या कुत्र्या च्या पिलांचा बंदोबस्त कसा करावा ?

Primary tabs

बाप्पू's picture
बाप्पू in काथ्याकूट
13 Feb 2018 - 11:19 am
गाभा: 

या कुत्र्या च्या पिलांचा बंदोबस्त कसा करावा ??

मि जिथे रहतो त्या गल्लीमध्ये 1 महीना झाले एक कुत्री ने 4 पिलांना जन्म दिला आहे .. नाही तिने 4 काय 14 पिलांना जन्म दिला तरी माझी काहि हरकत नाही.. पण आता ति पिल्ले मोठी झाली आहेत आणि मला त्यांचा त्रास होत आहे. मी माझी गाड़ी बाहेर पार्क करून तिला व्यवस्थित कवर घालून ठेवतो.. कारण कवर नाही घातला तर काहि शांतिप्रिय लोकांनि लाडवलेलि कबुतरे सकाळ पर्यंत गाड़ी पूर्णपणे रंगवुन देतात
आणि आता नवीनच प्रोब्लेम सुरु झालाय.. ति कुत्रया ची पिल्ले माझ्या गाडिवर घातलेल्या कवर बरोबर रात्रि खेळत बसतात आणि जोपर्यंत कवर फाटत नही तोवर त्यांचा खेळ संपत नाही..
1 कवर त्यांनी फाडून टाकला आहे.. कालच नवीन कवर मगवला जो की थोडा मजबूत आहे.. पण त्यालाहि आता फाडायला सुरवात केलि आहे..
त्याचबरोबर परिसर घान करने व रात्री बेरात्री ओरडने हे त्रास पण होतातच..

इकडे आड आणि तिकडे विहिर अशी परिस्थिति आहे..
बर या पिल्लंना काहि करता ही येत नाही.. गल्लीतिल काहि लोक त्यांचे असे काहि लाड करत असतात की जसे त्यांच्या स्वताच्या मुलीची डिलिवरी होउन तिने नातवंड़े आणली आहेत घरी.. अरे इतकि लाड़ाची आहेत तरी घरी नेउण चाटत बसा त्यांना.. रस्त्यावर कशाला सोडताय.. च्या आयला xxx

त्यांच्याशी या बाबत चर्चा करायची माझी इच्छा नाही कारण ते मनेका ताइंचे शिष्य गण आहेत. त्यामुळे मनात ल्या मनातच त्यांच्या खानदानिचा उद्धार करून शांत बसलोय.

असो तर मुद्दा असा की मी माझ्या गाड़ी च्या कवर ला कसे शाबुत ठेवु ??? कारण एक चांगला कवर घेणे म्हणजे ७०० ते 1000 रुपये गुंतवने... आणि या दिड दिमडी च्या पिल्लंपयी एवढे पैसे सरखे सारखे खर्च नाही करु शकत... कोनि मिपाकर या समस्ये वर जालिम आणि कमी खर्चिक उपाय सांगु शकेल काय

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

13 Feb 2018 - 11:33 am | कपिलमुनी

एक मोठा कुत्रा पाळा आणि त्याला तुमच्या गाडीला बांधून ठेवा . त्याला घाबरून पिल्ले येणार नाहीत

99 to go...

यावरून मांजराच्या धाग्याची (आणि मुक्तपीठकर ) मांजराची आठवण झाली.
https://www.misalpav.com/node/40179

( बाकी कुत्री बोअर होऊन स्वत:हून गेली तरच जातात म्हणे.)

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Feb 2018 - 12:51 pm | अमरेंद्र बाहुबली
विजुभाऊ's picture

13 Feb 2018 - 2:22 pm | विजुभाऊ

त्या पिल्लाना कुठेतरी लांब नेउन सोडून या.
किमान पन्नास किमी तरी लांब नेऊन सोडा.

कपिलमुनी's picture

13 Feb 2018 - 2:27 pm | कपिलमुनी

पिल्लांना त्यांच्या आईपासून दूर करायचा सल्ला देता !
किती दुष्टपणा !

गाडीच्या भोवती एक खंदक खोदा, त्या खंदका मधे पाणी भरा आणि त्यात ८ ते १० मगरी सोडा. मगरी सोडणे महत्वाचे आहे. मगरी सोडल्या नाहीत तर कुत्रे पाण्यातून आरामात पोहत येउन कव्हर खराब करतील.

खंदकावर एक सरकती फळी बसवून घ्या. जेव्हा गाडी खंदका बाहेर काढायची असेल तेव्हा ती फळी खंदकावर आडवी सरकेल अशी योजना करुन घ्या. (अधिक संदर्भासाठी बाहुबली २ पहा)

जर खंदकावर सरकती फळी लावायची युक्ती अव्यवहार्य वाटत असेल तर पाण्याखालून एक भुयार खोदून घ्या. भुयाराचा दरवाजा पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवा. पासवर्ड जरा कठीणच असावा. "खुल जा सिम सिम" असे सोपे पासवर्ड ठेउ नये. (जर पासवर्ड सुचत नसेल तर मिपावर अजुन एक धागा काढा. मिपावर (माझ्यासारखे) अनेक निरुद्योगी लोक पडीक असतात ते पासवर्डच्या भरपूर आयडीया सूचवतील. )

रच्याकने कबुरतांसाठी एक कबुतरखाना बनवून घ्या. त्यांना तिकडे भरपुर खाद्य उपलब्ध करुन द्या. म्हणजे कबुतरे रात्रीची गाडीवर बसणार नाहीत.

कबुतरे पकडण्यासाठी एखादा बोका पाळा. आमच्या घरा जवळ वस्तीला असलेला एक बोका दर दोन दिवसा आड कबुतरांची मेजवानी झोडतो.

तसेही कबुतरांच्या विष्ठेमधे भरुपुर नायट्रेट का असेच काहीतरी असते ज्याचा खत बनवण्यासाठी वापर केला जातो. गाडीच्या कव्हर वर जमलेल्या कबुतरांच्या विष्ठेवर प्रक्रिया करुन त्याचे उत्तमप्रकारचे खत बनवण्याचा प्रकल्पही सुरु करता येईल.

पैजारबुवा,

495 to go

विशुमित's picture

13 Feb 2018 - 4:08 pm | विशुमित

ठो...

विशुमित's picture

13 Feb 2018 - 4:08 pm | विशुमित

ठो...

बाप्पू's picture

13 Feb 2018 - 6:44 pm | बाप्पू

हसून हसून वाट लावली राव तुम्ही.... !!
:)) :)) :)) :))

प्राची अश्विनी's picture

13 Feb 2018 - 7:11 pm | प्राची अश्विनी

:):):)

भटक्य आणि उनाड's picture

14 Feb 2018 - 11:12 pm | भटक्य आणि उनाड

ek se ek upaay...

चिर्कुट's picture

21 Feb 2018 - 10:17 am | चिर्कुट

लय भारी.. :)

कपिलमुनी's picture

13 Feb 2018 - 3:22 pm | कपिलमुनी

तुमचा प्रॉब्लेम कुत्र्याची पिल्ले नाही , कबुतरे आहेत . कबुतरे नसती तर तुम्हि कव्हर घातला नसता आणि ते फाटले नसते.
कबुतरांच्या शिटण्यापासून वाचायचे असेल तर हे घ्या

umbrella

दीपक११७७'s picture

13 Feb 2018 - 3:53 pm | दीपक११७७

आपल्या धाग्या वरुन

http://www.misalpav.com/node/40984

याची आठवणं झाली मला बघा काही उपयोग होतो का

विजुभाऊ's picture

13 Feb 2018 - 4:17 pm | विजुभाऊ

कबुतर रिपेलम्ट मिळते.
बहुधा इंडिया स्टॉअर मधे उपलब्ध असेल ते.
चायनीज असेल तर नका घेवू. त्यामुळे नवीन कबुतरे येतात. शिवाय त्यातून चीन मधील संघटनाना तुमचे लोकेशन वगैरे समजू शकतात

चौथा कोनाडा's picture

13 Feb 2018 - 5:14 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

13 Feb 2018 - 5:17 pm | चौथा कोनाडा

कबुतरांना कंट्रोल करणे खूप अवघड जाईल असे वाटते कारण इथे खूप झाडे आहेत आणि बरेचसे इतर पक्षी देखील आहेत...
त्यांचा संसार आणि घरटी झाडावर च आहेत.

कंजूस's picture

13 Feb 2018 - 5:19 pm | कंजूस

**माझी गाडी ****
फोर विलर असेल तर आमच्या गल्लीतला लोकांनी केलेला खात्रीचा उपाय -
चारपाचफुट लांब मागच्या डिकित राहतील इतक्या लांबीच्या काटेरी बोगनवेलीच्या काठ्या कवरवर घालून ठेवतात. मोठे कुत्रे वरती बसायचे ते बंद झाले. गाडी काढताना कवर आणि काठ्या डिकित ठेवतात.
फोटो देऊ का?

पुणेकर बाइकला गाडी म्हणतात आणि फोर विलरला तिच्या नावाने हाक मारतात असे कळले - मारुती, होंडा, इंडिका वगैरे. "गाडी"वर काटेरी फांद्या ठेवल्या तर कुणाचे कपडे फाटल्यास क्लेम करेल ही भिती. शिवाय त्या काटक्या ठेवणार कुठे cacheमध्ये?

बाप्पू's picture

13 Feb 2018 - 6:51 pm | बाप्पू

गाडी चार चाकी च आहे,
गाडी ला मी माझ्या कुटुंबातील एक सदस्य च समजतो कारण ती च मला आणि माझ्या कुटुंबियांना सुखरूप पणे आणि सुरक्षित पणे इतर ठिकाणी फिरण्यास मदत करते.
हेच कारण आहे कि मी तिची तितकीच काळजी घेतो..

manguu@mail.com's picture

13 Feb 2018 - 5:49 pm | manguu@mail.com

इतकी कुत्री असली तरी माहिश्मती एकाचीच होईल व उरलेली कुत्री मोठी होतील तशी वाहून जातील.

पण ते एक कुत्रे मोठे झाले की पुन्हा त्यालाही मुले होतीलच . त्यामुळे नसबंदी करावी लागेल.

मनेका गांधींवर उपाय संजय गांधीच !

शब्दबम्बाळ's picture

13 Feb 2018 - 5:59 pm | शब्दबम्बाळ

असो तर मुद्दा असा की मी माझ्या गाड़ी च्या कवर ला कसे शाबुत ठेवु ?

हम्म, जरा वेगळाच प्रश्न आहे तुमचा! पण मदत करणे मिपाकरांचे आद्य कर्तव्य आहे त्यामुळे माझ्यापरीने मदत...

पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या गाडीच्या कव्हरची किती छोटी घडी होऊ शकते हे पाहावं लागेल. दंडगोल आकार करून गुंडाळालीत तर घडी चांगली होऊ शकेल असा अंदाज. आता घडी बघून लागणाऱ्या जागेचा अंदाज येईलच, मग एक मोठा डबा घ्यावा लागेल. त्याच्यात गाडीचे कव्हर बसून जागा शिल्लक राहायला हवी. मग या उरलेल्या जागेमध्ये तुम्ही वरून शाबू भरू शकता! म्हणजे शाबू व्यवस्थित सगळ्या बाजूने टाकता येतील! आणि मग झाकण लावून टाका! झालं काम! कुत्र्यांना शाबू आवडत नसावा कदाचित त्यामुळे तो प्रश्न देखील नाही...
महाशिवरात्री निमित्त शाबूमध्ये कव्हर वगैरे पण घालतात का?

पण मला एक गोष्ट कळली नाही कि जर तुम्हाला कव्हरला शाबुतच ठेवायचंय तर ते गाडीवर का घालताय??
आता जर तुम्हाला गाडीसकट कव्हर शाबूत ठेवायच असेल तर मात्र डबा लैच मोठा लागेल बर का!

बाप्पू's picture

13 Feb 2018 - 6:54 pm | बाप्पू

हसून हसून पुरती वाट....!!!!!! :)) :)) :)) :))

आज तसेही सौ नि भरपूर शाबू आणली आहे महाशिवरात्री मुळे.
आपला उपाय करून पाहतो. :)) :))

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Feb 2018 - 6:54 pm | हतोळकरांचा प्रसाद

हासून हासून प्वाट फुटलं बगा! :):):):)

चिर्कुट's picture

21 Feb 2018 - 10:21 am | चिर्कुट

मेलो मेलो...

सुबोध खरे's picture

13 Feb 2018 - 6:10 pm | सुबोध खरे

गाडीच्या कव्हरला निलगिरी तेलासारखे उग्र वासाचे तेल चोळा.आणि गाडीखाली तीन चार डांबर गोळ्यांचा चुरा करून टाका.
कुत्र्यांना असे उग्र वास सहन होत नाहीत. त्यामुळे त्याच्याशी खेळणे किंवा गाडीखाली जाणे ते काही काळ तरी टाळतील.

हा उपाय करण्याजोगा आहे. करून पाहीन.

प्राची अश्विनी's picture

13 Feb 2018 - 7:15 pm | प्राची अश्विनी

गाडी पार्किंगची जागा ठरलेली असेल तर त्याच्या बाजूने तिखट पसरा. कुत्र्यानं एकदा हुंगलं की पुन्हा तिथं येत नाही.

हो. गाडी ची जागा ठरलेली आहे.
तिखट म्हणजे मिरची पावडर चालेल ना??
ट्राय करून पहातो.

manguu@mail.com's picture

13 Feb 2018 - 7:29 pm | manguu@mail.com

कुत्र्याची शी टाकली की तिथे मांजर फिरकत नाही , असे ऐकून आहे.

कुत्रे फिरकू नये म्हणून वाघाची शी टाकून बघा.

manguu@mail.com's picture

13 Feb 2018 - 7:29 pm | manguu@mail.com

कुत्र्याची शी टाकली की तिथे मांजर फिरकत नाही , असे ऐकून आहे.

कुत्रे फिरकू नये म्हणून वाघाची शी टाकून बघा.

बाप्पू's picture

13 Feb 2018 - 8:15 pm | बाप्पू

अरे वाह... अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून मागवता येइल का ???

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Feb 2018 - 6:55 pm | हतोळकरांचा प्रसाद

ख्याख्याख्याख्या!!!!

भटक्य आणि उनाड's picture

14 Feb 2018 - 11:20 pm | भटक्य आणि उनाड

आम्हि लहान असताना एक उपाय करायचो...

thoda vel ani mehnat karavi lagel, kerosene manage kara with ek spray, aaplya cutting sallon sarkha..

tyane tya kutranchya dhungnavar spray kara, tyanna khaj sutte ani khajvata yet nahi.. nighun jatat..

all the best..

झेन's picture

15 Feb 2018 - 10:02 am | झेन

अशी आशा करूयात की इथे कुणी मनेका गांधी नाहीत नाही तर. . .

या पिल्लांचे हितचिंतक खूप झालेत गल्ली मध्ये त्यामुळे असं करताना खूप रिस्क आहे.

झेन's picture

15 Feb 2018 - 10:07 am | झेन

पिल्लं परवडली पण मोठी झाल्यावर त्यांचा यळकोट गेला नाही तर कारच्या फायबर पार्टचे लचकेसुध्दा तोडतात. नातेवाईकांची गाडी त्या खुणा मिरवत आहे.

झेन's picture

15 Feb 2018 - 10:09 am | झेन

पिल्लं परवडली पण मोठी झाल्यावर त्यांचा यळकोट गेला नाही तर कारच्या फायबर पार्टचे लचकेसुध्दा तोडतात. नातेवाईकांची गाडी त्या खुणा मिरवत आहे.

कोणी ओळखीचे आहे का कि ज्याला सुपारी देता येईल यांना किडनॅप करून दूर सोडून द्यायची ?
PMC च्या वेबसाईट वर पहिले असता असे समजले कि ६ महिने किंवा त्यापेक्षा कमी वयाची पिल्ले ते नेत नाहीत उचलून.
काय करावे मिपाकर्स ???

उगा काहितरीच's picture

17 Feb 2018 - 6:16 pm | उगा काहितरीच

या धाग्याची आठवण आली. :-D

आपल्या गाडीच्या कवर वर वाघाचे मोठे चित्र काढा, खूप फरक पडेल.

बाप्पू's picture

21 Feb 2018 - 2:25 pm | बाप्पू

सर्व मिपाकरांचे आभार .. कुत्र्याची पिल्ले अजून आहे तशीच आहेत.. मध्यंतरी मिरची पावडर कव्हर ला लावून पहिली.. थोडे दिवस त्यांनी काही केले नाही .. पण काही दिवसांनी परत जैसे थे.

असो. आजकाल मी गाडीला पूर्ण कव्हर न घालता गाडीच्या फक्त रूफ वर एक प्लास्टिक कागद अंथरतो जो कि पिल्लांच्या उंची पेक्षा जास्त वर राहील. त्यामुळे काही प्रमाणात माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे... आणि आता त्या पिल्लांचा बदला घेण्यासाठी आरामात विचार करतो आहे. :))
त्यांचा सूड घेण्यासाठी काही उपाय असतील तर सांगा :))