सुदाम्याचे पोहे

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
12 Feb 2018 - 5:39 pm

पुन्हा पुन्हा लिहितात,
अन पुन्हा पुन्हा खोडतात,
दिवसभर मोबाईलशी,
हात, खेळत बसतात.
मनातले शब्द शेवटी
मनातंच रहातात..

माणसं दूर जातात..
पण आठवणी जवळ राहतात
टाईमलाईनवर जाऊन,
डोळे नुसतेच रेंगाळतात.
सुदाम्याचे पोहे कधीकधी
कनवटीलाच रहातात..

कवितामुक्तककाहीच्या काही कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2018 - 9:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

13 Feb 2018 - 9:45 am | प्राची अश्विनी

:) मतितार्थ कळला.

पद्मावति's picture

12 Feb 2018 - 10:15 pm | पद्मावति

आहा...मस्तच!

पलाश's picture

13 Feb 2018 - 9:46 am | पलाश

सुंदर!!

प्राची अश्विनी's picture

15 Feb 2018 - 7:32 am | प्राची अश्विनी

पद्मावति ( आता पद्मावत लिहायची सवय पडली बघ.;)) ,पलाश, बिरुटे सर, धन्यवाद!

पद्मावति's picture

15 Feb 2018 - 10:16 pm | पद्मावति

:)

पैसा's picture

15 Feb 2018 - 9:05 pm | पैसा

आवडली कविता