दिवाणखान्याची सजावट

Primary tabs

फुंटी's picture
फुंटी in काथ्याकूट
10 Feb 2018 - 9:41 am
गाभा: 

दिवाणखान्यात सजावट म्हणून पुस्तकं ठेवण्याकडे कल अधिक दिसून येतो.समृद्ध वगैरे जीवनशैलीला ते शोभत.इतर सजावटीच्या साहित्याच्या तुलनेत पुस्तक स्वस्त आणि आकर्षक दिसतात..आपल्या विद्वत्तेचं दर्शन होत..त्यासाठी या काही टीप्स-
◆काही जाडजूड ग्रंथ मांडावेत.
◆त्यासाठी आकर्षक काचेचा दरवाजा असलेलं फर्निचर करावं.ते शक्यतो सागवान लाकडाच ,पॉलिश केलेलं असावं.
◆त्यात पुस्तकं उभी मांडून ठेवावी.दिसायला छान दिसतात.
◆संग्रहात एखादं दोन वाचलेली पुस्तकं ठेवावीत म्हणजे कुणी पाहुण्यांनी विचारलं तर त्या पुस्तकांबद्दल सांगता येत ऐनवेळी पंचाईत होत नाही.
◆भगवद्गीता,पु ल देशपांडे, व.पु काळे यांची काही पुस्तके असणे अनिवार्य आहे.(तुम्ही नव्या पिढीचे असाल तर चेतन भगत)
◆पायरेटेड पुस्तके शक्यतो सजावटीसाठी वापरू नयेत.
◆शोकेसला लॉक करावे त्याची चावी सहज उपलब्ध होणार नाही अशी ठेवावी.म्हणजे पाहुणे पुस्तक हाताळत नाही आणि त्याच आयुष्य वाढते.तसेच वाचायला नेतो म्हणून ढापण कठीण जात.
◆'पन्नास रुपयात कोणतेही पुस्तक' स्कीम मधल्या पुस्तकांना सजावटीसाठी शक्यतो वापरू नये.
◆दोन चार कुणालाही सहज माहीत नसलेल्या इंग्रजी लेखकांची पुस्तके ठेवावीत.चौकस,सखोल वाचनाचे दर्शन होते.
◆पुस्तकांना वाळवी लागली असेल तरी त्यावर चकार शब्द काढू नये.वाळवी लागणे हे पुस्तक वाचत नसल्याचे लक्षण आहे.
◆लिखाणाचं महागातलं पेन,नक्षीदार कागद असावेत.स्वतःसाठी लिहितो अधूनमधून या वाक्यासह फेकावेत.
◆या सगळ्या सेट सोबत नम्रपणा अंगी बाणवून घ्यावा.साहित्यावर बोलताना आवश्यक असतो.
◆स्थानिक साहित्यिक कार्यक्रमातील नामवंत साहित्यिकांना पुष्पगुच्छ देतानाच एखादा फोटो असावा.
◆आपले फोटो असलेल्या साहित्यिक बातम्यांची पेपर कटिंग शक्यतो लावू नयेत.

प्रतिक्रिया

ताज्या मासळी सारखं फ्रेस आहे! :)
फर्वंर्द हाय का? की उपरोधाने लिहीलं आहे?

फुंटी's picture

10 Feb 2018 - 12:30 pm | फुंटी

उपरोध हो

मासलीबद्दल माहित नाही पण फ्रेस नक्कीच. आत एलीडी लाइटिंग हवेच. साहित्याला मंद प्रकाश हवा की नको?

कृत्रिम प्रकाश अर्थात हवाच... साहित्यातून काही प्रकाश पडेल की नाही शंकाच असते

दमामि's picture

11 Feb 2018 - 7:24 am | दमामि

मस्तच!!!

अॅमी's picture

11 Feb 2018 - 7:30 am | अॅमी

खि खि :D

चौकटराजा's picture

14 Feb 2018 - 2:24 pm | चौकटराजा

पूर्वी आपले हिन्दी सिनेमातील नट यांच्यामधे वाचनाची आवड नसतानाही घरात अशी पुस्तके दिसलीच पाहिजेत अशी फ्याशन होती. त्याचे फटू फिल्म फेअर मधे येत कधी कधी !

manguu@mail.com's picture

14 Feb 2018 - 8:12 pm | manguu@mail.com

५० रु ला एक पुस्तक !! इतके म्हाग !!!

वाशी स्टेशनजवळ एक दुकान आहे. तिथे १०० की २०० रु किलो पुस्तके मिळतात.

जव्हेरगंज's picture

15 Feb 2018 - 8:07 am | जव्हेरगंज

:D

किसन शिंदे's picture

15 Feb 2018 - 5:28 pm | किसन शिंदे

आमच्या एका मिपाकर मित्राचे घर आठवले हे वाचून. अर्थात त्याचा व्यासंगही तेवढाच आहे म्हणा.