बक्षिस समारंभ (शतशब्दकथा)

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
16 Feb 2018 - 4:00 pm

अरे बापरे..एवढी सगळी प्रशस्तीपत्रके ? कमीतकमी अर्धा तास तरी लागेल हा सगळा गठठा संपायला...

आयोजकांनी हे आधी सांगायला नको का ? सगळीकडची हीच बोंब. ..नियोजन म्हणून काही नाहीच.

आणि एवढं करून मिळणारे मानधन किती ? सात हजार फक्त. कोण कुत्र तरी विचारत का सात हजारला ..

छ्या.. वेळ काही संपतच नाही आजचा. कधी एकदा हॉटेलवर जाऊन झोपतो अस वाटतयं..
................................................................................

माहितेय आज मला बक्षिस मिळणार! फक्त अर्धा तास राहिला आता..

आला की नंबर माझा..धावत जाऊन बक्षिस घेतो आता..

बापरे..यात चक्क पन्नास रुपये आहेत ..एवढ्या पैशाच काय करावं ? मला तर कळेचना..

घरी जाऊन ताईला देऊन टाकतो. हे बघून एवढी खूश होईल ना ती..

रेखाटनप्रकटन

प्रतिक्रिया

कथुकली आवडली. दोन भिन्न दृष्टिकोन.

प्राची अश्विनी's picture

17 Feb 2018 - 10:17 am | प्राची अश्विनी

+११
यावरून आठवलं एक फेस्टीवल आम्ही आयोजलेला त्यात प्रशिक्षकांना मानधन दहा हजार होते, प्रथम पारितोषिक पंचवीस हजार. परिक्षक म्हणाले आम्ही स्पर्धक म्हणून येणार.:)

प्राची अश्विनी's picture

17 Feb 2018 - 10:18 am | प्राची अश्विनी

#प्रशिक्षक नव्हे परिक्षक.

ज्योति अळवणी's picture

16 Feb 2018 - 7:38 pm | ज्योति अळवणी

मस्त... दोन्ही दोन टोकं... आवडली

सस्नेह's picture

17 Feb 2018 - 11:29 am | सस्नेह

छान छोटुकली कथा.

पद्मावति's picture

17 Feb 2018 - 2:42 pm | पद्मावति

आवडली.

कुमार१'s picture

17 Feb 2018 - 9:01 pm | कुमार१

चांगली आहे , पुलेशु

जव्हेरगंज's picture

17 Feb 2018 - 9:31 pm | जव्हेरगंज

मस्त!!

सुखीमाणूस's picture

17 Feb 2018 - 11:16 pm | सुखीमाणूस

छान रेखाटला आहे.
कथुकली आवडली.
लिहित राहा...

शित्रेउमेश's picture

28 Feb 2018 - 12:03 pm | शित्रेउमेश

मस्त