कुणी घरटं देतं का घरटं !

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
18 Jan 2018 - 11:02 pm

(लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे.)

आपले लहानपण 'एक घास चिऊचा , एक घास काऊचा' असे ऐकण्यात गेले. 'चिऊताई चिऊताई दार उघड असे विनवणारा कावळा आणि त्याला न जुमानणारी चिमणीही असायची. माणसाला हा नखरेलपणा बहुधा आवडला नसावा. अक्षरक्षः रस्त्यावर आणले हो त्याने दोघांना. कावळ्यालाही पिंडापुरते ठेवून त्याचाच पराचा कावळ केला. आज ते दोघे 'कुणी घरटं देतं का घरट' असा चिवचिवाट करत असतील असं उगीचच वाटत राहत.

पण मला खात्री आहे की पक्ष्यांची ही भाषा माणसाला कधी कळणारच नाही. स्वताः निर्माण केलेल्या भाषेतच तो एवढा गुतूंन पडला आहे की निसर्गाची एक शब्दाविना चालणारी भाषा असते हे तो विसरुनच गेला. एखादा जास्त(च) शिकलेला पोरगं आपल्याच आईवर रुसुन बसावं तसा माणूस निसर्गावर रुसुन बसला आहे असेच वाटते. म्हणजे संपत्तीतमद्धे तर हक्क पाहिजे पण आईवडिलांच्या दवापाण्याचा खर्च झेपत नाही असे रडगाणे गाणारी जमात म्हणजे मनुष्य.

ही जमात पर्यावरणसारखा विषयही चार भितींच्या खोलीत बसून शिकते. अख्या पर्यावरणाला काही मोजक्याच पानात गुंडाळून पन्नासपैकी मार्क पदरात पाडते. प्रदूषण कसे टाळावे याची चर्चा थंडगार ए.सी. खोलीत बसून फ्रीजचे थंडगार पाणी पित होत असते.

पण याच जमातितील काहींना वास्तवाचे भान असते. पक्ष्यांच हरवलेलं घरटं ते एकतर शोधत तरी असतात वा पुन्हा नव्याने बांधत तरी असतात. जैवविविधता , अन्नसाखळी , परस्परपुरक संबंध असे शब्द त्यांनी केवळ वाचलेलेच नसतात तर अनुभवलेलेही असतात.

मुळात एखादा पक्षी नामशेष होत आहे हे कसे ओळखतात ? जर दहा वर्षात वा तिन पिढ्यांमद्धे पक्ष्यांची संख्य ८० टक्क्यांपेक्षा कमी झाली तर ती जमात अस्तंगत होत आहे असे मानतात. तसेच १०० चौरस कि.मी. अंतरात पक्ष्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी त्यांची संख्या २५० पेक्षा कमी असते ते अस्तंगत होत आहेत असे मानले जाते. या सर्व प्रक्रियांचे आजपर्यंत पाच भाग पाडले आहेत.

१ ) अॉर्दोव्हिसियन = ४५०- ४४० दशलक्ष पुर्वीचा काळ. यात ६०-७० टक्के प्राणी नष्ट झाले.

२) लेट डिव्होनियम = ३७५-३६० दशलक्ष वर्षापुर्वीचा काळ. यात टप्याटप्याने अनेक जाती नष्ट झाल्या.

३) पार्मिअन = २५१ दशलक्ष वर्षापुर्वीचे युग. यात ९६% समुद्री जलचर आणि ७० % भूचर प्राणी नष्ट झाले.

४) ट्रायसिक = २०० दशलक्ष वर्षापुर्वीचा काळ. यात ७५% सजीच प्रजाती नष्ट झाल्या. डायनॉसॉर्सचा जन्म याच काळात झाला.

५) क्रेटासिअस = अलीकडील ६५ दशलक्ष वर्षापुर्वीचा काळ. यात अनशीघातामुळे अनेक प्रजाती लोप पावल्या. पक्षी आणि सस्तन प्राण्यांचा उदय हा या काळातील आहे.

पक्ष्यांच्या उदयापासुनच त्यांच्या अस्तित्वावर चोहोबाजूंनी हल्ले होत आहेत. पुर वादळे यांसारख्या माध्यमातून कधी निसर्ग कोपतो तर आधूनिक शेती , फोफावलेली मासेमारी जलविद्युत प्रकल्पांच्या तारा अशा एक ना अनेक गोष्टी पक्ष्यांच्या नाशाला कारणीभूत ठरत आहेत.

वनविभागाकडे आवश्यक मनुष्यबळ आजही उपलब्ध नाही. स्थानिकांचा आणि वनविभागाशी संपर्कही येत नाही. जरी आला तरी सामान्यांकडून दिलेल्या अनुभवी सल्ल्याकडे दुर्लक्ष केले जाते.

आय. यू. सी. एन म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कॅझर्वींग नेचरच्या अहवालानुसार सुमारे दहा टक्के पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आहे. ज्या नव्या प्रजातिंचा शोध लागत आहे त्यांना यामद्दे समाविष्ट केल्यास हा आकडा चक्क २५ टक्क्यांपर्यंत जातो ! नेचर मॅगझिममधल्या अहवालानुसार २०५० पर्यंत १५- ३७ % प्रजाती नष्ट होतील.

सोलापुरात आढळणारा माळढोक हा ग्रेट इंडियन वस्टर्ड नावाने अोळखला जातो. पिवळसर पाय डोक्यावर काळी पिसे , चॉकलेटी पंख व पाठ असा याचा राजवतार
२००९ मद्धे जे २१ माळढोक होते २०१० साली त्यांची संख्या अवघी नऊवर आली. ज्यात दोन नर सहा माद्या आणि एक पिल्लू आढळले.

हिमालयीन लावा , गुलाबी डोक्याचे बदक , डोडो या पक्ष्यांना आपण नामशेष केलेले आहे. मौआ पक्षी जेव्हा संपुष्टात आले तेव्हा त्यांच्यावर अवलंबून असलेले शिकारी हास्ट गरूडांनिही आपला गाशा गुंडाळला.

या सर्व समस्यांवर उपाययोजना केव्हाच चालू झाल्या आहेत. पण त्यांच्या मर्यादाही स्पष्ट आहेत. एखाद्या प्रजातितले सगळेच पक्षी कधीच मोजले जाऊ शकत नाहित. काही पक्ष्यांबाबत योग्य संशोधनही झालेले नाही. काही पक्ष्यांचे देशांतर होत असते. अशा पक्ष्यांना दोन देश्यांच्या सामंजस्यातून संरक्षण मिळणे जिकरीची गोष्ट असते.

यांसारख्या परिस्थितीवर मात करत आय. यु.सी. एन. सोबत झुऑलॉजी सोसायटी लंडन , वल्ड लाईफ इंटरनॅशनल , वल्ड कन्झर्वेशन मॉनिटरींग सेंटर यांसारख्या संस्था काम करत आहेत.यामुळे १६ प्रजातिंना वाचविण्यात यश आले आहे आणि १८ प्रजातिंना असलेला संभाव्य धोका कमी झाला आहे.

मोठमोठ्या संस्थांप्रमाणेच सामांन्यांनाही करण्यासारखे बरेच आहे. जादव पायेंग यांचे उदाहरण जगप्रसिद्ध आहे. अवघे जग कारखाने उभे करण्याचे स्वप्न बघत असताना या अवलियाने चक्क जंगल उभे केले आहे. हे जंगल जवळपास १३६० कि.मीम क्षेत्रामद्धे विस्तारलेले आहे.

शेतीच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल करणे ज्यात डायक्लोफेनॅकसारख्या विषारी अौषधाचा वापर टाळणे , मासेमारीचे क्षेत्र मर्यादित करणे गरजेचे आहे.

यासोबत रोजचा एसी , रेफ्रीजरेटरचा मर्यादित वापर , गाड्यांचा कमीतकमी उपयोग यामुळे विस्कटलेले घरटे कदाचित पुर्ण बांधून होणार नाही पण त्यास काडीचा आधारमात्र लाभेल. शेवटी घरटे तयार होते ते अश्या असंख्य काड्यातूनच...

समाजमाहिती

प्रतिक्रिया

लेखाशी सहमत आहे. याविषयावरील माझा एक जुना धागा देत आहे.

शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव

सानझरी's picture

19 Jan 2018 - 1:25 pm | सानझरी

लेखाशी सहमत आहे.

+ १ .. आपण आपल्या परिने काड्यांचा आधार देऊ शकतोच. गेल्या दहा वर्षांपासून आमच्याकडे मुनिया येतात. त्या फक्त पावसाळ्याच्या आसपास ३-४ महिनेच यायच्या. पण गेल्यावर्षी पासून वर्षभर मुक्काम आहे. ठराविक महिने येऊन त्या कात्रजच्या घाटात परत जायच्या. गेल्या काही वर्षांपासून तिथे प्रचंड बांधकाम झालंय. पुर्वी कात्रज चौक ओलांडला कि जरा पुढे जाऊन हिरवागार घाट सुरु व्हायचा, आता बोगद्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलं तरी बांधकामं संपत नाहीत. जिथे आम्ही मोर बघायला जायचो तिथे आता शाळा उघडलीये. पक्ष्यांचा अधिवास विगाने नष्ट झालाय.
(माझ्या एका ओळखीतल्या मुलीला पक्षीच आवडत नाहित. 'पक्ष्यांची फडफड' तिला आवडत नाही. मकर संक्रांतीत पतंगांच्या मांज्यांमुळे खुप पक्षी मारले जातात असा विषय निघाला तेव्हा 'बरंय, मरू देत सगळे पक्षी' असं तिचं मत होतं. अशी माणसं आजुबाजुला असली कि निसर्गाच्या बाबतीत प्रचंड निराशावादी वाटायला लागतं.)