साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत : ५व्या दिवसाच्या खेळाचा Analysis

राखीव खेळाडू's picture
राखीव खेळाडू in काथ्याकूट
18 Jan 2018 - 2:53 pm
गाभा: 

#FreedomSeries : #SAvsIND
Test02 , #Day05

आत्महत्या करायला निघालेल्या माणूस जंगलात जातो आणि तिथे एक शिकारी बाण मारतो, तो चुकून या माणसाला लागतो आणि मग तो शिकारी आपण कसा उत्कृष्ट आहे हे छातीठोकपणे सांगतो अशीच काहीशी अवस्था ५व्या दिवशी पाहायला मिळाली...
या वाक्याने कुठेही साऊथ आफ्रिकेच्या बॉलर्स चा अपमान करायचा नाही पण एकदा Fall of Wickets पहिल्या तर लक्षात येईल कि आत्महत्या करणारा कोण आणि शिकारी कोण ते...

म्हणजे तुम्ही मरायचंच ठरवलं तर गोळी लागून काय, बाण लागून किंवा गाडी खाली चिरडून... मृत्यू हा निश्चित...

बरं आधीच्या इंनिंग मध्ये आपण रन आऊट च झालो आहोत, रन आऊट होणे हे सर्वात जास्त मूर्खपणा ची विकेट ठरते कारण हि काही वन डे मॅच नाही जिथे अगदी 50 डॉट बॉल ने प्रेशर वाढेल... जेव्हा गरज आहे पीच वर खंबीर उभा राहायची त्याच वेळी असे आऊट होणे हे अपेक्षित नाही... At least from Batsman like Pujara!!

हार्दिक पंड्या यांना हार्दिक शुभेच्छा कारण त्यांनी परत एकदा आपण कसे गट फीलिंग वर खेळणारे आहोत आणि आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही या थाटात Out side the off stump चा बॉल जो साधारण टेस्ट मॅच मध्ये सोडून द्यायचा असतो तो मारून विकेट दान केली त्या दानशुर हार्दिक चे कौतुक...

रोहित शर्मा वाटले कि mature होतोय आणि धोकादायक पण... अगदी तेव्हाच (आदल्या ओव्हर मध्ये आपला एक कॅच पूल करताना सुटलेला असताना परत तसाच शॉट मारून आपण मुंबई इंडियन च्या हार्दिक पंड्या चे कॅप्टन असल्यामुळे आपण बापाला 'न' आजोबाला पण घाबरत नाही) अश्या थाटात Deep Fine Leg ला ABD कडे कॅच उडवून यजमान संघाला आपली विकेट बहाल केली...

बोलण्यासारखे काहीच न उरल्यामुळे हा Analysis!!

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

18 Jan 2018 - 3:18 pm | कपिलमुनी

पहिल्याच लेखामध्ये चिडून प्रकाशित करण्याचे बटण ६ वेळा दाबले गेल्याने ६ धागे निघालेत.
त्यामुळे तुम्हाला हिट विकेट आउट देण्यात येत आहे.

राखीव खेळाडू's picture

18 Jan 2018 - 4:01 pm | राखीव खेळाडू

पहिल्यांदाच लेख लिहायचा प्रयत्न त्यात प्रकाशित करण्याची घाई नडली.. पुढील वेळे पासून नक्की काळजी घेईन..

जिन्क्स's picture

18 Jan 2018 - 8:07 pm | जिन्क्स

अगदी बरोबर. एवढ होऊनही कोहलीचा उद्दामपणा ( ज्याला त्याचे चाहते Agression म्हणतात) काही कमी होत नाही.

कपिलमुनी's picture

18 Jan 2018 - 8:22 pm | कपिलमुनी

क्रिकेटवर तळमळीने लिहिलेला लेख बऱ्याच दिवसांनी वाचला ! असेच लिहीत रहा

मुक्त विहारि's picture

18 Jan 2018 - 8:31 pm | मुक्त विहारि

संदीप पाटील आणि कंपनीने अशाच विकेट फेकून, इंग्लंड विरूद्धची एक मॅच अशीच घालवली होती. (दुसरी कसोटी, १२ ते १७ डिसेंबर १९८४)

अर्थात त्या मॅचच्या आधी पण, हे असे अवसानघातकी फलंदाजीचे भारतीय खेळाडूंचे किस्से झालेले आहेत, आजही होतात आणि पुढेही होतील.

भारतीय संघाच्या बाबतीत एक कविता चपखल पण लिहिलेली आहेच...

मरे एक त्याचा दूजा शोक वाहे.

अकस्मात तो ही पुढे जात आहे.

दुर्गविहारी's picture

18 Jan 2018 - 8:48 pm | दुर्गविहारी

मुळात आपल्या क्रिकेट रसिकांचे कौतुक ज्यांना आपला संघ भारताबाहेर जिंकेल असे वाटते. त्यासाठी फक्त झिंम्बाबे, केनिया, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा हेच दौरे आखायला हवेत म्हणजे उपखंडाबाहेर आपण जिंकु शकतो असा दावा करता येईल. वेस्ट ईंडीज, श्रीलंका इथे आपण कदाचित जिंकु शकु.
आता सध्याचा दौरा. बरेच जण अंजिक्य रहाणेला घ्यायला हवे म्हणतात. पण जो सध्या भारतातही धावा करत नाही आहे तो त्याचा सध्याचा फॉर्म विचारात घेता रबाडा, फिलँडर, मॉर्केलसमोर उभा राहु शकेल असे मला तरी वाटत नाही. त्याच्या गुणवत्तेविषयी शंका नाही, पण सध्या तो परफॉर्मन्स दाखवु शकेल असे वाटत नाही. बाकीच्या नगांविषयी काय बोलणार ?
मुरली विजय हा गुणी खेळाडू, पण त्याने द. अफ्रिकेचे खेळाडू कसे खेळतात याचा अभ्यास करायला पाहिजे हे जाणवते. बाकी राहुल, धवन आणि तथाकथित हिटमॅन रोहित शर्मा हे फक्त भारतातच उजेड पाडू शकतात. रोहित शर्माला घ्यायचेच असेल तर त्याला ओपनिंगला पाठवावे असे माझे मत. नाही तरी कोणालाही पाठवले तरी पन्नाशीच्या आतच आपले आघाडीवीर गुंडाळले जाणार हे उघड आहे.
मला पुजाराचे आश्चर्य वाटते आहे. त्याच्या डोक्यातुन २०१७ ची पिच गेलेली नाहीत असे वाटते. दोन्ही डावात धावबाद होणे हा तर बालिशपणा झाला.
कोहली फलंदाज म्हणून उत्तम आहे तितकाच खेळाडू म्हणून फालतु आहे. चिडखोरपणाने चेंडू आपटणे, अगम्य फिल्डींग लावणे, चुकीची खेळांडूची निवड हे सगळे यावर्षीच्या परदेशातल्या मालिका पहाता नक्कीच भोवणार.
हार्दिक पांड्याला पांढर्‍या कपड्यात पहाताना हेलन, बिंदु, मल्लिका शेरावत, मलिईका अरोरा वगैरे सतिसाध्वी वटपौर्णिमेला अंगभर साड्या नेसुन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यासारखे वाटते. जास्तीतजास्त टि-२० चाच हा खेळाडू आहे.
ईंशात शर्माला बहुतेक त्याचे आडनाव फलदायी ठरते असे दिसतयं. नेमके दिल्ली कनेक्शन काय आहे ते पहायला हवे. त्या एवजी भुवनेश्वरकुमार हा कधीही चांगला पर्याय.
मुळात श्रीलंकेसारखा कमजोर संघ भारत दौर्‍यावर आला होता, त्याचा फायदा घेउन बॉलिंगला अनुकुल पिच बनवली असती तर थोडाफार फायद झाला असता. तशीही हरण्याची भिती नव्ह्ती. पण आपल्याला बहुधा प्रेक्षकांची जास्त काळजी असावी, त्यांना चौकार, षट्कारांची बरसात बघायला मिळावी, थोडी शतके व्हावीत, तथाकथित हिटमॅनची द्विशतके व्हावीत या हव्यासापोटी चांगली संधी गमावली. तेव्हा हे पुर्ण वर्ष पराभवाचे असेल अशी लक्षणे आहेत. वास्तविक या धोक्याचे सिग्नल आपल्याला कलकत्ता कसोटीत व धर्मशाळेच्या एक दिवसीय सामन्यात दिसले होते. पण अतिआत्मविश्वास नडला.
अर्थात सध्याची परिस्थिती विचारात घेता ना आपण कधी द. अफ्रिकेला त्यांच्या देशात हरवु ना ते आपल्याला आपल्या देशात हरवु शकतील. थोडक्यात अगदी ऑस्ट्रेलियासहित सगळे संघ अपने गली मे शेर आहेत.
तेव्हा पराभव डोक्यातून काढून आपला संघ तिसर्‍या कसोटीत तरी काही शहाणपणा आणि मुख्य म्हणजे लढावु वॄत्ती दाखवेल अशी अपेक्षा करु या. बाकी तिसर्‍या कसोटीचाही काय निकाल लागणार ते सांगायची गरजच नाही. ;-)

गामा पैलवान's picture

20 Jan 2018 - 3:47 am | गामा पैलवान

मला वाटतं की अजिंक्य रहाणेने सरळ कसोटी क्रिकेट सोडून द्यावं आणि आयपियेल मधनं बक्कळ पैका कमवावा. नाहीतरी कक्रिने फायदा काय होणारे!
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2018 - 11:07 pm | श्रीगुरुजी

पराभवाचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पाय रोवून फलंदाजी करू शकणारे फलंदाज या संघात एकदोनच होते. त्यातला पुजारा दुसर्‍याही डावात निष्काळजीपणे धावबाद झाला. कोहली व मुरली विजय आदल्या दिवशीच बाद झाले होते. उर्वरीत बहुतेक सर्व फलंदाज आयपीएलच्या पात्रतेचे आहेत. त्यामुळे पराभव अटळ होता.

संघनिवड तशीही परीपूर्ण नव्हती. भुवनेश्वरला वगळण्याचा निर्णय धक्कादायक होता. रहाणे भारतात अयशस्वी ठरला होता तरी त्याचे तंत्र चांगले आहे व तो परदेशात बर्‍यापैकी खेळू शकतो हे सिद्ध झाले आहे. तो अधिकृतरित्या उपकर्णधार असूनसुद्धा त्याला बाहेर ठेवणे अनाकलनीय होते. रोहित शर्मा व पंड्या ऐवजी भुवनेश्वर व रहाणे असते तर फरक पडू शकला असता.

भारतीय गोलंदाजांचे मात्र कौतुक केले पाहिजे. दोन्ही कसोटी सामन्यात द. आफ्रिकेचे सर्व २० फलंदाज बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले आणि तेसुद्धा मर्यादित धावा देऊन. पहिल्या दोन कसोटीतील ४ डावात आफ्रिकेची सर्वाधिक धावसंख्या आहे ३३५. म्हणजे गोलंदाजांनी आपले काम चोख बजावले. फलंदाजांनी मात्र पूर्ण निराशा केली. मुरली विजय ४ पैकी ३ डावात, धवन २ पैकी २ डावात, राहुल २ पैकी २ डावात, पुजारा सर्व ४ डावात, कोहली ४ पैकी ३ डावात, रोहित शर्मा ४ पैकी ३ डावात, पटेल २ पैकी २ डावात, साहा २ पैकी २ डावात व पंड्या ४ पैकी ३ डावात अपयशी ठरले. त्यातल्या त्यात अश्विननेच दोनवेळा ३५ चा टप्पा ओलांडला.

भारताला दोन्ही कसोटीत चौथ्या व पाचव्या दिवशी फलंदाजी करावी लागली ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायला हवी. भारताऐवजी आफ्रिकेने शेवटी फलंदाजी केली असती तर त्यांचेही असेच हाल झाले असते.

असो. तिसरा कसोटी सामना २४ जानेवारीला सुरू होणार आहे. निदान तिसर्‍या कसोटी साठी तरी रोहित शर्मा, पंड्या व बुमराह ऐवजी रहाणे, भुवनेश्वर व उमेश यादवला आत आणावे. राहुलऐवजी पुन्हा एकदा धवन हा पर्याय चालू शकेल.

दुश्यन्त's picture

21 Jan 2018 - 7:18 pm | दुश्यन्त

दिवस फिरले की सगळ्याच गोष्टी फसत जातात हे सध्या भारतीय टीम बद्दल लागू होत आहे. जिंकत असताना पण आपण चुका करत होतो मात्र विजयापुढे त्या झाकून जात होत्या. या दौर्यात आपले बॉलर चालले (आफ्रिकेचा सर्वोत्तम स्कोअर ३३५ हे वर लिहिले आहेच, तसेच त्यांच्या कडून अजून कुणी शतक मारले नाही) पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात आपण त्यांना १३५ मध्ये गुंडाळून सामना आपल्या कडे फिरवलाच होता मात्र नंतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. बाकी दोन्ही कसोटी पाहता पंड्या , पुजारा ज्या प्रकारे धावबाद होतात, मुरली विजय , रोहित अवसान घातकी फटके खेळून विकेट बहाल करतात हे पाहता आपण २-० ने मागे आहोत याचे आश्चर्य नाही.
आता आपला मराठी मीडिया बाकी काही होवो राहणे संघात नाही याला अवास्तव महत्व देतात. राहणे उत्तम फलंदाज आहे , कसोटी साठी उपयुक्त आहे मात्र रहाणे आत आला म्हणजे आपण जिंकलोच असा काही अविर्भाव असतो तो चूक आहे. दुसऱ्या कसोटीत संघ (प्लेयिंग ११) जाहीर झाला तेव्हा भुवनेश्वरला वगळले हि मोठी बातमी असायला हवी होती (पहिल्या कसोटीत त्याने पहिल्या तासातच आफ्रिकेला जोरात हादरे दिले होते) ते सोडून आपले मराठी वृत्त वाहिन्या '.. रहाणे संघात नाहीच' असल्या बातम्या देत होत्या.रोहित आणि रहाणे यात निवड करताना त्यांचा सध्याचा फॉर्म पाहून कर्णधाराने निवड केली असेल तर फक्त आपला (मराठमोळा वगैरे) म्हणून राहणेचा सूर आळवणे ठीक नाही.बरं रोहित पण मुंबईचाच खेळाडू आहे. बाकी दोन्ही कसोटीत रोहितची कामगिरी पाहता आता त्याला वगळून राहाणेला संधी द्यायला हरकत नाही.
गम्मत म्हणजे भुवनेश्वर ऐवजी शमी, बुमराह, इशांतला बाहेर ठेवायचे होते असे लोक म्हणत होते त्या तिघांनी दुसऱ्या कसोटीत चांगला खेळ केला मात्र तरीही जोरात फॉर्म असताना आणि पहिल्या कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भुवीला वगळून विनाकारण त्याचे मनोधैर्य खच्ची केले गेले . पुरेसा सराव नसणे आणि श्रीलंका वगैरेंना आपल्या आणि त्यांच्या देशात जाऊन धुलाई करून आल्याने आपले खेळाडू हवेत होते. जिंकताना पण आपल्या अश्या चुका होतच होत्या पण विजयापुढे त्या झाकून जात होत्या आता आपण हरत आहोत त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर टीका होणार हे धरून चालायचे.

हरू द्या की. अधूनमधून हरणं चांगलं असतं. म्हणजे पाय जमिनीवर आणि डोकं ठिकाणावर राहतं.

गामा पैलवान's picture

21 Jan 2018 - 9:22 pm | गामा पैलवान

एक इतिहासकार म्हणून रामचंद्र गुहा हा माणूस मला फारसा पसंत नाही. मात्र या लेखातली त्यांची निरीक्षणे चोख व दखलपात्र आहेत (इंग्रजी दुवा) : http://www.espncricinfo.com/story/_/id/22157239/virat-kohli-arrogance-he...

लेखातलं हे विधान अर्थपूर्ण आहे : With this demographic and financial base, India should always and perennially have been the top team in all formats of the game.

गांगुलीने बक्कीस विजयाची सवय लावली. बक्कीत कुणाला तरी आपला संघ सतत विजयी व्हायला नको होता. माझ्या मते त्याचं बहुतेक कारण असंकी एकंच संघ सातत्याने जिंकंत राहिला की सट्टेबाजांचा तोटा होतो. त्यामुळेच की काय ग्रेग च्यापेलला आणून दादोबांची नाकाबंदी करण्यात आली.

-गा.पै.

तिसऱ्या कसोटीमध्ये आता पर्यंत तर पूर्णपणे बॉलर्सचीच चलती आहे. आफ्रिकन बॅटिंग तर आपल्यापेक्षा पण बेभरवश्याची आहे. आपली बॅटिंग कागदावर ( फक्त कागदावरच!) तरी त्यांच्यापेक्षा उजवी वाटते. आपल्याला अतिआत्मविश्वास आणि निष्काळजीपणा भोवला आहे.