कोकण प्रवास - माहिती हवी आहे.

शब्दानुज's picture
शब्दानुज in काथ्याकूट
10 Feb 2018 - 7:36 pm
गाभा: 

पूणे - कोकण - पूणे अशी तीन दिवस दोन रात्रीची ट्रीप करणे योजले आहे. (दिनांक २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी)

संभाव्य प्रवास असा करण्याचे योजले आहे.

पहिला दिवस - पाली , जंजिरा आणि काशिद बीच. मुक्काम काशिद बीच किंवा दिवे आगार बिच

दुसरा दिवस - श्री वर्धन हरिहरेश्वर दापोली. मुक्काम दापोली

तिसरा दिवस - दापोली ते महाबळेश्वर. रात्री पुन्हा पुणे

यात कोणते बदल करता येतील ते सुचवावे. तसेच कोणती ठिकाणे वाढवता येतील ते सांगा

संपुर्ण प्रवास खाजगी वाहनाने करणार आहोत. प्रवासात तीन तरूण मुले-मुली आहेत (१९-२२) आणि बाकीचे ५६ वर वयाचे आहेत.

रायगड आणि गणपतीपुळे आधी पाहिले असल्याने ते समाविष्ट करण्यात आलेले नाही.

काशिद बीच कसे आहे ? काशिदला वॉटर स्पोर्टस आहेत असे ऐकले आहे. त्याबद्दल माहिती असल्यास सांगावे.

अलिबाग , काशिद , दिवेगार यापैकी उत्तम मुक्काम कुठला ठरेल ?

कोणत्याही बीचला संध्याकाळी पोहचणे अपेक्षित आहे.

योग्य मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत

प्रतिक्रिया

काशिद बीच वर वॉटर स्पोर्ट चे भरपुर प्रकार उपलब्ध आहेत. स्कुटर, पॅराशुट असे. काशिद पासुन ३ कि मी वर नांदगाव आहे मुरुड जंजिरा आणि नांदगाव ही दोन गावे संयुक्त ग्रामपंचायतीत आहेत. या दोन्ही गावांच्या दरम्यान भरपुर राहण्याची व्यवस्था आहे. आम्ही गेलो तेव्हा नांदगाव च्या सिध्दीविनायक गणपती मंदीराजवळ श्री. गजानन तांबटकर यांचे कडे मुक्काम केला होता. अगोदर फोन करुन बुकींग करता येते. फोन नंबर ०२१४४-२५२५४५, ९४२२३५९०२८, ९२७१०४५७०३, ८७९३६३५१५९, ९२२४७९१४८१. जेवण अगदी कोकणी पध्दतीचे आणि चवीचे होते. आम्ही शाकाहरी होतो तर तसे वेगळे बनविले होते. (हे वैयक्तिक मत आहे, दोन वर्षापुर्वीचे)

शब्दानुज's picture

10 Feb 2018 - 9:43 pm | शब्दानुज

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

10 Feb 2018 - 10:02 pm | चौथा कोनाडा

शेड्युल ठीक वाटत आहे !
पहिल्या दिवशी टाईट शेड्युल न ठेवल्यास वेळ कमी पडेल. जंजिरा दुर्ग पाहण्यासाठी तीन चार तास लागतात ते कंसिडर करा.

बाकी सोयी भरपूर आहेत, नेटवर चिकार माहिती आहे.

ट्रिप साठी शुभेच्छा !

काशिद हे मुरुडच्या उत्तरेस आहे, तिकडे जाऊन परत मागे येऊन दंडा राजापुरीची बोट मिळववून दिवेआगरला पोहोचायचे आहे. भराभर उरकणे करावे लागेल. जंजिरा जाऊन परत येणे आहेच. कोणी गाडी नेच कुठे फिरला हे माहित असेल तर तोच प्लान रिपीट/फालो करणे खात्रीचे.

नितिन थत्ते's picture

10 Feb 2018 - 10:25 pm | नितिन थत्ते

मुंबई गोवा हायवे (माणगाव पर्यंत) आणि माणगाव ते हरिहरेश्वर-श्रीवर्धन-दिवेआगर या रस्त्यांची पूर्ण वाताहात झालेली आहे तेव्हा तुम्ही तुम्हाला ठाऊक असलेल्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याच्या कालावधीत एक एक तास मिळवा आणि त्यानुसार शेड्यूल आखा.

पुणे ते महाड (भोर मार्गे), पुणे ते किंवा पुणे ते माणगाव (विळे मार्गे) या रस्त्यांची काय स्थिती आहे ते ठाऊक नाही.

कंजूस's picture

11 Feb 2018 - 1:16 pm | कंजूस

आराखडा?
>>पहिला दिवस - पाली , जंजिरा आणि काशिद बीच. मुक्काम काशिद बीच किंवा दिवे आगार बिच>>
पुणे -जुना मुंबई रस्ता/ एक्सप्रेसवेने- घाटात खोपोली बाह्यवळणाने - खोपोली/खालापूर -(८०) -पाली (+४०)darshan stop - नागोठाणे - रोहा - मुरुड (+60) janjira stop बोटीने जंजिरा पाहून परत येण्यास चार वाजतील.
आणखी २०किमि काशिद जाऊन परत मुरुड आल्यास शेवटची फेरी बोट मिळेल का दिवेआगरला जाण्यासाठी? अथवा परत गोवा रोडवर रोहा - माणगाव - म्हसळा - दिवेआगरला जावे लागेल.

पाली शेवटी ठेवा.
प्रथम पुणे - ताम्हणी घाट - माणगाव - म्हसळा - दिवेआगर - इथे मुक्काम. दुसरे दिवशी पलीकडे जाऊन सकाळीच मुरुड - जंजिरा - मुरुड - काशिद - साळाव - रोहा - नागोठाणे - पाली - खोपोली मार्गे पुणे.

दुर्गविहारी's picture

12 Feb 2018 - 1:03 pm | दुर्गविहारी

कोकणप्रवासाची आखणी सोपी जावी म्हणून मायबोलीवरचे काही उपयुक्त धाग्याच्या लिंक देतो. त्याचा उपयोग करून तुम्हाला कोकण ट्रिपचे नियोजन करता येईल.
मला कोकण बघायचेचं!!!!

पिकनिकला जायचंय.....?? इथे माहिती मिळेल.

या शिवाय हा ब्लॉगसुध्दा उपयोगी पडतो का, ते पहा.

http://pritskulkarni.blogspot.in/

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Feb 2018 - 7:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझ्या मते महाबळेश्वर करु नका.

सुरुवात ताम्हिणी घाट उतरुन करा आणि म्हसळामार्गे दिवेआगर ला पोहोचा. मुक्कामाला भरपुर सोयी आणि समुद्र किनार्‍यावर वॉटरस्पोर्टस वगैरे आहेत. दुसर्‍या दिवशी हरीहरेश्वर आणि श्रीवर्धन करुन मुक्काम करा दोन्हीपैकी कुठेही.

तिसर्‍या दिवशी खाडी पार करुन नांदगाववरुन पुढे दापोलीला या. इथेही बरेच पाहण्यासारखे आहे . दापोलिजवळ हर्णे (मुरुड)आ मुक्काम करा किवा कर्दे बीचला . जाता येता आसुदचे केशवराज मंदीर बघा. दपोली कृषी विद्यापीठवरुन पुढे तामसतीर्थ आणि परशुराम स्मारक बघा. किवा दुसर्या बाजुला जाउन केळशी आण आंजर्लेचा कड्यवरचा गणपती बघा. सुवर्ण्दुर्ग आणि पन्हाळेकाजी लेणी बघा.

एक दिवस दाभॉळ खाडी पार करुन गुहागर अंजनवेल बघा. जातान चंडकाई देवीचे दर्शन घ्या. मग गुहागर पुणे व्हाया कोय ना न

एवढी ठिकाणं कशी होतील रा०मे०?

Nitin Palkar's picture

12 Feb 2018 - 9:26 pm | Nitin Palkar

शक्यतो सूर्यास्तानंतर प्रवास करावा लागणार नाही असे वेळापत्रक आखा (सुरक्षिततेच्या कारणास्तव). चालक एकच असल्यास दिवशी सहा/सात तासांपेक्षा अधिक ड्रायव्हिंग नसावे. water sports काशीद प्रमाणेच मुरुडलाही आहेत, काशीद समुद्र किनारा बराच खडकाळ आहे त्या पेक्षा मुरुडचा समुद्र किनारा अधिक चांगला आहे.