आटपाटनगर, पाटण, पाटील, पटेल इत्यादी

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
8 Feb 2018 - 2:01 pm

मनो याम्च्या बाजीराव अ‍ॅट बिठूर लेखातील; राही, मनो, अरविंद कोल्हटकरां सोबतची एक अनुषांगिक उपचर्चा राजेलोकांची बसण्याची पद्धती आसने सिंहासन इत्यादी मार्गाने गेली . त्या चर्चेत सिंहासनास संस्कृतातील मंचक आणि भद्रासन हे शब्द पर्यायांचा विचार झाला . उर्दूतील तख्त , गद्दी शब्दाची चर्चा झाली तर मराठीतील गादी शब्दाचीही आठवण निघाली .

पत > पट > पाट >आटपाटनगर, पाटनगर , पाटण, पाटील पटेल इत्यादी शब्द साधर्म्याचा शोध या निमित्ताने वेगळ्या धागा लेख चर्चेच्या माध्यमातून घ्यावा असा विचार केला. मराठी लोककथातील आटपाटनगर हा शब्द लहानपणी कानावर पडला होता पण त्याचा नेमका अर्थ अथवा व्युत्पत्ती माहीत नव्हती . कोणतेतरी एका गाव असा त्याचा अर्थ मी घेत असे . राजधानीच्या गावास गुजराथीत पाटनगर म्हणतात हे कळाल्या नंतर आटपाटनगर शब्दाच्या व्युत्पत्तीचा अंदाज आपसूकच आला . पाटलीपुत्र /पाटणा ते पैठण अशी ऐतिहासिक राजधानीच्या शहरांची नावे आपण ऐकून असतोच

या लेखाच्या निमित्ताने भारतातील ग्रामनामांचा शोध पोस्टल पिनकोड डाटाबेस च्या साहाय्याने घेतला . (सेन्सस साईट सर्वर बिझी दाखवत होते) सेन्सस च्या मानाने पिनकोड डाटाबेस लहान असतो त्यात पुन्हा त्यांच्या डाउनलोड एक्सेल मध्ये सिक्कीम नागालॅन्ड केरळ तामिळनाडू यांचा का कोण जाणे समावेश झाला नाही तरीही Pat अशी सुरवात असलेली ६ हजाराच्या आसपास गावे भारताच्या सर्व राज्यातून सापडली . यातील अर्धी गावे ढोबळ ठोकताळ्याने इतर अर्थाने आली असतील असा विचार करून सोडून दिली तरी अर्धी म्हणजे तीन एक हजार गावे किंवा मोठ्या प्रमाणावार गाव नावे राजधानीच्या गावामवरून आलेली दिसतील यातील बरीच एका गावाच्या नावावरून दुसर्या गावाचे नाव आले असेही असणार तरीही एका खूप मोठे प्रमाण राजधानीच्या गाव नावाचे दिसते. यात अगदीअनेक पट्टानुर सारख्या नावाची गावे अगदी अरुणाचल प्रदेश मेघालयात आढळतात आणि असे Pat नाम-उच्चार साधर्म्य असलेली अनेक गावे उत्तरपूर्व भारतात आहेतच . (चीन ऐतिहासिक दृष्ट्या अरुणाचल प्रदेश त्यांचा असल्याचे सर्वांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करते त्या शिवाय उत्तर पूर्व भारतास वेगळे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न त्यांच्या साहाय्याने फुटीरतावादी गट करत असतात त्यांच्या तोंडावर हा पुरावा सहज टाकता यावा असे वाटते)

पाटण, पाटणा पट्टन पाटगाव अशी नाम - उच्चार साधर्म्य असलेली गावे काश्मीर ते तामिळनाडू संबंध भारतभर पसरलेली दिसतात . (अफगाण डाटाबेसमध्ये डझनाभातरी गावानावे उच्चार साधर्म्याची असावीत त्यातील दोन गावांची नावे सुस्पष्टपणे पाटण असलेली दिसतात ) तामिळनाडूचा संबंध डाटाबेस शोधणे शक्य झाले नाही तरी तंजावूरच्या मराठा राज्याने एका किल्ला उभारला तो तेथील पट्टुकोट ई नावाच्या गावात पट्टू पासूनची आणखी बरीच ग्रामनामे तामिळनाडूत असावीत असे प्रथम दर्शनी दिसले .

भारतातील काही आडनावांचा आपण माग घेतला तर पाटील , पटेल , पटवारी , पटनाईक , पटवर्धन अशी काही आडनावे भारतात दिसून येतात या आडनावाची माणसे राजप्रमुख पदावर असल्याचे पुरावे आज जरी मिळण्याची शक्यता कमी असली तरी स्थानिक स्वरूपाची प्रमुख पदाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे राहिल्या असाव्यात असा सर्वसाधारण कयास करता यावा.

पती या प्रत्ययाचे इतर उपयोग पाहिल्यास प्रमुख या अर्थाने हा शब्द प्रयोग वापरला गेल्याचे दिसते. etymonline वरील पेट्रीआर्क शब्दाची खालील व्युत्पत्ती माहिती रोचक ठरावी

patriarch (n.)
late 12c., from Old French patriarche "one of the Old Testament fathers" (11c.) and directly from Late Latin patriarcha (Tertullian), from Greek patriarkhes "chief or head of a family," from patria "family, clan," from pater "father" (see father (n.)) + arkhein "to rule" (see archon).
https://www.etymonline.com/word/patriarch?ref=etymonline_crossreference

इंग्लिश विकिपीडियावरील एका संदर्भ नमूद ना केलेली आंध्र आडनावाबद्दलची माहिती खालील प्रमाणे आहे

Family names ending with "pati" or "pudi" evolved later during post Ashokan period of Buddhism as new towns were established. Example: Gottipati, Bhamidipati, Gudipati, Mokkapati,
Chigurupati, Gudipudi, Rimmalapudi etc. - en विकिपीडिया

मोल्सवर्थ मधील पाट शब्दाचा अर्थ पाट (p. 283) pāṭa m (पीठ S) A stool असा दिला आहे .

आपले मिपा मित्र शरद यांनी महाराष्ट्र शब्दकोश , खंड 5, प ते भ, पान 1978, ( प्रत 1936) मध्ये पाट शब्दाचा अर्थ श्रेष्ठपणा , मोठेपणा / श्रेष्ठपणाचा मुख्य मान, अधिकार / सिंहासन, गादी, पीठ; असा दिला आहे आणि ज्ञानेश्वरीच्या पासून हा अर्थ मराठीत वापरला जात असल्याचे संदर्भ उपलब्ध होण्याकडे लक्ष वेधले.

पाट :
* २ . सिंहासन, गादी, पीठ; 'ते वेळी विजयश्रियेचे पाटीं | एकुचि बैसे ' - ज्ञानेश्वरी ७.१२ ; 'योगसाम्राज्य शेष पाट | तुजचि साजे ' - विपू ७.१०५.

* ३. श्रेष्ठपणाचा मुख्य मान, अधिकार . 'वरी क्षत्रीयांमाजी श्रेष्ठु | जो जगजेठी जगी सुभटु | तया दळवैपणाचा पाटु | भीष्मासी पै |' - ज्ञानेश्वरी १. ११५ ; ' एकाएकी इच्छी पाट| नेणे चाट काउळें | -तुकाराम गाथा २८७०

* ४. श्रेष्ठपणा , मोठेपणा . 'कांबाळका एकी माये - | वाचोनी जिणे काय आहे | म्हणोनी सेविजे की तो होये पाटाचा धर्मु ' -ज्ञानेश्वरी १८.९०८
-महाराष्ट्र शब्दकोश , खंड 5, प ते भ, पान 1978, ( प्रत 1936) मध्ये

अर्थात शब्द वापर ज्ञानेश्वरी पेक्षाही नक्कीच प्राचीन असावा हे गावांच्या नावांच्या यादीवरुन लक्षात येते.

पत ( झाडाचे बसण्यासाठी आठांथरलेले पान या अर्थाने मग असे आसन ग्रहण करणाऱ्या पत असलेल्याना प्रमुखांना संबंधित आडनावे > पट > पाट असा शब्द विकास होऊन राजधानी नावांची प्रगतीची शक्यता असू शकावी किंवा कसे ..

माझे उपरोक्त निष्कर्ष अचूक असतील असा दावा नाही पण जिज्ञासूंनी या दिशेने अधिक शोध अभ्यास करुन पहावा असे वाटते. तर या निमित्ताने अशा उच्चार साधर्म्य असलेल्या गावांच्या नावांची आणि जमल्यास त्या गावांच्या
इतिहासाची माहिती या लेख चर्चेच्या निमित्ताने वाचण्यास मिळाल्यास आनंद वाटेल.

अनुषांगिक व्यतिरिक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार

इतिहास

प्रतिक्रिया

आटपाट नगर याचा लाक्षणीक अर्थ आहे ज्या गावात आठ दिशांहून पाट येतात.
म्हणजेच पाण्याची रेलचेल आहे आणि पर्यायने सुबत्ता आहे.

माहितगार's picture

8 Feb 2018 - 2:23 pm | माहितगार

तसेही शक्य असावे.

ट्रान्सलिटरल डॉट ऑर्ग वर दाते कर्वेकोशात खालील प्रमाणे माहिती दिसते

कोणतें तरी निनांवी , रहदारीचें गांव . [ सं . अट = गमने व पट = गमने = आलें गेलें गांव ( राजवाडे ) ].
आठ पेठा असलेलें मोठें शहर . [ सं . अष्ट = आठ + पट्ट = चौक ; पेठ ]
आठ मोठे राजरस्ते असलेलें गांव . [ अष्ट + पथ = पाट ; कोंकणांत गुहागर या गांवीं एका रस्त्याच्या दोन बाजूस सारखी वस्ती असून त्या वस्तीच्या दोन वेगवेगळ्या भागांस खालचा पाट व वरचा पाट अशीं नांवें आहेत . ] कहाण्यांतून नेहमीं हा शब्द आरंभीं येतो . उ० आटपाट नगर होतें , तिथें एक ... वगैरे . [ तुल० गु . पाडा = भाग , वस्ती , पेठ . उ० नवापाडा ]

पण आट हया शब्दाला आठ हा अर्थ असलाच पाहीजे या बद्दलही शंका वाटते. पाट शब्दाला जोडीचा निरर्थक पण म्हणण्यास रोचक उपसर्ग जोडला गेला अशी
शक्यताही अभ्यासली जावी असे वाटते.

आपल्या प्रतिसादांसाठी अनेक आभार

manguu@mail.com's picture

8 Feb 2018 - 2:55 pm | manguu@mail.com

छान

माहितगार's picture

8 Feb 2018 - 4:42 pm | माहितगार

आभार

पैसा's picture

8 Feb 2018 - 3:26 pm | पैसा

पट्टण म्हणजे गाव, शहर. लोकवस्तीचे ठिकाण. वन म्हणजे जंगल नसलेले. गोव्याच्या जुन्या राजधानीचे नावही गोपकपट्टण होते.

पती याचा अर्थ स्वामी, मालक असाही होतो.

Patriarch मधला फादर आणि पितृ हे उघड जवळचे शब्द आहेत.

माहितगार's picture

8 Feb 2018 - 4:41 pm | माहितगार

ईंग्रजी विकिपीडियावर पती हा प्रत्यय जोडून आडनावे सम्राट अशोक काळा पासून सुरु होत असल्याचे म्हटले आहे ते कितपत बरोबर असावे , त्या पुर्वीची काही उदाहरणे असण्याच शक्यता असेल का ?

पट्टण शब्दाला राजधानीचे गाव अथवा अधिकार दर्शक अशी विशेषता असण्याची शक्यता वाटते. (पट्टराणी या शब्दात मात्र पट्ट शब्द वेगळ्या अर्थाने येतो अधिकार मात्र महाराणिकडे असतो असे दिसते) गोव्याच्या जुन्या राजधानीचे नावही गोपकपट्टण होते.

चर्चा सहभागासाठी अनेक आभार

पगला गजोधर's picture

8 Feb 2018 - 4:13 pm | पगला गजोधर

पाट/पट किंवा तदानुषंगिक नावांनी सुरू होणाऱ्या शहाराबरोबर
, तत्सम शब्द शेवटी येणारी गावे सुद्धा अभ्यासु शकता...

उदा विशाखापट्टनं श्रीरंपट्टण

माहितगार's picture

8 Feb 2018 - 4:32 pm | माहितगार

होय अगदी आपण सुचवल्या प्रमाणे प्रत्यायात जिथे येईल त्याचाही समावेश अभ्यासात करावायास हवा.

विशाखापट्टनं श्रीरंपट्टण शहरांची उदाहरणे देण्यासाठी अनेक आभार

हुप्प्या's picture

9 Feb 2018 - 12:28 am | हुप्प्या

पत्तन हा बंदर (पोर्ट) ह्याकरता वापरला जाणाराही शब्द आहे. विशाखापट्टण बंदर आहे. श्रीरंगपट्टणला नदी आहे पण बंदर असण्याइतकी मोठी आहे का माहित नाही.

पानीपत, बागपत, सोनपत ही उत्तरेकडील काही शहरे आहेत ज्यात पत हा प्रत्यय आढळतो.

माहितगार's picture

9 Feb 2018 - 1:40 pm | माहितगार

पत्तन हा बंदर (पोर्ट) ह्याकरता वापरला जाणाराही शब्द आहे.

काही बंदर असलेल्या गावांच्या नावावरून असा कयास बांधला जाणे सहाजिक आहे . अर्थात पोस्टल पिनकोड डाटाबेस शोधात मिळालेली खालील वानगी दाखल माहिती कदाचित वेगळ्या तर्कांचा विचार करण्यास मदत करू शकेल. पट्टण हे नाव इतर राज्यांसोबत अगदी बारामुल्ला काश्मिर , कान्ग्रा हिमाचल ते गारो हील्स मेघालय पर्यंत दिसते आहे. -इकडे बंदर येण्याची शक्यता कमी डाटाबेसब्मध्ये pattan हे डबल टि वाले रुप दक्षिणे कडे जाल तसे वाढत जाते तर सिंगल टि वाले रुप उत्तरेकडे जाल तसे वाढत जाताना दिसते आहे.

मला वाटते मुख्य बाजारपेठ , राजधानीचे गाव किंवा राजकीय विभागीय मुख्यालय अशा अर्थाची शक्यता अधीक असावी. अर्थात इतर कयासही विचारात घेणे नक्कीच सयुक्तीक ठरावे. आपल्या चर्चा सहभागासाठी आभार

* Pattan BARAMULLA JAMMU & KASHMIR
* Pattanggre WEST GARO HILLS MEGHALAYA
* Pattanayakshol EAST SINGHBHUM JHARKHAND
* Pattan KANGRA HIMACHAL PRADESH

* Pattan Urf Palia GORAKHPUR UTTAR PRADESH

* Pattan PANCH MAHALS GUJARAT

* Pattan Kodoli KOLHAPUR MAHARASHTRA

* Pattan VIDISHA MADHYA PRADESH
* pattanpura GWALIOR MADHYA PRADESH

* Pattanapeta SRIKAKULAM ANDHRA PRADESH
* Pattanagere MANDYA KARNATAKA
* Pattana HASSAN KARNATAKA
* Pattanasaragu BELLARY KARNATAKA
* Pattan GULBARGA KARNATAKA
*Pattankudi BELGAUM KARNATAKA
*Pattanam VILLUPURAM TAMIL NADU
* Pattanur VILLUPURAM TAMIL NADU
* Pattaniboli TIRUVANNAMALAI TAMIL NADU
* Pattani Kollai TIRUVANNAMALAI TAMIL NADU
* Pattanam kurichi ARIYALUR TAMIL NADU
* Pattanam PUDUKKOTTAI TAMIL NADU
* Pattanampatti DINDIGUL TAMIL NADU
* Pattan koil area DINDIGUL TAMIL NADU
* Pattanam MADURAI TAMIL NADU
* pattankadu TIRUNELVELI TAMIL NADU
* Pattanamarudur TUTICORIN TAMIL NADU
* Pattandivilai TUTICORIN TAMIL NADU
* Pattanvilai KANYAKUMARI TAMIL NADU
* Pattanapatti SIVAGANGA TAMIL NADU
* Pattanendal SIVAGANGA TAMIL NADU
थकलो बर का कॉपी पेस्ट करून तामीळनाडू आणि केरळात आणखी असंख्य आहेत.

माहितगार's picture

9 Feb 2018 - 2:00 pm | माहितगार

पानीपत, बागपत, सोनपत ही उत्तरेकडील काही शहरे आहेत ज्यात पत हा प्रत्यय आढळतो.

हे रोचक आहे. प्रत्ययावरचे डाटाबेस सर्च इंग्रजी सिंपल सर्च सुविधात जरासे अवघड जातात. देवनागरी शोध मला महारास्।ट्रीय डाटाबेस मध्ये शक्य असल्यामुळे त्यात प्रत्ययात पत असलेली पालमपत, सुपतगाव, नेपत , दलपत ,स्रीपत, श्रीपत
अशा स्वरुपाची आढळली

पत चे पती होऊन प्रत्ययात आलेली गणपती शिवायची इतर महारास्।ट्रीय गाव नावे वाचण्यासाठी रोचक आहेत .

सोनापती
पिंपती
सावरपती
पिंपती
ढापती
ग्यारापती
गेव्हांडे अपती

शरद's picture

9 Feb 2018 - 8:40 am | शरद

गुजराथीत पाटनगर चा अर्थ पाहण्याआधी जर "महाराश्ट्र शब्दकोश " पाहिला असता तर ज्ञानेश्वरीपासून हा अर्थ मराठीत वापरला जातो हे लक्षात आले असते. प्रतिसादात अनेकानी दिलेले अर्थ तेथे एकत्र पहावयास मिळतील.

अवांतर :श्री. माहितगारांना ( व जाता जाता नेटिकांना.{ अल्कोहोलिक सारखा नेटिक शब्द कसा वाटतो ?} माझे एक मत मी सांगू इच्छितो. नेटवर उदंड माहिती झटकन मिळते हे मान्य करूनही जेव्हा येथील शब्दांबद्दल परदेशी/परभाषिक लोकांना भावलेला अर्थ व आपल्या पूर्वासूरींना मान्य असलेला अर्थ यात फरक असू शकतो हे लक्षात घेऊन जी माहिती इथे सहजसुलभ मिळू शकते तीही आपल्या लेखात अंतर्भूत करावी महाराष्ट्र शब्दकोश व भारतीय संस्कृतिकोश यातील माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. पाटील म्हणजे राजप्रमुख असावयाची गरज नाही. तो गावाचा प्रमुखही असू शकतो.

शरद.

माहितगार's picture

9 Feb 2018 - 2:16 pm | माहितगार

पाटील म्हणजे राजप्रमुख असावयाची गरज नाही. तो गावाचा प्रमुखही असू शकतो.

सहमत

"महाराश्ट्र शब्दकोश " पाहिला असता तर ज्ञानेश्वरीपासून हा अर्थ मराठीत

नेमकी नोंद देता येऊ शकेल का ? transliteral.org/ वर दाते कर्वे महारास्।ट्र शब्द कोश आणि इतर जुन्या साहित्यात मिळाले नाही

शरद's picture

9 Feb 2018 - 8:17 pm | शरद

महाराष्ट्र शब्दकोश , खंड 5, प ते भ, पान 1978, ( माझ्याकडी प्रत 1936)
शरद

माहितगार's picture

10 Feb 2018 - 10:05 am | माहितगार

खूप खूप धन्यवाद, चर्चीत विषया संबधाने अत्यंत उपयूक्त माहिती आहे. आपण सुचवलेली प्रत अर्काईव्ह डॉट ऑर्गवर शोधता आली. (ट्रान्सलिटरल डॉट ऑर्ग च्या महारास्।ट्र शब्दकोश संगणकीकरणात उणीव राहून गेलेल्या दिसतात.)

सर्वांच्या माहितीसाठी पान क्र. १९७८ वरील "पाट" या शब्दाचे क्रमांक २ आणि ३ वे अर्थ येथे टंकतो.

* २ . सिंहासन, गादी, पीठ; 'ते वेळी विजयश्रियेचे पाटीं | एकुचि बैसे ' - ज्ञानेश्वरी ७.१२ ; 'योगसाम्राज्य शेष पाट | तुजचि साजे ' - विपू ७.१०५.

* ३. श्रेष्ठपणाचा मुख्य मान, अधिकार . 'वरी क्षत्रीयांमाजी श्रेष्ठु | जो जगजेठी जगी सुभटु | तया दळवैपणाचा पाटु | भीष्मासी पै |' - ज्ञानेश्वरी १. ११५ ; ' एकाएकी इच्छी पाट| नेणे चाट काउळें | -तुकाराम गाथा २८७०

* ४. श्रेष्ठपणा , मोठेपणा . 'कांबाळका एकी माये - | वाचोनी जिणे काय आहे | म्हणोनी सेविजे की तो होये पाटाचा धर्मु ' -ज्ञानेश्वरी १८.९०८

अरविंद कोल्हटकर's picture

10 Feb 2018 - 3:52 am | अरविंद कोल्हटकर

पद्र - पद्रक हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ 'गाव, खेडे' असा आहे. पट-पाट ह्या शब्दांचा उगम पद्र-पद्रक शी लावणे सर्वात क्रमप्राप्त दिसते.

ह्या शब्दाचा जुना उल्लेख नाशिकलेण्यांमध्ये सापडतो असे घुर्येलिखित 'After a Century and a Quarter' ह्या पुण्याजवळील लोणीकंद ह्या गावाविषयीच्या पुस्तकामध्ये वाचनात आले.

प्रचेतस's picture

10 Feb 2018 - 8:52 am | प्रचेतस

नाशिक लेणी क्र. ३ (देवी लेणे) व्हरांड्याच्या मागील भिंतीवरील लेख.

...एतच च लेण [स] चितण निमित महादेवीय अयकाय सेवकामो पियकामो च णता ....दखिणापथेसरो पितुपतियो धमसेतूस
[ददा]ति गाम तिरण्हुपवतस अपरदखिणपसे पिसाजि पदक सवजातभोगनिरठि

ह्या लेण्याच्या अलंकरणार्थ आपल्या महादेवी आजीची (गौतमी बलश्री-गौतमीपुत्र सातकर्णीची माता) सेवा करण्याची व तिला आवडेल ते काम करण्याची इच्छा करणारा तिचा दक्षिणपथेश्वर नातू आपल्या पित्याच्या पुण्याप्राप्त्यर्थ धर्मसेतूकरिता (धर्म करुन) त्रिरश्मी पर्वताच्या नैऋत्येस असलेले पिशाचीपद्रक हा गाव सर्व प्रकारच्या उपभोगांचा त्याग करुन देत आहे.

श्री मिराशी म्हणतात की पिशाचीपद्रक गाव कुठले हे ओळखता येत नाही, पण मला ते राहून राहून पाथर्डी वाटते. आजचे पाथर्डी गावही नासिक लेण्यांच्या नैऋत्येलाच आहे. पण इतके वगळता इतर काहीही पुरावे नाहीत.

हा दक्षिणपथेश्वर नातू म्हणजे गौतमीपुत्राचा मुलगा वाशिष्ठीपुत्र पुळूवामी.

माहितगार's picture

10 Feb 2018 - 11:05 am | माहितगार

@ प्रचेतस ,

या निमित्ताने मी माझ्याकडील महारास्।ट्र गांवांच्या नावाच्या यादीचा डाटाबेस तपासला . (पदक चे रुप पद्रक होऊ शकेल) पिसाजि साठी मात्र पिसाई / पिसादेवी च्या नावावरुन महारास्।ट्रात काही गावे दिसतात तिही कदाचित तपासता येतील. माझ्याकडील डाटाबेस मध्ये पिसोरे नावाचे गाव बागलाण तालुक्यात (जि. नाशिक) दिसते आहे . दिशा अंतर आणि इतर संदर्भ मात्र जुळतात की नाही ते आपल्यासारखे विषयाचे जाणकारच सांगू शकतील.

प्रचेतस's picture

10 Feb 2018 - 11:09 am | प्रचेतस

पिसोरे वायव्येस आणि खूप लांबवर आहे.

प्रचेतस's picture

10 Feb 2018 - 11:17 am | प्रचेतस

सॉरी, 'ईशान्येस' असे वाचावे.

माहितगार's picture

10 Feb 2018 - 11:31 am | माहितगार

धन्यवाद

माहितगार's picture

10 Feb 2018 - 11:54 am | माहितगार

पिसाई नावाची गावे उत्तरप्रदेश राजस्थान गुजराथेत ही तुरळक प्रमाणात पिनकोड डाटाबेस मध्ये दिसताहेत हे नोंदवून ठेवलेले बरे

माहितगार's picture

10 Feb 2018 - 10:32 am | माहितगार

पद्र - पद्रक हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ 'गाव, खेडे' असा आहे....

हे माहित नव्हते माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आपले आणि प्रचेतसचे अनेक आभार.

माहितगार's picture

10 Feb 2018 - 11:45 am | माहितगार

* Padrakha B.O 261001 Sitapur SITAPUR UTTAR PRADESH (पद'रखा ?) उत्तरप्रदेशात या नावाची बर्‍यापैकी गावे दिसतातहेत
* Padrakha Umradha B.O 461990 Pipariya HOSHANGABAD MADHYA PRADESH
* Padrakia Gumikia B.O 762103 Baliguda KANDHAMAL ODISHA

* Padrakalipudur Gudimangalam S.O 642201 Madathukulam TIRUPPUR TAMIL NADU Padrakalipudur - हे भद्रकाली शब्दाचे पद्रकाली असे स्वरुप झाले असण्याची शक्यता आहे का ; पद + उर चे पुदुर झाले असु शकेल का
*

मुख्यत्वे बंगाल आणि ओडीसा मिळून भद्रकाली आणि भद्रक नावाची असंख्य गावे दिसतात . पद्रक हे भद्रक चे अपभ्रंश रुप असण्याची शक्यता असू शकते का

अरविंद कोल्हटकर's picture

10 Feb 2018 - 4:33 am | अरविंद कोल्हटकर

घुर्येंच्याच उपरिनिर्दिष्ट पुस्तकामध्ये ’पाटील’ चा उद्गम ’पट्टकिल’ ह्या संस्कृत शब्दामध्ये आहे असे सांगितले आहे (Perspective, p. xxv) आणि तो शब्द ह्या अर्थाने वापरला गेल्याचे ८व्या ते १२व्या शतकांतील शिलालेखांचे आधार त्यामागे दाखविले आहेत. मोनिअर विल्यम्स ’पट्टकिल’ ह्याचा the tenant (by royal order) of a piece of land असा दर्शवितो. म्हणजे राजाच्या नंतर ’पट्टकिल’ हाच एका गावाच्या भूमीचा स्वामी.

पैसा's picture

10 Feb 2018 - 4:31 pm | पैसा

http://spokensanskrit.org/index.php?mode=3&script=hk&tran_input=%E0%A4%A... इथे पट्ट शब्दाचे अर्थ बघा. शिरोभूषण, कपडा, फेटा, मुकुट इत्यादि अर्थ आहेत तसेच "चार रस्ते मिळतात ते गाव" असाही अर्थ आहे. पट्टरानी पट्टशिष्य, पट्टाभिषेक शब्दातील पट्ट आणि पट्टन, पत्तन इत्यादिमधील पट्ट याचा संदर्भाने वेगवेगळा अर्थ आहे.

पट्टला म्हणजे जिल्हा, community असे अर्थ आहेत. पट्टकिल म्हणजे tenant of a piece of land.