखाद्या आशेने स्वीकारलात तर तुम्ही बंधनात अडकलात. त्याऐवजी शेजार्याला सांगून तुम्ही तो आंबा एखाद्या गरजू व्यक्तीलाही देऊ शकता अथवा अगदी नम्रतेने ते घेण्यास नाकारू शकता. पतंजलीच्या अष्टांग योग (राजयोग) मध्ये योग्यांसाठी काही यम आणि नियम सांगितले आहेत. त्यात ५ यम आहेत त्यातला एक म्हणजे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे दुसर्याने दिलेल्या कोणत्याही वस्तूचा स्वीकार न करणे. कारण स्वीकारलात तर बंधन आले आणि जी गोष्ट स्वीकारलीत त्याविषयी मोह निर्माण होण्याची शक्यताही वाढली.
दुर्दैवाने आज सर्वजण याच्या उलट वागतात. फुकट ते पौष्टिक ही म्हण त्यातूनच आली असेल ना?

manguu@mail.com's picture

20 Feb 2018 - 7:07 am | manguu@mail.com

आंबा हे काल्पनिक आणि साधे उदाहरण आहे . वाटून टाका , असे solution काढणे सोपे आहे . पण आयुष्यात मिळणार्या अन्न वस्त्र निवारा व इतर गरजा इतरांच्या श्रमातूनच येत असतात. त्यांचा उपभोग न घेता वाटून टाकणे प्रत्येकवेळेला जमेलच असे नाही.

गरजूना वाटून टाका , हेही न पटणारे आहे. प्रत्येकवेळी शक्य होइलच असे नाही.

क्रिप्ट's picture

20 Feb 2018 - 7:45 am | क्रिप्ट

पण आयुष्यात मिळणार्या अन्न वस्त्र निवारा व इतर गरजा इतरांच्या श्रमातूनच येत असतात--- परंतु तुम्ही त्यांना त्यांच्या श्रमांचा मोबदला दिला तुम्ही बंधनात अडकत नाही. त्यामुळे कर्मासाखळी निर्माण होत नाही. तुमच्या आयुष्यात जेवढे लागेल तेवढेच वापरावे आणि जास्तीची अपेक्षा करू नये हा गर्भाशय. अपरिग्रह मध्ये अनावश्यक वस्तूंचा साठा न करणे हाही अर्थ अभिप्रेत आहे.
गरजूना वाटून टाका , हेही न पटणारे आहे. प्रत्येकवेळी शक्य होइलच असे नाही--- अध्यात्म इतके सोपे नाहीच. तुकाराम म्हणून गेलेत कि अध्यात्म म्हणजे लोखंडाचे चणे पचवणे

manguu@mail.com's picture

20 Feb 2018 - 8:28 am | manguu@mail.com

श्रमाचा मोबदला घेउन वस्तू घेतली की कर्मबंधन संपते असे तुम्हीच बोलताय.

मग वस्तू १ घेतली काय अन ५०० घेतल्या काय , फरक काय पडतो ?

१ झाली गरजेपुरती आणि ५०० चंगळ... ५०० घेतल्या कि १००० असाव्यात असे वाटते. कितीही मिळवले तरी कमीच वाटते आणि अजून मिळवण्याची इच्छा होते आणि मोह होतो...अशी निर्माण झालेली आणि अपूर्ण राहिलेली इच्छा ज्याला अध्यात्मात वासना म्हणले आहे तेही एक कर्मबंधनच आहे कारण वासनेची पूर्ती झाल्याशिवाय मोक्ष नाही. म्हणूनच गरजेपेक्षा अधिक ची इच्छा धरणे म्हणजे कर्माची साखळीच निर्माण करणे. म्हणूनच अध्यात्मात वैराग्याला (non-attachment) खूप महत्व दिलं आहे.

manguu@mail.com's picture

21 Feb 2018 - 8:24 am | manguu@mail.com

Non attachment हे मानवाच्या मनाचे function आहे . वस्तूंच्या नंबरशी त्याचा संबंध नाही.

अन्यथा १६००० स्त्रीया करणारा नरकात गेला असता की.

क्रिप्ट's picture

22 Feb 2018 - 12:24 am | क्रिप्ट

Non attachment हे मानवाच्या मनाचे function आहे . वस्तूंच्या नंबरशी त्याचा संबंध नाही. --- माझा प्रतिसाद हा तुमच्या "मग वस्तू १ घेतली काय अन ५०० घेतल्या काय , फरक काय पडतो ?" यावर होता. १ हि गरज असेल परंतु ५०० कदाचित गरज नसावी. त्यामुळे फरक नक्कीच पडेल. जर ५०० वस्तूंची गरज नसताना त्या घेतल्या म्हणजे थोडक्यात गरजेहुन अधिक विनाकारण घेतल्या याचाच अर्थ त्या वस्तूविषयी निर्माण झालेला मोह आहे जो एकदा निर्माण झाला की बंधनाचे कारण ठरतो. इथे कर्मबंधनाचे कारण मोह ठरेल.

भौतिक जगातील आकर्षणे इतकी असतात की अनेक अनेक जन्म मिळाले तर चालतील पण ह्या भौतिक जगाची आसक्ती प्रत्येकाची सुटूच शकत नाही. त्यामुळे प्रत्येक जणाने मोक्ष मिळवला तर जग कसे चालेल हा प्रश्न जरी बरोबर असला तरी तशी पाळी कधी येणार नाही आणि आलीच तर त्या दिवशी जग आकुंचन पावून ब्लॅक होल मध्ये ओढले जाऊन एक पोकळी तयार होईल. (ब्रम्हदेवाचे चार दिवस म्हणजे चार युगे संपले की सृष्टीचा संहार होतो तसे काहीसे)

ही चार युगे म्हणजे नेमके काय?

निमिष सोनार's picture

20 Feb 2018 - 12:38 pm | निमिष सोनार

गीता जशी आहे तशी किंवा यथार्थ गीता हे पुस्तक वाचा

थोडक्यात सांगितलेत तरी चालेल.
गीता वाचून त्यातील नेमके मर्म मला समजणे खूप अवघड जाईल.

जसा आपला मोबाईल आपण factory reset करतो तसे काहीसे !

प्रचेतस's picture

20 Feb 2018 - 1:05 pm | प्रचेतस

पण मुळात युग म्हणजे जाय हेच मला नेमके हवेय.

मारवा's picture

21 Feb 2018 - 8:10 am | मारवा

तुम्हाला "युग" या संकल्पनेविषयी उत्तम विवेचन या ग्रंथात सापडेल.
History of Dharmashastra- Volume V Part I - Pandurang waman Kane
CHAPTER XIX- ़Kalpa, Manvantara, Mahayuga Yuga
या ग्रंथात फार थोडक्यात मात्र तरीही सखोल असा आढावा वरील सर्वच युग आणि संबंधित संकल्पनांचा घेतलेला आहे जो आपल्या प्रश्नांची उत्तरे देइल.
शिवाय संदर्भ भरपुर असल्याने म्हणजे विविध प्राचीन ग्रंथात कुठे कुठे व कशा रीतीने या संकल्पना आलेल्या आहेत याची माहीती असल्याने आपणास एक्स्प्लोअर
करण्यास अत्यंत उपयुक्त आहे.
यातील थोडी झलक म्हणुन इतके देऊ शकतो

When and how these huge numbers of years for the yugas were suggested remains somewhat enigmatic. It appears that as early as the Satapatha-brahmana people had become familiar with huge figures The Satapatha "^ says that there are 10800 muhurtas in a year (in one ahoratra 30 x 360), that Prajpati arranged the Rgveda in such a way that the number of syllables it contains is equal to 12000 Brhatls (each BrhatI having 36 syllables) i e. 432000 syllables and it is further stated that the Rgveda also contains 10800 panktis (each pankti having 40 syllables i e the syllables are 10800x40=432000. Prajapati is said to have arranged the other two Vedas also and the three Vedas amounted to ten thousand eight hundred eighties(that is 80 x lOiOO = 864000 syllables), that muhurta by muhurta he gained eighty syllables (as there are 10800 muhUrtas in a sacrificial year of 360 days).

हा खालील उतारा फार मार्मिक टीप्पणी करतो म्हणुन...
The theory of yugas, manvantaras and kalpas with their fabulous numbers of years and harrowing descriptions of pralaya, appears unreal, bizarre and called up by sheer fancy. But underlying it there is the idea of the timelessness of the universe, though from time to time it evolves, gradually declines and perishes, only to reappear in perfection after a cosmic night. There is also the hankering after Reality and pursuit of different ideals. It enshrines the ideas that humanity embarks on a certain goal, pursues it with great efforts and, after achieving some success, gives up that goal and the way that was thought to lead to it and pursues some other goal for aeons in the hope that at some distant date it will be able to evolve and construct a perfect society.

प्रचेतस's picture

21 Feb 2018 - 8:27 am | प्रचेतस

:)