पद्मावत- आत्मा परमात्मा मिलनाची गाथा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
23 Jan 2018 - 8:50 am

प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नाही. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीला कठोर तपस्या करावी लागली अमीर खुसरो यांनी म्हंटले आहे:

खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.

संसार रुपी रात्र जागून काढल्या शिवाय प्रेमाची प्राप्ती नाही. प्रेम हे अलौकिक आहे. प्रेम म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन. पद्मावतच्या कथा हि आत्म्याचे परमात्म्याशी मिलनाची कथा आहे. पद्मावत महाकाव्याची कथा संक्षेप मध्ये सांगताना महाकवी जायसी म्हणतात

“तन चितउर, मन राजा कीन्हा हिय सिंघल, बुधि पदमिनि चीन्हा।
गुरू *सुआ जेई पन्थ देखावा बिनु गुरू जगत को निरगुन पावा?
नागमती यह दुनिया–धंधा।बाँचा सोइ न एहि चित बंधा।।
राघव दूत सोई सैतानू।माया अलाउदीं सुलतानू”।।

चित्तोडगढ हे माणसाचे शरीर आहे. रत्नसेन नावाचा आत्मा या शरीरात विराजमान आहे. त्याच्या मनात परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा आहे. गुरु बिना परमेश्वराची प्राप्ती संभव नाही. हिरामन नावाचा पोपट हा गुरु आहे. तो रत्नसेनला मार्ग दाखवितो. सिंहल द्वीप हे प्रेमाने भरलेले हृदय आहे. या सिंहल द्वीपात वाघ आणि बकरी एकाच घाटावर पाणी पितात. अर्थात हे हृदय प्रेमाने भरलेले आहे. सात्विक बुद्धी रुपी पद्मावती तिथे निवास करते. शरीररुपी चित्तोड मध्ये तांत्रिक राघव चेतन नावाचा शैतान हि राहतो. त्याच्या पाशी मायावी शक्ती होत्या. तो चंद्र्माच्या कला हि आपल्या शैतानी मायेच्या शक्तीने बदलू शकत होता. पद्मावती चित्तोडला येते. राघव चेतन नावाच्या शैतानाला देश निकाला दिला जातो. अर्थात ज्या हृदयात सात्विक बुद्धी आहे तिथे शैतान निवास करू शकत नाही. अलाउद्दीन खिलजी हा भोग आणी विलासात बुडालेला संसारिक मायेने ग्रस्त मर्त्य मानव आहे. तो आरश्यात पद्मिनीला बघतो. आरसा हा आभासी आहे. मायावी जगाचे प्रतिक. आरश्यातील पद्मिनी हि आभासी. मोह आणि मायेने ग्रस्त अलाउद्दीन खिलजी आभासी पद्मिनीच्या प्राप्तीसाठी चित्तोडवर आक्रमण करतो.

महाकाव्याच्या अंती गुरुचे मार्ग दर्शन, प्रेमपूर्ण हृदय आणि सात्विक बुद्धी (पद्मावती)च्या सहाय्याने शरीराचा त्याग केल्यावर आत्मा आणि परमात्म्याचे मिलन होते. अलौकिक प्रेमाचा विजय होतो.

राजपूत स्त्रिया हवन कुंडात सर्वस्व अर्पण करतात, सती होतात. राजपूत योद्धा संपूर्ण चित्तोड गढाला अग्नीत अर्पण करतात व युद्धात प्राणांची आहुती देतात. सर्वस्व अर्पण केल्यावर त्यांना हि अलौकिक प्रेमाची प्राप्ती.

संसारिक मोह मायेला सत्य समजणाऱ्या अलाउद्दीन खिलजी काय प्राप्त होते. शरीर नष्ट झाल्या वर बाकी राहते फक्त शरीराची धूळ किंवा चितेची राख. खिलजीच्या हाती राख आणि धूळी शिवाय काहीही येत नाही.

सारांश भोग आणि विलासितेत बुडालेल्या संसारिक जीवाला मुक्ती नाही. अलौकिक प्रेमाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. पद्मावतच्या माध्यमाने महाकाव्याची महाकवी जायसी यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सुआ : हिरामन पोपट

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

23 Jan 2018 - 10:11 am | अनिंद्य

सुंदर लिहिले आहे.
गागर में सागर !

गामा पैलवान's picture

23 Jan 2018 - 1:44 pm | गामा पैलवान

विवेकपटाईत,

या रूपक काव्याची ओळख करवून दिल्याबद्दल आभार! :-)

आ.न.,
-गा.पै.

ज्योति अळवणी's picture

23 Jan 2018 - 6:20 pm | ज्योति अळवणी

खूप छान लिहिलं आहात. I hope सिनेमा देखील इतका तरल व्यक्त झाला असेल

पगला गजोधर's picture

25 Jan 2018 - 2:57 pm | पगला गजोधर

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: January 25, 2018 3:47 AM

बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. १८० कोटींचा बजेट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी भन्साळी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला कसून मेहनत करावी लागली. चित्रपटाच्या घोषणेपासून ते राजपूत समाजाच्या विरोधाला सामोरे गेले. कथानकावरून निर्माण झालेला असो, राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिल्जीमध्ये प्रेमप्रसंग चित्रीत केल्याचा आरोप असो, राजपूतांची प्रतिमा मलिन केल्याची टीका असो, भन्साळींनी सर्व गोष्टींचा सामना केला. प्रदर्शनावरून अजूनही देशभरात प्रचंड गदारोळ सुरू आहे. मात्र, चित्रपट पाहिल्यावर त्यात वादग्रस्त असे काहीच नाही हे सहज लक्षात येते. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणांवरून हे रणकंदन सुरू आहे, असा प्रश्न तुम्हाला पडल्यावाचून राहणार नाही.

इतिहासाची मोडतोड करून या चित्रपटाची निर्मिती केल्याचा आरोप राजपूत करणी सेनेने सुरुवातीपासूनच केला आहे. तर याउलट ‘पद्मावत’मध्ये राजपूतांची गौरवगाथाच सांगण्यात आली आहे. सौंदर्यासोबत उत्त्म योद्धा आणि चाणाक्ष बुद्धिमत्ता असलेल्या महाराणी पद्मावतीच्या शौर्यगाथेचे चित्रण यामध्ये करण्यात आले आहे. चित्रपटातील प्रत्येक दृष्यामध्ये दीपिका पदुकोण डोक्यापासून पायापर्यंत झाकलेली आहे. मोजक्या संवादात चेहऱ्यावरील हावभावांनी लक्ष वेधणारी, नजरेनं कसदार अभिनय करणारी दीपिका कुठेच खटकत नाही. तरीही तिच्या व्यक्तिरेखेवर आक्षेप का घेण्यात आला, हे कळत नाही.
अलाउद्दीन खिल्जीला आरशात अवघ्या काही सेकंदासाठी राणी पद्मावतीचा चेहरा दाखवला जातो. त्यानंतर संपूर्ण कथेत त्या दोघांचा कधीच सामना होत नाही. तरीही खिल्जी आणि राणी पद्मावतीमध्ये प्रेमप्रसंग चित्रीत केल्याचा आरोप का केला जात होता, हे कोडं उलगडत नाही. चित्रपटाच्या शेवटी महारावल रतन सिंह आणि अलाउद्दीन खिल्जी यांच्यातील तलवारबाजीचं दृश्य आहे. या युद्धात खिल्जी विश्वासघात करून महारावल रतन सिंह यांना मारतो, असे दाखवण्यात आले आहे. त्यातही आक्षेपार्ह असे काही नाही. नेटकी पटकथा, चांगले संवाद आणि अप्रतिम भव्यता हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरतात. तरीही चित्रपट न पाहताच करणी सेनेकडून तीव्र विरोध का होत आहे, हा प्रश्न अखेरपर्यंत पाठ सोडत नाही.

माहितगार's picture

25 Jan 2018 - 6:03 pm | माहितगार

....इतिहासाची मोडतोड करून या चित्रपटाची निर्मिती केल्याचा आरोप राजपूत करणी सेनेने सुरुवातीपासूनच केला आहे. तर याउलट ‘पद्मावत’मध्ये राजपूतांची गौरवगाथाच सांगण्यात आली आहे. ...

गौरवगाथा सांगितल्या म्हणजे इतिहासाची मोडतोड होत नाही ही लॉजीकल फॉलसी असावी . एनी वे यातल राजस्थान पद्मावत्/पद्मावरीती संदर्भ काढून टाका . गौरवगाथा आणि इतिहासाची मोडतोड महाराष्ट्राच्या परिपेक्षात चर्चा करा , आणि कोण कोणते वाद हातात येतात ते आठवा .

माहितगार's picture

25 Jan 2018 - 6:05 pm | माहितगार

मी दुसर्‍या बाजूस समजून घेण्याचा प्र्यत्न करत असलो तरी मुलतः अभिव्यक्ती स्वतंत्रतावादी हे माहित नसणार्‍यांसाठी नोंदवून ठेवलेले बरे.

पगला गजोधर's picture

26 Jan 2018 - 9:40 pm | पगला गजोधर

प्रत्यक्ष चित्रपट आताच पाहून आलोय, व
वरील लोकसत्तातील परिक्षणाला माझे अनुमोदन.

चौथा कोनाडा's picture

23 Jan 2018 - 11:26 pm | चौथा कोनाडा

सुरेख लिहिलंत !
छान रसग्रहण केलं आहे.

सहा लाखांच्या वर हिट्स मिळवलेला पदमावत मधल्या पोपटा वरचा एक स्टॅण्ड-अप कॉमेडी शो !

https://www.youtube.com/watch?v=xwihPlmHQlA

पैसा's picture

25 Jan 2018 - 7:26 pm | पैसा

छान लिहिलय

manguu@mail.com's picture

26 Jan 2018 - 6:46 pm | manguu@mail.com

थ्री डी कसा आहे?

मुम्बैत व्यवस्थीत सुरु आहे असे वाटते